Is the police's behavior strange, lady? in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | पोलिसांचं वागणं अजबच बाई?

Featured Books
Categories
Share

पोलिसांचं वागणं अजबच बाई?

पोलिसांचं वागणं अजबच बाई?

          *पोलीस...... पोलिसांवर कधीकधी शंकाच घेतली जाते. कारण त्यांचं वागणं. त्यांचं वागणं कधीकधी एवढं अजब असतं की त्यांच्यावर सहजच शंका निर्माण होत असते यात शंकाच नाही. मग एखादी महिला पोलिसांवर ताशेरे ओढत त्यांचं वागणं अजबच बाई असे म्हणायला कचरत नाही. म्हटलं जातं की अकस्मात अपराधाची स्थिती उत्पन्न होत असेल तर एकशे बारा क्रमांकावर फोन करावा. मुलांच्या बाबतीत काही समस्या असल्यास एक हजार अठ्ठ्यानव या क्रमांकावर फोन करुन लावावा. पोलीस येतात व अपराध टळतो. त्यातच पोलीस कन्ट्रोल रुमचाही क्रमांक लावावा. परंतु कधीकधी असा क्रमांक लावूनही उपयोग नसतो. जेव्हा तो कामात येत नाही. कधी पुरावा म्हणून तर कधी मदत म्हणून. तेव्हाच शंका उत्पन्न होते.*
         पोलीस कन्ट्रोल रुमचे वा अकस्मात अपराध टाळायचे क्रमांक म्हणून एकशे बारा व एक हजार अठ्ठ्यानव हे क्रमांक प्रसिद्ध आहेत. पुर्वी शंभर क्रमांक होता. जो कधी लागतच नव्हता. आता एकशे बारा क्रमांक आहे. जो लागतो. परंतु तो क्रमांक लागल्यानंतर काय होतं. तो क्रमांक लागल्यानंतर पोलीस येतात. पण काहीच करीत नाहीत. उलट अपराध करणाऱ्या व्यक्तींनाच शह देत त्यांची बाजू कधीकधी उचलून धरतात. असं बरेचवेळा घडतं. ते मदतीला येणारे पोलीस शहानिशा करतात व सांगतात की आपण वाद मिटवावा आणि नसेल मिटत तर पोलीसस्टेशनला यावं व आपली तक्रार नोंदवावी. त्यानंतर दोन्ही बाजूकडील मंडळी मिळेल त्या साधनानं पोलीस स्टेशन गाठतात व आपली तक्रार नोंदवतात. यामध्ये महत्वपुर्ण बाब ही की संबंधीत जीही प्रकरणं उद्भवतात. त्या प्रकरणात एकशे बारावर फोन लावणारा व्यक्ती हा अन्यायशोषीत असतो. म्हणूनच तो एकशे बारावर फोन लावत असतो. त्यामुळंच पोलीस येतात व अपराध टळतो. हा एक पुरावाच असतो. अन्यायशोषीत व्यक्तींसाठी. त्यात अन्यायशोषीत व्यक्ती आणि अन्याय करणाऱ्या व्यक्तीला म्हणलं जातं की त्यानं पोलीस ठाण्यात यावं व तक्रार नोंदवावी. परंतु ज्यावेळेस अन्यायशोषीत व्यक्ती पोलीस स्टेशनला पोहोचतो. त्यावेळेस त्याची तक्रारच पोलीस स्टेशनला घेतली जात नाही. उत्तर विचारल्यावर चक्कं सांगीतलं जातं की तो उशिरा पोलीस स्टेशनला पोहोचला. तो येण्याच्या आधीच तक्रार नोंदवली गेली आहे. त्यानंतर तक्रार कोणं नोंदवली याची शहानिशा करण्यात येते. तेव्हा आढळून येतं की ती तक्रार ज्यानं अन्याय केला. त्याच व्यक्तीनं त्याचे आधी येवून तक्रार नोंदवली. त्यामुळंच ज्यानं एकशे बारा क्रमांकावर तक्रार नोंदवली. ती तक्रार घेतली जावू शकत नाही व त्या क्रमांकावर फोन लावण्याचाही उपयोग होत नाही. त्यानंतर असे का घडले याचा विचार येतो. विचार येतो व मनातल्या मनात नकाराचे चक्र सुरु होते व पोलिसांबद्दलची आत्मीयता नष्ट होवून मनात पोलिसांबद्दल असुयाही निर्माण होत असते. 
         या प्रकरणात आणखी एक महत्वपूर्ण मुद्दा हा की संबंधीत व्यक्ती, ज्या व्यक्तीवर अन्याय झाला तो अन्यायशोषीत असून त्यानं जरी एकशे बारा क्रमांकावर फोन केला आणि पोलीस येवून त्यांनी जरी सांगीतलं की त्यानं पोलीस स्टेशनला येवून तक्रार नोंदवावी. तरीही साधनांच्या अपुरेपणामुळं तो अपराध करणाऱ्या व्यक्तीच्या मागून जर पोलीस ठाणे गाठत नसेल वा त्याची तक्रारच नोंदवली जात नसेल तर त्या एकशे बारा क्रमांकाचा वा एक हजार अठ्ठ्यानव क्रमांकाचा उपयोग काय? अशा घटना वा प्रसंग काही लोकांच्या जीवनात वारंवार घडत असतात. हे मला लहानपणापासून दिसलं. लहानपणातही गावात कुणावर कुणी अत्याचार केल्यास गावातील दोन्ही घटक तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला जात. ज्यात अन्याय करणारा घटक आपल्यावर खटला दाखल होवू नये म्हणून आधीच पोहोचलेला असायचा. त्यातच त्याचा अवतार पाहण्यासारखा असायचा. ते स्वतः कपडे फाडलेल्या अवतारात असायचे. अंगावर ओरबाडलेल्या जखमा असायच्या. त्यानंतर दोन्ही पार्टीचं मेडीकल चेकअप व्हायचं व कळायचं की त्या जखमा त्यांनी स्वतः स्वतःच्याच अंगावर केलेल्या असत. फिंगरप्रिंट प्रणालीच्या तावडीतून ते सुटायचं नाही. लपायचंही नाही व अगदी ते सहज दिसायचं. कालचे पोलीस हे अतिशय इमानदारीनं फिंगरप्रिंट प्रणाली राबवायचे. ज्यात अन्याय कोणी कोणावर केला हे निदर्शनास यायचं. 
         आजही अशीच फिंगर प्रिंट प्रणाली अस्तित्वात आहे. परंतु आज काळ बदलला आहे व लोकं फारच हुशारही झालेले आहेत. लोकं पोलिसांनाही मॅनेज करीत असावेत असे चित्र दिसत आहे. आज फिंगरप्रिंट प्रणाली ही आरोपीच्या मतानुसार काम करते की काय? याची शंका उत्पन्न होते. कारण एकशे बारा क्रमांकावर जरी फोन लावून अपराध टाळण्यासाठी पोलिसांना बोलवले तर पोलीस येतात हे निश्चीत. परंतु कधीकधी पोलीस येवून त्या परिस्थितीत केवळ ते तक्रारकर्त्यांनाच दाटतात. कारण असतं आरोपीचं वजन. आरोपी हा आरोपीच असतो. त्याला जात धर्म वा ओळख नसते. ही भावना गृहीत न धरता पोलीस प्रशासन संबंधीत गुन्हा नोंदवतांना आरोपीची ओळख, जात व धर्म पाहतात की जे पाहायला नको. त्यामुळंच काही लोकं म्हणतात की तशाच स्वरुपाचा आपल्यावर अत्याचार होत असतांना तोच क्रमांक लावून आपण आपल्यावर झालेल्या अत्याचाराचं निवारण करु शकत नसेल वा तो क्रमांक तक्रार करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येत नसेल किंवा त्या क्रमांकावर फोन करण्याचा उपयोग होत नसेल तर तो क्रमांक कोणत्या फायद्याचा. तो क्रमांकच बंद केलेला बरा आणि आरोपीला मोकाटच सोडून दिलेले बरे की त्याला दुसरे तशाच स्वरुपाचे इतर बरेच गुन्हे करता येतील. असं आजही वाटतं. यामुळेच आजच्या काळात बरेचसे गुन्हे वाढत चाललेले आहेत. याबाबतीत एक घटना सांगतो. एक प्रकरण अमरावतीतील मेळघाटातील रेट्याखेड्या गावात घडली. हे गाव चिखलदऱ्यापासून ऐंशी किमीच्या अंतरावर आहे. त्या गावातील एका वृद्ध महिलेवर अलिकडील काळात जादूटोणा अस्तित्वात नसतांना तिच्यावर जादूटोणा केल्याचा आक्षेप घेवून तिची धिंड काढली. तिला आगीचे चटके दिले. तिला मुत्र पाजले व तिच्या तोंडाला काळे फासले. तसंच हे कृत्य खुद्द ज्या व्यक्तीनं गावातील अन्याय दूर करावा म्हणून त्याची नियुक्ती असते. अशा पोलीस पाटलानंच केलं. त्यातच त्या पोलीस पाटलाचाच रुतबा जवळच्या पोलीस स्टेशनला असल्यानं त्या महिलेवर अन्याय होवूनही पोलिसांनी सदर तक्रार दाबून ठेवली. पुढं कारवाई झाली. परंतु तेव्हापर्यंत ती तक्रार दबूनच राहिली ना. या प्रकरणात अन्याय ज्यावर झाला. त्या व्यक्तीची मुलं जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार घेवून गेले. तेव्हाच तक्रारीचं निवारण झालं व आरोपींना अटक झाली. जर असं झालं नसतं तर आरोपी जाळ्यात अडकले तरी असते काय? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. 
         आज बराचसा समुदाय सुशिक्षीत आहे म्हणून ठीक आहे. दाद तरी मागता येते. परंतु जर समाज सुशिक्षीत नसता तर चित्र काहीसे वेगळेच असते. आजही काही ठिकाणी असंच घडतं. विशेष सांगायचं झाल्यास आरोपी हा आरोपी असतो. त्याची जात, धर्म वा ओळखही आरोपीच असते. असे असतांना त्याला जात धर्म वा त्याची वेगळी अशी ओळख नसतेच. असे असतांनाही पोलीस ते प्रकरण जर आरोपीच्या जात, धर्म आणि विशेष अशा ओळखीनं हाताळत असतील तर जगातील कोणत्याच व्यक्तीला न्याय मिळणार नाही. अशाच धिंडी निघतील. कुणाला मुत्र पाजले जाईल तर कुणाचे गळेही कापले जातील. आज सगळीकडे असंच घडत आहे. वातावरण तंग आहे व आरोपी सर्रास सुटत आहेत. त्यांना अभय मिळत आहेत. महिलांवरही अत्याचार होत आहेत. ज्याचं काल याचं प्रमाण कमी होतं. आज जास्त आहे. 
          आज बऱ्याच ठिकाणी गुन्हे घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला. ज्यात एकशे बारा व एक हजार अठ्ठ्यानव क्रमांकाचा समावेश होतो. लोकं फोन लावतात. परंतु प्रत्यक्षदर्शी पोलीस स्टेशन गाठण्यावर तक्रार करण्याचं स्वरुप अवलंबून असतं. त्यातच आज तक्रार करणारी व्यक्ती जरी एकशे बारावर फोन करीत असेल तरी तीच तक्रार ग्राह्यं धरली जात नसल्यानं बऱ्याच लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चाललेला आहे. ज्यातून गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे व गुन्हे वाढत असून गुन्हेगारही वाढत आहेत. यात शंका नाही. 
         महत्वाचं सांगायचं झाल्यास अपराध टाळण्यासाठी वा पोलिसांची मदत मिळविण्यासाठी जर एकशे बारा क्रमांक आहे तर तोच क्रमांक तक्रार दाखल करण्यासाठीही पुरावा म्हणून वापरावा. शिवाय जो कोणी तक्रार दाखल करीत असेल तर त्याला तक्रार दाखल करतांना विचारावे की त्यानं तक्रार दाखल करण्यापुर्वी एकशे बारा क्रमांकावर फोन लावला होता काय? नसेल लावला तर त्याची तक्रार दाखलच करु नये. आधी एकशे बारावर फोन लावणाऱ्यांची तक्रार घ्यावी. जेणेकरून अन्याय कुणी कुणावर करणार नाही. गुन्हे कोणीही करणार नाही. गुन्ह्यांची संख्या कमी होईल. गुन्हेगारही कमी होतील. आरोपी मोकाट सुटणार नाही. अन् तसं होत नसेल तर एकशे बारा क्रमांक रद्द करावा. 
          गुन्हे वाढतात व गुन्हेगार वाढतात. कारण त्यांना माहीत असतं की एकशे बारा क्रमांकावर फोन लावल्यानं काही उपयोग नाही. ते गुन्हे करतात जाणूनबुजून व ताबडतोब पोलीस स्टेशनला जावून तक्रार नोंदवतात. शिवाय उलटे चोर आपणच शेर होत समाजात मिरवतात. काही लोकं यातून पैसेही कमवतात. गुन्हे मागे घेत असतांना. चांगले व्यक्ती मात्र या भानगडीत पडत नाहीत. ते फक्त एकशे बारावर फोन करु शकतात. तक्रारीच्या भानगडीत पडत नाहीत. मग फसगत होते व चांगला व्यक्तीच पोलिसांच्या विनाकारण जाळ्यात अडकतो यात शंका नाही. तेव्हा एकशे बारा क्रमांक हाही एक तक्रारीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा हेही तेवढंच खरं. जर असं घडत नसेल तर व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होवून तो आजच्या पोलीसांचं वागणं अजबच बाई असे म्हणून घ्यायला विसरत नाहीत. 

            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०