Short story in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | लहान कथा

Featured Books
  • I SAW A ANGEL

    I saw a angel. I call her lexi  "ഹേയ്, ഹലോ.ആരെങ്കിലും എന്നെ...

  • ഡെയ്ഞ്ചർ പോയിന്റ് - 15

    ️ കർണ്ണിഹാരയെന്ന ആ സുഗന്ധ പുഷ്പം തന്നിൽ നിന്നും മാഞ്ഞു പോയിര...

  • One Day

    ആമുഖം  "ഒരു ദിവസം നമ്മുടെ ജീവിതം മാറുമെന്ന് ഞാൻ എപ്പോഴും വിശ...

  • ONE DAY TO MORE DAY'S

    അമുഖം

    “ഒരു ദിവസം നമ്മുെട ജീവിതത്തിെ ഗതി മാറ്റുെമന്ന് ഞാൻ...

  • ഡെയ്ഞ്ചർ പോയിന്റ് - 14

    ️ കർണ്ണിഹാര ചോദിച്ച ചോദ്യത്തിന് വ്യക്തമായ ഒരു ഉത്തരം കണ്ടെത്...

Categories
Share

लहान कथा

१} विमान
 प्रकाशनं एकदा विमान पाहिला. विचार केला आकाशी उडीन. त्यानं एक कागदाचा विमान बनवला. त्याला पंख लावले. त्यात एका माणसाचे चित्र ठेवले. नाव दिलं प्रकाश. आता रोजच प्रकाश आकाशात उडू लागला.बोध- स्वप्न मोठं असेल तर ते पुर्ण होणारच. 
२} लबाड उंदीर
 एकदा एका उंदरानं भीतीपोटी सापाशी मैत्री केली. म्हणे, "मी तुला मदत करणार."  एवढ्यात शिकारी आला. त्यानं सापाला पकडलं व तो त्याला नेवू लागला. त्यानं बराच आवाज लावला. परंतु उंदीर मदतीला आलाच नाही. साप निघून गेल्यावर उंदीर आनंदानं नाचू लागला. बोध- लबाडाशी मैत्री करु नये.३}  खरी मैत्री गंपूला पोहणे कठीण वाटायचे. त्यानं एका बेडकाशी मैत्री केली.  बेडूक म्हणाला, "गंपू माझ्याकडे ये. मी पोहायला शिकवतो."गंपू बेडकाकडे गेला आणि पोहणे शिकला.बोध- चांगल्या मित्राचीच संगत खरी लाभदायक असते.४}  चॉकलेटचिंकी चॉकलेट खाणारी मुलगी. ती फारच चॉकलेट खायची. आज तिनं चॉकलेट खाल्ली नव्हती. चिंकीनं एकदा स्वप्न पाहिलं. स्वप्नात अळी आली. म्हणाली, " मी तुझ्या दातातील अळी. मला आज चॉकलेट मिळालं नाही. चॉकलेट दे. नाहीतर मी तुलाच खाते."         थोड्या वेळाचा अवकाश. तिला जाग आली व तिनं त्या दिवसापासून चॉकलेट खाणे सोडले.बोध - चांगल्या वस्तू खाणे आरोग्याला फायदेशीर असतात.५}  खरा आनंदरिंकीचं दूध पिवून झालं नव्हतं. एवढ्यात मिंकी मांजर आली. तिला लहान लहान पिल्लं होती. तिला भूक फार लागली होती. रिंकीला दया आली व तिनं तिला दूध दिलं. दूध पिवून मिंकी मांजर आनंदानं झोपी गेली. त्याचा फार मोठा आनंद रिंकीला झाला होता.बोध- दुसर्‍यांना मदत करण्यातच खरे समाधान लाभते.६} कावळ्याची मदत काल एक कावळा बराच तहानलेला व उपाशी होता . आबानं त्याला वडापाव दिला. आज आबा  म्हातारे होते व उपाशी होते. कावळ्यानं ते पाहिलं. आज त्याच कावळ्यानं आबाला  वडापाव आणून दिला होता. ७) मदतढंपू गाढव गवतावर विचार करीत चरत होते. विचार होता, आपण माणसाला मदत करायची नाही. आपण मदत करतो, तरी ते बेईमान होतात.         गाढवानं मदत करणं बंद केलं. मग माणसानंही त्याला मदत करणं बंद केली. एवढ्यात पावसाळा आला. गाढव ओलेचिंब झालं. आता त्याला माणसाची आठवण येवू लागली होती. बोध- कोणी केलेले उपकार विसरु नयेत.बोध- आपण एखाद्याला केलेली मदत व्यर्थ जात नाही.८) शानचितू सिंह जंगलचा राजा होता.तोच जंगलाची शान होता, आता जंगल स्मशान झाले होते झाडं शेतीसाठी मकानासाठी रस्त्यासाठी कटली होती आता जंगलात झाडं नव्हती  पाऊस पाणी पडत नव्हते जंगलात प्राणी राहात नव्हते चितूनं विचार केला, त्यानं गणू माकडाशी मैत्री केली गणूनं झाडं लावली जंगल हिरवंगार झालं जंगलात प्राणी आले. पक्षी आले.मोर नाचायला लागले. सिंहोबाची शान वाढली. अन् सारेच कसे आनंदी झाले. म्हणून झाडे आपण लावूया. पाऊस पाणी बोलवूयाबोध- झाड म्हणजे पर्यावरणातील एक महत्वाचा घटक. म्हणून झाडं लावावीत.९) परीवर्तन         रवी पतंग उडवीत होता. एक दिवस त्यानं चिमण्यांचा चिवचिवाट सुरु ऐकला. एक चिमणी म्हणाली, "काय बाई लोकं, त्यांना कळत नाही की पतंगानं चिमण्यांचा जीव जातो."          ते बोलणं जवळच उभा असलेला रवी ऐकत होता. त्यानंतर तो हसला व त्यानं पतंग उडविणं बंद केली.१०) परीक्षा          गरुडराणी झाडाच्या फांदीवर उंचावर बसून होती. तिचा पती पिल्लांची देखभाल करण्यासाठी घरट्याच्या खाली ताटकळत होता. तिनं जमीनीवर पाहिलं, एक माणूस दारु पिऊन आपल्या पत्नीला मारत होता. तशी ती खाली येवून त्याच्या पत्नीला म्हणाली,           "वेड्या बाई, माझ्यासारखी परीक्षा घेतली असती, तर असे घडलेच नसते."          त्या महिलेनं ऐकलं व घटस्फोट झाला. बोध- कोणतीही गोष्ट करण्याआधी ती चांगली की वाईट हे पडताळून पाहावे.११) निरीक्षण         मंजूळा पाचव्या वर्गात शिकणारी मुलगी. मुलगी फारच हुशार. परंतु दुर्दैवानं आईबाप मरण पावले. शिक्षण गेलं.           मंजूळा असहाय्य झाली. शिकण्याची इच्छा मारली गेली. परंतु ती निरीक्षण करायची. झाडं, फुल, फळ, पक्षी यांच्याशी बोलायची. निसर्गात रमायची. त्यातून ती शिकली. तिनं शेतकऱ्यांचं जीवन पाहिलं. खंत वाटली व कालानुकालीक मोठी होताच तिनं एक यंत्र काढलं. ज्याचा शेतकऱ्यांना उपयोग होत होता. बोध:- केवळ शाळेत शिकणं महत्वाचं नाही. परीसरही जास्त शिकवून जातो.१२) सुप्त गुण           मृग महिना लागला होता. पावसाची सर आली होती. बाबूराव मातीच्या घरात होता. तशी भिंत पडली व त्यात बाबूरावचे दोन्ही पाय गेले. परंतु बाबूरावनं हिंमत हारली नाही.         बाबूराव विचार करु लागला. आपण काहीच करु शकत नाही. तशी त्याला एक मुंगी म्हणाली,          "वेड्या कायर माणसा, मी मुंगी, निसर्गातील लहान जीवन. मोठमोठी पहाड चढते."         बाबूरावनं तिचं ऐकलं. तिचा त्याला हेवा वाटला व त्यानंही निर्धार केला. मी एवरेस्ट चढणार. आज त्यानं एवरेस्ट शिखर पादाक्रांत केलं होतं. बोध:- प्रत्येकात सुप्त गुण असतात. त्यासाठी जाबवंतासारखा गुरु हवाच. १३) ऑपरेशन           आई बाजारातून घरी आली. प्रत्येकाला खाऊ दिला. ज्यातून लहानग्या आरुषीला विषबाधा झाली.  आरुषीचं पोट दुखू लागलं. त्यानंतर तिला दवाखान्यात नेलं. एक्सरे काढला गेला व निदान झालं. तिच्या पोटात घासणीच्या ताराचा लहानसा तुकडा गेला होता. तो ऑपरेशननं बाहेर निघणार होता.          ऑपरेशन झालं व तुकडा बाहेर निघाला. आईनं सुस्कारा सोडा. देवाचे आभार मानले. बरं झालं की अनर्थ टळला. बोध:- बाहेरचं जीनस विचारपुर्वक खावे.१४) बोलणं       मुलं बोलत होती. ते पाहून सर म्हणत होते, 'शांत बसा.' मुलं ऐकत नव्हती. सरानं बोलणंच बंद केलं.बोध- कोणाला सुधारायचे असेल तर आपणच आधी सुधारावे  १५) जन्म       अनुसयाची आजी आजारी होती. तिला आजीची चिंता होती. वाटत होतं आजी जाणार.          वसंत आला होता. झाडांना पालवी फुटली होती. अनुसया बागेत खेळत होती. एवढ्यात एक पिकलं पान पडलं. तिला आश्चर्य वाटलं. एवढ्यात पान म्हणालं, "काय आश्चर्यानं बघतेय. अगं मी गळून पडणारच नाही तर नवीन पालवी येणार कशी?"         पानानं म्हटलेले शब्द. अनुसयानं ऐकले व ती समजली की एक जीव जातो. मगच नवीन जीव जन्म घेतोय. आपली आजी जाणार. परंतु त्या जागेवर नवीन जीव जन्म घेवून येणार.बोध - मृत्यू हेच जीवन आहे. १६) आधार        गुणी कोकीळा झाडावर बसून रडत होती. ते रडणं होतं, गाणं नव्हतं. तिला तिचा पती आज वात्रट बोलला होता, म्हणाला होता की तू ऐतखाऊ आहेस. सुंदर नाहीस. मी बरा आहे. म्हणून तुझी शान आहे.          पावसाळा आला होता. तिच्या पतीला थंडी वाजत होती. कोकीळेनं ते पाहिलं. तिनं रडणं सुरु केलं. भाषा  समजत नसल्यानं इतरांना ते गाणं वाटलं. ते धावत आले. त्यांचं मनोरंजन झालं. बदल्यात त्यांनी तिला मदत केली व तिच्या पतीचा जीव वाचवला.बोध- कोणताही व्यक्ती स्वभावाने वाईट नसतोच.  १७) मदतगंपू उंदीर बिळात होता. त्याला विचार होता. आपण जगायचं कसं? बाहेर निघालो तर मांजरीची भीती आणि बिळात असलो तर सापाची भीती. एवढ्यात त्याला एक उपाय सापडला. त्यानं काजव्याला आमंत्रीत केले. आता तो भयमुक्त झाला. आता तो आणि काजवा सुखात बिळात राहू लागले होते.बोध- निर्भीडपणा हाही एक अलंकार आहे. १८) सुधारणा       गजू बगळा पाण्यात उभा होता. त्याचे डोळे मिटले होते. मात्र मासोळ्यांना माहीत होतं की तो आंधळ्याचंच सोंग करतोय आणि तो तसाच करायचा व वागायचाही.          एकदा एका खेकड्यानं बगळ्याचे पाय पकडले व तो खोल पाण्यात खेचू लागला. तोच बगळा 'मदत करा, मदत करा' असे ओरडायला लागला होता. त्यातच बाकी मासोळ्यांना त्याची मजा वाटायला लागली होती. त्यांना वाटत होते की या बगळ्याने त्याचे अख्खे कुटूंबचे कुटूंब खाल्ले. तोच एक वयोवृद्ध मासोळी म्हणाली, "चला धावायला पाहिजे."          वयोवृद्ध मासोळीनं त्याला मदत करावी म्हटलं. परंतु कोणीच सरसावलं नाही. तोच ती पुढं गेली व खेकड्याला इजा करु लागली. ते पाहून बाकीच्याही मासोळ्या धावल्या व बगळ्याला बंधमुक्त केलं. आता बगळ्याला आपली चूक समजली होती व त्यानं आता मासे पकडणं बंद केलं होतं.बोध- कुणाचेही कोणी वाईट करु नये.१९) चुकीवर पश्चाताप         अंशू नावाचा एक माकड. माकड फार शहाणा होता. एकदा अति शहाणेपणानं त्यानं संतू आणि बंतू मांजरीचा वाद सोडवला केळी फस्त करुन. मग मांजरांना केळीचा एकही कण न मिळाल्यानं ते बदला घेण्याची वाट पाहात होते. अशातच एक दिवस मांजराची शेपूट ओंडक्यात अडकली. माकड ओरडू लागलं.         माकडाचं ओरडणं मांजरींना ऐकायला आलं. त्या आल्या. त्यांनी माकडाची फजिती पाहिली व त्याला आठवण करुन दिली. त्यानंतर माकडाला पश्चाताप झाला व त्यानं माफी मागितली. ते पाहून मांजरांनी त्याला मदत केली.         चूक झाली होती. ती चूक लक्षात येताच माकडानं बरीच केळी मांजरांना चारली होती.बोध- वात्रट वागण्यापुर्वी आपल्या बाळाचा विचार करावा२०) सुगीचे दिवस         झाडावर पक्षी बसले होते. पाऊस येत नव्हता. तसा दुष्काळ पडला होता.           दुष्काळ जसा गावात होता. तसा जंगलातही होता. झाडं रडत होती. आपण संपतो की काय? परंतु ते रडणं एका चिमणीला दिसलं. चिमणीनं कारण विचारलं, तेव्हा झाड म्हणालं, "काय करावं. पावसानं दगा दिला. पाणी नाही प्यायला. आम्ही जगावे कसे?"         चिमणीनं ऐकलं. सगळ्यांना सांगीतलं. कोणी ऐकेना. तेव्हा ती स्वतःच उडत गेली. तिनं तळं शोधलं. चोचीत पाणी आणलं. चोचीत पाणी तरी किती येणार. परंतु ती कृती इतरांनी पाहिली. त्यांनी चिमणीला सहकार्य केलं. झाडं हिरवीगार झाली. तसा दुष्काळ संपला आणि सुगीचे दिवस सुरु झाले. बोध- संकट येणारच. जो संकटात मदत करतो. तोच खरा मित्र असतो.२१) उपकार          आनंद आनंद देणारा मुलगा. एकदा तो आजारी पडला. त्याच्या आईवडीलांनी बरेच उपाय केले. परंतु तो बरा होत नव्हता. ते पाहून त्याच्या आईवडीलांना चिंता पडली.           एकदा ते एका झाडाच्या खाली बसले होते. निराश होते. ते पाहून झाडानं विचारलं, "काय झालं?" त्यावर त्यानं आपबीती सांगीतली. तसं झाड म्हणालं, "वेड्या माणसा, "माझ्या पानाचा रस दे त्याला. तो लवकरच बरा होईल."         आनंदच्या पालकांनी तसंच केलं. आनंद ठणठणीत बरा झाला. त्यानं झाडाचे उपकार मानले व झाडं लावायला सुरुवात केली.  बोध- चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळत असते.२२)  लाजाळूपणा रिंकू पोपट फार लाजाळू होता. तो लाजाळूपणानं अजिबात बोलत नव्हता. तसं त्याचं वागणं पाहताच मालकानं त्याला विकायचं ठरवलं. आता रिंकू घाबरला. दुसरा मालक कसा मिळतोय. याचा त्याला विचार येवू लागला. तोच त्याला ढंपी मनीमावशी म्हणाली, "रिंकू बोलायला सुरुवात करतांना पुढे मुर्ख लोक बसलेले आहेत असं समज व बोल. तू बोलू शकशील."          रिंकूनं तसंच केलं व तो बोलायला लागला. आता तो मालकाच्या घरची गोड फळे खात असे. त्याचबरोबर तो गोडही बोलत असे. बोध- लाजाळूपणा हा घटक आपल्यातील दुर्बलता वाढवत असते. २३) सुधा अळी          सुधा अळीनं विचार केला. माणसे आपल्याला चांगलं खायला देत नाही. उलट आपण पानं खाल्ली की तो पानावर औषधी फवारुन आपले वंशज मारुन टाकतात. आपण त्याला धडा शिकवायला हवा.          एकदा तसा विचार करीत सुधा झाडाच्या फळात शिरली. त्यानंतर ती अतिशय गुप्तपणे माणसाच्या शरीरात. ज्यातून माणसांना रोग झाला व माणसे मरायला लागली होती. पाहता पाहता भरपूर माणसं मरण पावली होती. बोध- आपल्यापेक्षा कुणालाही कमजोर समजू नये.  २४) सायकल        सीमी श्वान सायकल चालवत होता. तो श्रीमंत होता. तशी रिमी मांजर गाडी चालवत होती. ती गरीबच होती व ती त्याला नेहमीच चिडवत असे.          एकदा सीमी रस्त्यानं चालला होता. तेव्हा त्याला रिमी दिसली. ती रडकुंडीला आली होती. गाडी ढकलता ढकलत नव्हती. तसं सीमीनं कारण विचारलं. रिमी म्हणाली, "काय करु, गाडीत पेट्रोल नाही. म्हणून ढकलतोय. परंतु थकल्यानं जीव रडकुंडीला आलाय."         सीमीनं तिला सायकल चालवण्याचा सल्ला दिला. आता रिमी सायकल चालवते व तिला काही समस्या आली तरी कोणताच त्रास होत नाही. बोध- आपल्याला झेपेल, तेच काम करावं. दुसऱ्याचा द्वेष करु नये.२५) भीती       गायत्री लहान होती. तिनं एक दगड पाण्यात टाकला. तसे तरंग निर्माण झाले. तिला मजा वाटत होती. तशी ती त्या पाण्यात दगड फेकू लागली. त्यात तिला बऱ्याच जणांनी समजावले तर ती ऐकली नाही. एवढ्यात एक साप तिच्या मागे धावला व धावता धावता म्हणू लागला, "जर यापुढे तू दगडं मारली तर पहातच राहा."         ते सापाचं बोलणं. त्या दिवसापासून घाबरलेली गायत्री आता पाण्यात दगडं मारत नाही. बोध- संस्काराची जपणूक करण्यासाठी कधीकधी भीती आवश्यक असते.२६) शिकणे           फातिमा अभ्यास करीत नव्हती. तिचं मन लागत नव्हतं अभ्यासात. ती नापास होत होती. त्यातच तिचे वडील परेशान झाले होते. काय करावं सूचत नव्हतं. एवढ्यात त्यानं पाहिलं की एक मुंगी भिंत चढत आहे व पडत आहे. त्यातच त्याला माहीत होते की ती भिंत चढणार. तेच दृश्य त्यानं आपल्या मुलीला दाखवले.          मुलीनं त्या दृश्याचं निरीक्षण केलं. त्यानंतर त्या मुंग्या भिंत चढून जाताच तो आपल्या मुलीला म्हणाला,          "बघ ही मुंगी. तुझ्यापेक्षाही लहान आहे. तरीही ही एवढी मोठी भिंत चढते आणि तू साधी परीक्षा पास होत नाही."         फातिमानं ते ऐकलं. तिला वाईट वाटलं. त्यानंतर ती अभ्यासाला लागली. त्यानंतर ती अभ्यासाचे मोठमोठे पर्वत चढू लागली होती.   बोध- मुक्या प्राण्यांपासूनही बरंच काही शिकता येतं.       २७) काम        अपर्णा घाईघाईनं दुकानात पोहोचली होती. तिला आई ओरडली होती सामान आणण्याबद्दल. कारण ती काम ऐकत नव्हती. तशी तिनं चिठ्ठी दिली.          अपर्णानं सामान घेतलं व तिनं ते न मोजता घरी आली. घरी आईनं सामान तपासलं. त्यात एक सामान नव्हतं. तसं आईनं अपर्णाला विचारलं. अपर्णा काहीच बोलली नाही. तशी आई अपर्णाला घेवून दुकानात गेली व दुकानात त्या वस्तूबद्दल विचारलं. परंतु दुकानदार मान्य झाला नाही. त्यानंतर आई निराश होवून घरी आली. तिनं अपर्णाला म्हटलं,           "अपर्णा, पाहा, लोकं असेच मुर्ख बनवतात. म्हणून मी तुला रोजच दुकानात पाठवते. त्याचं कारण आहे तू शिकावं व तुला पुढे मोठमोठे व्यवहार करता यावेत."        ते आईचं बोलणं. अपर्णा काय समजायचं ते समजली. आता ती रोजच आईनं काम सांगताच दुकानात जात असे व हुशारीनं व्यवहार करीत असे. आता ती एवढी हुशार बनली होती की कोणीही तिला व्यवहारात मुर्ख बनवीत नव्हता. बोध- आईचा राग धरु नये.२८) पश्चाताप       पुढे दूध ठेवलं होतं. पिंकी मांजर दूध पिणार होती. तिला भूक फार लागली होती. इतक्यात तिचं लक्ष एका उंदरावर पडलं. उंदीर खेळत होतं.          पिंकीनं उंदरावर झडप मारली.  उंदीर पळून बिळात गेलं. अशातच दुधाचं पातेलं तिच्या झडप घालण्यानं पडलं. दूध वाया गेलं होतं.            पिंकीच्या हातून शिकार गेली. दूधही गेलं. भूकही क्षमली नाही. आता पिंकीला पश्चाताप होवू लागला होता.    बोध- लोभ ही अतिशय वाईट सवय आहे.२९) कसाई        श्रद्धा बकरीला आपल्या बाळाची चिंता होती. बाळ मोठं झाल्यावर त्याला कापायला नेतील. ती काय करावे याचा विचार करीतच होती. अशातच कसाई आला. त्यानं तिच्या बाळाला पाहिलं. तिला राग आला. काय करावे सुचेनासं झालं. अशातच तिला आठवलं. आपल्याला शिंगे आहेत. शिंगाचा योग्य वापर करायला हवा.           तिचा तो विचार. ती विचारच करीत होती. एवढ्यात श्रद्धानं आपली अगाढ ताकद लावून त्याच्या पोटात आपली शिंग खुपसली. तसा कसाई खाली पडला. रक्त वाहू लागलं व तो क्षणातच गतप्राण झाला. बोध- मुक्या प्राण्यांना त्रास देवू नये.३०) शाप       अक्कू झाडू मारत होती. तिनं झाडू मारला, तेव्हा बक्कू मुंग्यांची रांग उध्वस्त झाली. ज्यात तिचा परिवार होता. त्यांनी तिला शाप दिला. "तुझाही परिवार असाच उध्वस्त होईल."         काळ गेला व कालांतरानं आजारात अक्कूची चारही मुलं मरण पावली. आता तिला मुंगीचा शाप आठवत होता. परंतु आता त्याचा काही उपयोग नव्हता. बोध- आपण दुसर्‍यांना त्रास दिला, तर प्रारब्धही आपल्याला त्रास देत असतो.३१) हलकं काम        मंगू झाडू मारत होता. तसं ते काम त्याच्या शेजारी राहात असलेल्या चंगूला हलकं वाटत होतं. तो सारखा तिला चिडवत होता. कारण चंगू सरकारी नोकरदार होता.         काळ पालटला. तसा चंगू एका  अफरातफरच्या खटल्यात अडकला. त्यात वाटोळं झालं व भीक मागायची पाळी आली. जेव्हा मंगूला हे माहीत झालं, तेव्हा त्यानं त्याला न चिडवता समजावून सांगीतलं की कोणतंही काम हलकं नसतंच.         काही दिवसानं चंगूची परिस्थिती पालटली. परंतु आता तो आलेल्या परिस्थितीतून शिकला होता. तो आता कुणाला चिडवीत नव्हता. बोध- १) परिस्थिती आपल्याला सगळं शिकवून जात असते.          २) कोणतेही काम हलके नसते.३२) मोबाईल        सुरेखाला आवडत होती पुस्तक. ती त्यातील गीतं वाचत होती. मात्र वसीम तिला हसायचा. त्याला वाटायचं की अलिकडील काळात मोबाईल बरा की तो एका क्लिकवर गोष्ट शोधून देवू शकतो.         वसीमचं बरोबर होतं. कारण काळ बदलला होता. मोबाईलला जास्त महत्व आले होते.           एकदा वसीमचा मोबाईलमुळं अपघात झाला. ज्यात डॉक्टरांनी सांगीतलं, "मोबाईल चालवायचा नाही. वेडा होशील. हं, पुस्तक वाचू शकतोस."        आता त्याच्या सोबतीला पुस्तक होती. कारण तो मोबाईल चालवू शकत नव्हता. बोध- कोणत्याही गोष्टीला चिल्लर समजू नये.