Lakshmi Pujan Alakshmi's entry? in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | लक्ष्मीपूजन अलक्ष्मीचा प्रवेश?

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

Categories
Share

लक्ष्मीपूजन अलक्ष्मीचा प्रवेश?

*लक्ष्मीपुजन ; आपल्या घरात अलक्ष्मीचा प्रवेश? शक्यच नाही.*

            *दिवाळी...... दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन करतो. त्यासाठी घराची साफसफाई करतो. अंगणात रांगोळ्या टाकतो. सुग्रास अन्न बनवतो. झाडांची खांब, पानं लावतो. घर सजवतो. वाटतं की लक्ष्मीची अशी पुजा केल्यानं आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल. पैसाही येईल. शिवाय अशी पुजा केल्यानं पैसाही येत असतो अतोनात. परंतु तो पैसा आपल्या पापकर्माचं द्योतक असतो. जे पापकर्म आपल्या हातून घडत असतात. ज्यातून घरात रोगराई प्रवेश करीत असते. पर्यायानं सांगायचं झाल्यास अलक्ष्मीच घरात प्रवेश करीत असते. लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन बहिणी. आपल्या हातून लक्ष्मीची चांगली पुजा झाली तर आपल्या घरी लक्ष्मी नांदत असते. जी आपल्याला चांगलं आरोग्य प्रदान करीत असते. तशीच तिची पुजा चांगली जर आपल्या हातून झाली नसेल तर आपल्या घरात अलक्ष्मी प्रवेश करीत असते. शिवाय लक्ष्मी यावी व ती नांदावी म्हणून दरवर्षी आपण लक्ष्मीची पुजा करीत असतो. परंतु आपल्या मनात विचार घाणेरडे ठेवून. अशा घाणेरड्या विचारानं लक्ष्मी आपल्या घरात येत नाही. नांदणं दूरच. म्हणून कर्माला लक्ष्मी समजून चांगले कर्म करावे. लक्ष्मी येईल, टिकेल आणि नांदेलही. परंतु त्याचवेळेस आपल्या हातून वाईट कर्म घडल्यास लक्ष्मी येणारही नाही, टिकणारही नाही व नांदणारही नाही. हे तेवढंच खरं.*     
          दिवाळी झाली. लक्ष्मीपूजनही झालं व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही वृक्षांची हत्याही करण्यात आली. जसं केळी, सिंदी, आंबा. म्हटलं जातं की लक्ष्मीपूजनात आमचे पुर्वज सिंदीच्या झाडाची पानं वापरुन लक्ष्मीपुजा करीत असत. ती आमची प्रथा आहे. कोणी म्हणतात की केळीचे खांब लावल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते आणि तसं घडतंही. एखाद्यावेळेस एखादा कावळा फांदीवर बसतो व जशी फांदी मोडते, तशी एखादवेळेस केळीची खांब लावून पुजा केल्यास आपल्याला रास्त लाभ होतो व आपण ठरवतो की हा रास्त बदल आपण केळीची खांब लावून पुजा केल्यानं झाला. मग आपण केळीचीच खांब लावून पुजा करीत असतो व ती आपली प्रथा पडते. 
          प्रथा, परंपरा या आदिम काळापासून अस्तित्वात आल्या. वारा येतो, पाऊस पडतो, आग लागते. या घटना त्या काळातील चमत्कारिक घटना होत्या. त्या कोण करतो? याची कल्पना मांडतांना देव नावाच्या साधनांची उत्पत्ती झाली. मग निसर्गाला देव मानलं गेलं. तेव्हा देव या संकल्पनेला ना आकार होता, ना एखादी देवाची प्रतिकृती पुढं होती. कालांतरानं त्यातही बदल झाला व ज्या निसर्गाला देव संबोधलं गेलं. त्यात थोडाफार बदल होवून निसर्गातील वस्तूंना देव संबोधलं गेलं व निसर्गातील याच ज्ञात अज्ञात गोष्टींना देव म्हणून मान्यता मिळाली. शिवाय देवांच्या या संकल्पनेच्या आधारेच या निर्जीव वस्तूंनाच देव मानलं गेलं. जसे, एखादा दगड वा एखादा लाकुड. झाडात जीव असतो हे लोकांना माहीत नसल्यानं सर्रास त्या काळात झाडं कापली जात होती. तसंच प्रथा वा परंपरा का असेना, त्या पाळल्या जावून दिवाळी हा सण साजरा होत असे. हे आजही घडत आहे. जरी झाडांना जीव असतो हे आपल्याला माहीत झालं आहे तरी. 
          पुर्वी अशाच प्रकारच्या प्रथा, परंपरा व त्यावर आधारीत अंधश्रद्धा निर्माण झाल्या. ज्या अंधश्रद्धेवर काल समाज चालत होता. आजही समाज चालत असतो आणि या प्रथा, परंपरा आज कोणी मानत नसल्यास वा पाळत नसल्यास त्याला समाज वाळीत टाकत असतो. जरी आजच्या काळात विज्ञानानं प्रथा, परंपरा व अंधश्रद्धा कोणत्या हे जरी सिद्ध केलं असलं तरी. आज विज्ञानानंच सिद्ध केलंय की झाडाला जीव असतो. तरीही आपण शेकडो वृक्षाची कत्तल करुन आपल्या प्रथा व परंपरा पाळतच असतो. जसं केळीची खांब लावल्यानं व सिंदीच्या पानोऱ्या लावल्यानं लक्ष्मी येते वा आंब्याची पानं दरवाज्यावर लावल्यावर लक्ष्मी येते. फुलं दरवाज्यावर लावल्यावर लक्ष्मी येते. 
         अंगणात झाडाची पानं लावल्यानं लक्ष्मी येते ही आपली भ्रामक कल्पना. याबाबतीत सखोल विचार केल्यास खरंच लक्ष्मी यातून येते काय? येवू शकेल काय? असा विचार केल्यास त्याचं उत्तर नाही असंच येईल. त्याचं कारण आहे झाडाची हत्या करणं.
           जगदिशचंद्र बोस या भारतीय जगप्रसिद्ध शास्रज्ञानं सिद्ध केलं की झाडांनाही जीव असतो. त्यांनी तो प्रयोग सन १९०० मध्ये लावला. त्यावेळेस त्यांनी आपल्या तत्वज्ञानात सांगितलं की एखादं झाड जेव्हा विषाच्या संपर्कात येतं. तेव्हा ते फार हलतं. त्याचं कारण असतं त्या झाडावर होणारा विषाचा परिणाम. असा परिणाम होवू नये म्हणून झाडाचं हालणं. त्यांनी लाजाळूच्या झाडावर प्रयोग करुन सिद्ध केलंय की झाडांनाही भावभावना असतात. त्यांना विजेचा करंट लावल्यास त्यांना शॉक बसतोच. शिवाय आज असंही सिद्ध झालंय की झाडांना संगीत ऐकवल्यास झाडं उत्पादन जास्त प्रमाणात देत असतात. झाडावरही सुख दुखाचा परिणाम होत असतो. तेही आत्महत्या करीत असतात. पर्यायानं सांगायचं झाल्यास झाडांना सगळंच कळत असतं. त्यातच कोणी त्यांना कापत असल्यास त्याही गोष्टी झाडांना कळतात. त्यांना घाव देणं वा त्यांच्यापासून त्यांची फळं विलग करणं. फुलं विलग करणं हे सारं त्यांना कळत असतं. त्यातच त्यांची पानं देखील तोडणं ते झाडांना कळत असतं. त्यावेळेस त्यांना महाभयंकर व तीव्र स्वरुपाच्या वेदना होत असतात. 
             पान, फुल फळ ही आपली गरज आहे आणि झाडांचे ते अवयव आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला हात, पाय, डोळे असतात तसे. एखाद्यावेळेस आपला हात तोडल्यास आपल्याला जशा वेदना होतात. तशाच वेदना झाडाचं एखादं पान तोडल्यास त्यांनाही होत असतात. परंतु आपल्याला माहीत आहे की झाडांची अवयव तोडले नाही तर आपण जगू शकणार नाही. म्हणून आपण त्यांचे अवयव अर्थात पाने, फुले व फळे तोडतो. हे जरी बरोबर असलं तरी ती आपली गरज असते म्हणून आपण चालवून घेणं, हा अपराध जरी असला तरी याला आपण अपराध मानत नाही. परंतु त्याच जागी आपण सरसकट त्या झाडांची कत्तल केल्यास अपराध होतोच पण त्या अपराधाबद्दल देवही आपल्याला माफ करीत नाही. उदाहरणार्थ एखादा शेतकरी. शेतकरी शेतात मशागत करुन आपल्या अमाप पीक व्हावं म्हणून त्यावेळेस तो आपल्या शेतात बिया पेरतो. त्याच्या रोपाला आपल्या मुलांसारखं लहानाचं मोठं करतो. त्याची काळजी घेतो. त्यानंतर त्या रोपाला ते मोठे झाल्यावर दाणे फुटतात. त्यानंतर ज्यावेळेस त्या रोपाला दाणे फुटतात. त्यावेळेस ते झाड पुर्णतः सुकलेलं नसतंच. तरीही तो शेतकरी ते दाणे आपल्याला अवजले पाहिजे म्हणून त्या झाडाला सुकू न देता त्याच्या हिरवेगारपणातच शेतकरी त्याची हत्या करतो. हे एक जीव मारल्याचं पाप असतं. अशी कितीतरी झाडं कापत असतो शेतकरी. त्यानंतर काय घडतं ते आपल्या माहीतच आहे. या हिरव्यागार झाडाचं जे पाप शेतकऱ्याला लागतं. त्यानुसार पुढील काळात त्या शेतकऱ्याला आत्महत्या कराव्या लागतात. हे त्याला माहीत असूनही तो पाप करतो. कोणासाठी? तो आपल्या स्वतःसाठी पाप करीत नाही तर तो दुसऱ्यासाठी पाप करीत असतो. तो समाजासाठी पाप करीत असतो. मात्र आपण त्याकडे लक्षच देत नाही. आपण एवढे स्वार्थी आहोत की आपण त्यात सहभागी न होता आपण आपला स्वार्थ पाहात असतो व जगत असतो. वाल्याच्या परीवारासारखे. तो वाल्या असतो. आपल्याला जगविण्यासाठी तो सतत पापकर्म करीत असतो. त्याच्या जीवनात पापक्षालन नसतंच. तेच घडतं लक्ष्मीपूजनाच्या निमित्यानं. आपल्या लक्ष्मीपुजपातही हाच शेतकरी झाडाचा जीव जातो याचा विचार करीत नाही व केळीचे खांब, आंब्याच्या फांद्या, सिंदीच्या पानोऱ्या हे झाडाचे अवयव कापून आणत असतो आपल्या पुजेसाठी आणि आपली पुजा साधवत असतात. ते पाप घेतात अंगावर आपला दिवस आनंददायक करण्यासाठी. परंतु यात महत्वपुर्ण बाब ही की आपण केळीची खांब वा सिंदीची पानं वा आंब्याची पानं वापरुन जी पुजा करतो. ती पुजा आपल्याला लाभदायी ठरत असेल काय? असा विचार केल्यास त्याचं उत्तर किंचीतसं नाही स्वरुपात येईल. कारण हे झाडाचे जीवंत स्वरुपाचे असतात. जे देवी लक्ष्मीलाही नामंजूर होवू शकतात. कारण देवी लक्ष्मी जर साक्षात देवी आहे तर झाड हे तिचे लेकरुच आहे. त्या लेकराची हत्या वा एखादा अवयव कापणे हे तिला कसे काय रुचेल, पचेल? हे एक कोडंच आहे. याचा विचार व्हायला हवा. लक्ष्मीदेवी, तिची मुर्ती जो बनवतो, त्यालाच सोडत नाहीत तर ती अशी हत्या शेतकऱ्याकडून करवून घेणाऱ्याला सोडेल काय? हेही एक कोडंच आहे. जसा कुंभार समाज मुर्ती बनवतो, गणपती बनवतो, देव्या बनवतो. तोच लक्ष्मीही बनवतो. त्यासाठी जेव्हा तो माती तयार करतो. तेव्हा तो अक्षरशः मातीला पायानं तुडवतो. त्यानंतर तिला रंग मारतो, तेव्हाही तो ब्रशला आपली थुंकी लावतो. तसं करावंच लागतं त्याला. त्यानंतर मुर्ती तयार होते, जी आपण पुजतो. कुंभारासमोर पर्याय नसतो म्हणून तो मातीला पायानं तुडवतो, रंग मारतांना ब्रश थुंकीनं टोकदार बनवतो. परंतु तेवढाच राग लक्ष्मीदेवीला येत असल्यानं आजही कुंभार समाज विकासाच्या क्षेत्रातून बऱ्याच प्रमाणात कितीतरी मागं आहे. मग ही झाडांची हत्या करवणं झाली. जो करतो, तो शेतकरीही आज सुखी नाही, अन् करविणारा तरी सुखी आहे काय? याचा विचार केल्यास तोही सुखी नाही असेच दिसते. हं, पैसा निश्चितच वाढेल अशी झाडांची हत्या करुन पुजाअर्चना केल्यानं. परंतु पैशामागून एकप्रकारची अवदसाही घरात शिरते. जिला अलक्ष्मी म्हणतात. जिला लक्ष्मीची बहिण संबोधलं आहे पुराणात. तीच अलक्ष्मी आपल्या घरात शिरून आपलं वाटोळं करीत असते. कधी रोगराई आपल्या घरात टाकून तर कधी आपल्याच परीवारातील एखाद्या सदस्यांचा अपघात घडवून आणून. कधी एखादं भांडण उकरुन काढून कोर्टखटले चालू करु शकते तर कधी तीच अलक्ष्मी आपल्या स्वतःला आत्महत्या करायला भाग पाडत असते. कधी आपल्या हातून भिकारी, अनाथ, अपंग लोकांची सेवा घडवून आणत नाही तर कधीकधी हीच अलक्ष्मी आपल्याच हातून आपल्याला जन्म दिलेल्या आपल्याच मायबापाचीही सेवा घडवून आणत नाही. हे सगळं घडतं आपण झाडांची लक्ष्मीपुजनाच्या निमित्यानं हत्या करवून घेत असल्यानं. परंतु याचा विचार कोण करतंय? आपल्याला त्याबाबतीत काहीच माहीत नसतं. आपल्याला केवळ लक्ष्मी माहीत आहे. आपण लक्ष्मीचा अर्थ धन देणारी देवी असा घेतो. परंतु जशी लक्ष्मी असते, तशीच अलक्ष्मीही असते याचा आपण विचारच करीत नाही. जी आपल्याला नेस्तनाबूत करीत असते. म्हणूनच आपण झाडांची हत्या करु नये, निदान लक्ष्मीपूजन करतांना तरी. शिवाय ते पाप समजून त्या पापात सहभागी होवू नये व आपल्या घरात अलक्ष्मीचा प्रवेश होवू देवू नये म्हणजे झालं.

         अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०