Honor should also be given to the corpse? in Marathi Short Stories by Ankush Shingade books and stories PDF | सन्मान प्रेतालाही मिळावा?

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

सन्मान प्रेतालाही मिळावा?

*सन्मान आपल्याला नाही तर आपल्या प्रेतालाही मिळावा?*

          *सन्मान...... सन्मान आपल्यालाच नाही तर आपल्या प्रेतालाही मिळावा. त्या प्रेताचाही विशिष्ट पद्धतीनं दाह संस्कार व्हावा. चार पाहूणे गोळा व्हावेत. ते रडावेत. हे तेव्हाच घडू शकतं. जेव्हा आपल्या हातून बालपणापर्यंतचे कर्म चांगले घडत असतात. परंतु आपण बालपणापासूनच कर्म चांगले करीत नाहीत. जसं बालपणात आपण गंमत येते म्हणून फुलपाखरांची हत्या करीत असतो. झाडांना तोडत असतो. सरड्यांना तंबाखू चारत असतो. मोठे झाल्यावरही कित्येक माणसांना त्रास देत असतो. शब्दांचा मार देत असतो नव्हे तर हत्याही करीत असतो. आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकत असतो. त्यावेळेस विचार करीत नाही की आपल्याला या कर्माचे वाईट भोगमान भोगावेच लागतील. त्याचे वाईट भोगमान म्हणजे आपली लेकरं चांगली न निपजणे, त्यांना दुर्धर आजार असणे. तसा आपल्या संततीला जर थोडासाही त्रास असला तर तो त्रास आपल्याला जीवघेणा वाटतो. वाटत असतं की असा त्रास आपल्याला झाला तर चालेल, संततीला नकोच. तसंच आपल्याला म्हातारपण छळणे. म्हातारपणात अतिशय वेदनादायी त्रास होतो. मरावेसे वाटते, पण मृत्यू येत नाही. हे सर्व टाळायचे असेल तर जीवन जगत असतांना जीवनातील प्रत्येक पाऊल मार्ग फुंकर घालून चालावा. पापकर्म करु नयेत, अगदी बालवस्थेपासून. अन् कोणत्याही आईनं आपली मुलं बाल्यावस्थेत वाईट कर्म करीत असतील तर,त्यावर उत्तम मार्गदर्शन करावं. त्या मुलांकडून बालवयात वाईट कर्म घडू देवू नये. कारण त्याचाही परिणाम त्या मुलाच्या आयुष्यात होतो. कधी त्याचे आई वा वडील अकाली मरण पावतात. कधी त्याच्यासमोर विवाहाचा प्रश्न निर्माण होतो तर कधी त्याच्यासमोर रोजगाराचा. हे तेवढंच खरं.*
          काल एक बातमी वाचली बातमी दिल्लीतील होती. बेदरकारपणे कार चालविल्याने ताकीद दिल्याच्या रागावरुन एका कारचालकानं एका पोलीस शिपायाच्या दुकाचाकीला धडक दिली व फरफटत नेलं. ज्यात तो गंभीर जखमी झाला. पुढं त्याचा मृत्यू. 
          घटना अशाच घडत आहेत आज. संविधान आहे तरीही. ज्याला आपण कायदा म्हणतो. परंतु ते राबविणारे घटक बरोबर नसल्यानं संविधानाचा आदर तर कोणी करीत नाही. शिवाय त्या संविधानालाही कोणी घाबरत नाहीत. ज्यातून अशा अनैतिक घटना घडत असतात. 
          माणूस जेव्हा झाडावर राहात होता. त्यानंतर तो जमीनीवर राहायला आला. तेव्हा त्याला जमीनीवर राहात असतांना त्यानं कसं,राहावं. कसं वागावं. यासाठी काही नियम बनवले. त्यानंतर तो त्या नियमानुसार वागतही असे. परंतु तो जसतसा प्रगत होत गेला व तसतसा तो स्वैर होत गेला. त्याला रोखणे वा थांबविणे कठीण होवू लागले. अशातच देवादिकांच्या कथीत कल्पना आणल्या. कारण त्यापासूनच अशा स्वैर होणाऱ्या बऱ्याच लोकांना आजतागायत रोखता आलं. ज्याला आज आपण अंधश्रद्धा म्हणतो. आजही समाज जरी शिकला असेल, उच्च पदावर जरी गेला असेल, तरी आजही अशा अंधश्रद्धा समाजात आहेत. ज्या अंधश्रद्धेनं समाज आटोक्यात आहे.
         समाजात आज असलेल्या अंधश्रद्धा कोणत्या की ज्यातून माणसाला स्वैरापासून थांबवल्या जावू शकते. त्या सांगणे क्रमप्राप्त ठरेल. जसे, मांजर आडवी जाणे हा अपशकून समजून रस्ता पार न करणे, कुत्रा आडवा जाणे, घुबडाचे ओरडणे, कावळ्याचे फांदी पकडल्यावर पावसाचा अंदाज बांधणे, त्याचे ओरडणे, कावळा पिंडाला शिवणे, मुंगूस दिसणे, स्वप्न पडणे, सापाची लाट दिसणे, रजस्वाचा विटाळ मानणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही अनुचीत घटनेला दगड रुपी पाषाणाची भीती दाखवून, आपण नियम पाळले नाही म्हणून त्या त्या पाषाणानं केल्या असा बनाव करुन त्या अनुचीत घटनेपासून रोखणे. या अंधश्रद्धाच. या अंधश्रद्धा आजही येथील संस्कृती पाळत असते. जरी लोकं उच्चभ्रू शिकलेले असतील तरीही. चांगले चांगले अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर आपल्या घरी सत्यनारायण पारायण करीत असतात. त्याचं कारण आहे, निसर्गचक्राला घाबरणं. भीती आहे की आपण त्या गोष्टी पाळल्या नाहीत तर आपलं नुकसान होईल व ते नुकसान देव करतो. सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे देव नावाची. 
          देव आहे किंवा नाही हे काही माहीत नाही. परंतु त्या देव या संकल्पनेनं अगदी कालपासून तर आजपर्यंत आणि आजही लोकांना स्वैराचार करण्यापासून रोखलं आहे नव्हे तर बांधून ठेवलं आहे. अगदी मोठमोठे अभिनेते आणि अभिनेत्र्या देव या संकल्पनेला घाबरतात. त्या साधी मांजर आडवी गेल्यास अपशकून मानतात व शुभ कार्याला जात नाहीत. मात्र काही लोकं या देव संकल्पनेपासून परागंदा होत आहेत आणि जे लोकं देवाचे अस्तित्व मानत नाहीत, ते संविधानालाही घाबरत नाहीत व असे गुन्हे करतात. कारण त्यांच्या मनातून भीती नावाचा शब्दच कायमचा दूर पळालेला आहे. हे असे का झाले? त्याचं कारण आहे आपली प्रगती. याचा अर्थ आपण प्रगती करु नये काय?
          आपली प्रगती. आपण प्रगती केली. काल झाडावर होतो, तेव्हा आपल्याला वन्य हिंस्र प्राण्यांची भीती वाटत होती. काल झाडावरुन खाली आलो व आज झाडावरच्याच नाही तर ज्यांची आपल्याला भीती वाटत होती. त्यांनाही आपण कैद केलं. आज त्याच प्राण्यांना आपली भीती वाटते. प्रगती ही त्यासाठीच असते की आपल्याला कोणाची कोणत्याही स्वरुपाची भीती वाटू नये. मग त्या अंधश्रद्धा असो वा देवाची संकल्पना. त्यालाच स्वातंत्र्य म्हणता येईल. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण आपल्यातच राक्षसी वृत्ती निर्माण करावी व त्यात वाढ करावी. आज अशाच बऱ्याच घटना घडत आहेत की ज्या राक्षसी आहेत. मागे नागपूरात अशाच एका पोलीस शिपायावर गंभीर हल्ला झाला. ज्यात तो पोलीस शिपाई मरता मरता वाचला. काल कसाबच्याही प्रकरणात शिपाई तुकाराम ओबळे मरण पावला. आजही तेच घडतं. कितीतरी संरक्षण करणाऱ्या शिपायांचा जीव जातो, असल्या आपल्या स्वैराचार वागण्यानं. तसंच आज आपल्या अशाच वागण्यातून कोणाचे जीव जातात व त्यांचे संसार उध्वस्त होतात तर कोणावर बलात्कारही होत असतात. कारण आपल्याला वाटतंय की देव नाही आणि संविधान आहे, परंतु ते देव नाही. ज्या संविधानाला आम्ही आमच्या जास्त पैशाच्या ताकदीनं वकीलांमार्फत उखडून फेकू शकतो. परंतु हे संविधान जरी आपण कुचकामी ठरवत असलो तरी एक शक्ती आहेच, आपल्यातील निर्माण झालेल्या अशा राक्षसी प्रवृत्तीला नियंत्रीत करणारी. जिला आपण निसर्गशक्ती म्हणतो. या निसर्गशक्तीसमोर आपण कितीही प्रगती केली ना. तरी ती प्रगती कुचकामाची ठरते. तीच निसर्गशक्ती म्हणजेच देव आहे. ती निसर्गशक्ती ना कोणत्या पाषाणात दिसत, ना कोणत्या एखाद्या वस्तूत. परंतु ती सर्वत्र आहे. कल्पना करुन बघा की हवा आपण निर्माण करु नकतो का? आपल्याला माहीत आहे की 
H2O जाळल्यास पाणी निर्माण होतं. परंतु आपण अति प्रमाणात पाणी निर्माण करु शकतो का? आपल्याला माहीत आहे की दगडावर दगड आपटल्यानं आग तयार होते. परंतु रात्रीला सुर्याच्या उष्णतेएवढा प्रकाश पाडू शकतो का? आपण जमीन निर्माण करु शकतो का? अन् आकाश निर्माण करु शकतो का? ह्या सर्व गोष्टी एक अद्वैत शक्ती करीत असते. जिला आपण देव म्हणून संबोधतो. ही देव संकल्पना संविधानापेक्षाही मोठी असून ती असे गुन्हे करणाऱ्याला जशास तसे स्वरुपाची शिक्षा देत असते. जसे आज गुन्हा करतांना काही वाटत मनाही. आपण संविधानाला वा अशा निसर्गशक्तीला न घाबरता गुन्हे तर करुन टाकतो. परंतु जेव्हा तो गुन्हा घडून जातो. त्यानंतर संविधानालाही कुचकामी ठरवत आपण पैशाच्या बळावर वकीलांमार्फत न्यायालयातून स्वतःला मोकळं करुन घेतो. कालांतरानं आपला गुन्हा लपतो व समाजात आपण मी नाही त्यातील असे मिरवीत वागतो, वावरतो असं प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. तेव्हा वाटतं की त्यानं गुन्हा केला. तेव्हा त्याचं काय झालं तर आपलं होणार. परंतु त्यात व्यक्तीच्या आयुष्याच्या अंतरंगाचा थोडा जरी अभ्यास केला तर असं आढळून येतं की तो व्यक्ती बराच दुःखी असून त्याला मुलंबाळं नसतात. ते दुःखच असतं, दुसरं म्हणजे त्याला मुळबाळ जरी असले तरी ते त्याला छळत असतात. वृद्धाश्रमात टाकत असतात. ज्याची आपल्याला कीव येते. ते त्याच्याच गतकाळातील वागण्याची फळं असतात. त्याला कितीतरी व्याधींनी छळलेलं असतं. तो मृत्यूही मागत असतो. परंतु त्याला मृत्यू येत नाही. शिवाय समाज त्याला ताणे देत असतो. कधीकधी वाळीतही टाकत असतो. कधी त्याला परीवार असूनही भीक मागायची वेळ येते. 
          पर्यायानं सांगायचं म्हणजे तरुणपणात आपणाला तरुणपण असल्यानं आपण स्वैराचारी वागत असतो. पाप करीत असतो. गुन्हेही करीत असतो. आपल्याला असं वाटत असते की आपलं कोणीच काही बिघडवू शकणार नाही. आपल्याजवळ पैसे आहेत. पैशाच्या जोरावर आपण काहीही करु शकतो. संविधानाला तर जिंकूच शकतो. तसा पाषाणात तर देव नाहीच की जो आपलं वाकडं करेल. परंतु हे जरी खरं असलं तरी निसर्गात अशीही एक शक्ती आहे की जी आपल्याला आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माची शिक्षा देत असते. तसं गरुड पुराण सांगतं की मृत्यूनंतर आपल्या चांगल्या वाईट कर्माची शिक्षा मिळते. परंतु ते खोटं आहे. ती शिक्षा आपण जीवंत असतांनाच मिळते व त्याचा प्रत्ययही आपणास पदोपदी येतो. जेव्हा आपल्याला म्हातारपण येते. ते म्हातारपण एवढं आपल्याला असह्य होवून जाते की मरावंसं वाटते. परंतु आपण स्वतःच्या मर्जीनं आपण मरुही शकत नाही. ते म्हातारपण तीळतीळ छळत असते. त्यावेळेस आपल्याला आपल्या तरुणपणातील कर्माचा पश्चाताप येत असतो. ते गतकाळातील कर्म आपल्याला पदोपदी आठवत असतात. जे इतरांना सांगावेसे वाटतात. ते सांगून केलेल्या पश्चातापाचं प्रायश्चित्त करावंसं वाटतं. परंतु आपण ते करु शकत नाही. कारण त्या काळात आपलं कोणीच ऐकायलाही तयार नसतातच. 
           विशेष सांगायचं झाल्यास आपण तरुणपण असो की बालपण. त्या काळात कर्म चांगलेच करावे. वाईट करु नये. ज्यातून आपल्याला चांगले फळ मिळेल. तसंच आपलं मरणापर्यंतचं आयुष्य सुखी समाधानानं जगता येईल. आपल्यालाही त्या काळात मदत करणारे कुणीतरी असतील. आपलंही ऐकून घेणारे कुणीतरी असतील. घरच्याच चार लोकांच्या नातवंडांच्या उपस्थितीत आपल्याला अखेरचा श्वास घेता येईल. अन् आपलेच कर्म वाईट असले तर मरतांना आपल्याला म्हातारपण छळेल नव्हे तर अखेरचा श्वास घेतांनाही आपल्याजवळ कोणी नसेल, एखाद्या लावारीश जनावरासारखा आपलाही मृत्यू होईल. त्यानंतर आपलं प्रेत एखादा कार्पोरेशनवाला व्यक्ती उचलून नेईल व त्या आपल्या प्रेताला सन्मान न देता लावारीश लाश म्हणून फेकून देईल यात शंका नाही.
            सन्मान...... सन्मान आपल्यालाच नाही तर आपल्या प्रेतालाही मिळावा. त्या प्रेताचाही विशिष्ट पद्धतीनं दाह संस्कार व्हावा. चार पाहूणे गोळा व्हावेत. ते रडावेत. हे तेव्हाच घडू शकतं. जेव्हा आपल्या हातून बालपणापर्यंतचे कर्म चांगले घडत असतात. परंतु आपण बालपणापासूनच कर्म चांगले करीत नाहीत. जसं बालपणात आपण गंमत येते म्हणून फुलपाखरांची हत्या करीत असतो. झाडांना तोडत असतो. सरड्यांना तंबाखू चारत असतो. मोठे झाल्यावरही कित्येक माणसांना त्रास देत असतो. शब्दांचा मार देत असतो नव्हे तर हत्याही करीत असतो. आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकत असतो. त्यावेळेस विचार करीत नाही की आपल्याला या कर्माचे वाईट भोगमान भोगावेच लागतील. त्याचे वाईट भोगमान म्हणजे आपली लेकरं चांगली न निपजणे, त्यांना दुर्धर आजार असणे. तसा आपल्या संततीला जर थोडासाही त्रास असला तर तो त्रास आपल्याला जीवघेणा वाटतो. वाटत असतं की असा त्रास आपल्याला झाला तर चालेल, संततीला नकोच. तसंच आपल्याला म्हातारपण छळणे. म्हातारपणात अतिशय वेदनादायी त्रास होतो. मरावेसे वाटते, पण मृत्यू येत नाही. हे सर्व टाळायचे असेल तर जीवन जगत असतांना जीवनातील प्रत्येक पाऊल मार्ग फुंकर घालून चालावा. पापकर्म करु नयेत, अगदी बालवस्थेपासून. अन् कोणत्याही आईनं आपली मुलं बाल्यावस्थेत वाईट कर्म करीत असतील तर,त्यावर उत्तम मार्गदर्शन करावं. त्या मुलांकडून बालवयात वाईट कर्म घडू देवू नये. कारण त्याचाही परिणाम त्या मुलाच्या आयुष्यात होतो. कधी त्याचे आई वा वडील अकाली मरण पावतात. कधी त्याच्यासमोर विवाहाचा प्रश्न निर्माण होतो तर कधी त्याच्यासमोर रोजगाराचा. हे तेवढंच खरं.
           
            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०