Suits may be dismissed as frivolous on merits in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | योग्यतेनुसार खटले कुचकामी ठरावेत

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

योग्यतेनुसार खटले कुचकामी ठरावेत

योग्यतेनुसार खटले कुचकामी ठरावेत.

आजच्या काळात न्यायालयीन परीसरात जावून पाहिल्यास खटले सुरु असलेले दिसत असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असलेली दिसत आहे. अलिकडील काळात भांडण होणे वा खटले दाखल होणे. ही काही आजच्या काळातील नवी गोष्ट नाही. कोणावर, केव्हा, कसे खटले दाखल होतील याची काही शाश्वती देता येत नाही. याबाबतीत एक उदाहरण आहे. उदाहरण सत्य आहे.
एका शहरात चोरांची टोळी सुटली होती. रात्री अपरात्री कुणाच्याही घरी चोरी व्हायची. चोर मंडळी दागदागीने घेवून जायचे. त्यातच समजा एखाद्याला जाग आलीच तर त्या व्यक्तीला ते चोरं यमसदनी पोहोचंवायचे अशा बर्‍याच घटना त्या शहरात घडत होत्या. ज्यामुळं लोकांमध्ये भीती निर्माण होवून लोकं दहशतीत आले होते. कारण त्या गोष्टीनं कोणी कितीही मोठा पहलवान असला तरी त्याचा झोपेत केव्हा व कसा जीव जाईल याची शाश्वती देता येत नव्हती. कधी दिनदहाडे भर दुपारीच चोऱ्या होत असत. त्यामुळं लोकांनी वस्तीवस्तीत गस्त ठेवणं सुरु केलं होतं. ते रात्रीलाही गस्त देत असत. शिवाय विचार केला होता की जर अशी झोपमोड करणारा एखादा चोर सापडल्यास त्याला चांगलंच पिटावं.
विचारांती काही लोकांची टोळीही सक्रीय होती. जे चोर असावेत असा संशय होता. ही मंडळी त्या शहरातील नव्हती. ना ही ती त्या देशातील वाटत होती. ही मंडळी कसलेली होती व ती मंडळी आपल्या हातांना चक्कं तेल लावून असायची. शिवाय ही मंडळी दिवसा भर वस्तीत भिकारी बनून यायची. चार दोन आणे मागायची व निघून जायची. ती कोणाला काहीही म्हणायची नाही. मात्र त्यांचे तेल लावलेले दंड चमकायचे. जेव्हा त्यावर सुर्याचं उन्हं पडायचं.
लोकांमध्ये दहशत व भीतीयुक्त तसं वातावरण होतंच. त्यातच ते चोर शोधतच होते. अशातच एका अज्ञात व्यक्तीचं बारीक लक्ष त्या वस्तीवस्तीत येणाऱ्या एका भिकाऱ्याच्या दंडाकडे पडलं. ते चमकत असल्यानं त्याला विचार आला की आपले दंड चमकत नसतांना या व्यक्तीचे दंड का चमकत असावेत? प्रश्नार्थी त्यानं आधी दुर्लक्ष केलं. कारण त्याला ते दंड त्याच्या शरीरावरुन निघणाऱ्या घामानं चमकत असावं असं वाटलं. परंतु नंतर क्षणातच त्याच्या लक्षात आलं. लक्षात आलं की हे दंड तेल लावल्याशिवाय चमकतच नाही. मग काय विचारांती त्याला वाटू लागलं की या व्यक्तीचे दंड जर तेल लावल्यानं चमकत आहेत तर यानं हाताला तेल लावलंच कसं? विचार करता करता त्याच्या सहजच लक्षात आलं की हे भर दुपारी वस्तीवस्तीत येणारे व भीक मागणारे लोकंच चोर असावेत. त्यांच्या दंडाला तेल लावण्याचं कारण म्हणजे जर एखाद्यानं त्याला चोर समजून त्याचा दंड पकडल्यास तो त्या दंडाला लावलेल्या तेलाच्या सहाय्यानं सहजच निसटून निघून जाईल नव्हे तर त्याला निसटून जातात येईल. मग काय, तोही चोर शोधतच होता व त्यानंही चोर शोधतच असतांना बर्‍याचशा रात्री अशा जागलीतच काढल्या होत्या. विचारांती त्यानं ती गोष्ट आपल्या काही मित्रांना सांगीतली व त्यांच्या दंडाला तेल लावण्याचं कारणही सांगीतलं. मग काय लोकांनी त्याला पकडलं व त्याला झोडपण्यासाठी त्याच्यावर काठ्यांनी वार करणे सुरु केले. जेणेकरुन त्याला चोरी करण्यापासून अद्दल घडावी.
ते लोकांचं काठीनं त्याला मारणं. त्यातच त्या काठ्या दंडाला तेल लावल्यानं दंडावरुन निसटून जाणं. त्यातच ती गोष्ट इतर त्याच्या सोबत्यांनाही माहीत झाली व ते त्याला वाचवायला आले. ज्यांनीही दंडाला तेल लावलेलेच होते.
लोकं मारत होते एका व्यक्तीला, तेही त्याला धडा शिकवावा म्हणून. त्यातच ती मंडळी मारणार नव्हती त्याला जीवंत. परंतु जसे त्याला वाचवायला इतर त्याची मित्रमंडळी आली व ती त्यांच्यावर वार करु लागली. ते पाहून आधीच जागली असलेले व त्रासलेले लोकं संतापले. तसे ते त्यांच्या दंडाला तेल लावण्यानं त्यांनाच चोर समजून त्यांना मारुन टाकलं व ज्यांनी मारलं. ते पळून गेले. तसं पाहिल्यास ती माणसं खाली मरुन पडली होती व मारणारे पळून गेले होते. परंतु त्या मृतावस्थेत असलेल्या प्रेतांना पाहायला लोकांची बघ्याची गर्दी गोळा झाली होती. लोकं आजुबाजूला उभे राहून पाहात होते. ज्यात ती प्रेतं खुणावत होती की त्यांनाही न्याय मिळावा. ज्यांनी त्यांना मारलं. ती मंडळी पकडली जावीत. मग काय, थोड्याच वेळात पोलीस आलेत व त्यांनी त्या प्रेताजवळ जे उभे होते व ज्यांनी मारलं नव्हतं त्यांना. त्यांनाच पकडलं. मग काय, त्यांच्यावर खटले दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकून दिलं होतं. ज्यात काही विद्यार्थीही होते. काही उच्च शिकलेले तरुणही होते. काही शिक्षक, प्राध्यापकही होते तर काही डॉक्टर व इंजीनियरही होते आणि काही समाजसेवक होते. ज्यांचा त्या प्रकरणात कोणत्याही स्वरुपाचा दोष नव्हता.
प्रत्येकांवर खटले दाखल झाले होते. विद्यार्थी ती प्रेतं पाहायला गेल्यामुळं त्यांच्यावर खटला दाखल झाल्यानं गुन्हा नसतांनाही त्यांना शिकता आलं नाही. तरुण युवकांना ती उच्चशिक्षित असली तरी त्यांच्यावर खटला दाखल झाल्यानं गुन्हा नसतांनाही नोकरी लागली नाही. तसेच प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर व समाजसेवकांचा गुन्हा नसतांनाही त्यांच्यावर खटला दाखल झाल्यानं बदनामी झाली. असे बरेच खटले असतात की ज्यात गुन्हा नसतोच लोकांचा. तरीही त्यांच्यावर जबरदस्तीचे आरोप लागून खटले दाखल होत असतात. याबाबत दुसरं उदाहरण आहे. एके ठिकाणी जुगार सुरु होता व एक व्यक्ती तेथून जात होता. तो जुगार रस्त्यानच सुरु होता व तो जुगार सुरु असल्यादरम्यान त्या ठिकाणी पोलीस आले. तशी पोलिसांची चाहूल लागताच सर्वजण सैरावैरा पळाले. मात्र जाळ्यात अडकला तो त्या रस्त्यानं जाणारा व्यक्ती. जो गणमान्य होता.
अशी बरीच उदाहरणं सांगता येतील. जी आपली इच्छा वा गुन्हा नसूनही आपल्यासोबत घडत असतात. कधीकधी एखादा चोर आपल्या घरी येतो व आपल्यावरच वार करीत असतो. त्यातच आपण स्वतःचे रक्षण करीत असतांना आपल्या हातून नकळत गुन्हा घडतो. ज्याची परियंती खटल्यात होते व खटल्यातून तुरुंगात. ज्यात आपला गुन्हा नसला तरी शिक्षा. विशेष बाब ही की अशा खटल्यात शिक्षाच होवू नये. गुन्ह्याचे प्रारुप पाहायला हवे. जर एखादा गुन्हा जरी गंभीर असेल, परंतु तो जर बचावात्मक परिस्थितीत झाला असेल वा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी केल्या गेला असेल तर तो गुन्हा ज्या माणसाने गंभीरपणे केला. त्यास शिक्षा करुच नये. कारण त्यानं जर ऐनवेळेस बचावात्मक पवित्रा घेतला नसता तर तोच आज जीवंत उरला नसता. उदा. एखादा हत्यारबंद चोर आपल्या घरी येणे. या प्रकरणात आपल्या घरी हत्यार घेवून चालत आलेला चोर चोरी करतांना हा विचार करीत नाही की तो सहजासहजी आपल्या चोरीच्या आड येणाऱ्या लोकांना सोडून देईल. तो त्याच्या चोरीच्या आड जे जे येतात. त्याला यमसदनी पाठवीत असतात. अशांना मारुन टाकणे हा गुन्हा नाही. परंतु कायद्यातील तरतुदीनुसार जरी आपल्या घरी चोर आला असेल व त्याचा आपल्या हातानं खुन झाला असेल तर आपण जरी तो खुन बचावात्मक परिस्थितीत केला असला तरी खुन तो खुनच असतो. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची झाल्यास उच्चशिक्षण घेतलेल्या तरुणांवर जर खटले असले तर त्यांना नोकरी लागत नाही. परंतु हेही तेवढंच चूक आहे. कारण या प्रकरणात आजुबाजूची मंडळी अशा उच्च शिकणाऱ्या व्यक्तीचा द्वेष करीत असतात. ज्यातून कोणताही आरोप लावून प्रकरण घडवलं जातं. कधीकधी एखादा गुन्हा घडलाच तर खटले दाखल होणारच. ते दाखल होत असतात. ते चालत असतात. त्यातच काही लोकं ते चालत असतांना सुधरतात. त्यांना पश्चाताप होतो व ते सामाजीक कामं करीत असतात. याच सामाजीक कामातून ते उच्चकोटीला पोहोचतात. त्यांची समाजात चांगली प्रतिमा तयार होत असते. अशातच खटल्याचा निकाल जाहीर होतो. अमूकाला अमूक अमूक कालावधीसाठी कारावास. ज्यातून जेवढी इज्जत कमवली, तेवढी फोल ठरते. शिवाय कधीकधी तरुणपणात एखादा अपराध समंजसपणा नसल्यानं घडून जातो. जसं एखाद्या राजकारण्याच्या पुकारलेल्या आंदोलनात तरुणाईचं सहभागी होणं. परंतु यात राजकारण्यांचं काहीच नुकसान होत नाही वा तो कधीच मागे वळून बघत नाही. कधी शहानिशा करीत नाही. कधीच पैसेही देत नाही. मात्र खटल्यामध्ये तारीख वर तारीख करीत हाच कार्यकर्ता खेटा घालत असतो. योग्यता असली तरी त्याला त्या खटल्यानं पुरेशी झोपही लागत नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास त्याचं शिक्षण आणि त्याची योग्यता पुर्णतः धुळीस मिळत असते.
महत्वाचं सांगायचं झाल्यास असे काही गुन्हे हे गंभीर गुन्हे ठरवू नये की जे गुन्हे अनवधानानं घडत असतात. जसं तरुणाईनं आंदोलनात घेतलेला सक्रीय सहभाग. असे गुन्हे की जे रक्षात्मक असतात. आपल्या घरी चोर येणे वा एखाद्यानं एखाद्या तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणे. असे गुन्हे की ज्यात व्यक्ती आपल्या सामाजीक कार्यानं योग्यता प्राप्त करतो. जसा. एखादा वैज्ञानिक, कलाकार वा साहित्यीक. परंतु अलिकडील काळात गुन्हा तो गुन्हाच धरला जातो. जरी एखाद्यानं जबरन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तरी, त्याला आमचे कायदे मारुन टाकण्याचा सल्ला देत नाही. एखादा चोर जरी घरात आला आणि त्याने आपल्याला जरी मारुन टाकण्याचा प्रयत्न केला तरी आमच्याकडील कायदे त्याला मारुन टाकण्याची परवानगी देत नाही. कारण आमच्याकडील कायदे हे बचावात्मक स्वरुपाचे नाहीत तर कोणत्याही चांगल्या व्यक्तीस गुन्हेगारच ठरवणारे आहेत. इथं जे खरे गुंड असतात. ते बाहेर मोकाट फिरत असतात आणि जे खरे गुंड नसतात. ते खटल्यामध्ये गुंतून असतात. परंतु त्यानं गुन्हा का केला? याची कोणतीच शहानिशा केली जात नाही. त्याचं कारण असतं वेळ. आमच्या न्यायालयात एवढे रोजचे खटले दाखल होत असतात की ते सोडवता सोडवता नाकी नव येत असतं. समजा एखादा खटला न्यायालयात गेलाच तर त्या खटल्यात आरोपीला शिक्षा सुनावण्याची वेळ म्हातारपणात येते आणि कायदा असा म्हणतो की आरोपी हा जेष्ठ नागरिक आहे. त्याला सोडून द्यावे. शिवाय न्यायालयात न्यायकक्षेचं मोजमाप होतांना जे गुन्हेगार नसतात, तेच गुन्ह्यात लटकतात आणि जे मुळ रुपातील गुन्हेगार असतात, ते मोकळे.
न्यायालयीन प्रक्रियेनुसार महत्वपुर्ण बाब ही की आज योग्यतेनुसार खटले कुचकामी ठरावेत. ते वेळीच संपवावेत. शिवाय जे गुन्हेगार खटले सुरु असतांना सामाजीक कामं करीत असतील आणि त्याची गोळाबेरीज ही जास्त असेल, गुन्ह्याच्या स्वरुपापेक्षाही, तर त्याला सोडून देण्यात यावे. खटल्याचा निकाल लावतांना ज्यानं खटला दाखल केला, त्याही व्यक्तीची रूपरेषा तपासावी. तो जर चांगल्या स्वभावाचा असेल, वा तो सामाजीक कार्यकर्ता असेल तर आरोपीला खटल्यात शिक्षा अवश्य द्यावी. तेही आरोपींचे चरीत्र पाहून. अन्यथा बिचाऱ्यांना शिक्षा देवून गुन्हेगार बनण्यास बाध्य करु नये. कारण एखाद्याला जर शिक्षा झालीच, तर तो कधीच सुधारत नाही उलट त्याच्यात बदल्याची भावना निर्माण होत असते व तो अट्टल गुन्हेगार बनत असतो. यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०