stupid king in Marathi Children Stories by Ankush Shingade books and stories PDF | मुर्ख राजा

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

मुर्ख राजा

मुर्ख राजा
ते चंपक वन. त्या वनाचा राजा एक सिंह होता. सिंह कर्तबगार होता व त्याला वाटत होतं की त्याच्या राजगादीवर एखादा हुशार व्यक्ती बसावा. परंतु ते त्यांचं स्वप्नच राहिलं होतं. कारण तो अचानकच मरण पावला होता व त्या जागेवर पुढील काळात एक गजू नावाचा गर्दभ राजा बनला. ज्याच्या मदतीला लबाड लांडगे होते.
सिंह मरण पावला होता. आता चंपक वनाला कोणताच वाली नव्हता. तसा प्रश्न उद्भवला. राजगादीवर कोणाला बसवावं. तसा राजाच्या निवडीचा प्रश्न निर्माण होताच सर्वांनी डेंगू वाघाचं नाव सुचवलं. परंतु पुर्वीच्या राज्याचा प्रधान असलेला लांडगा सर्वांना म्हणाला,
"वेडे झालात की काय? आजपर्यंत आपण सिंहाची चाकरीच करीत आहोत. तो मांसाहारी होता व तो आपल्याला केव्हा खाईल याचा नेम नव्हता. याच भीतीनं आपण आजपर्यंत घाबरतही होतो. परंतु आता घाबरायचं नाही. आता स्वतंत्र्य व्हायचं. आपण आपला राजा निवडायचा. राजा अशा प्राण्याला बनवायचं. जो आपलं ऐकेल. जो मांस खाणार नाही. ज्यानं आपलं रक्षणच होईल."
त्या लांडग्याचं नाव मधू होतं. मधू लांडग्यानं आजपर्यंत सिंहाशी गोड गोड बोलून मधू मिळवलं होतं. सिंह करीत असलेल्याच शिकारीवर त्यानं डल्ला मारला होता आणि आता प्रत्यक्ष त्या सिंहासनावर राज्यकारभार त्याला आपल्या हातात घ्यायचा होता. त्यासाठीच तो आपली अक्कल पाजळवीत होता. अशातच कोणीतरी म्हणालं,
"आपण डेबू हत्तीलाच आपला राजा बनवूया. कारण डेबिट हत्ती हा शाकाहारी आहे व तो बलवानही आहे. तो आपलं रक्षण अगदी सहज करु शकतो."
ते प्राण्यांचं बोलणं. त्यावर तो मधू लांडगा म्हणाला,
"पक्के मुर्खच आहात तुम्ही. तुम्हाला संधी गोष्ट करत नाही. अरे रक्षण तर आपणही आपलं करु शकतो. प्रत्येकजण आपलं रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. तेव्हा आपण अशा प्राण्यांची राजा म्हणून निवड करु. जो स्वतःच कमजोर असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी तो आपल्यावर अवलंबून असेल. जो मांस अजिबात खाणार नाही."
मधू लांडग्याचं ते बोलणं. त्यावर सर्व प्राण्यांनी इकडेतिकडे पाहिलं. त्यांना ते काहीच कळेनासं झालं. त्यावर सर्व प्राणी लांडग्यालाच म्हणाले,
"तुम्हीच सुचवा महाशय, कोणाला राजा बनवायचं ते. तुम्ही ज्याचं नाव सुचवाल. त्यालाच आम्ही सर्वजण राजमान्यता देवू."
प्राण्यांनी म्हटलेले शब्द. मधू लांडग्यांच्या कानात शिरले व तो सर्वांना राजा निवडीविषयी सुचवत म्हणाला,
"हे बघा, आपण गजू गर्दभाला राजा बनवूया. तो मांसाहारी नाही तर शाकाहारी आहे. शिवाय तो कमजोरही आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तो आपल्यावर अवलंबून असेल. जर त्यानं आपलं ऐकलं नाही तर आपण त्याचा पाठींबा काढून टाकू. मग तो आपल्यावा काहीच करणार नाही. तो मांसाहारी नसल्यानं आपल्याला खाऊही शकणार नाही. अर्थात हल्ला करु शकणार नाही. त्यामुळं आपण सुरक्षीत असू. राहिला प्रश्न संकटांचा. तर संकटं हे येत जात असतातच. असं जर संकट आलंच तर आपण सर्वजण एकत्र येवून त्याचा प्रतिकार करु."
सर्व प्राण्यांनी त्या लबाड मधू लांडग्याचं ऐकलं व गरजू गर्दभाला त्यांनी राजा बनवलं. त्यानंतर राज्यकारभार सुरु झाला. मात्र आताही गजू गर्दभानं मधू लांडग्यालाच आपला प्रधान बनवलं. त्यातच गजल गर्दभ मधू लांडग्यांच्याच सल्ल्याने चालू लागला. तो जसा म्हणेल तसा.
ते लांडगे लबाड होते. तेही राजगादीवर बसू शकत होते. परंतु त्यांना वाटत होतं की एखाद्या कठीण समयी काही झाल्यास आपलाच जीव जाईल. शिवाय या जंगलातील सर्व प्राण्यांचं रक्षणही करावं लागेल. परंतु हातात काहीच मिळणार नाही. उलट राजा असल्यानं कोणाची शिकारही करता येणार नाही. शिवाय गर्दभाला बसविल्यास तो मुर्ख असल्यानं आपल्याला यथेच्छ जेवनावर तावही मारता येईल व गर्दभानं काही म्हटल्यास त्याला कोंडीत पकडून धडाही शिकवता येईल. शेवटी असा विचार करुन मधू लांडग्याऑअं राजा बनवलेल्या गर्दभाला मधू लांडगा म्हणाला,
"महाराज, मला पुष्कळ दिवस झाले. चांगली शिकार मिळाली नाही. तसा आता मी म्हाताराही झालोय. तेव्हा आपण माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी."
ते मधू लांडग्याचं बोलणं. ते लांडग्याचं बोलणं राजा बनलेल्या गजू गर्दभाला समजलं नाही. तसा तो म्हणाला,
"काय म्हटलं, जरा समजावून सांगा."
"हे बघा, आता मी म्हातारा झालोय व मला शिकार करतात येत नाही. शिवाय मी जर पोटभर जेवेल तर मला चार दिवस जगता येईल. राज्यकारभार चालवता येईल. तेव्हा आपण माझ्या जेवनाची व्यवस्था करावी. असं म्हटलं मी."
"हो काय, मग मला काय करावं लागेल?"
गजू गर्दभानं त्या प्रश्नावर लाच उपाय विचारुन टाकला. तसा लबाड मधू लांडगा म्हणाला,
"हे बघा महाराज, आता मला जेवनाकडे जावं लागणार नाही. जेवन माझ्याकडं स्वतः येईल अशी व्यवस्था करा."
"म्हणजे?"
"म्हणजे आपण आदेश द्यावेत की आता आपले मंत्री महोदय म्हातारे झालेले आहेत. त्यांना शिकार करता येणे शक्य नाही. परंतु त्यांना जगविणे आवश्यक आहे. तेव्हा आपण स्वतः एकेक त्यांचेकडे जेवन म्हणून यावं. तसा निर्णय आपण घ्यावा."
"परंतु हे सगळं ऐकतील ते सर्व प्राणी माझं?"
"का नाही ऐकणार? आपण राजे आहात. आपलं ऐकावंच लागेल. आपण त्यांना आदेश द्यावा आणि कोणी ऐकत नसेल तर त्याला दंडही."
तो लबाड मधू लांडगा बोलून गेला. तशी गर्दभाला त्या लबाड लांडग्याची गोष्ट पटली व त्यानं त्या लबाड लांडग्याला ठीक आहे म्हणत आश्वासन दिलं. त्यानंतर त्यानं सभा बोलावली व सर्वांना आदेश दिला की आता आपले प्रधानमंत्री असलेला मधू लांडगा थकलेला आहे. तेव्हा त्याला जगवणं आवश्यक आहे. तेव्हा आपण एकेक स्वतः त्याचेजवळ येवून त्याचं जेवन बनावं. तसा निर्णय आपण घ्यावा की परीवारातील कोणाला त्याचेपुढं पाठवायचं ते. हा माझा आदेश असून याची कोणी जर तोहीम केली नाही तर त्याला दंडीत करण्यात येईल. दंडीत अर्थात त्याच्या पुर्ण परीवारालाच या लांडगे मंत्र्यांचं शिकार व्हावं लागेल. आता काय करायचं ते आपण ठरवावं. एकाला मरायचं आहे की अनेकांना."
गर्दभानं आदेश दिला. आदेशानुसार प्रत्येक जणच विचार करायला लागला विचार होता की आपण परीवारातील कोणाला तरी एकाला पाठवावं. बाकीचे वाचतील तर वंश वाचवता तरी येईल. अन् तो जगणारच किती दिवस आहे. तर काहीजण विचार करीत होते की आपण चुकीच्या माणसाची राजा म्हणून निवड केली. ज्यानं प्रजेचं रक्षण करायला हवं होतं. तोच आपल्या जीवावर उठलाय. मात्र तो प्रत्येकाचा विचार होता. असा विचार ते दररोजच करीत असत. मात्र कोणताच प्राणी त्याला पदावरुन हटविण्याच्या गोष्टी करीत नव्हता वा कोणीही पदावरुन त्याला पायउतार करीत नव्हता. ज्यातून घरबसल्या लबाड मधू लांडग्याला आयतं जेवन मिळत होतं. तशीच त्याची अख्खी बिरादरीही गजू गर्दभाच्या मुर्खपणामुळं काहीही मेहनत न करता केवळ रिकामी बसून, ऐषआरामात आपले जीवन जगत होती.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०