Anubandh Bandhanache - 14 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 14

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 14

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग १४ )

आज दिवसभरात जे काही घडलं होतं त्यामुळे एवढ्या सहजपणे दोघांनाही लवकर झोप येणं शक्य नव्हते. 😊

अंजलीच्या घरी पार्टी असल्यामुळे तिलाही झोपायला उशीर झाला होता. पार्टीमध्ये डान्स वगैरे करून ती पण थोडीफार थकली होती. पण तरीही तिला पण झोप येत नव्हती.
 सकाळी जे काही घडलं होतं, ते पुन्हा सर्व डोळ्यासमोरून जात होते. तो क्षण पुन्हा पुन्हा आठऊन ती हाच विचार करत होती, 
खरच आज जे काही घडले ते स्वप्न तर नव्हते ना...? 
खरच प्रेम ने माझं प्रेम स्वीकारलं आहे...😍 आता आयुष्यभर तो फक्त आणि फक्त माझाच असणार. 😊

ज्या क्षणाची मी एवढ्या आतुरतेने वाट पाहत होते, शेवटी तो क्षण आज आला माझ्या आयुष्यात... थॅन्क् गॉड 🙏 

 आज खरच मी खुप म्हणजे खुप खुश आहे. आता कधी एकदा प्रेमला भेटेन असं तिला वाटत होतं. त्याच्याच आठवणीत तिला उशिरा कधी झोप लागली ते कळलं सुद्धा नाही. 

इकडे प्रेमच्या डोक्यात मात्र हळू हळू नको ते विचार यायला लागले होते. 
भावनेच्या भरात आपण तिच्या प्रेमाला होकार दिला खरं... पण खरच हे योग्य आहे का...?

 अंजली अजुनही खुप लहान आहे. मी खुप घाई केली का तिला होकार द्यायला...? 
अजुन थोडा वेळ घ्यायला हवा होता. आणि वेळ घेऊन तरी काय होणार होते. एक तर तिचं प्रेम स्वीकारायचं किंवा नाही. हे दोनच पर्याय होते. जे उद्या होणार होते ते आज झाले... बस् एवढच आहे का...?

माझ्याही मनात आधीपासून तिच्याबद्दल प्रेम होतेच ना...
 मग त्याच प्रेमाला होकार दिला तर काय झालं...पण... पुढे काय...?
खरच या नात्याचा शेवट काय असेल...? 
पुढे जाऊन आम्ही कायमचे एकत्र का...?
 लग्न होईल का तेव्हा आमचं...?
 ती जरी तयार झाली माझ्यासोबत लग्न करायला, तरी तिच्या घरातले मॉम डॅड...?
 हे कदापी शक्य नाही. एवढ्या लाडात आणि श्रीमंतीत वाढलेली मुलगी माझ्यासारख्या मुलाला...
 ज्याच्याकडे साधं रहायला स्वतःच घर सुद्धा नाही. कोणीच नाही तयार होणार. 
दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या घरी म्हणजे आईला कसं सांगायचं हे सर्व...
 एकतर आई गावी आहे. तिचे विचार खुप वेगळे आहेत. आणि ती कधीच तयार होणार नाही, हे सर्व स्वीकारायला. 😨

प्रेम काय करून बसला तु हे....?
 काय घाई होती तुला...?
 आता पुढे काय...?

 इतके सर्व विचार एकामागून एक डोक्यात गर्दी करू लागले होते. खरं तर आता त्याचं डोकं दुखायला लागले होतं.

घरी सर्व झोपले होते. हळूच उठून त्याने लाईट चालु केली. घड्याळाकडे पाहिलं पहाटेचे चार वाजले होते. थोडं पाणी प्यायला आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण या सर्व विचारांनी त्याची पूर्णपणे झोप उडून गेली होती. 

पुढे काय करायचं त्याला काहीच सुचत नव्हते. पुन्हा त्याच विचारात गुरफटून गेला. खरच खूप घाई केली आपण, असं त्याला वाटू लागले होते. 

अंजलीवर माझं मनापासून प्रेम आहे. पण मी तिच्या लायक नाही, हे तितकच खरं आहे. आता या गोष्टीची जाणीव होतेय, पण हा विचार आपण आधीच करायला हवा होता. तिच्यावर मी खुप प्रेम करतो. 
मला ती हवी आहे. 
पण मी तिला काय देऊ शकतो....
काय आहे माझ्याकडे.... 
काहीच नाही....

मग का तिला अशा एका नात्यात अडकवून ठेवायचे, जे कधीच पूर्णत्वास येणार नाही.
 तिचं आयुष्य खराब करण्याचा मला काहीही हक्क नाही, 
जरी ती माझ्या आयुष्यात आली तरी मी तिला खुश ठेऊ शकणार नाही. आणि ते मलाही शक्य होणार नाही. 

हे सर्व अजुन पुढे जायच्या आधी आत्ताच थांबवलं पाहिजे. तिला हे सर्व समजून सांगायलाच हवे. नाहीतर पुढे जाऊन अजुन खूप प्रॉब्लेम होतील.
 मग ठरलं तर... आता जेव्हा ती भेटेल तेव्हा तिच्याशी हे सर्व बोलायचं..... 

अशा खुप साऱ्या गोष्टींचा विचार करत कधी पहाट झाली ते कळलेच नाही. थोडा रिलॅक्स होऊन तो झोपून गेला.
 दुसऱ्या दिवशी रविवार होता. सुट्टी होती, रात्रभर झोप लागली नव्हती, त्यामुळे प्रेम थोडा उशिराच उठला. 
अंजलीच्या घरी पण खुप पाहुणे वगैरे आलेले होते. रात्रीच्या पार्टी मुळे सर्वच तसे उशिरा उठले होते.

 सर्व आवरण्यातच दुपार झाली होती. मधेच तिला प्रेमची आठवण येत होती. त्याला कॉल करून त्याच्याशी बोलावं असं वाटत होतं, पण आज रविवार होता. तो घरीच असणार, त्याच्या ताईचा घरातील टेलिफोन नंबर एकदा तिने घेतला होता, इमर्जन्सी म्हणुन, पण आजपर्यंत कधी त्याच्या घरी कॉल केला नव्हता. कारण प्रेमच तिला बोलला होता की खूपच गरज लागली तरच घरी कॉल करायचा.

 आज करूया का...?
 त्याच्या ताईने उचलला तर काय बोलणार...? आणि त्यात इथे घरी एवढे लोक होते. मग बोलणार तरी कसे...?
त्यापेक्षा बाहेर जाऊन कॉल करू. 

असा विचार करून ती प्रेमच्या घरचा नंबर तिच्या डायरीतून शोधुन तो हातावर लिहून घेते आणि बाहेर येते, निघताना काही कॉइन सोबत घेते. 
घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या पिसिओ वरून तो नंबर डायल करते. तिकडे रिंग होते... आणि समोरून प्रेमच्या ताईचा आवाज येतो...
ताई : हॅलो... कोण बोलतंय...?

* अंजलीला काही सुचत नाही काय बोलावं म्हणून ती पटकन रीसिवर ठेवून देते.
 आता काय करायचे, 
 विचारू ना ताईला प्रेम आहे का...?
 मग बोलवतील त्या...प्रेमला....

 म्हणून ती पुन्हा नंबर डायल करते. समोरून ताईचा आवाज येतो. 

ताई : हॅलो...कोण...?
अंजली : हॅलो... तुम्ही प्रेमच्या ताई बोलता आहात ना... प्रेम आहे का...?
ताई : हो... तु कोण...?
अंजली : मी प्रेमच्या मित्राची बहिण बोलतेय. अंजली. 

* ताई प्रेमला आवाज देते. *

ताई : प्रेम... फोन आला आहे तुझ्यासाठी...
प्रेम : कोण आहे...?
ताई : कोणीतरी मुलगी आहे... अंजली.

* प्रेम पटकन येऊन ताईच्या हातून फोनचा रीसीवर घेऊन कानाला लावतो. *

प्रेम : हॅलो... अंजली...
अंजली : हाय... जानु... सॉरी घरी कॉल केला. कसा आहेस तू...?
प्रेम : मी ओके आहे... पण कॉल का केला आहेस काही काम होतं का...?🤔
अंजली : काही नाही असच... आठवण आली तुझी, मग बोलावंसं वाटलं तुझ्याशी म्हणून कॉल केला.
प्रेम : अरे पागल... तिथे घरी सर्व आहेत ना...मग...
अंजली : अरे मी बाहेरून कॉल केलाय...पीसीओ वरून...😊
प्रेम : एवढं काय अर्जंट होतं...?🤔
अंजली : तसं काही नाही, पण खूपच आठवण येत होती ना...म्हणून... सॉरी...😔
प्रेम : मला पण असं घरी नाही बोलता येत ग... ताईचे घर छोटे आहे. सर्वांना ऐकू जाते.
अंजली : इट्स ओके ना, जास्त नाही थोडा वेळ बोलू शकतो ना...?😊
प्रेम : ताईला आता काय सांगु...? कोण होतं म्हणून...?
अंजली : नको टेन्शन घेऊ, मी बोलले त्यांना, प्रेम च्या मित्राची बहिण बोलतेय म्हणून...😊
प्रेम : वेडी आहेस का तू... आजपर्यंत असे कोणत्या मुलीचे कॉल नाही आले. मग तिला काय वाटेल.
अंजली : मग सांग ना ताईला सर्व...😊 का मी सांगू...😊
प्रेम : ओ.. मॅडम... रिलॅक्स एवढी घाई बरी नाही.
अंजली : हो...का.. पण कधीतरी सांगावे लागेलच ना... मग आताच सांग...😊
प्रेम : तुला असं वाटत नाही का...की हे जरा जास्त होतंय....🤨
अंजली : बिलकुल नाही वाटत...😊 मी सांगू का... तु दे फोन ताईंना...😊
प्रेम : आता गप्प बसते का... बोल पटकन काय ते... जास्त वेळ नाही बोलता येणार.
अंजली : अरे हो... आत्ताच तर कॉल केला ना...बरं ओके... आज भेटशील संध्याकाळी.
प्रेम : का... कशाला...कुठे...?🤔
अंजली : किती ते प्रश्न... तु भेटशील का ते सांग...मग सांगते कुठे ते...😊
प्रेम : अरे पण कालच तर भेटलो, मग आज काय लगेच...🤔
अंजली : तुला नाही वाटत का मला भेटाव असं... 🤨
प्रेम : अरे... असं काही नाही... पण उगाच घाई नको. नंतर भेटू ना.. आता तुझ्याकडे पाहुणे वगैरे आलेले आहेत. त्यांना वेळ दे आज. आपण नंतर भेटूच...ओके
अंजली : काय रे तू असा... ?😏
प्रेम : हो... असाच आहे मी, माहीत नाही का तुला...?😊
अंजली : हो... चांगलच माहीत आहे मला... खडूस...😏
प्रेम : बरं आता फोन ठेव आणि घरी जा... एन्जॉय कर त्यांच्यासोबत...ओके.
अंजली : हो...हो... जाते... पण उद्या मी कॉल करेन ऑफिस मधे दुपारी ओके...😊
प्रेम : हा... ठिक आहे. तेव्हा बोलू. बाय...😊
अंजली : किती घाई फोन ठेवायची, एवढा घाबरतोस ताईला...😀
प्रेम : खुप बोलली... आता ठेवते का...🤨
अंजली : अरे हो ठेवते... ओरडतो काय...😏
प्रेम : हा... ठेव आता आणि जा घरी, सर्व शोधत असतील तुला...😊
अंजली : हो...रे... पण ऐक ना...😊
प्रेम : आता काय झालं...🤔
अंजली : काही नाही झालंय... फक्त मला प्रेम झालंय.... तुझ्यावर...ते ही खुप जास्त.... आणि हा .... आय लव्ह यू जानु...😘 बाय...

* असे बोलून अंजली फोन कट करते. आणि घरी निघून येते. *

प्रेम मनातच तिला 'वेडी आहे ही ' असं बोलून फोन ठेऊन देतो. आणि बेडवर बसतो.
तेवढ्यात ताई किचन मधुन बाहेर येते आणि त्याला विचारते.

ताई : कोण होती ती मुलगी...?🤔
प्रेम : अगं ती बोलली ना तुला... मित्राची बहिण होती.😊
ताई : या आधी कधी फोन आला नाही तिचा...🤔
प्रेम : तो ऑफिस मधील एक मित्र आहे ना तो अचानक गावी गेलाय रात्री. त्याने कॉल करून मला सांगायला सांगितले होते तिला.

* ताईने तेवढं ऐकुन घेतलं आणि किचन मधे गेली. प्रेम मनातच बोलला...' सुटलो ' 😊

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️