राघव कबिरच्या प्रश्नाला उत्तर देते म्हणाला"मी इलेक्ट्रिशियन फोन केला होता...... कदाचित तो दिवस येऊन त्याने स्विच ठीक केला असेल... मिसेस बिर्ला घरीच होत्या त्यांना विचारूया...."
राघवच बोलणं ऐकून अबीर राघवला म्हणाला "तुला ते तुझ्या डोळ्याखाली दुरुस्त करुन घ्यायला सांगितलं होत...." असं म्हणत अबीर त्याच्या खोलीच्या खिडकीकडे बघायला लागला... त्याला खिडकीत अक्षरा दिसली... जी त्याची नजर तिच्यावर पडताच तिथून बाजूला होते आणि काही सेकंदाची खोलीतील दिवे एका मोठ्या किंचाळीने बंद होतात....
<<<<<<<<<<आता पुढे>>>>>>>>>>
आवाज ऐकून कबिरने त्या खोलीकडे एक नजर टाकली आणि मग घरच्या मुख्य दरवाजाकडे धाव घेतली आणि तो डोअर उघडला... घरातील सर्व लाईट्स बंद होते.. ती सर्व लाईट्स चालू कारण्यावजी अबीर धावत त्याच्या खोलीत गेला आणि त्याचा फोन बाहेर काढून त्याने त्याचा फ्लॅश ऑन करून पाहिलं... अक्षरा तुटलेल्या टेबलयाजवळ बसून तिचा पाय धरून रडत होती... तिच्या चेहऱ्यावर फ्लॅश पडताच ती घाबरून अबिरकडे पाहू लागली... अबीर त्या स्वीचकडे एक नजर टाकतो आणि मग ब्लब कडे बघतो आणि अक्षर जवळ येऊन उभा राहतो... तेव्हा त्याला अक्षराच्या पायात काचेचा एक तुकडा अडकलेला दिसला ज्यामुळे तिथून रक्त येत होत...
अक्षर अबिरला तिच्या समोर उभा असलेला बघून मन खाली करत घाबरून म्हणाली" मी फक्त ते खोली पाहण्यासाठी...."
अक्षरा म्हणतच होती तेवढ्यात अबीर खाली विकतो आणि त्याचा एक हात तिच्या कमरेभोवती आणि दुसरा तिच्या मानेभोवती पकडून तिला फारशींवरून उचलून बेडवर घेऊन जातो... अचानक अबीरने तिला असं उचलून घेतल्याने अक्षरा घाबरते आणि तिचे डोळे बंद करते... ती कबिरचा शर्ट हाताने घट्ट हाताने घट्ट पकडले आणि तिच्या डोळ्यासमोरून काल रात्रीचा प्रसंग जातो... ज्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रुंचे थेंब वाहून अबीरच्या हातावर पडतात.... अबीर अक्षराच्या चेहऱ्याकडे पाहतो... घाबरून सतत अश्रू वाहताना पाहून अबीरलाही काल रात्रीची घटना आठवते... ज्यामुळे तो त्याची नजर अक्षराच्या चेहऱ्यापासूनदूर करतो आणि तो बेडवर पोहोचेपर्यंत पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहत नाही...
बेडजवळ पोहोचल्यावर अबीरने हळुवारपणे अक्षराला त्याच्या हातातून सोडून खाली बसवलं आणि तो स्वतहा खाली बसला...... त्याने त्याच्या हाताने तिचा पाय उचलला आणि तो काचेकडे पाहू लागला... थोडा वेळ बघितल्यानंतर कबिरने तो काढण्याचा प्रयत्न केला.... अक्षरा एक सुस्कारा टाकत कबिरच्या खांद्यावर हात ठेवते ... त्यामुळे अबीर त्याचा हात मागे घेतो आणि खोलीबाहेर उभ्या असलेल्या राघवला आत यायला सागतो...
"हा काच तिच्या पायातून तुला काढता येईल का...??"अबीर राघव आत आल्यावर त्याला अक्षराचा पाय दाखवत म्हणाला....
"येस बॉस ...."राघव कबिरच्या शेजारी बसत म्हणाला... एवढं म्हणत राघवने अक्षराच्या पायाकडे हात पुढे केला आणि एका झटक्यात तो काच बाहेर काढला....
ओढल्यामुळे अक्षरा वेदनेने थोडीशी किंचाळली आणि अबीर च्या खांद्यावर ठेवलेला हात घट्ट तिने घट्ट केला.... ज्यामुळे अबीर अक्षराच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि तिथून निघताना बेडवर फर्स्ट एड बॉक्स ठेवत म्हणाला "याने पट्टी बांधून घे...... आणि राघव तू माझ्या सोबत खाली चाल....."
अबिरचा आदेश ऐकून राघव तिथून उठतो आणि अबीरच्या मागे जातो आणि अक्षरा फर्स्ट एड बॉक्स उचलून तिच्या पायाच्या जखमेवर ओटीसेप्टिक क्रीम उचलून तिच्या पायाच्या जखमेवर ऍण्टिसेप्टिक क्रीम लावून मलमपट्टी करते... "मी ताटीच्या खोलीत आले म्हणून ते मला परत ओरडणार का... आणि या रूममध्ये लाईट्स का नाही आहेत....?"
इकडे अबीर खाली पोहोचतो आणि हॉलची लाईट व करतो आणि रागावला रागाने म्हणतो ...."तुला तुझी जॉब प्रिय नाही आहे हो ना...."
मी शपथ घेऊन सांगितलं मी फोन केला होता, पण तो आला नाही तर यात माझी चूक नाही आहे..."राघव अबीरच्या मागे जात म्हणाला
"तू तिला पाहिलं.... तिला किती वेदना होत होत्या...." अबीर राघवकडे वळून त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाला ...
"पण स्विच आणि काच पायात अडकण्याचा काय संबंध ....??"राघव दोन पावले मागे घेत म्हणलं....
"तू बघितलं नाहीस का त्या खोलीत लाईट नाहीये.... मला उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत त्या खोलीतील सर्व बिघडलेली लाईट्स दुरुस्त झालेली दिसायला हवीत...." अबीर रागाने ओरडत म्हणाला...
"ओके सर .... मी उद्या सकाळीच सर्व काही ठीक करून घेईन .... तुम्हाला हवं असेल तर मी मिसेस बिर्ला ला त्या खोलीतून दुसऱ्या खोलीत शिफ्ट करून देऊ का....." राघव अबीरच्या रागाने घाबरून म्हणाला....
"गेट आऊट .... आणि हो उद्या सकाळी तुझा फेस दाखवण्याआधी सर्व काही ठीक झालेलं हवं... नाहीतर आठ वाजल्याचा एक मिनिटाने तू स्वतःच तुझी जॉब सोडून निघून जाशील... कळलं ...."अबीर डोळे बंद करून राग पिट त्याला म्हणाला ....
अबिरचा राग पाहून राघव होकार देत लांब पावलांनी मेन्शनमधून निघून जातो....
राघवला जतन पाहून अबीर तिथेच हॉल मध्ये सोफ्यावर बसतो आणि टीव्ही चालू करतो... कधी ती टीव्हीकडे तर कधी त्याच्या अबीर कडे बघत असतो... थोड्यावेळ अशा पाहिल्यावर अबीर उठतो आणि किचन मध्ये जाऊन फ्रिज मध्ये खायला काहीतरी शोधायला लागतो... पण तो या आधी कधीच घरी जेवण नव्हता करत त्यामुळे फ्रिज पूर्णपणे रिकामं होत... त्यामुळे अबीर फक्त कॉफी बनवून सोफ्यावर येतो आणि कॉफी पिट टीव्ही बघायला लागतो.... कॉफी पीतपीत मग त्याच्या मनात विचार येतो..... "किचनमध्ये तर खायला काहीच नाही आहे मग त्या मुलीने काय खाल्लं असेल.... ती सकाळपासून भुकेली आहे का...?" एवढा विचार करून तो त्याच्या फोनवर वेळ बघतो... रात्रीचा १ वाजले होते... ज्यामुल्ले त्याने टीव्ही बंद केला आणि कॉफीचा कप त्याच टेबलावर ठेऊन त्याच्या खोलीत गेला .....
बराच वेळ अबीर पार्ट न आल्याने अक्षर सुद्धा दाराकडे बघत झोपी जाते... तिला झोपलेली बघून अबीर कुठलंही आवाज न करता कबर्ड मधून नाईट सूट काढतो आणि बाथरूममध्ये जातो... काही मिनिटात फ्रेश होऊन जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तो त्याच्या फोनचा फ्लॅश व करतो.... त्याला ती एकवटून झोपलेली दिसते.... त्यामुळे कबिरने एसीचा तापमान वाढवतो आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन आडवा होतो... आडवा होत तो खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या मंद प्रकाशात अक्षराचा चेहरा बघतो आणि विचार करतो... "काय झालं असणार त्या रात्री.... मी एक ग्लास ज्यूस प्यायला आणि मग एका खोलीत गेलो... पण तू तिथे कशी आलीस... काय गेम तू माझ्यासोबत खेळत होतीस.... या निरागस चेहऱ्यामागे दडलेलं तुझा हेतू मी शोधून काढेन.... पण तुझ्याकडे बघून मला माहित नाही का पण असं वाटत कि या कारस्थान बद्दल तुला काही माहित नसावं आणि तुलाही माझ्यासारखं या सगळ्यात जबरदस्तीने ओढलं गेला आहे .... "एवढा विचार करून अबीर त्याचा फोन उचलतो आणि राघव ला मॅसेज करतो..."ज्या हॉलमध्ये मिस्टर दिनेशची (मोठ्या वडिलांची)वाढदिवसाची पार्टी होती तिथे CCTV कँमेरा बसवले आहे का..???त्या होळीबद्दल इन्फॉर्मेशन कधी... मला सकाळी छोटी मोठी माहिती हवी आहे आणि हो, उद्या सकाळी येताना काही खायचं सामान घेऊनये सोबत..." रात्री खूप उशीर झला असल्याने राघव मेसेज पाहत नाही.... त्यामुळे अबीर फोन घरी ठेवतो आणि अक्षराच्या दिशेने पाठीमागे जाऊन झोपतो....
पहाटे ४ वाजता अक्षराला जग येते.... अक्षराने डोळे उघडली तेव्हा अबीरला आपल्या शेजारी झोपलेलं पाहून ती घाबरली आणि काही वेळ अबीर कडे बघून ती हळूच बेडवरुन खाली उतरते आणि दुखापतग्रस्त पायाने लंगडत खोलीबाहेर निघून किचनकडे जायला वळते...
किचन मध्ये गेल्यावर तिची नजर कॉफीच्या कँपवर पडते.... ते बघून अक्षरा तिच्या लंगड्या पायाने चालत जात तो कप उचलून त्याला साफ करते आणि साफ केल्यानंतर ती काहीतरी खाण्यायोग्य शोधत फ्रिज उघडते... पण तिथे काहीही नसल्यामुळे ती एक ग्लास पाणी पिते आणि भीतीला टेकून बसते.... बसल्याबरोबरच तिला तीर्व भूक जाणवते.... त्यामुळे ती तिच्या पोटावर हात ठेवते आणि मनात विचार करते .... "इतकी तीर्व बभूक का जाणवतेय मला... मी आताच तर पाणी प्यायले आणि तरीही..."
अक्षरा पोटावर हात ठेऊन बसलेली असते जेव्हा तिची नजर तिच्या पायाकडे जाते... त्या मुले तिला आठवत कि कास रात्री अबीर ने तिला आपल्या हातात उचलल होत आणि काचेचा टुक्कड तिच्या पायावरून काढणायचा प्रयत्न करत घाबरत होता ... ते सर्व आठवण येताच तिच्या चेहऱ्यावर एक छोटाच हसू उमटत आणि ती तिथून उठून होळलादल्या सोफयावर येऊन झोपते....
सहा वाजण्याच्या सुमारास फोन वाजलुयाने अबीर ला जग अली.... तो कॉल उचलतो आणि मोबाईल कनाशी लावतो आणि झोपतो म्हणतो...."अबीर स्पिकिंग ...."
फोनच्या पलीकडून ओळखीचा आवाज येईतो... "मला वाटलं होत कि अबीर बिर्ला टाईमचा पक्का आहे सहा वाजेपर्यंत उठून जात असणार.... ब्र ते जाऊ दे .... मी लवकर भारतात येणार आहे हेच सांगण्यासाठी फोन केला होता... तेव्हा आपला काँन्ट्रॅक्ट मध्ये लिहलेल्या अति पूर्ण कर...."
कबिरने डोळे पूर्ण उघडून म्हणाला" मी तुला आधीही सांगितलं होत आणि आताही सांगतो... मला डिस्टर्ब् करू नको स.... मला माझ्या सर्व गोष्टी ..."अबीर पुढे बोलतच होता. तेवढ्यात कॉल कट झाल्याचा आवाज त्याला येतो.... त्यामुळे तो फोन कांजवळून काढून बेडवर फेकतो.... मग त्याची नजर बेडच्या दुसऱ्या बाजूकडे जाते अक्षरा त्याला तिथे दिसत नाही... तो खोलीत इकडे तिकडे पाहतो आणि बेडरूमवरून खाली उतरून चप्पल घालून बाथरुमकडे बघतो जे ओपन असत.... मग तो खोलीतून बाहेर पडतो आणि पायर्यांकडे जातो आणि वरून तो संपूर्ण हॉलभवती एक नजर मारतो आणि मग त्याला तिथे अक्षरा सोफ्यावर झोपलेली दिसली...
अक्षरा ओपलेली पाहून अबीर वळून त्याच्या खोलीत जात असताना त्याला दारावर बेल ऐकू येत.... त्यामुळे तो खाली उतरतो आणि दरवाजा उघडतो... राघव दारात एका मुलासोबत उभा होता... तो त्याला इलेक्ट्रिशियन म्हणून सांगतो आणि त्याला खोलीच्या दिशेने घेऊन जातो.... आणि काही वेळ खोलीत इलेक्ट्रिशियन च काम पाहत उभा राहतो...
तो इलेक्ट्रीशयन त्यांना सागतो "बॉब फ्युज गेल्यामूळर लाईट्स ऑफ झाल्याचं आणि मी स्विच ठीक करून झालं आहे.." असं म्हणत तो त्याचे पैसे घेतो आणि मेन्शन मधून बाहेर जातो...
"एक काम कर नाश्ता आणि जेवण घेऊन ये त्या मुलीने कालपासून काहीच खाल्लं आणि आहे... " इलेक्ट्रीशयन निघून जाताच अबीर रागावला म्हणाला...
"पण खायला काय आणू...??मिसेस बिर्ला याना आवडणारी कोणती डिश आहे का....??"राघव अबिरकडे पाहून हसत विचारतो...
"मला नाही माहिती... जवळच्या रेस्टोरंटमध्ये जा आणि तिथे जे मिळेल घेऊन ये आणि काही मुलीचे कपडे पण आन तिच्याकडे घालायला कपडे सुद्धा नाही आहेत.."अबीर काही वेळ विचार करून म्हणाला...
अबीर च बोलणं ऐकून राघव ने होकार दिला आणि निघताना तो विचार करत होता..."मला खात्री आहे कि मिसेस बिर्लाच ती मुलगी आहे जी तुमच्यातील द्वेष संपवेल आणि तुम्हाला प्रेम करायला शिकवेल...."
राघव निघून गेल्यावर अबिरने पायातला काच उचलला आणि डस्टबिन मध्ये टाकला... कबर्ड मधून सूट काढून तो बाथरूममध्ये गेला....
इकडे अक्षरा सुद्धा दारावरच्या बेलच्या आवाजाने जागी झाली होती उठून सोफयावर बसून ती तिच्या केसाचा जुडा खोलते आणि तिचे केस मोकळे सोडते ज्यामुळे तिचे केस तिच्या कमरेभोवती पटतात आणि कधी न केल्यामुळे ते विखुरलेले असतात....
अंघोळ केल्यावर अबीर त्याचा सूट घालतो .... केस सेट करतो... ड्रॉवर मधून एक महागडे घड्याळ काढतो आणि हाताला बांधतो आणि खोलीतून बाहेर पडतो... पायऱ्या उतरत असताना त्याला अक्षरा दिसली जी तिच्या केसमध्ये व्यस्त होती ..... ती तिच्या बोटानी तिचे केस कानाच्या मागे करत होती....
अक्षराला पाहून अबीर त्याच्या स्टडी रुमध्ये जातो आणि तिथून लॅपटॉप आणि काही फाईल्स घेऊन हॉलमध्ये येऊन डायनींग टेबलवर बसून लॅपटॉप ओपन करून काहीतरी त्यावर टाईप करायला लागतो....
टायपिंगचा आवाज ऐकून अक्षरा डोकं वाळवून त्या दिशेने बघते .... अबीर स्क्रीनकडे बेघर लॅपटॉपवर टाईप करत असतो.... हॉलमधल्या सगळ्या खिडक्या बंद असतात त्यामुळे जास्त उजेड तिथे नव्हता पण लॅपटॉपच्या स्क्रीनमधून येणार प्रकाश अबीरच्या चेहऱ्यावर पडत होता.... त्यामुळे त्याचा चेहरा मोहक दिसत होता.... अक्षरा त्याच्याकडे बघत असते... मग बघत असताना डोअर वर बेल च्या आवाजाने तिची तंद्री तुटते... अचानक आलेल्या आवाजामुळे अक्षराने अबीरवरून तिची नजर हटवली आणि घाबरून ती उभी राहली.... ज्यामुळे त्या टेबलवर काल रात्री कबिरने ठेवलेला कॉफीचा कप खाली पडून तुटतो .... तुटण्याचा आवाज ऐकून अबीर अक्षराकडे बघतो आणि काहीही प्रतिक्रिया न देता तिथून उठून डोअर ओपन करायला जातो ..... तिथे डोअरवर त्याला हातात अनेक पिशव्या घेऊन उभा असलेला राघव दिसतो.... तो धावत आल्यासारखा धापा टाकत होता....
अबीर अक्षरावर एक नजर टाकत राघवकडे बघत म्हणाला"आतासाठी जे काही आणलं आहे ते टेबलावर ठेव आणि दुपारची जे काही आहे ते फ्रिजमध्ये जाऊन ठेव आणि हो तू आणलेले कपडे तिला दे आणि तिला सग कि फ्रेश होऊन ते घाल ..."हे बोलून अबीर त्याच्या लॅपटॉप कडे गेला आणि तो उचलून गार्डनकडे निघाला....
अबीरला पाहून राघव नाश्ता टेबलवर ठेवण्यापूर्वी अक्षराकडे जातो आणि तिला एक बॅग देऊन तिला अंघोळ करून घालायला सांगतो .... अक्षर ती बॅग घेताच राघव घेताच राघव नाश्ता ठेवायला तो आणि अक्षर तो तुटलेला काप उठण्यासाठी खाली वक्त असताना तिच्या कानावर अबिरचा आवाज पडतो त्यामुळे तिने डोकं वर करून अबीर कडे बघते जो तिला म्हणला "त्याला हात लावायची काही गरज नाही आहे... अंघोळ कर आणि नाश्ता कर.....(राघव कडे बघत)तुझं काम संपलं असेल तर मला ऑफिसला घेऊन चाल..."
राघव अबीरकडे बघत म्हणाला"ठीक आहे सर ..." असं म्हणत राघव अक्षराला जेवणाचा आंनद घ्यायला सांगतो आणि अबीरसोबत बाहेर जातो..
अबीर आणि राघवला बाहेर जाताना पाहून अक्षराने बॅग उचलली आणि डोअर लॉक करून वर अबीरच्या खोलीत गेली....
अक्षर फ्रेश होऊन राघवन आणलेले कपडे घालून पुन्हा हॉलमध्ये येते आणि नाश्ता करते... नाश्ता करताना तिला तिच्या इंदोरच्या घरात घालवलेले क्षण आठवतात ज्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येत.... मग ती विचार करायला लागते कि ती कशी काय या सर्वात अडकली ज्यामुळे आज सगळेच तिचा तिरस्कार करताय... मग ती फ्लॅशबॅक मध्ये जाते.... "रोजच्या प्रमाणे अक्षर सकाळी उठल्यावर तिच्या आई वडिलांसाठी नाश्ता बनवून कॉलेजला निघाली होती तेवढ्यात तिला गाडीच्या डोअर जवळ निल दिसला.... तो त्यादिवशी सारखाच तिच्याकडे पाहून स्माईल करत होता... अक्षराला त्याच तिच्याकडे बघून स्माईल कारण नव्हतं आवडलं म्हणून तिने आपली मान दुसरीकडे वळवली आणि तिच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसून ती तिच्या ड्रॉयव्हरला चालायला सांगते.....
कॉलेजमध्ये पोहोचल्यावर अक्षरा तिच्या गाडीतून उतरून कॉलेजकडे जायला निघाली होती कि तिला मागून आवाज येतो "हॅलो मिस .... तुम्ही मला ओळखलं नाही का..."
आवाज ऐकून पोहोचल्यावर अक्षरा न वळवता म्हणाली "मला हे सगळं नाही आवडत.... पुन्हा माझ्या मागे येऊ नकोस..." असं बोलून अक्षर कॉलेजला निघून जाते आणि निल तिला जाताना बघत तिथेच उभा राहतो... अक्षरा च्या बोलण्याकडे त्याच मन दुखावलं होत म्हणून तो पुन्हा तिच्या मागे गेला नाही...
पण एका दिवशी अक्षरा एका कॉलमध्ये तिच्या मैत्रिणीची वाट पाहत बसली होती... तेव्हा काही मूळ तिथे येऊन तिच्या टेबलावर बसून काही रिकामटेकड्या गोष्टी करत होते... त्यामुळे अक्षरा तिथून उठायला लागली तेवढ्यात एका मुलाने तिचा हात पकडला आणि तिला आपल्याजवळ बसवलं आणि तिच्या गालाला हात लावत तिच्यासोबत गैरवर्तन करायला लागला.... बाकी मूळ त्या मुलाच्या कृतीवर हसत होती....
स्वतः सोबत हे सर्व घडताना पाहून अक्षरा एकदम घाबरली... तिने त्या मुलाला तिला सोडायची विनंती केली पण त्या मुलावर काहीच परिणाम होत नव्हता ..... आणि तो मुलगा आपल्या हातानी अक्षराच्या हाताला रब करायला लागला.... अक्षराच्या डोळ्यातून सतत अश्रुंचे थेंब खाली पडत होते.... आणि कॅफे मध्ये बसलेले सगळे लोक आपापसात बोल्ट होते..." हा सगळं त्याचा रोजचाच धंदा झाला आहे... एखादी सुंदर आणि निरागस मुलगी बघताच त्याचा हा खोडकर पणा सुरु होत .... पण आपण काय करू शकतो तो एक आमदाराचा मुलगा आहे.... आणि तो खूप वाईट मुलगा आहे..."
कँफेमधील बडबड त्यातल्या एका मुलाने कँफे मधे बसलेल्या सर्व लोकांकडे पाहिलं.. त्यामुळे कँफे पूर्णपणे शांत आलं... भीती आणि अस्वस्थतेमुळे अक्षरांचे हात पाय थंड व्हायला लागले ज्यामुळे तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले.... ते बघून ती मुलं हसायला लागली... तेवढ्यात कॅफेच्या दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि मूळ दाराकडे बघायला लागली ... दोन मूल (अबीर आणि निल) दारात छान सूट
बूट घालून डोळ्यावर चष्मा लावून उभी होती... त्यांनी एकत्र डोळ्यावरून चष्मा काढला आणि त्या कँफे कडे बघायला लागले.....
शांत कँफे पाहून एक मुलगा (निल)दुसऱ्या मुलाला(अबीर)त्या बदमाशाकडे बघत काहीतरी म्हणाला आणि दोघेही एका टेबलावर येऊन बसले ....
पूर्णपणे शांत कँफेमधे अक्षराच्या रडण्याव्यतिरिक्त त्या मुलाचा आवाज ऐकू येत होता... त्यामुळे निल आणि अबीर वळून त्या दिशेने पटत.... दोघांनीही अक्षराला पाहताच ओळखलं होत आणि तिचा चेहरा भीतीने फिका पडलेला पाहून निल उठून त्या मुलाजवळ जाऊन रागाने म्हणाला"त्या मुलीला सोडून द्या नाहीतर तुमचा सगळं तोड खराब करेल...."
नीलचा आवाज ऐकून अक्षरा त्या दिशेने पाहू लागली... पण लवकरच तिच्या कानावर आवाज येतो..."तू आमचं तोड बिघडवणार ... तुला माहित आहे का आम्ही कोण आहोत...?"एक मुलगा उभा राहून नीलची कॉलर पकडून त्याला म्हणाला....
निल कॉलर पकडलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक ठोस मारतो ज्यामुळे तो खाली पडतो.... हे सर्व पाहून इतर मूळ उठून नीलला घेरतात आणि त्यातल्या आमदाराचा मुलगा त्याला बोलतो "तुला का एवढी मिरची लागतेय... बायफ्रेन्ड आहेस का या मुलीचा...."
"जिभेवर ताबा ठेऊन बोल.."निल अक्षराकडे बघून म्हणला त्यामुळे अक्षरही नीलकडे लागली ....
मग एक मुलगा नीलच्या चेहऱ्यावर एक पंच मारतो... ते पाहून अक्षरा तिच्या जागेवरून उभी राहते.... आणि अबीर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे त्याच्या जागेवर बसून कॉफि पिट असतो....
पंच पडल्याने नीलच्या ओठाच्या कोपऱ्यातून रक्त येत होत.. ज्याला निल आपलं बोट आपल्या ओठावर घेऊन स्पर्श करतो आणि वळून त्या मुलाचा हात वाकवतो पण इतर मुलं त्याला मागे धरून मारायला लागतात ,... हे पाहून अक्षरा पुढे जाऊन त्या मुलाला हात धरण्याचा प्रयत्न करते.. पण ती मुलं तिला दूर ढकलतात आणि नीलला मारहाण करतात...
अक्षराला ढकलल्याने ती खाली पडते आणि तिच्या हाताला लागत.... ती तिच्या हाताकडे बघते ....
मारहाण होत असताना निल ओरडत म्हणाला"भाई यार तुला लाज नाही वाटत का.... ... तुझ्या भावला इथे मारहाण तू तिथे सँडविच ठुसतोय ..."
"पंगा तू घेतलाय तर मर तूच खाणार.. मी नाही..." अबीर न बघता म्हणाला....
त्यानंतर ती मूळ नीलच्या पोटात पंच करतात ज्यामुळे नीलच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरु व्हायला लागतो आणि तो खाली जमिनीवर पडतो.. अबीर ला पडण्याचा आवाज येतो... तो मागे वळून पाहतो आणि जागेवरून उठून नीलकडे जाऊन त्याला उचलतो...
नीलला उचलून अबीर त्याला खुर्चीवर बसवतो आणि पाणी देतो आणि त्याचा कोर्ट बाहेर काढून टेबलावर ठेवल्यावर तो मागे वळून त्या मुलाकडे रागाने पाहतो...
अबीर ला त्याच्याकडे पाहताना बघून ती मुलं हसायला लागतात आणि त्यातला एक म्हणतो"एका भावाने आधीच मार खाल्ला आहे आता दुसराही मार खायला तयार आहे... चला त्यालाही बॉडी मसाज देऊया... बिचार्याला त्याचा सुंदर चेहरा आवडत नाही वाटत म्हणून तो आपल्याकडून दुरुस्त करून घयायला आला आहे.... " असं म्हणत तो मुलगा कबिरला मारायला धावतो.... पण अबीर त्याला जोरात बुक्का मारतो आणि तो तिथेच थंबुन त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवतो... पण अबीर थांबत नाही तो त्याच्या डोक्यावरच्या केसाना पकडून त्याला मारायला सुरुवात करतो... पोळ्या मित्राला मारहाण होताना पाहून इतर मूळ तिथे येतात आणि अबीरवर हल्ला करायला लागतात .... पण अबीर सगळ्यांना मारून सर्वाना जमिनीवर पडतो...
सर्व मूल जमिनीवर पडून त्याचे हात पाय पकडत विचित्र चेहरे बनवत बघायला लागतात ... जे पाहून कॅफेमध्ये बसलेले प्रत्येक जण टाळ्या वाजवतात... आणि अक्षरा कबिरच्या शर्टच्या वरून बाहेर पडलेल्या हाताकडे बघते आणि बघतच राहते... तिला अबीर खालून वर पर्यंत तिच्या स्वप्नातला राजकुमार वाटायला लागतो,.... ती बराच वेळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहते....
"तू इथेच बसणार आहेस का... तू म्हणत असशील तर मी तुला घरी ड्रॉप करू शकतो ........"निल उठून पोटावर हात ठेवत तिला म्हणाला....
नीलचा आवाज ऐकून अक्षरा तिच्या विचारातून बाहेर आली आणि नीलकडे बघून ती म्हणाली"तुम्ही दोघांनी माझ्यासाठी या बदमाशासोबत हातापाई केली यासाठी सॉरी आणि थँक्स सुद्धा.... पण मी माझ्या ड्रायव्हरला मेसेज केला आहे तो लवकरच येणार आहे... मला तुम्हला अजून त्रास नाही द्यायचा.."
"पण आम्हाला काही प्रॉब्लम नाही येणार मिस ....???"निल अक्षरा जवळ उभा राहून म्हणाला..
"अक्षरा राठोड...."अक्षरा तीच नाव सांगते आणि पुढे म्हणाली "नाही ठीक आहे... मी माझी माझी निघून जाईल... तुम्ही दोघेही काळजी करू नका आणि तुम्ही दोघेच पुन्हा थँक्स फॉर हेलपिंग मी ...."
"तुझं नाटक झालं असेल तर निघायचं नाहीतर मी निघून जाईन ..."अबीर त्याचा कोट घालून नीलला म्हणाला...
"भाऊ तिला साग ना आपण तिला घरी सोडूया...."निल अबीर कडे बघत म्हणाला ...
अबीर अक्षराकडे न बघता म्हणाला"त्याची काही गरज नाही आहे... असंही तिची कार आली असणार .... तुला तिची काळजी करायची काही गरज नाही... तुला माझ्यासोबत यायचं असेल तर तीस सेकंदात कारजवळ ये नाहीतर मी निघून जाईल आणि तुला पायीच यावं लागेल..."असं म्हणत अबीर डोळ्यावर चष्मा लावून कॅफेच्या बाहेर निघून जातो....
भाई पण ना ... आपण पुढे पण भेटू शकतो ना..."नीलने हसत...हसत अक्षराला विचारलं....
"तुला तीस मिनिट नाही तर फक्त तीस सेकंद मिळाले आहे.."हे बोलून अक्षर जरा हसली आणि काफे मधून निघून गेली... तिची गाडी पण आली होती म्हणून तिने गाडीत बसून खिडलीतून डोकं बाहेर काढलं आणि अबीर कडे बघत हसत ड्रायव्हरला म्हणाली "चला काका, मला घरी घेऊन जा,...."
निळी कँफेच्या बाहेर येतो आणि अबीर कडे पाहून त्याला विचारतो "तू बैल आहेस का....???"
अबीर आश्चर्यचकित होत त्याला म्हणाला "काय ..?? तू मला फक्त बैल म्हणालास..."
निल रागाने म्हणाला"हो तू आहेस म्हणून...???ती मुलगी किती सुंदर होती.... तुला दिसत नाही की ती माझ्यावर एम्प्रेस सुद्धा झाली होती, पण तू सर्व काही बिघडवलंस...."
अबीर कारचा दरवाजा उघडून त्यात बसतो बाबी त्याला बोलतो"तू काय करायचा प्रयत्न करत होता हे तर मी नोटीसच नाही केल...."
निल कारच्या पॅसेंजर सीटवर बसून म्हणाला"तुला नाही समजणार भाई... तुला हृदय नाही आहे ना .... मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्या मनाने मला सांगितलं कि हीच ती मुलगी आहे जिला मी शोधात होतो.... भाई तीच माझं खार प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करेन... इनफॅक्ट मी ठरवलं आहे कि डॅडच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर मी त्यांना अक्षराला मागणी घालायला तिच्या घरी जायला सांगेल....."
अबीर हसत म्हणाला"फ्युचर प्लॅनींग चांगली आहे पण आपण जसा विचार करतो तस होईलच असं नाहीये..."
---------==========----------------------
हेय गाईज ......
कसा वाटलं आजचा भाग ... नक्की कळवा .... आणि पुढे वाचत राहा...
संख्या रे..