Is there equality between men and women? in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | स्री पुरुष समानता आहे काय?

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

स्री पुरुष समानता आहे काय?

स्री पुरुष समानता ; समानता आहे तरी काय?

आज देशात स्री पुरुष समानता आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांइतकीच कामं करीत असतात. मग ती कोणतीही कामं का असेना. त्यावरुन दिसतं की स्री पुरुष समानता आहे.
स्री पुरुष समानता ही जळी, स्थळी, पाताळी सारखीच दिसते. अर्थात सरकारी कार्यालयात, खाजगी कार्यालयात, शिक्षणक्षेत्रात, मुलं शिकत असतांना ही पातळी दिसते. परंतु हे जरी खरं असलं तरी ती पातळी सारख्या प्रमाणात दिसून येत नाही. त्याचं कारण आहे, स्री आणि पुरुषांची संख्या. आज सरकारी क्षेत्रात महिलांची संख्या जास्त प्रमाणात आहे. तशीच महिलांची संख्या खाजगी क्षेत्रातही जास्त आहे. त्याचं कारण म्हणजे मुली अतिशय इमानदारीनं काम करीत असतात. असं कार्यालयातील कंपनी मालकांचं म्हणणं. यावरुन सरकारी क्षेत्रामध्ये महिलांची संख्या अतिशय जास्त दिसते. परंतु हे जरी बरोबर असलं तरी आज स्री पुरुष समानता दिसत नाही. त्याचं कारण आहे स्री जातीवर होणारा अत्याचार.
आज राजकारणाचा विचार केल्यास आणि महिलांची संख्या मोजल्यास पुरुषांपेक्षा महिलांची संख्या कमीच आहे. असे दिसते. असे का? तर महिलांना राजकीय क्षेत्र आवडत नाही. असं पुरुषांचं म्हणणं. गावखेड्यातील एखाद्या महिलेला आरक्षण असल्यामुळंच निवडणुकीत उभं ठेवावं लागतं. जर ते आरक्षण नसतं तर तिला कोणत्याच काळ्या कुत्र्यानंही विचारलं नसतं. अशी महिला राजकारणात निवडणुकीत निवडून आलीच तर ती निर्णय घ्यायला सक्षम असूनही तिच्या नावानं राज्यकारभार तिचा पुरुष असलेला पतीच करीत असतो. तिला राज्यकारभारच करु देत नाही. यात कुठं आली महिला समानता? शिवाय बऱ्याचशा अशा जाती आणि असे धर्म आहेत की त्या धर्मात वा जातीत महिलांना शिकण्याची परवानगी नसते. एकतर त्या महिलांचा विवाह करुन दिला जातो किंवा तिचं शिक्षण ती कितीही हुशार असली तरी दहावी शिकविल्यानंतर बंद केलं जातं. इथेही कुठं आली स्री समानता? आजही बऱ्याचशा घरात मुलीचं जर एखाद्या मुलासोबत प्रेम असेल आणि ते प्रेम तिच्या आईवडीलाला माहीत झालं तर तिला पुढील शिक्षण शिकविलंच जात नाही. तिला शिक्षण शिकविणं बंद करुन तिचा विवाह करण्याची वाट पाहिली जाते. याला का स्री समानता म्हणता येईल काय? कारण त्याच ठिकाणी एखादा मुलगा असेल तर त्याचं तसं प्रेम करणं वा तो गुन्हा माफ करुन टाकला जातो. याचाच अर्थ असा की प्रेम करणं गुन्हा आहे.
खरंच मुलींनी प्रेम करणं गुन्हा आहे काय? अन् मुलांनी प्रेम करणं न्यायीक आहे काय? नाही ना. मग असं का घडतं बऱ्याचशा कुटूंबात? हा एक स्री पुरुष असमानता दर्शविणारा महत्वपुर्ण प्रश्न आहे.
कोणी म्हणतात की युगाचे चार प्रकार आहेत. कृत, त्रेता, द्वापर आणि कली. कोणी हे युग मानायला तयार नाहीत. परंतु ते जर युग मानले आणि स्री पुरुष समानता पडताळून पाहिली तर तीनही युगात पुरुष आणि स्री समानता दिसते व तेवढीच असमानताही. कृत, त्रेता व द्वापरयुगात स्रियांचे विवाह होतांना स्वयंवराचे आयोजन केलं जात असे. ज्यातून विवाहयोग्य पती निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना बहाल केलं जात होतं. ही समानता होय. परंतु ज्यावेळेस कलियुग आला. त्यानंतर स्री पुरुष समानता संपली व स्रिला गुलाम बनवलं गेलं. तिच्यावर साऱ्याच स्वरुपाची बंधनं लादली गेली. ही असमानता. म्हटलं जातं की कृतयुगात या धरणीवर विष्णूचे चार अवतार झालेत. त्यानं माणसाच्या रुपात जन्म घेतला नाही तर तो प्राण्यांच्या रुपात जन्म घेतला. ज्यात मत्स, कुर्म, वराह व नरसिंह असे अवतार झालेत. याठिकाणी चार्ल्स डार्विनचा सिद्धांत लागू होतो. डार्विनच्या सिद्धांतानुसार माणूस कुर्म अर्थात माकड होता. तो मानव नव्हता. त्यानंतर दुसरे युग, त्रेतायुग. या त्रेतायुगात विष्णूनं पहिल्यांदा मानव म्हणून जन्म घेतला. ज्यात वामन, परशुराम व राम अवतार झाले. ज्यात वामन अवतार अर्थात निशस्र माणूस, परशुराम अवतार अर्थात शस्त्रधारी माणूस आणि रामअवतार अर्थात कंदमुळ खाणारा माणूस. हेच डार्विनच्या सिद्धांतानुसार सांगायचं झाल्यास माकड झाडावरुन खाली आलं. तेव्हा तो साधारण वामन अवतारासारखा माणूस होता. त्यानंतर त्यानं परशुराम अवतारासारखी शस्र बनवली. त्यानंतर त्या शस्राच्या सहाय्यानं त्यानं रामअवतारासारखी त्यानं कंदमुळं खाल्ली. त्यानंतर द्वापर युग आलं व त्या युगात विष्णूचा क्रिष्ण अवतार झाला. ज्यानं पशुपालनाला महत्व दिलं. अर्थात क्रिष्णाला यादव म्हटलं आहे व त्यानंतर झालेल्या बुद्ध अवतारानं कृषीला प्राधान्य दिलं. अर्थात शेती केली. याचाच अर्थ डार्वीनच्या सिद्धांतानुसार पुर्वी माकड अवस्थेत असलेला माणूस आता क्रिष्ण अवतारासारखा पशूपालन करायला लागला व बुद्ध अवतारासारखा शेती करायला लागला. त्यानंतर आला कलीयुग. ज्या युगात विविध प्रकारच्या कला माणसानं अवगत केल्या होत्या. हेच डार्वीनच्या सिद्धांतानुसार सांगायचं झाल्यास माणूस जेव्हा शेती करायला लागला. त्यानंतर तो साऱ्याच कला शिकला. ज्याला हिंदू शास्त्रानुसार कलियुग व डार्वीनच्या सिद्धांतानुसार माकडाच्या उत्क्रांतीचा इतिहास हे नाव आहे.
हिंदू धर्मशास्रात विष्णूने घेतलेले जे जे अवतार आहेत. ते ते अवतार का घेतले? याची कारणमिमांसा आहे. जसं म्हटलं जातं की पृथ्वीवर अन्याय व अत्याचार अति प्रमाणात माजल्यामुळं हे सर्व अवतार घेतले गेले. याचाच अर्थ असा की हिंदू धर्म जिथं जिथं अस्तित्वात होता, तिथं तिथं अन्याय, अत्याचार माजला होता व स्रीला एक उपभोग्य वस्तू मानल्या जात होते. ही असमानताच होती. परंतु समानता नव्हती हेही नाकारता येत नाही. जसे. त्रेतायुगातील सीतेचं कृतयुगात नाव वेदवती होतं व तिला विष्णू आवडत असल्यानं तिनं त्याला मिळविण्यासाठी तपश्चर्या केली. ही समानता होय. परंतु तिला रावण नावाच्या पुरुषानं छळलं. ही असमानता. त्रेतायुगात स्री पुरुष समानता ही कैकेयीच्या शब्दावरुन दिसून येते. तिच्या शब्दांना मान दिल्या गेला. परंतु सत्य माहीत होताच तिलाही अयोध्येत छळलं गेलं. ही असमानताच. द्वापर युगातही स्री समानता होती. तिला दुय्यम समजलं जात नव्हतं. हे द्रौपदीवरुन दिसून येते. तिनं म्हटलं की मी कर्णाशी विवाह करणार नाही व ती कर्णाची पत्नी बनली नाही. ही समानता होय. मात्र तिचा जागोजागी अपमान करणे ही असमानताच. त्यातच तिचे केसं पकडून फडफडत आणून भर दरबारात तिच्या पतीसमोर तिची धिंड काढणे ही असमानताच होय. आज विवाहाच्या बाबतीत थोडासा निर्णय घेण्याची स्री समानता दिसत असली तरी आजही स्री समानता नाही. कारण हिंदू धर्मशास्रातील कालच्या तीनही युगात स्रियांची समानता जरी दिसत असली तरी ती वरवर होती. आतून स्रियांना आजच्याचसारखी असमानतेची वागणूक मिळत असे. रावणानं स्रिला दुय्यम समजत वेदवतीला छळणं. त्यानंतर तिची अग्नीकुंडात उडी घेणं. रावणाचं आपल्या पत्नीचं न ऐकणं. हीच स्री असमानता. त्रेतायुगात सीतेनं भुमीत स्वतःला गाडून घ्यायला बाध्य होणं. ही देखील स्री असमानता, तसंच द्वापरयुगात द्रौपदीची परवानगी न घेता तिला जुव्याच्या दावावर लावणं त्यातच तिला दुर्योधनाने दुःशासनाकरवी भर दरबारात ओढत नेणं ही कृती देखील स्री असमानता दर्शवते. याचाच अर्थ असा की काल तर स्रिला काही बोलायचीच परवानगी नव्हती. अन् ज्यावेळेस कलीयुग प्रारंभ झाला, तेव्हा त्या कलियुगात तिला बुरखा परीधान करणं. तिच्या शिक्षणाच्या संधी नाकारणं. तिचं सती जाणं, केशवेपण, बालविवाह, विधवा पुनर्विवाह बंदी, एक पत्नी असतांना अनेक पत्नी करणे अर्थात पहिल्या पत्नीची इच्छा नसतांनाही पुरुषानं सवती आणणे या साऱ्या गोष्टी काल स्रिच्या वाट्याला आल्या. याही गोष्टी स्री असमानताच दर्शवितात. शिवाय कालच्या कलियुगाच्या प्रारंभ अवस्थेत स्रियांना दुय्यम स्थान असलं तरी आजतरी स्रियांना प्रथम स्थान आहे का? जरी भारत स्वतंत्र्य झाला असला तरी आणि संविधान बनून त्यानुसार आरक्षण दिलं गेलं तरी. याचाच अर्थ आजच्या काळानुसार असाच आहे की आजही समाजात स्री पुरुष असमानताच आहे. मोजक्या दोनचार स्रिया सुधारल्या व त्या स्रिया सुधारणेतून पुढे गेल्या. म्हणजे स्री पुरुष समानता आली असा त्याचा अर्थ नाही.
ही झाली हिंदू धर्मशास्रानुसार स्री पुरुषांची असमानता. इतर धर्मातही तशीच असमानता दिसून येते. जसं स्रिला बुरख्यात वावरायला भाग पाडणे. तिच्या उच्च शिक्षणावर बंदी घालणे, तिला उपभोग्य वस्तू समजत दोन लेकरांपेक्षा अनेक लेकरांना जन्म देण्यास लावणे, तिला पत्नी म्हणून नेणे. परंतु पत्नीचा दर्जा न देणे, तिला मारणे, झोडणे बलात्कार करणे, एवढंच नाही तर तिच्यावरच बलात्कार करुन ती ओळखू येवू नये म्हणून तिचा चेहरा विद्रूप करणे, तिच्यावर तिचा गुन्हा नसतांना ॲसिड फेकणे या साऱ्याच गोष्टी स्री पुरुष असमानताच दर्शवितात. ही स्री पुरुष असमानता विविध धर्मातील धर्मांड लोकं दर्शवितात. त्यासाठी धर्मातील सुत्राचे प्रमाण देतात. परंतु ही स्री पुरुष असमानता डार्वीनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत दर्शवीत नाही.
महत्वाचं सांगायचं झाल्यास माणसानं पुर्वी अवतार झाले की नाही हे पाहिलेले नाही व आताही कल्की अवतार आहे की नाही हेही सांगता येणे शक्य नाही. परंतु माणूसकी सर्वांनी पाहिलेली आहे. त्यातच सर्वच लोकं मानव हा माकडांपासूनच कसा वृद्धिंगत होत गेला हे शिकलेली आहेत. तेव्हा जगातील प्रत्येक माणूस जसा डार्वीनच्या स्री पुरुष समानतेनं चालतो. तसंच आपल्याही देशातील सर्वच मानसानं चालण्याची गरज आहे. स्री पुरुष समानतेबाबत हिनता न बाळगता. कारण जी स्री पुरुष असमानताच भेदभावाच्या विषाचं बीज पेरतं. हे तेवढंच सत्य आहे. याबाबतीत जास्त खोलवर विचार केल्यास असं दिसेल की संविधान आहे व आरक्षण आहे. म्हणूनच स्रिला सर्वच गोष्टीत संधी आहे. नाही तर शास्राच्या त्या स्री पुरुष असमानतेच्या हत्यारानं केव्हाच कालच्या स्रियांसारखी आजच्या स्रियांचीही हत्या केली असती यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०