Praktan - 9 in Marathi Motivational Stories by अबोली डोंगरे. books and stories PDF | प्राक्तन - भाग 9

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्राक्तन - भाग 9

प्राक्तन -९


बरोबर पहाटेला तिला जाग आली. अखेर तिने मयुरेशचा हात अलगद बाजूला ठेवला. आणि ती निघाली. जाताना तिच्या मनात अनेक विचार येत होते. मयुरेशला सांगावं का यश बद्दल.. माझा जीव वाचवला त्याने, एवढंच नाही तर जगण्याचा अर्थही सांगितला. मयुरेश समंजस आहे मग तसंच समजून घेईल ना तो.. ती संभ्रमात पडलेली. पण आता तो झोपलाय परत सांगू असा विचार करत ती निघाली.

ती तिथे येऊन पोहोचली तर यश आधीच तिथे आलेला... डोळे मिटून शांतपणे तो बसलेला. चेहऱ्यावर समाधान वाटत होतं त्याच्या, त्यामुळे तो प्रसन्न चित्ताने बसलेला दिसत होता. ती आल्याची चाहूल त्याला लागली पण त्याने डोळे उघडले नाही. आणि त्याची तंद्री भंग पावू नये म्हणून ती हळूवारपणे पाऊलं टाकत त्याच्याशेजारी जाऊन बसली.

" झोप मोडून का आलीस, जाग आली नाही तर झोपायचं होतं ना..." तो डोळे मिटलेल्या अवस्थेतच बोलला. तेव्हा अचानक आवाज आल्याने तिने आधी घाबरून इकडे तिकडे बघितलं. जशी ढगातूनच आकाशवाणी झाली की काय असं वाटलेलं तिला... आणि तिने त्याच्या दंडावर हलकाच पंच मारला. त्याला हसू आवरत नव्हतं. ती बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत होती.

" यश मला आज सिरियस बोलायचंय तुझ्याशी आणि तू मस्करी करतोय.." ती अचानक गंभीर होत म्हणाली. तसा तो वरमला.

" ओके सॉरी. बोल तू काय झालं..? परत काही टेन्शन आलंय का?" त्याने काळजीपूर्वक विचारलं. तसं तिने अमेय आणि मयुरेश बद्दल आज घडलेला सगळा वृत्तांत त्याला सांगितला.

" ओहहह... अगं मग ही तर चांगली गोष्ट आहे. आणि तुझा मुलगा किती वर्षांचा आहे, एवढ्यातच किती समजदार झालाय तो त्याच्या बाबांप्रमाणेच... " यश कौतुकाने म्हणाला.

" तो चौदा वर्षांचा आहे. आणि हे तू खरं बोलला की खरंच तो त्याच्या बाबांवर गेलाय स्वभाव आणि हुशारीबाबत... पण यश मला कळत नाहीये मी इतक्या लवकर मयुरेशला माफ करावं की नाही. त्याने त्याचा जॉब सोडण्याची तयारी दाखवलीय आणि तो सोडेलही... पण या निर्णयामुळे काही नुकसान झालं तर मी स्वत: ला कधीच माफ करू शकणार नाही. " अनिशा गोंधळून म्हणाली.

" तुमचं लव्ह मॅरेज आहे ना? असं तू मागे म्हणालेलीस. मग त्याला तू चांगलीच ओळखत असशील. आणि भावनेच्या भरात तसंच अतिशहाणपणाने कोणताच निर्णय घेऊ नकोस. जे काही ठरवायचं असेल ते समंजसपणे आणि मॅच्यूअरली कळतंय ना. " तो म्हणाला तसं तिने होकार दिला.

" बाय द वे तुझ्या नवऱ्याचं प्रोफेशन काय? आय मीन जॉब स्पेशालिटी.. की ज्यामुळे त्यांना विदेशी क्लायंटच्या फालतू हट्ट पुरवावे लागतात.. " यशने विचारलं.

" एका आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या कंपनीत तो थर्ड पोझिशनवर आहे. ती मुळ विदेशीच कंपनी आहे पण त्याची भारतात गुंतवणूक आणि अजून काय तर ते मिळवण्यासाठी या चार पाच लोकांनी मेहनत घेतली त्यात माझा नवराही आहे. आणि मागची वीस वर्षे तो त्याच कंपनीत आहे. खरं तर पॅकेज आणि सुरूवातीचा कमी रिस्पॉन्स पाहता अनेकांनी दूसरीकडे झेप घेतली. पण त्याने संघर्षातील निष्ठेला आणि हार्ड वर्किंगला जास्त महत्त्व दिलं नेहमीच, म्हणून तो आज त्या प्लेसवर आहे. " अनिशाने माहिती दिली.

" ओह माय गॉड... वीस वर्षे एकाच कंपनीत ही काही चेष्टा नाहीये. इतका कमालीचा संयम रिअली हॅट्स ऑफ टू हिम. आणि तरी तो हे सगळं तुझ्यासाठी आणि अमेयसाठी सोडायला तयार आहे. कारण त्याला आता जाणवलं असेल पैसा खूप कमावला पण त्याइतकं कुटूंबप्रेम नाही कमावता आलं. राहिला प्रश्न त्याच्या रिलेशनचा, जर तो खरंच यासाठी मनापासून तयार असता तर आज त्याने याला कंटाळून रिजाईन करण्याचा निर्णय कधीच घेतला नसता. यावरून हेच सिद्ध होतं की तो एक जबाबदार आणि कर्तव्यदक्ष पुरूष आहे. ना की कुणी ठरकी किंवा रंगीन... आणि तुला सांगू पुरूष त्यांच्या भावना आणि सगळं त्यांच्या पुरूषार्थात लपवतात. याचा अर्थ असा नाही की त्यांना भावना आणि चारित्र्य नाही. तुम्ही स्त्रिया ना खरंच ओव्हरपझेसिव्ह असता, फक्त एकाच बाजूने विचार करता आणि तेच खरं समजून बसता. स्वत:ला तर नाहक त्रास करून घेताच पण यासोबत घरातील इतरांनाही यात ओढता.. मान्य त्याने नाईलाजाने का होईना चुक केली. आणि ती गोष्ट तुला डायव्हर्ट झाली नाही ज्यामुळे तुला भयानक त्रास झाला. पण असाही काही अक्षम्य गुन्हा नाही घडला त्याच्या हातून की तू त्याला याची आयुष्यभरासाठी शिक्षा द्यावी. वारंवार संधी मिळूनही जो वाममार्गातून सुटत नाही, त्याला खुशाल चुकीचं ठरवा. पण जो संधी मिळायच्या आतच पश्चात्तपाने त्याचं प्रायश्चित्त करून घ्यायला निघाला असतो त्याला चुकीचं ठरवून तुम्ही त्याच्यावर फक्त अन्यायच नाही तर खूप मोठा गुन्हा करत असता... लास्ट बट नॉट लीस्ट मी एवढंच सांगेन अनिशा की वीणाने जी चुक केली तीच तू करायला निघालेलीस. जर मी तेव्हा तिथे पोहोचलो नसतो तर आज त्याची अवस्था माझ्याहून भयंकर असती. तू वीणापेक्षा नक्कीच मॅच्युअर आहेस. आय होप तू चुकीचा निर्णय घेणार नाहीस. " एवढं बोलून तो थांबला. ती मात्र त्याच्या वास्तविक शब्दांनी पुरती घायाळ झालेली...

" यश मी चुकले... मी चुकले रे खरंच माझ्याच प्रेमाला ओळखण्यात मी चुकले. " असं बोलून ती एकाएकी रडायला लागली. त्याने तिला रोखलं नाही. तो फक्त तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होता. थोड्या वेळाने ती रडून शांत झाली.

" बाय द वे अनिशा तुझ्या हजबंडचं पूर्ण नाव काय म्हणालेली?" त्याने एकाएकी विचारलं.

" मयुरेश लेले..." ती उत्तरली. पण हे ऐकून तो आश्र्चर्यचकित झालेला. कारण हे नाव त्याच्या खूप जवळच्या आणि ओळखीच्यापैकी एक होतं. त्याच्या चेहऱ्यावर क्षणातच आश्र्चर्य, करूणा, आनंद आणि तितकाच किंचित दु:खद भाव प्रकटलेला... पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखायला तिचं लक्ष होतं कुठे त्याच्याकडे.. ती तर मयुरेशच्या विचारात हरवलेली.

क्रमशः

©️®️ अबोली डोंगरे