Decision in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | निर्णय

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

निर्णय

निर्णय        विदीर्ण सामाजीक झळा.जणू दुःखाचं वाळवंटच पसरलं होतं तिच्या जीवनात.ती विचार करीत होती.देवदासी बनण्याची.तिला हौस नव्हतीच मुळी देवदासी तिनं बनावं.पण नियती तिच्यावर क्रूर होती.ती नियतीच तिच्यावर जाळे टाकत होती नव्हे तर ही नियतीच तिला देवदासी बनण्यास भाग पाडत होती.        आज समाजात कित्येक समीरा होत्या की ज्यांचं लग्न जुळत नव्हतं.तर कित्येक समीक्षा अशा होत्या की ज्यांचे विवाह तर झाले होते.पण पतींनी त्यांना सोडून दिलं होतं उपभोग घेवून.मुलगी झाल्याचा कांगावा करुन.मुख्य म्हणजे मुलगी होणे हा केवळ एक बहाणा होता.खरं कारण वेगळंच होतं त्या पत्नीला सोडण्याचं.            समीरा तिचं नाव होतं.लहानपणापासून ती लाडात वाढली होती.तिला एक भाऊ आणि एक मोठी बहिण होती.बहिण मोठी असल्यानं वडीलांनी तिचं लग्न करुन दिलं होतं.पण तिचाही पती हा बरोबर नव्हता.त्यामुळं त्या पतीनही तिला सोडून दिलं होतं.       समीक्षा व समीरा दोघ्या बहिणी होत्या.दोघीही बहिणी लहानपणापासून गोडीगुलाबीनं राहायच्या.पण आता समीक्षेची चिडचिड.लग्न तुटण्यावरुन तिचं मायबापाकडे राहाणं शिवाय न्यायालयात प्रकरण गेलं तरी ते प्रकरण न्यायप्रविष्ठ होतं.पती जवळपास चाळीस ते पन्नास हजार कमवीत होता.पण तो पत्नीचं यत्किंचितही ऐकत नव्हता.म्हणून सारखी समीक्षाची चिडचिड.ती चिडचिड अजून वाढत चालली होती.           समीक्षा जेव्हा जेव्हा न्यायमंदीरात यायची.तिला आशा असायची की हे न्यायमंदीर कधीतरी मला न्याय मिळवून देणारच.कधीतरी मला खावटी मिळणारच.मला नाही तर माझ्या मुलीसाठी तरी.समीक्षेला तिचे जुने दिवस आजही आठवत होते.तिचा पती किती लाड करीत होता तिचा.ती गरोदर असतांनाही किती काळजी घ्यायचा.हे सांगणे नकोच.पण एकदाचं मुल झालं आणि कळलं की मुलगी झाली.सासू नाक मुरडायला लागली.याचं कारण होतं की तिला मुलगा हवा होता.मुलगी नको होती.        समीक्षेला मुलगी झाली खरी.पण समीक्षा सुखी नव्हती.जुने दिवसं तिची सासू व पतीराया विसरुन गेले होते व आता बस टोमणेच मारायला लागले होते.कधीकधी तर आईच्या बोलण्यातून वादही व्हायचे.ते वाद एवढे विकोेपाला जायचे की मारपीटही व्हायची.ह्या सगळ्या गोष्टीतून तंग होवून समीक्षेनं घरदार सोडलं व ती वेगळी चूल मांडून राहू लागली.पण यात मुलीचा खर्च मिळावा म्हणून ती खावटी मागू लागली.यात तिचं काही चुकत नव्हतं.पण यात चुकत होतं तिच्या पतीचं.चुकत होतं नियतीचं. पण नियती काही ती चूक स्वीकारायला व सुधरंवायला तयार नव्हती.         समीक्षेची हालत गंभीर होती.त्याचबरोबर हालत समीराचीही गंभीरच होती.बहिणीच्या घरी येवून राहण्याचा परीणाम तिच्यावरही झाला होता.आज ती पाहायला सुंदर असली तरी तिच्या लग्नासाठी पाहूणे उतरत नव्हते.तिचं वय वाढून गेलं होतं.चेह-यावर सुरकृत्या येवू लागल्या होत्या.चेहरा निस्तेज पडू लागला होता.मायबापाला चिंता होती की काय करायचं.भाऊ वहिणी वेगळे राहात होते,त्यांना आपल्या बहिणीची चिंता सतावत नव्हती.          चिंतेतील मायबाप,चिंतेतील समीरा आणि चिंतेतील समीक्षा.हालत दिवसेंदिवस खस्ता होत चाललेली.अशावेळी समीराच्या जीवनात गीतनं जन्म घेतलाय. गीत समीराला मोबाईलवर मिळालेला तरुण.तो समीराशी बोलायचा.त्याला समीरा फार आवडायची.तो तिचं सांत्वन करायचा.तिला समजवायचा.पण तो काही तिच्याशी विवाह करु शकत नव्हता.कारण त्याचा विवाह झाला होता.गीत फक्त सांत्वना देवू शकत होता. वर्षामागून वर्ष जात होते.गीतनं एक दिवस विचारलं,         "समीरा,तुझा जर विवाह झाला नाही तर तू काय करशील?"           समीरा विचारात पडली.तिच्या पायाखालची वाळू सरकली.तशी ती विचार करु लागली.तोच गीतनं पुन्हा प्रश्न केला,         "समीरा,तुझा विवाह जर झाला नाही तर काय करशील?"          समीरा उत्तरली,         "मी देवदासी बनेल.प्रभू येशूची सेवा करीत करीत दिवस काढेल.त्यांच्या चरणात अख्खं आयुष्य घालवेन."          देवदासी.......वाईट प्रथा.......कुप्रथाच समजा.पण विवाह न झाल्यास चक्क देवदासी बनण्याचा निश्चय करणारी समीरा...... आज समीरा विचार करीत होती.कारण आज काही या समीराची संख्या कमी नव्हती.कोणत्या समीरा हुंड्याची रक्कम देता न आल्यानं कुवा-या पडल्या होत्या.तर काही समीरा सुंदर दिसत नसल्यानं त्यांचे विवाह जुळले नव्हते.काही समीरांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यानं त्यांचे विवाह जुळत नव्हते.अशा ब-याच समीरा होत्या.या समीरा त्या समीक्षेपेक्षाही ब-या होत्या.कारण समीक्षेचं दुःख न कळणारं होतं.त्या ना तळ्यात होत्या ना मळ्यात होत्या.पण समीरा एका काठावर तरी उभ्या होत्या एक ठोस निर्णय घेण्यासाठी.         आज समीराचं लग्न झालं नव्हतं.ती नित्य प्रभू येशुची सेवा करीत होती.परमेश्वर दासी बनून.तसेच समीक्षेचाही खटला न्यायालयात सुरु होता.तिला आणि तिच्या मुलीला अजूनपर्यंत पोटगी मिळाली नव्हती.दोघ्याही दुःख भोगतच होत्या.एक देवदासी बनून तर दुसरी भोगदासी बनून.जणू तिच्या पतीनं तिला भोगदासी बनवून घेवूनच तिच्यावर अत्याचार केला होता.नव्हे तर उपभोग घेवून झाल्यावर ते भोग भोगायला लावण्यासाठी मधल्याच फळीवर सोडून दिले होते.       अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२