For the sake of election results in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | निवडणूक निकालाच्या निमित्याने

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

निवडणूक निकालाच्या निमित्याने

आज निवडणूक निकालाच्या दिवशी           *आज तेवीस तारीख. कोण निवडून येणार व कोणाला बहुमत मिळणार हा एक गुंतागुंत निर्माण करणारा मुद्दा. त्याबद्दल घेतलेला आढावा.*          नेते म्हटले की त्या नेत्यांवर विश्वास करणारे आज भरपूर आहेत. काही लोकं त्यांचेवर विश्वास ठेवून ते जसं सांगतात. त्या पद्धतीनं वागतांना दिसतात. लोकं नेत्यांवर विश्वास ठेवून आपले अमुल्य मतही अगदी निःशुल्क त्या नेत्यांना अर्पण करीत असतात. त्यावेळेस असं वाटायला लागतं की हे त्या नेत्यांचे अंधभक्तच असावेत. एवढी अगाढ श्रद्धा मतदारांची नेत्यांप्रती असते. कारण जनता ही कोमात असते. ती विचारच करीत नाही की कोण आपल्या कामाचा व कोण आपल्या कामाचा नाही. मग मतदान व अमुल्य मत वाया जातं. जेव्हा निवडून आलेला प्रतिनिधी काम करीत नाही व भेटायलाही येत नाही. अशी माणसं प्रत्येकच राजकीय पक्षात असतात. जे बुजगावणेच असतात, काम न करणारे. असं एका विचारवंतांचं मत.         दि. २०|११|२०२४ ला मतदान झालं व लोकांनी नेत्यांवर विश्वास ठेवून मतदान केलं. यावेळेस मतदानाचा टक्काही वाढला. अन् ठरलं, ज्यानं ज्याला मतदान केलं, तोच निवडून येणार. परंतु मतदार नेत्यांना मतदान देत असतात. त्यानुसार नेते निवडूनही येत असतात. मग ते नेते निवडून आलेच की त्या अंधभक्तांचा त्यांना विसर पडत असतो. ते नेते मतदारांशी कामापुरता मामा असेच वागत असतात. त्यानंतर तेच नेते, ज्यांनी त्यांचेवर विश्वास ठेवून त्यांना डोळे लावून मतदान केलं. त्यांचेकडे फिरकतही नाही. त्यांच्या सुखदुःखातही सहभागी होत नाही. एवढंच नाही तर असे नेते वस्तीत फिरकतही नाहीत.         नेत्यांनाही आठवण येते. तेही वस्तीत फिरकतात. जेव्हा मोसम येतो तेव्हा. मोसम म्हणजे निवडणूक. मग ती निवडणूक कोणत्याही कालातीत असो. विधानसभा, लोकसभा असो. त्यांना वस्तीत नाईलाजानं फिरकावं लागतं. अशावेळेस ते न लाजता न शरमता वस्तीत येत असतात. मतांचा जोगवा मागत असतात. अन् आजपर्यंत तेच घडत आलं. परंतु आता नेते थोडे बदललेत. त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कामं करणं सुरु केलीत. त्यानुसार जागोजागी त्या नेत्यांनी रस्ते बांधकाम सुरु केले. रस्ते तेही सिमेंटचे. त्या रस्त्याच्या बाजूलाच फुटपाथ तोही सिमेंटचाच. जागाच ठेवली नाही वस्तीवस्तीत पाणी मुरायला. ज्यातून पाण्याची पातळी नव्हे तर जलस्तर साठा काही दिवसानं हद्दपार होणार याची पक्की शाश्वती. आता फुटपाथही सजलेले असून त्या फुटपाथवर लाईट लागलेले आहेत. उजालाच उजाला. योजना तर भरपूर उघडकीस येत आहेत की ज्याचं मोजमाप करता येत नाही. परंतु हे कोणत्या कामाचं? असं काही लोकांवर कधी म्हणायची वेळ येते. तसे काही लोकं म्हणतातही. तसंच त्यावर लोकं आज म्हणायला लागले आहेत की आम्हाला असला विकासच नको. जो आमच्या उरावर बसेल. आम्हाला दोन वेळची रोटी मिळू द्या म्हणजे झालं. तसं पाहिल्यास राशनमधून तांदूळ, गहू निःशुल्क मिळत असल्यानं काही लोकांना दिलासा आहे. मात्र रोजगार नाही. अन् काही ठिकाणी रोजगार जरी असला तरी लोकं खाली राहतात. परंतु कामाला जात नाहीत. अशी आज वास्तविकता निर्माण झाली आहे. खासकरुन ग्रामीण भाग. पुर्वीसारखे लोकं शेतीत कामाला जात नसल्यानं शेतात धान करपतो आहे. सोयाबीनला अंकूर फुटले आहेत. अन् त्यावरही मात करुन सोयाबीन निपजलीच तर त्या सोयाबीनच्या एका क्विंटलचा भाव सोयाबीन तेलाच्या एका पिंपाएवढाच आहे. असं काही गटाचं म्हणणं व त्याच  म्हणण्यानुसार त्या गटानं सत्तेत नसलेल्या लोकांना मतदान केलं. परंतु महागाई वाढलेली आहे. सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्याचं कारण आहे. देशाचा विकास. रस्ते, लाईट आणि सर्व प्रकारच्या सुविधा नागरिकांना पुरवणे. सुविधा पाहिजेत ना. मग आम्ही महागाई वाढविणारच. आज निःशुल्क राशन, लाडकी बहिण,  मोफत प्रवास, सिमेंटचे रस्ते इत्यादी सुविधा करण्यासाठी पैसा लागतोच. आम्ही सर्व सुविधा देवू. परंतु पैसा कुठून आणायचा? हा सरकारचा प्रश्न. मग महागाई वाढणारच. ती कळ शोसावीही लागणार. यात सरकारचं कुठं चुकतं. मग हे सरकार असो वा दुसरं कोणतंही. त्यांनीही तेच केलं असतं. आम्ही सुविधा देवू. परंतु पैशानं. तसं पाहता सर्वच याचा विचार करीत नाहीत. अपवाद काही राजकीय पक्ष महागाई देखील वाढवत नाहीत आणि सुविधा देखील करीत नाहीत. हे दुसऱ्या गटाचं म्हणणं. त्यांनी असाच विचार करुन त्यांना मतदान केलं.           एकवकाळ असाच होता. त्या काळानुसार कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एक पक्ष असा होता की त्या पक्षानं गल्लोगल्लीत विकासच केलेला नव्हता. लोकांना सिमेंटचे तर सोडा, साधे डांबराचेही रस्ते मिळत नव्हते. दगडा गोट्याच्या रस्त्याने बरेच दिवस चालावं लागायचं. त्या काळात महागाई तेवढी नव्हती व विकासही तेवढा नव्हताच. कारण ते सरकार देशातील लोकांच्या पोटाचा विचार करीत असे. देशावर कर्ज नको याचा विचार करीत असे. देशातील इतर सगळ्याच लोकांच्या खिशातून जास्त पैसा जायला नको याचा विचार करीत असे. आज मात्र सुविधा उपलब्ध आहेत व विकासही तेवढाच आहे. सरकारनं विकासासाठी पैसा आणला. मात्र तो स्वतःच्या खिशातून नाही तर जनतेच्याच खिशाला कात्री लावून आणि आणणारही कुठून होतं? त्यांनी जनतेच्या खिशाला कात्री लावली. कारण विकासासाठी जनतेच्या खिशातून एकदाच पैसा जाईल. वारंवार पैसा जाणार नाही हे सरकारचं मत. परंतु खऱ्या अर्थानं विचार केल्यास देशाचा विकास कितीही केलं वा करण्याचा प्रयत्न जरी केला तरी पुर्ण होत नाही.           महत्वाचं सांगायचं झाल्यास जनतेनं मत यावर वेगवेगळं आहे. त्यांचा तो विचारही वेगवेगळाच आहे. एकीकडे आहे आम्हाला विकास पाहिजे, असे म्हणणारी जनता तर दुसरीकडे आहे महागाईच्या नावावर बोंब मारणारी जनता. सरकार मात्र नेहमी पेचात फसत असते. काय करावे व काय नको असे सरकारला होवून जाते. मग योजना काढल्या जातात. रस्ते विकास केला जातो. त्यानंतर काही लोकं सरकारला चांगले म्हणतात तर काही लोकं सरकारला वाईट. यात सरकारचं काईच चुकत नाही. मात्र याचा उहापोह होतो. ज्या लोकांना मोफत राशनचं धान्य मिळते. त्यातील काही महाभाग त्यांना गरज नसल्यानं ते धान्य काळ्या स्वरुपात व्यापाऱ्यांना विकतात. ही वास्तविकता व शोकांतिकाच आहे. काही लोकं लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्यानं कामाला जात नाहीत. घरी बसून बायकोच्या भरवशावर खातात. आज मजूर न मिळाल्यानं शेतातील धान करपते. सोयाबीनला अंकुर फुटतो. असं वाटतं की योजनांचा उहापोह झाला. तो दोष जनतेचाच असतो. परंतु जनता तो दोष सरकारवर लावत असते. त्याचाच फायदा विरोधक घेतात. जे नेहमी द्वेषात असतात.            आता वीस तारखेला निवडणूक झाली व आज तेवीस तारखेला झालेल्या निवडणूकीतील मतदान कळणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आमोरासमोर उभे होते. काही पक्ष मोठमोठे आश्वासन देत होते. मात्र आता कळणार आहे. त्यांच्या आश्वासनाला लोकांनी भीक घातली काय? शिवाय हेही कळणार आहे की मोफत राशन, बसप्रवास, लाडकी बहिण योजना यांच्यावर लोकं भाळून गेले काय? अन् जेव्हा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. तेव्हा कळेल की आज जनतेला विकास हवा. मोफत धान्यही हवं. महागाई हवी की महागाई कमी व्हायला हवी. त्यासाठी जास्तीचा विकास नको. मोफत धान्य नको.         निवडणुकीच्या निकालाचा विचार करतांना निकाल काहीही लागो, परंतु महत्वपुर्ण बाब ही की दोन्ही गट विजयी होणार नाहीत. असं होवूच शकणार नाही. कारण एकाच पारड्यात विकास व अविकास, या दोन्ही गोष्टीला बसवता येत नाही. हे जनतेनं आजतरी स्विकारायला हवं. तसं पाहिल्यास आज सर्वच राजकीय पक्ष विकास करु पाहात आहेत व ते त्यांनी विविध स्वरुपाचं आश्वासनंही दिलं आहे. परंतु प्रत्येक पक्षात काही खडे आहेत. जे पक्षाच्या नावावर निवडून येतात. हवं तर ते बुजगावणेच आहेत. काम न करणारे. अशांना जनतेनं ओळखायला हवं होतं. त्यानंतरच मतदान करायला हवं होतं. तसाच बाहेरचा रस्ताही दाखवायला हवा होता. शिवाय या महाविकासाच्या चक्रव्यूहात जनतेनं न फसता मतदान करायला हवं होतं. अन् सांगायला हवं होतं जो व्यक्ती आमच्यासाठी काम करीत नसेल, त्यांची आम्हाला काहीच गरज नाही. जनतेलाही आज हुशार व्हायला वेळ मिळालेला होता. ती कोमात नाही तर होशात आलेली होती. ती सदैव जबाब द्यायला तयार होती व ती तसा जबाब निवडणुकीच्या माध्यमातून देवू शकत आहे. हे जनतेनंच नेत्यांना दाखवायला हवं होतं, तेही मयदान करीत असतांना. आम्हाला आश्वासन, लाचलुचपत नको. तर काम हवं काम. काम म्हणजे विकास, विश्वास आणि एखाद्यावेळेस मुलाखतही. हाही मतदान करतांना विचार करायला हवा होता. आता ती वेळ निघून गेलेली आहे व आता निकाल येणार आहे. जोही येईल, तो निकाल स्विकार करायचा आहे. वाद करायचा नाही. शांतता राखायची आहे. कारण आपण जनता भोळ्या विचारांची आहोत. आपण कधीच समजून घेत नाही. वेळप्रसंगी राजकीय पक्ष कट्टर विरोधक असतांना, एकमेकांना जनतेसमोर शिव्या हासडत असतांना सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येत असतात. त्यांची युती होत असते आणि आपली सामान्य जनता एकमेकांना पक्षासाठी विरोधक समजून एकमेकांचेच जीव घेत असतो. ते राजकीय पक्ष आपली पोळी शेकून लाभ घेत असतात आणि आपण विनाकारण आपापसातच भांडण करुन उगाचच वाद करीत असतो. मात्र ते निकालानंतर दिसायला नको. कारण आपल्या वादानं देशातील स्थावर संपत्तीचं नुकसान होत असते. जी आपलीच संपत्ती असते. नेत्यांचं काहीच जात नाही. जातं आपलंच. आपल्याच कररुपातील भरलेल्या पैशातून निर्माण झालेल्या संपत्तीचं नुकसान आपल्याच हातून होत असतं. याबद्दलचा विचार आपल्यालाही निकालाच्या दिवशी करायला हवा व तसं वागायला हवं. एवढंच निकालाच्या निमित्यानं सांगणं आहे. आज निकालाच्या दिवशी शांतता, संयम या गोष्टी पाळाव्यात म्हणजे झालं.              अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०