This election is about improving the reputation? in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | ही निवडणूक प्रतिष्ठेची की सुधारणा करण्याची?

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

ही निवडणूक प्रतिष्ठेची की सुधारणा करण्याची?

ही निवडणूक प्रतिष्ठेची की सुधारणा करण्याची?

           निवडणूक म्हटली की हौसे, नवशे व गवसे निवडणूकीला उभे राहात असतात. त्यांना माहीतही असते की मी जर निवडणुकीत उभा राहिलो तर अजिबातच निवडून येणार नाही. तरीही ते निवडणुकीला उभे राहात असतात व पैशाचा अपव्यय करीत असतात. 

           पैशाबाबत सांगायचं झाल्यास जे उमेदवार निवडणुकीला उभे राहात असतात. त्यांच्याजवळ इमानदारीचा स्वकष्टानं कमवलेला पैसा असतोच असे नाही. त्यातील बरेचसे उमेदवार हे वाद मार्गानं पैसे कमवीत असतात. ज्यातून निवडणूकीसाठी थोडेसे पैसे उधळले, तरीही त्यांना फरक पडत नाही. कारण हा पैसा कष्टाचा नसतो. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या मालमत्ता विक्री करणाऱ्या सोसायटी मालकाचं देता येईल. त्यानं विकलेल्या एका प्लॉटचा पैसा तो निवडणूकीला लावू शकतो. कारण त्याचेजवळ असे कितीतरी प्लॉटं असतात. त्यांना फरक पडत नाही. दुसरं उदाहरण पेट्रोल पंपधारक मालकाचं देता येईल. तो आपल्या पेट्रोल पंपावर सेटिंग करुन पैसे कमवीत असतो. तो दाबलेला पैसा हा अवैध मार्गानं कमविलेल पैसा असतो. त्यालाही फरक पडत नाही. तिसरं एक उदाहरण म्हणजे गतकाळात असाही एक संस्थाचालक निवडणुकीला उभा झाला होता. कारण त्याचेजवळ फुकटचा पैसा आला होता. जो पैसा त्याच्या संस्थेत जे शिक्षक कर्मचारी होते, त्यांना लुटला होता. आजही तीच गत आहे. एखादा शाळेतील संस्थाचावक निवडणुकीला उभा राहिलाच तर त्याच शाळेतील शिक्षकांकडून देण म्हणून पैसा गोळा केला जातो. जो पैसा निवडणूकीत खर्च केला जातो व असा पैसा निवडणूकीत खर्च करतांना काहीच वाटत नाही. 

           निवडणूकीत पैसा खर्च करणं म्हटलं तर असा अवैध पैसा खर्च करणं आलंच. कारण निवडणुकीला पैसा लागतोच. अलिकडे निवडणूक अधिकारी पैशाचा हिशोब मागत असतात आणि निवडणूकीत उभा राहणारा उमेदवारही खर्चाचं विवरण देत असतो. जो पैसा कमी खर्च झालेला दाखवला जातो. मात्र प्रत्यक्षात कितीतरी पैसा खर्च झालेला असतो. ते कोणीही पाहात नाही व पाहू शकत नाही. कारण तो पैसा प्रत्यक्षात कार्यकर्त्यांमार्फत खर्च केला जातो. असे कार्यकर्ते, जे आपल्याच घराजवळ एखाद्या अज्ञात व्यक्तीच्या घरी जेवनखावण अर्थात पार्ट्या ठेवत असतात. त्या पैशाचं मोजमाप केलं जात नाही. काही ठिकाणी तर मतदारांनी आपल्याला मतदान करावं, म्हणून त्यांना एक नोट व दारुची एक बाटलही वाटली जाते. यात या सर्व गोष्टींसाठी जो पैसा खर्च होतो, तो मोजला जात नाही. काल हे सर्रास घडत होतं. कारण त्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणा काल नव्हत्या. आज तशी परिस्थिती उरलेली नाही. आज सीसीटीव्ही कॅमेरे बारीक नजर ठेवतात. तरीही आज असे नेत्यांचे धंदे चालतात. जे धंदे उजागर होवू शकत नाहीत. 

        नेता मंडळी हिरीरीनं निवडणूकीत उभे राहतात. त्यासाठी लाखो रुपयेदेखील खर्च करतात. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे, संपत्ती मिळवता येणं. निवडणूकीच्या माध्यमातून एक साधारण व्यक्ती निवडून आल्यास त्याचेजवळ पाच वर्षाच्या कार्यकाळात एवढा पैसा येतो की त्याच्या सात पिढ्या या बसून खावू शकतात. हि वास्तविकता आहे. म्हणूनच निवडणूकीला हौसे, नवशे, गवसे उभे राहात असतात. मग निवडणूकीत निवडून नाही आले तरी चालेल. विचार असतो की नशिबानं साथ दिला आणि निवडणूकीत निवडून आलो तर. कधीकधी कावळा फांदीवर बसल्यागत व फांदी मोडल्यागत अवस्था होते. तो चमत्कारच असतो की मातब्बर माणसं निवडणूकीतून पडतात व ज्याची शाश्वती नसते, तेच निवडणूकीत निवडून येत असतात. 

          दरवेळेस निवडणूक येत असते व ती पार पडत असते. याहीवेळेस निवडणूक आली आहे व ती पार पडणार आहे. मात्र यावेळेसची निवडणूक ही वेगळीच आहे. या निवडणूकीत प्रतिष्ठा दावावर लागलेली असून ही निवडणूक प्रतिष्ठेची ची की सुधारणा करण्याची तोच विचार करायला मार्ग उरला नाही. 

         येत्या वीस तारखेला महाराष्ट्र राज्यात निवडणूक होवू लागली आहे व त्या निवडणूकीचा निकाल लवकरच म्हणजे तेवीस तारखेला लागणार आहे. त्यातच सर्व राजकीय पक्षाचा कस लागणार आहे. 

         निवडणूकीबाबत सांगतांना एवढंच सांगता येईल की या निवडणूकीतून दोन पैलू दिसतात. पहिला म्हणजे गतकाळात ज्या ज्या राजकीय पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणात कुरघोडी केली वा जनतेच्या भावनांशी ते खेळले. त्या सर्वांना ही निवडणूक अद्दल घडवणार आहे की काय? असे वाटायला लागले आहे व दुसरा पैलू म्हणजे ही निवडणूक अशाच राजकारण्यांच्या पाठीशी राहून पुन्हा त्याच लोकांना निवडणूकीत निवडून देते कीवकाय? हेही वाटायला लागलं आहे. कारण हे राजकारण आहे व या राजकारणाबाबत काळ सांगणार आहे. तूर्तास आता निवडणूकीबाबत प्रचार करण्याची संधी असल्यानं सर्वांनी अगत्यानं प्रचार करणं गरजेचं आहे. 

           गतकाळात ठाकरे सरकार होतं. त्याला फाटा देत शिंदे सरकार बाहेर निघालं. तसं पाहिल्यास भारतात लोकशाही असल्यानं बरेचदा नेत्यांमध्येच वाद सुरु असतात. कारण ते कोणाचे गुलाम नसतात. त्यातच एकमेकांचे आचार विचार एकमेकांना पटत नाही व ते एका पक्षातून बाहेर पडतात. ते दुसऱ्याच पक्षात जातात. याला पक्षबदल म्हणतात. 

           हेच घडलं एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यात. मग कलगीतुरा बराच गाजला व ठाकरे सरकार पडलं आणि शिंदे सरकार सरकार स्वरुपात विकास पावलं. त्याला जनता पार्टीनंही मदत केली व दोघांनी मिळून राजकारण गाजवलं. त्यानंतर चिन्हांवरुन वाद झालेत. धनुष्यबाण कोणाला द्यायचं? तोही वाद न्यायालयानं मिटवला व धनुष्यबाण हे चिन्हं शिंदे सरकारला मिळालं. त्यानंतर ठाकरे गटानं चिन्हं प्राप्तीचा दावा केला व त्या पक्षाला म्हशाल चिन्हं मिळालं. त्यानंतर वाद मिटला, तरीही आरोप प्रत्यारोप सुरुच राहिले. 

          काही दिवस बरे गेले व काही दिवसानंतर त्याच प्रकरणाची पुनरावृत्ती घडली. राष्ट्रवादीचे अजीत पवार यांनी आपले काही विश्वासू आमदार घेतले व ते जुन्या शरद पवारच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडले. एवढंच नाही तर चिन्हांवरही दावा केला. ज्यात अजीत पवारच्या पक्षाला जुनंच घडी चिन्हं मिळालं आणि शरद पवारला तुतारी. 

          वाद....... जुनी शिवसेना कोणाची वा जुनी राष्ट्रवादी कोणाची? त्यानंतर तो वाद मिटल्यावर जुनं चिन्हं कोणाचं? हाही एक वाद तयार झाला होता. त्यावरही उपाय निघाला व आता एक नवीनच वाद तयार झाला आहे अस्मितेचा. त्यातच लोकसभा झाली व लोकसभेत अस्मिता दिसून पडली. परंतु त्यात स्पष्टता नव्हती. परंतु ही विधानसभा आहे व या विधानसभेत कोण किती मातब्बर, याची कसोटी लागली आहे. ही परिक्षाच आहे, नेत्यांच्या अस्मितेची. आता या निवडणुकीत लोकं शिंदे, भाजप व अजीत पवार या त्रिकुटाला निवडून देणार आहे की ठाकरे, पवार व कॉंग्रेस या त्रिकुटाला निवडून देणार आहे, हे सांगता येणे कठीण आहे. परंतु एक विशेष सांगायचं म्हणजे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीला प्रतिष्ठेची समजून कामाला लागले आहेत. आपआपले नेते जिंकावेत. म्हणून आपआपल्या पक्षातील उमेदवाराचा प्रचार ते हिरीरीनं करु लागले आहेत. ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असून कोण किती मातब्बर आहे हे कळणार आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी जनतेनं या निवडणूकीत भाग घेतांना नेत्यांच्या प्रतिष्ठेपणावर विश्वास ठेवू नये. त्यांनी मतदान करतांना जो नेता सुधारणा करु शकतो. त्यांनाच निवडणूकीत निवडून द्यावं. कारण आपल्यासाठी त्या नेत्यांची प्रतिष्ठा महत्वाची नाही. आपल्यासाठी महत्वपुर्ण बाब आहे राज्याचा विकास. जो व्यक्ती आपल्या राज्याचा विकास करु शकेल, असे जर वाटत असेल तर जनतेनं त्यालाच निवडणूकीत निवडून द्यावं. इतरांना निवडून देवू नये. मग त्यासाठी हा व्यक्ती अमूक मोठ्या पार्टीचा आहे,  याचाही विचार करु नये. केवळ व्यक्ती बघावा. मग तो लहानच पार्टीतील असो वा मोठ्या गणमान्य पार्टीचा असो. आपल्यासाठी फक्त विकास महत्वाचा आहे. एवढंच मतदानाबाबत सांगणं आहे. अन् हेही सांगणं आहे की सर्वांनी घराघरातून निघून मतदान केंद्रावर जावं व सर्वांनीच मतदान करावं म्हणजे झालं. 

               अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०