Malika..... Aayushyatlya Anubhvanchi. - 12 in Marathi Short Stories by Arpita books and stories PDF | मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 12

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 12

पान १२ 

            त्या दिवशी म्हणजे सोमवारी आम्हाला बाईंचं असं झालेलं समजलं. सगळ्या मुलींसाठी हा खूप मोठा धक्का होता.पण , आमच्या बाई खूप चांगल्या होत्या. वर्गातल्या सगळ्या मुलींच्या आवडत्या होत्या. त्या आम्हाला कधीच ओरडल्या नाहीत, नेहमी समजून घ्यायच्या आणि भारी शिकवायच्या. त्यांना खूप वेळा उत्तम शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला होता.त्या असं अचानक समजल्यामुळे खूप मुलींना चक्कर आली तेव्हा. आज आमच्या बाई हयात नाहीत. पण , त्यांच्या आठवणी मात्र मनामध्ये कायम ताज्या राहतील.

          आता परत हॉस्टेल मधला गोंधळ सांगते. माझी एक सई नावाची मैत्रीण होती. तीच आणि माझं एकदा फार मोठं भांडण झाल होत.आणि तेही आंघोळीच्या बाथरूम मध्ये जाण्यावरुन. तेव्हा मी तिच्याशी इतकी भांडले होते की , तिला फिट आली होती,तिच्या तोंडातून फेस येत होता. थरथर कपात होती ती. आणि अचानक चक्कर आल्यामुळे ती जोरात बाथरूम मध्ये पडली. त्यामुळे तीच डोक बाथरूम मधल्या नळावर जोरात आपटल. आमच्या मावशींनी ( कपडे धुणाऱ्या ) पाहिल्यामुळे त्यांनी लगेच रेक्टर बाईंना बोलवलं. त्यांनी तिला लगेच दवाखान्यात नेलं. पण , काय माहित का ? मला त्या वेळी काहीच वाटलं नाही. मी निःशब्द होते. म्हणजे मला वाईट पण वाटत नव्हतं. तेव्हा एवढं सगळं होऊन सुद्धा तिने माझं नाव कधीच बाईंना सांगितलं नाही. 

         आणि हो आता अजून एक बाथरूम मधेच झालेली गंम्मत सांगते. एकदा मी बाथरूम मध्ये गरम पाण्याची बादली भरायला लावली होती गिझरच्या नळाला. आमच्या हॉस्टेलमध्ये सगळ्या बाथरूम ची एक रूम होती. म्हणजे त्या रूम मध्ये आत गेल्यावर एका बाजूला गिझर होता.त्याच्या शेजारीच एका ओळीत सगळे सिंक. आणि मग त्यासमोर सगळ्या बाथरूम्स ची लाइन सुरु . मग मी गिझरच्या नळाला बादली भरायला लावली.  आणि दोन्ही बादल्या भरून मी बाथरूम मध्ये बादली नेत होते. दोन्ही बादल्या एकाच वेळी उचलल्यामुळे अचानक माझा पाय घसरून मी जोरात पडले. हातातल्या दोन्ही बादल्या माझ्या अंगावर सांडल्या. माझ्या मैत्रिणी माझ्याकडे बघून खूप हसत होत्या. मी पण, पडले तिथेच बसून हसत होते. अजून एकदा असच झालं आहे. सॉरी , झालं होत.  त्या दिवशी माझा बर्थडे होता. माझे मम्मी- पप्पा आले होते. मी रूम मध्ये सेलेब्रेशन साठी केक घेतला. मम्मी- पप्पा गेल्यावर मी केक घेऊन रूम मध्ये येत असताना पॅसेज मध्ये पाणी सांडल्यामुळ माझा पाय कधी घसरला हे मला पण कळालरेक्टर नाही. माझ्या हातातल्या केकच काय झालं असेल? हे आता तुम्हाला समजलं असेलच. सगळा लगदा झाला होता. पण , मी संध्याकाळी तसाच केक कट केला. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनी तो तसाच आवडीने खाल्ला. 

         त्यानंतर काही दिवसांनी असाच दुर्गा आमची एक मैत्रीण आहे. तेव्हा तिचा बर्थडे होता. खरतर आमच्या हॉस्टेल ला बर्थडे celebrate  करण्याची परवानगी नव्हती. तरी पण आम्ही सगळे रेक्टर मॅडम ला न कळता बर्थडे celebrate करायचो. मी , टिळेकर , टेपाळे आम्ही मागच्या जिन्याने केक रूम मध्ये नेत असताना आम्हाला रेक्टर मॅडम ने पाहिलं. आम्हाला ऑफिस मध्ये बोलवून खूप ओरडल्या. त्या म्हणाल्या , " तुम्हाला किती वेळा सांगितल आहे आपल्याकडे वाढदिवस असल्यावर रूम मध्ये केक न्यायला परवानगी नाही. आणि तुम्हाला एवढाच जर वाढदिवस साजरा करायचा आहे तर ,आपण सगळ्या मुलींसोबत प्रार्थनेच्या वेळेस साजरा करूया. मेस मध्ये केक द्या. जेवणाच्या वेळेस ताई सगळ्यांच्या ताटात केक वाढतील." आता आम्ही मनातल्या मनात म्हणलं ," इथं हा एवढासा केक आमच्या रूम मध्ये खायला पुरत नाही. आणि यांच काय तरं मेस मध्ये द्या केक, सगळ्यांना मिळेल. जस काय एवढ्या हॉस्टेल मधल्या अडीचशे (२५०) मुलींना केक चा एक एक पीस मिळणारच आहे. आमच्या मैत्रिणीचा बर्थडे आम्ही आमच्याच रूम मध्ये करणार ना. सगळ्या मुलींना बोलवून ते पण प्रार्थनेच्या हॉल मध्ये बर्थडे सेलिब्रेट करायला ते काय गाव जेवण आहे का." हे सगळं बाई आम्हाला ओरडत असताना आम्हीच मनातल्या मनात बोलत होतो. पण , तेव्हा तोंडावर तर कस बोलू शकणार ना ? शेवटी मग बाई बोलल्या की, "तुम्हाला जर मी बोलले ते थोडं जरी बरोबर वाटलं तर हा केक इथेच ठेवा, जरा तरी तुम्हाला लाज वाटत असली हा केक इथेच राहील. बाकी काय करायचं तो निर्णय तुमचा आहे.

        आम्ही एकमिकांकडे पाहिलं तिघींनी. बाकी आमच्या रूम मधल्या मुली आमची वाट बघत होत्या. बर्थडेची सगळी तयारी झाली होती. फक्त केक मुळे उशीर झाला होता. मग आता सगळं बोलून झाल्यावर बाई शांत बसल्या आणि आम्ही पण शांतपणे एकमेकींकडे बघत होतो. बाईंनी आम्हाला एवढं बोलून सुद्धा आम्ही निर्लज्जपणे , लाज नसल्यासारखं  बाईंसमोर असलेला केक आम्ही उचलला आणि रूम मध्ये सेलेब्रेशनसाठी घेऊन आलो. खरच पण , आम्ही असं केल्यावर बाईंना आम्ही निर्लज्ज आहोत, याची तेव्हा १०० टक्के  खात्री पटली असणार. 

 

 

 

पुढचं पान  लवकरच.......