Sankhya Re - 5 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | सख्या रे ..... भाग -5

The Author
Featured Books
Categories
Share

सख्या रे ..... भाग -5

निल कारच्या पॅसेंजर सीटवर बसून म्हणाला"तुला नाही समजणार भाई... तुला हृदय नाही आहे ना .... मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्या मनाने मला सांगितलं कि हीच ती मुलगी आहे जिला मी शोधात होतो.... भाई तीच माझं खार प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करेन... इनफॅक्ट मी ठरवलं आहे कि डॅडच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर मी त्यांना अक्षराला मागणी घालायला तिच्या घरी जायला सांगेल....."


अबीर हसत म्हणाला"फ्युचर प्लॅनींग चांगली आहे पण आपण जसा विचार करतो तस होईलच असं नाहीये..."




<<<<<<<<<<आता पुढे>>>>>>>>>>


नाश्ता करता करता अक्षरा तिच्या आठवणीतून बाहेर पडते... आणि विचार करते ..... कि त्या वेळेस किती छान दिसत होते ना....ते.... पण ना ते तेव्हा माझ्याकडे बघत होते ना आज.... 


असा विचार करत अक्षरा तिचा नाश्ता संपवते... आणि तिची प्लेट साफ करते... आणि तिचे कपडे आणि टेबलावर ठेवलेला नाष्टा बघते.... तिला वाटत कि कबिरने राघवला या सगळ्या गोष्टी आणायला सांगितल्या असाव्यात... पण त्यांना माझी एवढी काळजी का वाटत आहे...?एवढ्याच विचारात अक्षराचे डोळे चमकले आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि ती आनंदाने हॉलमधल्या सोफ्याकडे निघाली आणि तुटलेला कप उचलू लागली..... 

इकडे अबीर राघवसोबत एका रेस्टोरंटमध्ये जातो एका टेबलावर बसून कोणाची तरी वाट पाहू लागतो ....... 


"सर कोणी येत आहे का....?आज सकाळी तुमची मिटिंग असल्याचं मला आठवत नाहीये..."राघव अबीरच्या चेहऱ्यावरील परेशान बघून म्हणाला.... 

राघवच्या बोलण्याला अबीर प्रतिसाद देत नाही आणि त्याचा फोन उचलतो आणि कॉल करतो ...."कुठे आहेस तू....?मी तुझी जास्त वेळ वाट बघत बसणार नाहीये... मला टॉन्ट मारण्याआगोदर स्वतः आधी वेळेची करायला शिक..."फोनच्या पलीकडून कॉल आला"जस्ट शट अप .... मी रेस्टोरंटमध्येच आहे तुझ्या मागे बघ...."


फोनवरच संभाषण ऐकून अबीरमागे वळून पाहतो... तर एक मुलगी पांढऱ्या जीन्सवर जांभळ्या रंगाचा कोट आणि पायात हाय हिल्स घालून उभी होती... तिने तिचे केस एकत्र करून पोनी बनवलेली असते... आणि तिच्या चेहऱ्यावर खूप मेकअप करून कडून स्माईल करत असते.... 


अबीर तिच्याकडे एक नजर टाकतो आणि त्याच्या असिस्टंटकडे पाहतो.... यामुळे राघव त्याच्या जागरवरून उभा राहतो आणि त्या मुलीकडे जातो आणि तिला ग्रीड करतो..... 

"गूड मॉर्निंग मिस नैनिका ... तुम्ही वेंगसहून कधी प्रतलात तिथं तुमचं काम चंगळ झालं ना....."


नैनिका राघवकडे पाहते आणि थोडस हस्ते आणि कोणतंही उत्तर न देता ती अबीर च्या जवळ येऊन उभी राहते.... आणि त्याला बोलते"मला वाटलं होत कि तू तुझ्या जागेवरून माझ्यासाठी उभा राहशील... पण तुझ्या या ऍटिट्यूडने मी इंम्प्रेस झाले आहे..."



नैनिकाकडे न बघता अबीर कडक स्वरात म्हणतो...."मी तुला इन्म्प्रेस करायला आलो नाहीये... तुझा गैरसमज कमी कर... आणि तुला जे काही बोलल्याचं अशी ते लवकर बोल .... मी तुला फक्त दहा मिनिट देतोय ..... 


अबिरचा टन ऐकून नैनिकाला जरा राग येतो पण इगावर नियंत्रण ठेवत ती खुर्चीवर बसते आणि बोलते...."काही दिवसाआधी तुझी आणि त्या मुलीची नाव काय तीच...(ती तिच्या डोक्यावर जोर देत....)हा अक्षरा .... तुमच्या लग्नाबद्दल चालणाऱ्या न्यूज आणि तुमच्या लग्नाबद्दल तुमचा काय म्हणणं आहे मिस्टर अबीर बिर्ला...?तुम्ही विसरलात असाल तर ती तुम्हाला आठवण करून देते कि तुम्ही माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केलं होता... तुम्हाला त्याचा अर्थ माहितीय का ...?"


अबीर नैनिकाकडे रागाने पाहत म्हणाला"मला पुन्हा...पुन्हा... आठवण करून देण्याची गरज नाही.... मला सर्वकाही चंगळच माहिती आहे...."

त्यावर नैनिका हसत म्हणाली"सगळं समजूनही तुला त्या मुलीने फसवलं ... त्या मुलीने असं काय केलं....?तुला काही नशेच्या पिल्स दिल्या होत्या का...?मला माझ्या असिस्टंट कडून कळलं कि ती कोणत्याही गरीब कुटूंबातली नाहीये... पैसा आणि स्टेट्सच्या बाबतीत ती तुझ्या किंवा माझ्यापेक्षा कमी नाहीये ... मग तिने तुला तिच्या बेडवर का नेलं....?तुझ्याकडे पाहून वाटत नाही कि तुला तिच्याजवळ जायचं असेल... त्या मुलीला श्रीमंत आणि बॅचलर मुलासोबत झोपायला आवडत का...?सर्वात श्रीमंत मुली चांगल्या नसतात .... काही त्या मुलीसारख्या म्हणजे अक्षर सारख्या भ्रष्ट देखील... असतात...."



नैनिकाचं बोलणं ऐकून मनात अक्षराबद्दल भावना नसतानाही अबीरला ते आवडत नव्हतं... त्याच्या डोळ्यासमोर अक्षराचा फेस येत होता.... 


त्यामुळे तो उभा राहतो आणि कठोर स्वरात म्हणतो ...."जर तुला त्या मुलीबद्दल गॉसिप करायची असेल तर तुझ्या सारख्या कोणाशी तरी कर... लोकांच्या चारित्र्यावर कमेंट करायला तुझ्याइतका मोकळा वेळ माझ्याकडे नाहीये..."

अबीरला कठोर स्वरात बोलताना पाहून नैनिकाला तिच्या आत चाललेलं वादळ थांबवता आलं नाही आणि ती उठून उभी राहते आणि अबीरच्या रंगाची जाणीव असूनही ती त्याला बोलते "तू माझ्यावर अश्याप्रकारे ओरडू शकत नाहीस ... त्या मुलीसोबत घालवलेल्या रात्रीची किंमत तुला चुकवावी लागेल... आठवत्यानं आपण आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मेन्शन केलं कि जर आपल्यापैकी कोणी दुसऱ्याची फसवणूक केली तर तो फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या नावावर त्याच्या कंपनीचे ५१%शेअर्स हस्तांतरित करेल.... एक तर त्या मुलीला डिवोर्स दे नाहीतर तू पेपर तयार करशील कि मी ..... विचार करून मला मेसेज करून देशील ..."




असं म्हणत नैनिका टेबलावरून तिची पार्स उचलून रेस्टोरंटमधून बाहेर पडली आणि अबीर त्याच्या मागे उभा असलेल्या राघवला म्हणाला "मला आज संध्याकाळपर्यँत पार्टीची CCTV फुटेज हवी आहेत...."


कबिरच्या तागाच्या भीतीने राघवन त्याला एस सर म्हणत ऑफिसमध्ये जायचं का विचारतो... अबीर कांठीं उत्तर ना देता रेस्टोरंटमधून निघून जातो आणि पूर्ण वेगाने त्याच्या ऑफिसच्या दिशेने गाडी चालवू लागतो... 

राघव कबिरला जाताना पाहतो आणि विचार करतो..."हि नैनिका आता का अली आहे हे मला कळत नाही, मी तर आधीच सांगितलं होत कि कुठलंही कॉन्ट्रॅक्ट करू नका .... पण असिस्टंट्सचं कोण ऐकत... आता माहिती नाही मिसेस बिर्ला याच काय होईल ते...हि नैनिकाने तिचा उद्देश पूर्ण कारल्याशिवाय राहत नाही...." असा विचार करून राघव CCTV फुटेज काढायला निघून गेला.... 

गाडी चालवताना कबिरला नैनिकाने अक्षराला एक अय्याश मुलगी बोलल्याचं आठवत.... त्यामुळे तो ब्रेक देऊन गाडी थांबवतो आणि तो त्याचा फोन काढतो आणि राघवला कॉल करतो आणि म्हणतो..."CCTV तुला पाहायची गरज नाहीये,... ते थेट माझ्याकडे पाठव ..."

अबीर च्या बोलण्यामागचं दडलेलं कारण राघव ला समजलं नाही.... तरीही त्याने काहीही न विचारता 'ओके सर' म्हणत फोन ठेवला.. 

इकडे हॉलमध्ये तुटलेलं काप साफ केल्यावर अक्षर थोडं वेळ टीव्ही बघते... आणि मग उठून घरच्या प्रत्येक खोलीकडे बघून तिला वाटत... अबीर इथे एकटाच राहतो का...?तरीही घर इतकं स्वच्छ आहे... अबीर ने हि साफसफाई केली असेल का...?

एवढ्या मोठ्या घरात एकटी राहिल्याने अक्षराला भीती वाटत होती... मग ती पुन्हा हॉलमध्ये येते... आणि टीव्ही बघत बसते... ते बघून तिची भीती थोडी कमी होते.... मग टीव्ही अचानक बंद होतो त्यामुळे अक्षरांची कमी झालेली भीती पुन्हा वाढते आणि ती..ती चे पाय उचलते आणि सोफ्यावर कुरवाळत बसते.... 

सोफ्यावर बस्तान ती तिच्या हाताकडे बघते आणि तिला आठवत कि तिने तीच सर्वात प्रिय आणि चमकदार ब्रेसलेट गमावलं आहे, ज्यामुळे ती उभी राहते... आणि सोफ्याबवती ब्रेसलेट शोधू लागते... तिथे नाही भेटल्यावर अक्षर अस्वस्थ होते आणि घरात सगळीकडे शोधू लागते.... 

ब्रेसलेट न मिळाल्याने , अक्षर निराश होऊन बसते... आणि दुखी मनाने कबिरच्या खोलीत पार्ट येते आणि बेडवर बसून मनात विचार करत असते... "माझ्या वाढदिवशी डॅड ने ते दिल मला गिफ्ट केलं होत... पण आता ना डॅडने दिलेलं ब्रेसलेट माझ्याजवळ आहे ना ते... 
दरम्यान , अबीर त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतो आणि नैनिक आणि अक्षर या दोगांनाही विसरून आपल्या कामात व्यस्त होतो... रात्री दहाच्या सुमारास तो त्याच्या असिस्टंट राघवला फोन करतो आणि त्याला CCTV फुटेजबद्दल विचारतो..... 

राघव त्याला सांगतो कि त्याने फुटेज काढलं आहे आणि तो ते त्याच्या जुहू गार्डनमधील बंगल्यासमोर उभा आहे... हे ऐकून अबीर ने त्याला ऑफिसमध्ये यायला सांगितलं... पण राघव नकार दत्त म्हणाला"तुमच्या घरचे लाईट्स तर ऑन आहे... मिसेस बिर्ला घरी आहेत का..?आणि तस असेल तर मी हे फुटेज तुमच्या स्टडी रूममध्ये ठेवतो.... तुम्ही टी घरी येऊन बघितलं तर बर होईल...."


राघवच बोलणं ऐकून अबीर अक्षराचा विचार करतो आणि इच्छा नसतानाही तो राघवला हम्म बोलून होणं ठेवतो..... 



फोन ठेवल्यावर अबीर च्या मनात एक दोन वेळा विचार येतो कि त्याने लवकरात लवकर घरी जाऊन ते CCTV चे फुटेज बघावं... पण नंतर त्याच्या मनात येत कि CCTV फुटेजमध्ये त्या मुलीने त्याला औषध दिल असेल तर...?मग काय होईल..?ते दिसलं तर...?


का माहित नाही पण त्याचा विचार करत असतानाच अबीर ला अस्वस्थ वाटू लागत... मग तो त्याच्या चेयर वरून उठतो आणि ऑफिसच्या केबिनमध्येच इकडे तिकडे चक्कर मारायला लागतो... 


दुसरीकडे राघवन अबीर च्या मेन्शनच्या दाराची बेल वाजली आणि अक्षराने दरवाजा उघडला.... 


अक्षरा पाहून राघव एक स्माईल कारतोआणि तिला ग्रीट करत बोलतो "मिसेस बिर्ला मला मिस्टर कबिरच्या स्टडी रूममध्ये काही काम आहे..."

अक्षराने काहीही न बोलता बाजूला होते... त्यामुळे राघव तिच्या साईडने घरात येतो आणि स्टडी रूमच्या दिशेने जायला लागतो... काही वेळातच तो पेण्ड्रॉइव्ह तिथे ठेवल्या वर तो हॉल मध्ये परततो आणि निघण्यापूर्वी अक्षराला बोलतो "तुम्हाला जेवण आणि कपडे कपडे आवडले ..?मी काही चुकीचं तर घरून नाही ना आलो...?"


राघवच्या बोलण्याला अक्षरा उत्तर देत म्हणालाय"तुम्ही सगळ्या वस्तू बरोबरच विकत घेतल्या आहेत.... अबीर घरी येणार नाहीये का ...?"


राघव काही वेळ विचार करून म्हणाला "ते घरी येतील कि नाही माहित नाही... कारण ते अजून ऑफिसमध्येच आहेत... पण ते ऑफिसमध्ये एवढा टाइम झाला काय करत आहेत हे सगन खिन्न आहे... कारण सर्व कर्मचारी एवढ्यात निघून गेले असतील...."एवढं बोलून राघव थोडं हसत घरातून निघून जातो.... 


राघवच बोलणं ऐकून अक्षराच्या मनात विचार येतो कि "त्यांना माझ्यापासून दूर राहायचं आहे म्हणून ते ऑफिसमध्ये आहेत का...?"मग तिला आठवत कि कश्याप्रकारे काल सकाळी अबीर ने सांगितलं होत कि माझी बायको होण्याचा प्रयत्न करू नकोस ... हा विचार करत अक्षरा च्या पापण्या अश्रुनी ओल्या होतात आणि ती दरवाजा बंद करते... आणि थेट स्वयंपाकघरात जाते... फ्रिज मधून काही खायला बाहेर काढते आणि गरम करते... ती डायनींग टेबलवर बसते आणि जेवायला लागते .... जेवताना ती सकाळचा विचार करते... अबीर ने माझ्यासाठी जेवण आणि कपडे मागवले ... पण ते अजून घरी नाही आलेत... ते मला एका क्षणी आनंदात आणि दुसऱ्या क्षणी दुःखात ढकलतात...?


हा विचार करून अक्षरा च मन भरून येते आणि ती माजवता तिच्या खोलीत निघून जाते... रूममध्ये गेल्यावर ती बाल्कनीत जाऊन उभी राहते.... आणि रात्रीच्या अंधारात बघू लागते... तिथे तिला स्वतःलाच जास्त ऐकत जेवढं तिला तिच्या आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं.... रात्रीच्या अंधारात एका मोठ्या घरात ऐकत राहून तिला भीतीची भावना देत होत ... ज्यामुळे ती बाल्कनीतून परत खोलीकडे येते आणि स्वतःला ब्लॅकेट ने झाकून झोपते.... अथृनवर पडून राहून ती स्वतःला पटवून देते कि काही होणार नाही... जगात अनेक लोक असे एकटे राहता... अबीर घरी न आल्याची काळजी आणि तिची भीती तिला झोपू देत नव्हती.... मग ती स्वतःला ब्लँकेट मध्ये झोकवून राहते.... 


अक्षरा सोन तासापेक्षा जास्त वेळ अशीच पडून राहते... पण तिच्या डोळ्यात झोपेचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते... त्यामुळे तिने उठून हॉलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला... मग ती स्वतःला ब्लँकेटमधून बाहेर काढते... आणि तिची चप्पल घालते ... तेवढ्यात तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज येतो आणि ती चालत जात खिडकीजवळ उभी राहते... आणि खाली पाहते... अबीर गाडीतून उतरून खिशात हात घालून उभा राहून त्याच्या मेन्शन कडे पाहत असतो ..... 


अबीर च्या आगमनाने अक्षर आनंदी होते... आणि तिच्यातोल भीतीही कमी होते... मग तिने घड्याळाकडे पाहिलं तेव्हा रात्रीचा एक वाजले होते.... हे पाहून अक्षरा येऊन बेडवर आडवी पडते... आणि वरपासून खालपर्यंत स्वतःला ब्लॅकेटने झाकते... आणि झोपण्याचा नाटक करते..... जेणेकरून कबिरला वाटेल कि ती झोपली आहे.... 


खाली उभ्या असलेल्या कबिरला त्याच्या खोलीतील लाईट जळत असल्याचं पाहून समजत कि अक्षरा अजून जागी आहे... थोडा वेळ तिथे थांबून तो विचार करतो कि आज त्याने ते CCTV फुटेज पहावं....?मग विचार करत तो मेन्शन च्या आत येतो आणि त्याच्या खोलीत जाण्याऐवजी तो त्याच्या स्टडी रूममध्ये जातो.... 



स्टडी रूममध्ये पोहोचल्यानंतर अबीर पेनड्राईव्ह उचलतो.... तो त्याच्या लॅपटॉप मध्ये ते लावत तो खुर्चीवर बसतो आणि व्हिडीओ प्ले होण्यापूर्वी लॅपटॉपची स्क्रीन बंद होते.... ज्यामुळे अबीर लॅपटॉपचं पावर बटन दाबतो... पण लॅपटॉप उघडत नाही.... ज्यामुळे त्याला समजत कि लॅपटॉपची चार्ज संपली आहे... 


काही वेळाने लॅपटॉप कडे तर्क लावून पाहिल्यानंतर अबीर ला आठवलं कि लॅपटॉपचं चार्जर त्याच्या रूममध्ये आहे.... मग तो पेण्ड्रॉइव्ह त्याच्या लॅपटॉप वरून बाहेर काढतो आणि त्याच्या सर्वात सुरक्षित ड्रॉवर मध्ये ठेवतो आणि खोलीच्या दिशेने जायला निघतो.... 

खोलीची लाईट अजूनही चालू असल्याने अबीरल त्याच्या खोलीत प्रवेश करताना थोडा संकोच वाटतो पण काही वेळ खोलीच्या बाहेर उभा राहिल्यानंतर तो खोलीत येतो.... 

खोलीत गेल्यावर अबीर ने अनिच्छेने त्याच्या बेडवर एक नजर टाकली... तिथे त्याला अक्षरा डोक्यापासून पायापर्यंत ब्लँकेटने पांघरलेली दिसली.... तिच्याकडे बघून कबिरला वाटत कि ती झोपली आहे... त्यामुळे अबीर त्याच्या ओर्डरोबकडे सरकतो .... थोड्या वेळाने अंघोळ केल्यानंतर तो नाईट सूट घालून त्याच्या खोलीत येतो.... चार्जर उचलतो आणि खोली सोडू लागो....

निघण्यापूर्वी त्याने पुन्हा एकदा त्याच्या बेड कडे पाहिलं... अक्षरा झोपली होती... तिचा चेहरा अर्धा ब्लॅकेटने झाकलेला होता... तिचे केस पळगांवरून खाली लटकलेले होते जे जमिनीला स्पर्श करत होते.... हे पाहून अबीर ची पावलं उत्स्फूर्त पणे त्याच्या बेडकडे सरकली.... 

तो अक्षराच्या अगदी जवळ येऊन उभा राहतो आणि तिच्या अर्धवट दिसणाऱ्या चेहऱ्याकडे बघू लागतो आणि बघता बघता खाली वाकून अक्षराचे केस हाताने उचलून बेडवर ठेवतो.... 


काही वेळ अक्षराकडे असच बघून तो त्याच्या लॅपटॉप चार्जर त्याच बाजूच्या टेबलावर ठेवतो आणि बेडच्या पलीकडे आडवा होऊन झोपलेल्या अक्षराकडे बघू लागतो.... अक्षराला पाहत असताना काही वेळातच त्याला झोप येते..... 


सकाळी अक्षरा उठण्याआधी अबीर चे डोळे उघडतात .... तो उठतो आणि कोणी झोपलं नसल्यासारखं त्याच्या बेडला नीट करतो आणि तो रेडी होऊन चार्जर घेऊन स्टडी रूममध्ये जातो.... तिथून तो त्याचा लॅपटॉप आणि तो पेनड्राईव्ह घेऊन हॉलध्ये येतो... 

तो घरातून बाहेर पडणार असताना त्याची नजर डायनींग टेबलवर ठेवलेल्या जेवणावर पडते.... ते पाहून ती किचनमध्ये जातो आणि फ्रिज उघडतो आणि पाहतो कि त्यात अजूनही बरच जेवण उरलेलं होत..... ते बघून तो मनात विचार करतो कि या मुलीने हे सर्व का खाल्लं नाहीये...?हे तर खूप जास्त पण नाहीये...?मी ऑर्डर केलेल्या गोष्टी तिला आवडल्या नसणार का...?"

हा सर्व विचार करून कबिरला राग येतो आणि रंगाच्या भरात तो त्याच्या हातातील लॅपटॉप आणि चार्जर त्याच स्लॅबवर ठेवतो आणि फ्रिजमधून सर्व सामान बाहेर काढून डस्टबिन मध्ये टाकतो.... डस्टबिन मध्ये टाकल्यावर तो राघवला फोन करतो आणि कडक स्वरात म्हणतो"आज जेवण आणायची गरज नाहीये..."अबीर संतप्त आवाज ऐकून राघव ओके सर म्हणतो आणि फोन ठेवतो.... 

फोन हँग अप केल्यानंतर काही सेकंदांनी अबीर त्याच्या लॅपटॉपला चार्जर जोडतो आणि तिथून निघून जातो.... रात्री खूप उशीरा पर्यंत जागी असल्याने अक्षरा अकरा वाजेपर्यंत झोपून राहते.... अकरा वाजता तिचे डोळे उघडतात तेव्हा ती बेडच्या पलीकडे पाहते.... बेड अजिबात खराब झालेला दिसत नाही ... ते बघुनसमजलं कि काल रात्री अबीर खोलीत आला नाही.... त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचं दुःख येत आणि ती खिन्न मानाने उठून बेड्वरर बसते... 


बसल्यावर ती तिचे केस गोळा करून बांधते आणि बेडच्या खाली उतरून बाथरूममध्ये जाते .... काही मिनिटांनी ती अंघोळ करून बाहेर येते... अंघोळ करून ती तिच्या खोलीच्या खिडकीतून खाली पाहते... तिथे अबीरची गाडी नसल्याने तिला समजलं कि अबीर घरी नाहीये.... त्यामुळे ती मनात विचार करते..."अबीर इथून कधी निघून गेले असणार...?ते खोलीत आले नाही .... मग ते रात्रभर कुठे होते....?

अक्षरा हा सर्व विचार करत असतानाच तिला भूक लागली आणि काहीतरी खाण्याचा विचार करत ती किचन मध्ये आली.... पण फ्रिज उघडताच तिला तिथं काहीच दिसत नाही .. ते बघून ती विचार करते...."हे सर्व काय झालं... काल सकाळी तर मी फक्त नाश्ता केला होता.... आणि यात भरपूर खायला होत.."असा विचार करत अक्षरा फ्रिज बंद करते आणि तिच्या विचारात मग्न असतानाच ती ग्लास पाण्याने भरते... 


ती ग्लास तोंडावर लाऊनपाणी प्याला बेतात असताना तिची नजर डस्टबीनवर पडते... ज्यां झाकण खूप थोडस उघड होत.... 


डस्टबीनकडे बघून अक्षर तोंडातून ग्लास काढून त्या डस्टबिन जवळ जाते आणि बघते .... त्यात सर्व खाण्याचे डब्बे फेकले होते... जे पाहून अक्षरलेलं कळत नव्हतं कि ते बॉक्स असे डस्टबीनमध्ये कोणी फेकले असणार ..."मग तिला वाटत काल रात्री अबीर घरी आला होता... मग त्याने असं अन्न डस्टबीनमध्ये फेकलं का...?पण ते असं का करतील ..? हे खराब झालं असेल का...? ... असा विचार करत अक्षरा त्यातून एक डब्बा काढते आणि तो चेक करते... तिला जेवणाच्या टेबलावर पाणी पिऊन बसते... 


दुसरीकडे अबीर ऑफिसमध्ये पोहोचतो आणि राघवला त्याच्यासाठी नाश्ता ऑर्डर करायला सांगतो... त्यावर राघव त्याला विचारतो..."काल रात्री तुम्ही घरी गेला बहत का....?मी पेनड्राईव तव्हयला गेलो होतो तेव्हा मिसेस बिर्ला तुमच्याबद्दल विचारत होत्या.... त्याच्या बोलण्यातून मला वाटलं कि तुम्ही रात्री उशिरापर्यंत बाहेर राहिल्याने त्यांना तुमची काळजी वाटत होती..."राघव बोल्ट असतानाच राघव बोल्ट असतानाच अबीर वर भुवई वर करून त्याच्याकडे बघत त्याला बोलतो"मी त्या मुलीच्या समस्येवर चर्चा करायला सकाळी ऑफिसला आलोय का...?तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर... तुला त्या मुलीच्या समस्यांकडे लक्ष देण्याची नजर गरज नाहीये..."


"सॉरी सर..."मी आतापासून काळजी घेईल... मला तुम्हला नक्षीं काही विचारायचं होत... मिस नैनिकाशी केलेल्या कॉन्ट्रँक्टच काय...?तुम्ही कंपनीतील ५१ % शेयर्स द्याल का...?कारण आता तुम्ही तिच्याशी लग्न करू शकत नाहीत..." राघव जरा घाबरतच विचारतो...

"मी नैनिकाला शेअर्स देईल असं वाटत का तुला.... मी अबीर बिर्ला आहे आणि मी एका छोट्या रायवळ सोबत हरणार नाही.."अबीर किंचित हसत म्हणाला... 


"मग हा प्रोब्लम सोडवण्यासाठी काही विचार केला आहे का...?"राघव आश्चर्य चकितपणे त्याला विचारतो..... 


"तुम्ही एक्सीटमेन्ट कमी कर... आणि माझ्यासाठी काही नाश्ता घेऊन ये..."अबीर खुर्चीवरून उठून त्याला म्हणाला ... 
"ओके सर .."म्हणत राघव कबीर च्या केबिन कडे निघून गेला आणि अबीर ने चार्जर मधून त्याचा लॅपटॉप काढला आणि केबिनमधील सोफ्यावर बसून लॅपटॉपमध्ये पेनड्राइव्ह ठेवणार इतक्यात अचानक केबिनच्या दरवाजा वाजतो आणि अबीर ने आपला लॅपटॉप बंद केला... 



"अरे व्वा , तू अजून इथेच आहेस का....?"केबिनमध्ये येतना सुनीता बिर्ला(अबीरची मोठी आई ..) अबिरकडे पाहून एक धूर्त स्मिथ हास्य करून त्याला म्हणाली... 


"तुम्हाला काय वाटलं...??"अबीर खिशात हात ठेऊन उभा राहून म्हणाला... 

"या खुर्चीच्या जोरावर तू एवढा आकडतो ना पण तीच राहिली नाही तर....?"सुनीता कबिरच्या खुर्चीकडे सरकत तिला स्पर्श करत त्याला म्हणाली... 


"आणि तुम्हाला वाटलं तुम्ही माझ्याकडून ती हिसकावून घेऊ शकता,..."अबीर हसत म्हणाला.... 



"मी इथे तुझ्या फायद्यासाठी आले आहे... आतापर्यन्त तुला न्यूज मिळालीच असेल कि तुला बोर्ड मेंबर पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय... त्या रात्री नंतर तुझ्या रीपीयुटेशनवर किती परिणाम झालाय माहितीय ना... म्हणून कंपनी कोना दुसऱ्या हातात देण्यापेक्षा माझ्या नक्षला हि मेंबरशिप देऊन दे.... मी वचन देते कि तो तुला चेयरमन बनवेल... माझा मुलगा नकाशाच्या हाताखाली तुला कोणतीही अडचण येणार नाही... पण तू या कंपनीशी संबंधित तू तुझे सर्व अधिकार गमावशील .."सुनीता अबीरच्या.. खुर्चीवर बसून हसत म्हणाली... 

"तुम्हाला माझी काळजी करण्याची गरज नाहीये...मला हे चंगळच नाहीत आहे कि मी कोणाला हे मेंबरशिप द्यायची आहे आणि कोणाला नाही... आणि मला वाट नाही कि नाक्ष यासाठी रेडी आहे..."अबीर भुवया उंचावत म्हणाला ..... 


अबीर ने बोलणं ऐकून सुनीताचा चेहरा फिका पडतो आई चेहऱ्यावरून हसू पूर्णपणे नाहीस होत.... तरीही ती जबरदस्ती स्मितहास्य करत त्याला बोलते..."तू कदाचित भानावर नाहीस ... हि कंपनी हि खुर्ची हे सर्व माझ्या मुलाचं आहे.."सुनीता एवढंच बोलली तेव्हा अबीर तिला मधेच थांबवत बोलतो"तुम्हाला आठवत नाही कि तुम्ही विसरायचं नाटक करतात... पण काही हरकत नाही मी तुम्हाला आठवण करून देतो... सुरवातीपासून सांगतो डॅड आणि मिस्टर दिनेश याना प्रॉपर्टीवरून भांडत असताना पाहून मिस्टर धर्मेश (अबीर चे आजोबा..) यांनी एक मृत्युपत्र केलं होत... त्यानुसार कुटूंबातील पहिला जन्मलेला व्यक्ती हा कंपनी आणि संपूर्ण मालमतेचा वारस असणार... आणि मिस्टर दिनेश याच्या सांगण्यावरूनच तयार केलं होत... पाहिलं आपत्य तुमचच असेल याची तुम्हाला खात्री होती... पण नाक्षच्या आधी मी या जगात आलो.. त्यामुळे हि कंपनी आणि खुर्ची सर्व काही माझं आहे.... 

अबीर ला जुन्या मृत्युपत्राबद्दल बोलताना ऐकून सुनीता चिडते आणि खुर्चीवरून उठत कबिरला म्हणते "तुला हे कस माहिती.. तुझे वडील गेल्यानंतर मी ते खोदून काढलं होत ..."


अबीर त्याच्या खुर्चीवर बसून हसत म्हणाला"तुम्ही जे मिटवला होत ना ती खोटी झेरॉक्स होती.. माझ्याकडे खरी कागदपत्रे आहेत.. डॅड ला माहित होत कि तुम्ही दोघे माझी फसवणूक करणार ... म्हणूनच त्यांनी ते कागदपत्र अक्षराच्या वडिलांना दिले...(कबिरच्या वडिलांचे जिवलक मित्र....) मी ऑफिस जॉईन केल्यावर ते मला भेटायला आले होते आणि त्यांनी मला माझी खरी जागा दाखवली.... नाहीतर घरातील सगळं काही पहिल्या मुलाचं होत आणि धाकट्या मुलाच्या मुलाला कंपनीत फक्त कर्मचाऱ्यांची जागा मिळते ... हेच सर्व तुम्ही मला सांगितलं असत..."



सुनीताला तीच दडलेलं सत्य ऐकून काळजी वाटायला लागते आणि ती वळून अबीरच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघते.. आणि स्वतःवर नियंत्रण ठेवत त्याला बोलते"तरीही तो कंपनीतील बोर्ड मेंबरशिप पद सोडावं लागेल ... तू त्या रात्री केलेल्या चुकीमुळे कंपनीचे शेयर्स आणि रीपीयुटेशन या दोन्ही मध्ये घसरण झाली आहे... ज्यामुळे तुला तुझी मेंबरशिप सोडावी लागेल..."


सुनीताचा बोलणं ऐकून अबीर हसत केबिनच्या दरवाजाकडे पाहतो तिला म्हणतो "आता तुम्ही जाऊ शकता.... मला काही काम आहे...."


अबीर च असं थंड वागणं पाहून सुनीताला समजत कि कंपनीत बोर्ड मेंबर राहण्यासाठी त्याच्या मनात काही योजना आहेत ... त्यामुळे ती रागातच तिथून उकळत बाहेर निघून जाते... 

केबिन मधून बाहेर पडून ती थेट तिच्या कारकडे जाते जिथे तिचा मॅनेजर उभा होता... तो सुनीताच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे बघतो आणि घाबरून विचारतो..."अबीर सरानी नाक्ष सारण मेंबरशिप द्यायला होकार दिला का....?"

सुनीता तिच्या मॅनेजरकडे रागाने पाहते... आणि म्हणते ..."त्याने काहीतरी विचार केला आहे कंपनीत राहण्यासाठी ,.... तो काय करणार आहे ते शोधावं लागेल..."


"त्या रात्री त्याला नशेची गोळी तुम्ही दिली होती हे त्याला कळलं तर नसेल ना,,...?"मॅनेजर गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला.. 

"तो माझ्यावर कधीच संशय घेणार नाही... कारण मी ते काम एका अश्या व्यक्तीकडून केलं आहे ज्याच्या तो तिरस्कार करतो.... आणि त्याने जरी शोधण्याचा प्रयत्न सुनीता तिच्या मॅनेजरकडे रागाने पाहते... आणि म्हणते ..."त्याने काहीतरी विचार केला आहे कंपनीत राहण्यासाठी ,.... तो काय करणार आहे ते शोधावं लागेल..."


"त्या रात्री त्याला नशेची गोळी तुम्ही दिली होती हे त्याला कळलं तर नसेल ना,,...?"मॅनेजर गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला.. 

"तो माझ्यावर कधीच संशय घेणार नाही... कारण मी ते काम एका अश्या व्यक्तीकडून केलं आहे ज्याच्या तो तिरस्कार करतो.... आणि त्याने जरी शोधण्याचा प्रयत्न केला तरी त्याला फक्त त्या मुली विरुद्ध पुरावे सापडतील.."सुनीता गाडीच्या दिशेने चालत जात म्हणाली... आणि एवढं बोलून ती गाडीत बसली... 



"त्या रात्रीच्या पार्टीत तुम्ही अबीर सरांची इमेज बिघडवली... कारण त्यांना त्याच कंपनीतील पद गमवावं लागेल आणि नाक्ष सारण ते मिळेल... पण यासाठी तुम्ही अक्षरा मॅडमची निवड का केली..."मॅनेजर गाडीत बस्तान विचारतो.... मॅनेजरचा बोलणं ऐकून सुनीता किंचित हसली आणि म्हणाली.... "कारण ती मुलगी माझ्या नक्षल नाकारणार होती.... मी तिला तिच्या डॅड सोबत बोल्ट असताना हे ऐकलं... म्हणून तिने माझ्या मुलाला नाकारण्यापूर्वी मी तिला कोणाच्याही लायकीच नाही ठेवलं..."असं म्हणत सुनीता पाच दिवस आधी घडलेल्या गोष्टीचा विचार करू लागली... 




----========----------



हेय गाईज.... 


कसा वाटला आजचा भाग .... कधी वाटतेय स्टोरी.. नक्की कळवा काय झालं होत त्या रात्री .... जाणून घ्यायला वाचत राहा ...... 



सख्या रे ......❤️❤️❤️❤️❤️