Do people have no common sense? in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | लोकांना अक्कल नसते?

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

लोकांना अक्कल नसते?

लोकांना अक्कल नसते ?           लोकांना अक्कल नसते? असा जर कोणाला प्रश्न विचारला तर काही लोकांना नक्कीच राग येईल. त्यांना वाटेल की लेखक महोदय, आमची अक्कल काढतात व तशी अक्कल काढायची त्यांना काहीच गरज नाही.         अक्कल......... होय अक्कलच नसते. अकलेच्या बाबतीत विचार केल्यास लोकांना अक्कल नसते असे नाही. परंतु ती कमी जास्त प्रमाणात असते. लोकांना आज माहीतही आहे की आपल्या घरासमोर कचऱ्याची दररोज गाडी येते व ती कचरा घेवून जाते. तरीही लोकं त्या गाड्यांची वाट पाहात नाहीत. तो कचरा स्वतंत्र बादल्यात भरुन ठेवत नाहीत तर कुणाच्या मोकळ्या भुखंडात कचरा टाकत असतात. ज्यातून आजाराचे जंतू वाढत असतात. मोकाट कुत्री, जनावरं तिथंच रेंगाळून आजार पसरवत असतात.           काही काही घटना अशाच विपरीत स्वरुपाच्या असतात. ज्यात लोकांना अक्कलच नसते. त्याबाबतीत एक उदाहरण देतो. एक महिला, जिचं वय साधारणतः पंचेचाळीस. तिला मुलं बाळं. दोघांचं किरकोळ कारणांवरून भांडण झालं. अशावेळेस तिचा पती त्या कारणास्तव कपडे भरुन रागानं निघून गेला. तो दोन चार दिवस घरी आलाच नाही. मग त्या महिलेला राग आला. तशी ती त्याला आणायला गेली. त्यानंतर त्यानं दोनचार तिला शिव्या दिल्या व घरी येण्यास नकार दिला. त्याचवेळेस तिला राग आला व तिनं आपल्या मुलांचा विचार न करता तो का घरी येत नाही. म्हणूनच हाताची नसच कापून टाकली. बरं झालं की प्रसंग थोड्यावर निभावला. नाहीतर नक्कीच मरायची पाळी होती. असंच दुसरं उदाहरण. एका महिलेचा पती दारु पीत होता. त्यालाही तीन लेकरं. तो दारु सोडत नव्हताच. त्यातच तो दारु का सोडत नाही म्हणून तिनं मानेवर ब्लेडचे चिरे मारले. इथंही बरं वागलं. नाहीतर प्रसंग जीवावर बेतला असता. तिसरं उदाहरण असंच आहे. एक महिला आयुष्यभर संसार केल्यावर पन्नास वर्षानंतर परपुरुषाच्या नादी लागून त्याच्यासोबत पळून गेली आपला संसार सोडून.          लोकांचं असंच असते. ते आपली अक्कल पाजळवीतच नाहीत की आमच्या चुकीच्या वागण्यातून आमचंच नुकसान होईल. आमच्याच परीवाराचं नुकसान होईल. महत्वाचं सांगायचं झाल्यास काही शेतकऱ्यांचं उदाहरण देता येईल. शेतकरी आत्महत्या अशाच घडतांना दिसतात. कारण सतत नापीकी व दुष्काळ त्यातून होणारं दुष्परिणाम, त्यातून आत्महत्या. तेही विचार करीत नाहीत की आमच्या परीवाराचं आमच्यानंतर कसं होईल.          असे बरेच प्रसंग आहेत की त्या प्रसंगात लोकं विचारच करीत नाहीत की आपल्या अशा मुर्ख वागण्यानं आपल्याही परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळून पडेल. तसं काही अंशी कळतंही त्यांना. परंतु तरीही त्यांचं वागणं मुर्खपणाचंच असतं. असेच काही गुन्हेही घडत असतात. काही गुन्हे मजबुरीनं घडत असतात. जशी पोटात आग पडलीच तर आरोपीचं खाऊच्या दुकानात चोरी करणं. पैशाची गरज पडलीच तर पैशाची चोरी करणं. गरज पडल्यास गुन्हा? परंतु काही काही गुन्हे असेही असतात की जे गरज नसते तरीही गुन्हे घडतात. ज्याचा मुर्ख वागण्यानं गुन्हा घडतो. असे गुन्हे घडतांना लोकांना मुळात अक्कल नसतेच. जसं एखादा खुन केल्यावर आपल्याला फाशी होईल हे माहीत असतांनाही खुन केला जातो. हा गुन्हा म्हणजे मुर्खपणाचं लक्षणच. मग पश्चाताप होतो. तसंच परीवाराला सोडून पन्नासव्या वर्षी पळून जात असतांना त्या महिलेला माहीतही असतं की आपण करीत असलेलं कार्य हे आपल्याला शोभत नाही. तरीही ती पळून जाते. या घटनेतदेखील अक्कल कमी असल्याचं आढळून येतं. अशाच त्या घटना, हात कापणे आणि मान कापणे. त्यानंतर पश्चाताप झाला. ना हाताची नस कापून पती परत आला.  कारण त्याला भीती होती की उद्या कदाचीत आपल्याकडून भांडण होवून त्या भांडणानंतर ती आपली मानच कापेल. दुसर्‍या घटनेत मान कापूनही तिच्या पतीनं दारु सोडली नाही. तर तिसऱ्या घटनेत ती पन्नास वर्षाची महिला, ती पळून तर गेली. परंतु ज्याच्यासोबत पळून गेली. त्यानं तिला एकच महिना ठेवलं व हाकलून दिलं. मग ती परत आपल्याच पतीकडे आली.          विशेष बाब ही की अशा बर्‍याच घटना घडत असतात परीसरात. ज्या लोकांना अक्कल नसते याचं प्रतिनिधित्व करीत असतात. काही तरुण मुलीही अशाच की आपलं वय न पाहता आपल्या आईवडीलांचा विचार न करता आणि आपल्याला पोषणारा जोडीदार कितपत चांगला आहे. तो आपल्याला पोसू शकेल काय? याचा विचार न करता पळून जातात अगदी सैराट चित्रपटातील कथानकासारखं. मग जे व्हायचं ते होतं. कारण कधीकधी या मुलींवर आत्महत्येची वेळ येते तर कधी या मुलींना वेश्यालयात विकून वेश्याव्यवसायाला लावलं जातं.          राजकारणातही असंच आहे. लोकं मतदान करतांना विचारच करीत नाहीत की कोणता नेता कसा आहे? तो बलात्कारी आहे की गुन्हेगारी स्वरुपाचा. त्याला निवडून दिल्यावर तो आपलं काम करेल की आपलाच पैसा आपल्या पाकीटमनी म्हणून वापरेल. असा विचार न करता मतदाता आपलं मत एका दारुच्या पव्व्यात व पाचशे रुपयात विकतो. जे मत बहुमोल असतं व ज्याला किंमतीत मोजताच येत नाही. मग देशाचं वाटोळं होत असते. यातही लोकांना अक्कल नसते असंच म्हणावं लागेल.           काही काही बलात्काराचेही असेच आहे. या बलात्काराच्या घटनेबाबत सांगायचं झाल्यास काही महिला आधी पुरुषांना फसवून पैसे उकळण्यासाठी त्याच्या वासनेला होकार देतात. त्यानंतर पलीकडील माणसाची वासना पुर्ण झाली वा त्यानं पैसे देण्यास नकार दिला तर त्याचेवर बलात्काराचा आरोप लावून त्याला बलात्काराच्या केसमध्ये अडकवतात. तशाच काही काही महिला अशाही असतात की त्या पुरुषांकडून स्वतःची वासना भागवून घेतात. बदल्यात त्या पैसे घेतात. अन् ज्यावेळेस समस्या निर्माण होतात. तेव्हा बलात्काराचे आरोप लावले जातात. यात गुन्हा महिलांचाच असतो. परंतु दोष पुरुषांवर लावले जातात व बिचारे पुरुष विनाकारण फसतात. या घटनेतही लोकांना अक्कल नसते हे दिसून येते.           महत्वाचं सांगायचं झाल्यास लोकांना अक्कल नसते व त्यांच्या मुर्खपणानं कधीकधी इतर लोकंही फसतात व त्यांना यातना भोगाव्या लागतात. हे तेवढंच खरं. त्यातच लोकं असे का वागतात? हाही एक विचार येतो. विशेष म्हणजे लोकांनी विसरु नये की आपण मानवप्राणी आहोत. त्यांनी आपलं वागलं सुधरावं. कारण आपल्या अक्कल हुशारी न वापरता मुर्खपणाच्या वागण्याचं आपलंच नुकसान होत असतं. त्याचबरोबर आपण आपल्या परीवाराचंही नुकसान करीत असतो नव्हे तर देशाचंही नुकसान करीत असतो यात शंका नाही. म्हणूनच प्रत्येकानं वागतांना वा प्रत्येक पाऊल टाकतांना मुर्खपणानं पाऊल न टाकता थोडा विचार करुन व विचारपूर्वक पाऊल टाकावं. जेणेकरुन त्याचे गंभीर परिणाम आपल्याला, आपल्या परीवाराला व आपल्या देशालाही भोगावे लागणार नाही.              अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०