Niyati - 41 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 41

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

नियती - भाग 41


भाग 41




पण मुख्य म्हणजे कोणत्या रस्त्याने आपल्याला जायचे आहे तेच तिला समजत नव्हते. जुलीने मायराच्या चेहऱ्यावरील  कावरेबावरेपणा निरखून घेतला आणि ती अतिशय हळुवार आवाजात म्हणाली....


"चल ...आपण तिकडे त्या दुकानात थोडावेळ बसू... उभे राहून पाय दुखत आहेत..."





मायराला आता थोडं विचित्र वाटू लागलं शरीरात... डोकं काम करत नाही असं वाटू लागलं... बोलायचे आहे काहीतरी पण तोंडातून शब्द फुटत नाहीत असं जाणीव होऊ लागली...





मायराला नकार द्यायचा होता... पण बोल निघत नव्हते मुखातून.... आता तेथे जॅक आला त्यांच्याजवळ.
मायरा एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे पहात होती... जॅक तारवटलेल्या डोळ्यांनी केसांची झुलपे एका हाताने वर सरकवत सिगरेटचा दीर्घ झुरका घेत मायराकडे पाहून विचित्र हसू लागला आणि जुली कडे पाहून पुन्हा डोळा मारला तेव्हाप्रमाणेच...





आता मात्र मायराने पाहिले पण तिचे हात पाय बधिर झालेले होते... काम करत नव्हता तिचा मेंदू ....निव्वळ डोळ्यांनी पहात होती ती. आता तर मायराच्या चेहऱ्यावर निर्विकारपणा आला होता...





जुली ने तिला तोंडात असलेले पान पूर्ण खाऊन घ्यायला सांगितले... तिने सांगितल्याप्रमाणे मायराने पान गिळून घेतले.





जॅक येऊन त्या दोघी बसलेल्या होत्या तेथे मायराच्या बाजूने बसला.




आता मायरा.. त्या बेंचवर जॅक आणि जुलीच्या मध्ये बसलेली होती... त्या दुकानात गरम गरम वडे तळल्या जात होते...
जुलीने जॅकला दोन वडे आणायला सांगितले...



जुलीने मनात काही आडाखे बांधणे सुरू केले. ती मायराचा हात धरून बेंचवर बसली होती.



खाल्लेल्या विड्याच्या पानामुळे मायराच्या पोटात आता भूक भडकली होती. आणि जुलीने ती भूक तशीच भडकू द्यायची.... इव्हन वाढवायची असे ठरवले होते मनात...
चांगला मासा गळाला लटकला आहे तर त्याला ती आता सोडणार नव्हती...





समोरंच एक झाड होते त्या यात्रेच्या परिसरात. त्या झाडामुळे त्या भागात सरळ रस्ता न राहता आजूबाजूला गोल गोल दुकान असल्यामुळे..... ते जिथे थांबले होते मायराला घेऊन.... तेथे सहसा नजर जाणार नव्हती कुणाची पटकन ....अशी ती जागा होती. 
जुलीने चलाखीने ती जागा निवडली आणि मायराला घेऊन बसलेली होती.





एखादा वडा पोटात गेल्यामुळे ती भूक कमी न होता अधिकच वाढणार होती हे जुलीला पक्के माहिती होते... ती तेवढी जॅकला ओळखतंच होती...





हळूहळू ती प्रश्न विचारून मायराची सगळी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होती. विड्याच्या पानात दिलेली औषधी काम करते की नाही...???  जुलीला संदेह होता पण हळूहळू असर होत असल्यामुळे..... पूर्ण माहिती सध्या तरी मिळत नव्हती पण काही काही तुटक तुटक समजत होते जुलीला.






आपल्यासमोर बसलेली ही नाजूक आणि टंच पोरगी... जरी तिचं लग्न झालेलं असलं तरी... अजूनही कोवळी कुमारिकाच आहे... हे गुपित जूलीला समजलं होतं.





जूलीच्या डोक्यातील विचारांची चक्री वेग धरू लागली .
एक सावज तिच्या टप्प्यात आले होते... तेवढ्यात
जॅक दोन वडे घेऊन याला प्लेटमध्ये... त्याने स्वतःसाठी सुद्धा एक प्लेट आणली होती वड्यांची.... वड्याची प्लेट त्याने मायराच्या हातात दिली आणि स्वतः एक प्लेट घेतली.





मायराला जुलीने इशारा केला खाण्यासाठी... मायरा मुकाटपणे वडे खाऊ लागली... दुसऱ्या प्लेट मधील एक वडा जॅकने घेतला आणि दुसरा वडा जुलीने घेतला....






जुली आणि जॅक दोघेही .....दोघेही.... सावकाश खात होते आपले आपले वडे... त्या मानाने मायरा आता अधाशीपणाने स्वतःच्या प्लेटमधली दोन वडे खात होती....






जॅक आणि जुली एकमेकाकडे बघून मंद हसू लागले. खाऊन होताच जॅकने पैसे दिले हॉटेल वाल्याला आणि त्याने जुलीला इशारा केला. 






पुन्हा जवळचे विड्याची दोन पानांच्या पुड्या जुलीने बाहेर काढल्या आणि एक मायराच्या हातात खोलून दिले आणि एक स्वतः घेतले.





तेवढ्यात जॅक जुलीच्या कानात काहीतरी कुजबुजला आणि जुलीने मायराचा हात पकडला आणि यात्रेतून उजव्या भागाच्या रस्त्यातून बाहेर निघाले... तेथे एक गाडी उभी होती.. त्यामध्ये सुरुवातीला जॅक बसला आणि त्याने मग मायराचा हात पकडून आतमध्ये ओढून बसवले.... मायरा बसल्यानंतर मग जूली बसली....





मायरा खिडकीच्या बाहेर पाहत होती तिथेच दोघांच्या मधात बसून... गाडी पुढे निघाली. गाडी जवळपास पंधरा-वीस मिनिटे चालणार होती... जात असताना..... एके ठिकाणी सिग्नल लागला तर गाडी थांबली... खिडकीतून मायराला बाहेर रस्त्याच्या बाजूला समोस्याचा ठेला दिसला . ते दिसताच मायराची चुळबूळ सुरू झाली...




गाडी थांबल्यामुळे.... आणि काचा बंद असल्यामुळे ती अस्वस्थ होऊन.... आणि पोटात भुकेल्या आगीचा डोंब उसळला असल्यामुळे तिची चुळबूळ भारीच त्रासदायक वाटू लागली दोघांना...





जूलीने इशारा करताच जॅक उतरला गाडी बाहेर .... समोसे वाल्याकडे गेला आणि गरम समोसे मागण्याच्या भानगडीत न पडता जे तेथे बनवून होते तेच घेतले... 


जॅकने त्या समोसेवाल्या आजोबाला पैसे दिले... आणि
म्हणाला....
"आजोबा, खूप तहान लागलेली आहे. पाणी मिळेल काय..??"





त्याने असं विनवणीच्या स्वरूपात म्हटल्यानंतर आजोबा पाण्याच्या माठाकडे जाऊन पाणी घेऊ लागले... आणि इकडे जॅक ने पटकन खिशातली छोटीशी बॉटल काढली आणि समोस्यावर दोन दोन थेंब टाकले... आणि बॉटल पटकन ठेवून दिली...






आजोबाने पाणी दिल्यानंतर दोन घोट प्यायला आणि ग्लास परत केला... आजोबा विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत होते.






मनात ते.....
"एवढी तहान लागली म्हणत होता आणि फक्त दोन घोट .... घोटभर पाण्याने तहान जाते...??? विचित्रंच आहे."






बांधून दिलेले समोसे जॅक झटपट घेऊन आला आणि गाडीत बसला. मायराच्या हातात समोस्याचा पुडा दिल्यावर मायरा
अगदी आधाशी पणे  तो पुडा खोलताना पाहून... ते दोघेही कुत्सितपणे हसू लागले....







मायराचे समोसे खाऊन झाले.... पुन्हा ती गाडीच्या बाहेर खिडकीतून बघू लागली.... तिला बाहेर विशाल रस्ता आणि त्यावर वाहनांचा सुळसुळाट... आजूबाजूला दोन-चार येणाऱ्या इमारती आणि चौकामध्ये असणारी माणसांची गर्दी... ती भांबवल्यासारखी झाली होती.



एवढं खाऊनही सारखं पोटात भूक जाम भडकत होती... आता थोडी थोडी अंधारी येत होती डोळ्यांसमोर.... ती येणारी डोळ्यांवरची झापड... त्यामुळे तिला डोळ्यांच्या पापण्या ताणून ताणून पहावे होते..... तिला आता भोवळ आल्यासारखे झाले... तर मायराने जुलीचा हात घट्ट पकडला.....





मायराचे डोके फार फार जड वाटत होते. समोरून एक टॅक्सी येऊन थांबली... जॅक आणि जुलीने मायराला उतरवले आणि टॅक्सीत मध्ये घेऊन बसले मायराला.... मायराला कोणतीही जाणीव होत नव्हती.... तिला भान नव्हतं...
एखाद्या यंत्रासारखी झाली होती ती....पण....


पण आता यावेळी मायराच्या माथ्यावर आट्या पडल्या...
तिला जसं बसवले होते दोघांनी... हातापायांची हालचाल सर्व ....    तिच्या मेंदूच्या नियंत्रणा बाहेर गेले होते तरी...ते तिला आवडले नव्हते.... कुठली तरी विचित्र शक्ती अंगी संचारल्यासारखी...तिने हाताने कडेला बसण्याचा प्रयत्न केला होता पण जुलीची तशी इच्छा नव्हती आणि .....आपल्या इच्छेप्रमाणे जॅक  मायराचा हात पकडून तो मांडीवर ठेवून बसला..





तेवढी ती भ्रमात होती तरीही तिचा जॅकने हात पकडला त्यावर विरोध केला होता...



रस्त्यावरून टॅक्सी धावू लागली होती त्यांची तर आता मायराने ग्लानी आल्यामुळे डोळे मिटून घेतले होते.


संधीचा फायदा घेऊन आता जॅक नको तो स्पर्श ....तिला करू पहात होता..... मध्येच त्याने त्याचा हात तिच्या मांडीवर ठेवला तसे मायराने अंग चोरून घेतले....

डोके जड झाले होते तरीही तिला नको असलेला तो स्पर्श जाणवत होता.... त्याचा मांडीवरचा हात.... दूर करायचा म्हटलं तर त्याला हात लावावे लागणार होते... म्हणून मायराने मान वळवून त्याच्याकडे त्याही स्थितीत रागात पहिले...
पण तो नुसता हसला आणि त्याने उलट मांडीवरील हात 
उचलून तिच्या खांद्यावर टाकला.... 



मायराने जुलीकडे पाहिले...जणू ती जुलीला म्हणत होती.....
"तुम्ही तरी सांगा या तुमच्या माणसाला!!! हे असं करणं बरोबर आहे का....???"






हे बरोबर नव्हतं.... बरं काय ...?? वाईट काय ...???............
हे ठरवण्याचा सर्व हक्क .... सर्व अधिकार .... आता पुढे तिच्याकडून हिरावून घेतला जाणार आहे हे तिला माहित नव्हते...
आता कुठल्यातरी भागातून टॅक्सी हळुवार चाललेली होती पण ती आता थांबली.





थोड्या वेळापूर्वी जुलीने खाल्लेलं पान...... त्याचा तसाच
तोंडात तोबरा धरून जनावराप्रमाणे.... रवंथ करतात त्याप्रमाणे 
तोच चघळंत होती आताही....


आता टॅक्सी थांबवली एका जुनाट वाटणाऱ्या इमारती समोर... ..
तेथे जॅक उतरला पूर्वी.....
जूलीच्या पाठोपाठ मायरा उतरली... एका जुन्या चाळवजा इमारती समोर ते उभे होते..




त्या इमारतीत प्रत्येक दारात आणि खिडकीत बायका उभ्या होत्या..... का उभ्या असाव्या...??? प्रश्न पडला.... असता 
जर मायरा शुद्धीत असती तर....

.......
🌹🌹🌹🌹🌹