Udoudo of guests: Not at all in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | पाहुण्यांचा उदोउदो : मुळीच नको

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

पाहुण्यांचा उदोउदो : मुळीच नको

पाहुण्यांचा जास्त उदोउदो नको.          *आपल्या भारत देशात पाहुण्यांना विशेष महत्व आहे. पाहुण्यांना आपल्या भारत देशात अतिथी देवो भवं म्हणत देवांचा दर्जा दिला जातो. त्यांच्या सर्व गोष्टी ऐकल्या जातात. त्यांच्यासाठी विशेष असा पाहुणचारही केला जातो. कारण आपल्याला ते जर आले तर अतिशय आनंद होत असतो. त्याचं कारण आहे, हे जीवन. म्हणूनच पाहुण्यांची आपण इज्जत करतो. हे जीवन तसं पाहिल्यास बरंच कंटाळवाणं आहे. या कंटाळवाण्या जीवनात पाहुण्यांना विशेष स्थान आहे. कारण पाहूणे हे आपल्या कंटाळवाण्या जीवनात रंग भरत असतात.*            पाहुणे....... अलिकडील काळात भारतात पाहूण्यांना मोठा सन्मान मिळत असतो. त्यांची मोठी आरास असते आपल्या घरी. प्रसंगी एखाद्यावेळेस काही पाहूणे आपल्या घरच्या सदस्याला काही बोलत असतील तरीही पाहूण्यांना आपण काहीच म्हणत नाही आणि आपला घरचा सदस्य जर पाहुणे काही बोलल्यास पाहुण्यांना एखाद्यावेळेस काही म्हणत असतील तर आपण आपल्या घरच्या सदस्यावर रागावतोच.         आज शहरात व देशातही नवीनच फॅड आलं आहे. आपण प्रत्येक वेळेस कार्यक्रम प्रसंगी पाहुणे बोलावतो. त्यांचाच उदोउदो करीत असतो. जरी त्यांच्याहीपेक्षा कितीतरी पटीनं गुणवंत आपल्याच देशात असतील तरीही. आपल्याला कार्यक्रम प्रसंगी आपल्या देशातील गुणवंत वा शहरातील गुणवंत दिसत नाहीत. इतर शहरातीलच गुणवंत दिसतात व त्यांचाच उदोउदो चाललेला असतो.  हे वास्तविक चित्र आहे.          आपण पाहुण्यांची इज्जत करतो. कारण आपला देश हा संस्कारक्षम आहे व या देशात अतिथी हा अगदी देवासमान मानला जातो. अतिथींची इज्जत हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा विषय असतो.          अतिथी हा देव असतो. ही परंपरा आपल्या देशात पुर्वीपासूनच आहे. त्यातच अतिथींनी काही सांगितलेले बदल स्विकारण्याची परंपराही पुर्वीपासूनच आहे. जेव्हा माणूस झाडावरुन खाली आला होता. झाडावरुन खाली आलेला हा माणूस जेव्हा जमिनीवर वावरायला लागला. तेव्हा या जमिनीवर आर्याचं आगमण झालं. याचाच अर्थ असा की आर्य हे आपले पहिले पाहुणे होय. त्यानंतर अतिथींचं ऐकण्याची आपली परंपरा असल्यानं आपण आर्यांचं वेळोवेळी ऐकत गेलो. त्यातच ज्यात त्यांनी आपल्याला सांगीतलेल्या देवादिकांच्या कल्पनाही आपण ऐकत गेलो. त्यांनी सांगीतलं पाषाणात देव असतो. ते ऐकत गेलो. मग काय, ज्यातून अंधश्रद्धा प्रसवल्या गेल्यात व आपण आर्याचे नकळत गुलाम झालो. ते आपले पाहूणे म्हणून आले असले तरी त्याच पाहुण्यांनी आपल्याला तत्कालीन काळात गुलाम केलं होतं, आपल्यावर अत्याचार केले होते. त्यानंतर पाहूणे म्हणून आलेल्या अरबांनी व मुघलांनीही आपल्याला गुलाम केलं. त्यांनीही आपल्यावर अनन्वीत अत्याचारच केले होते. पुढं आपल्याच देशात पाहुण्या म्हणून आलेल्या इंग्रजांनी आपल्याला गुलाम केलं व त्यांनीही आपल्यावर वारंवार अत्याचार केलेत. हे विसरता येत नाही.             पाहूणे येतात. आपल्या घरात वावरतात. कधी मालकासारखं  हुकूम गाजवतात. ते पाहूणे असले तरी ते आपल्यावरच अत्याचार करतात. पुढं आपल्याला त्यांना बोलायची हिंमत होत नाही. कारण आपल्यात माणुसकी असते. आपल्याला असं वाटत असते की जर आपण पाहुण्यांना काही बोललोच तर त्या पाहुण्यांना राग येईल. त्या पाहुण्यांना काहीच राग येवू नये असं सारखं वाटत असतं आपल्याला. म्हणून आपण बोलू शकत नाही. आपण त्यांना बोलायचं टाळतो. परंतु पाहूणे तसा विचार करीत नाहीत. ते आपल्याच घरी येतात व आपल्याला हिनवत असतात.           अतिथी देवो भव. पुरातन काळापासून चालत आलेली प्रथा. अतिथींसाठी आपला सर्व सहन करणारा स्वभाव. कारण आपण सहनशील आहो व आपल्यात संस्कार आहे. त्याच संस्काराच्या भरवशावर आपण सर्वांचं सगळंच सहन करीत आलो. म्हणूनच आर्य लोकं आले व ते इथं स्थिरावलेही. त्यानंतर अरब आले व तेही स्थिरावले. त्यानंतर मुघल आले.  तेही स्थिरावले व त्यांनी राज्य केलं. इंग्रज लोकं आले व त्यांनीही राज्य केलं. याचाच अर्थ असा की जे जे कोणी पाहुणे म्हणून भारतात आले. त्यांनी त्यांनी आपल्यावर अत्याचार केला अन् अन्यायही. तसंच आपल्या कुटुंबातही घडत असते.          आजही पाहुण्यांची आरास असते प्रत्येकांच्या घरात. ज्यात पाहुण्यांमुळे कधी आपल्या घरच्या एखाद्या सदस्यास बोलावं लागतं. त्यात आपल्याच घरचे सदस्य निराश होवू शकतात. कारण पाहूणे कधीकधी आपल्याच घरच्या सदस्यांचा अपमान करीत असतात. मात्र आपल्याला त्यांचं काही घेणं देणं नसतं. आपल्यासाठी महत्वाचा असतो पाहुणा. पाहुण्यांचा सन्मान करणं. त्यांचं हित जोपासणं हे आपण आपलं कर्तव्य समजत असतो. म्हणूनच आपण पाहुण्यांमुळे आपला अपमान जरी झाला वा त्यांनी आपल्यावर आपल्या  वागण्यातून अत्याचार जरी केले, तरी तो अत्याचार वा अपमान आपण मानून घेत नाही व आपण आपल्याच घरच्या व्यक्तीवर रागावत असतो. आपल्याच घरच्या व्यक्तींना अपमानास्पद वागणूक देत असतो. जो आपल्या घरचा सदस्य असतो. अन् पाहुणा हा आपल्यासाठी अतिथी देवो भव असतो. जो आपल्याच घरचा सदस्य नसतो.            विशेष सांगायचं म्हणजे पाहूणे यावेत. न यावेत असे नाही. परंतु पाहुण्यांनी पाहुण्यांसारखंच राहावं. स्वतःची अक्कल पाजळवू नये. अन् आपणही विनाकारण पाहुण्यांचा उदोउदो करु नये. कारण पाहूणे हे काही आपलं घर पुरं करीत नाहीत. ते आपलं आपल्यालाच पुर्ण करावं लागतं. हे तेवढंच खरं आहे. जरी ते आपल्या जीवनात आनंद भरत असले तरी. तसंच पाहुण्यांसाठी आपण आपल्याच घरातील सदस्यांना अपमानास्पद वागणूक देवू नये हेही तेवढंच खरं. अतिथींबरोबर आपल्या सदस्यांचेही हीत जोपासणं आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यांचंही हित जोपासावं. तेही नाराज होवू नयेत. म्हणजे झालं. कारण त्यांच्यावरच आपल्या घराची भिस्त अवलंबून असते. म्हणूनच केवळ अतिथी देवो भवं करत बसू नये. जर पाहुणे आपल्या घरच्या लोकांचा पाणउतारा करीत असतील तर आपणही त्यांना जागा दाखवावी. तेच आपण आपल्या शहरासाठी, राज्यासाठी वा देशासाठी करावं म्हणजे झालं.           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०