Not so much for creation? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | सृष्टीसाठी एवढंही नाही?

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

सृष्टीसाठी एवढंही नाही?

सृष्टीसाठी! एवढंही नाही?

काही लोक म्हणतात, लहानपण देगा देवा. कशाला हवं असं लहानपण. कारण त्या लहानपणात व्यक्तीला कोणतंही काम करतांना मजा वाटत असते. कोणी त्या काळात अडवत नाही आणि अडवलंच तर आपण काही त्यांचं ऐकत नाही. मग ते कोणतंही काम का असेना. त्यातच आपण पापही करायला मागंपुढं पाहात नसतो. त्यावेळेस आपण करीत असलेले कर्म आपणास पाप वाटत नसते. याउलट तसे कर्म करतांना आपल्याला मजा वाटत असते आणि ते कर्म आपण अतिशय आनंदानं करीत असतो.
लहानपणी आपण असे कोणते पापकर्म करीत असतो बरे. तसा विचार मांडल्यास कोणाच्याही मनात असा विचार नक्कीच येवू शकतो. त्याचं उत्तर देतांना सांगता येईल की बालपणात आपण कालपर्यंत मुक्या पशूपक्षांना त्रास देत होतो. पावसाळ्याच्या सुरुवातीस वातावरणात निघालेल्या चतूरांना व फुलपाखरांना यमसदनी पोहोचवत असतो आपण. तसंच नदिनाल्यातील मासोळ्या, खेकडे, झिंगे व कासवांना पकडून त्यांच्या मांसावर ताव मारत असतो आपण. तसंच विनाकारण झाडांच्या फांद्या तोडत त्यांनाही क्षय पोहोचवत असतो आपण आणि एखाद्या म्हाताऱ्या आजीआजोबांनाही वा वडीलधारी मंडळींनाही त्यांचा अपमान करुन त्रासच देत असतो आपण. विशेष म्हणजे तसे करतांना आपल्याला येणारी मजा वा आनंद पुढील काळात आपल्याला गंभीर स्वरुपाची संकटं देवून जात असतात यात शंका नाही. ज्या सानेगुरुजींनी श्यामची आई हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं. त्या सानेगुरुजींनी पुस्तकात सांगीतलं की मुक्या कळ्या तोडू नये. त्यानं पाप होतं. परंतु आज आपण मुक्या कळ्या मुलांना मनसोक्तपणे तोडतांना पाहतो. ग्रामीण भागात तर उन्हाळ्यात पायात चप्पल न घालता रानावनात फिरणारी मुलं ही झाडावरील पक्ष्यांना अगदी सहज पकडतात व त्यांना भाजून खात असतांनाचं चित्र दिसतं आणि ज्यांना हे पक्षी सापडत नाहीत. ती मुलं रानावनात झाडावर बांधलेल्या घरट्यातून पक्षांची अंडी काढून ती भाजतात नमस्कार त्यावर यथेच्छ ताव मारतात. तेव्हा मजा वाटते. ही रानावनात फिरणारी मुलं पाहिली की वाटते, त्यांनी तसं करु नये परंतु त्यांना कोण सांगणार. ती ऐकणार तेव्हा ना. असंच हे बालपणात आपल्या हातून पाप घडत जातं, जरी आपल्याला आपल्या लहानपणी कोणत्याच पापपुण्याच्या गोष्टी कळत नसल्या तरी. याबाबतीत काही लोकं म्हणतात की ती लहान मुलं. ती देवाची रुपं असतात. त्यांना काही कळत नसतं कर्म करतांना. म्हणूनच त्यांचं पाप देव माफ करुन टाकतं परंतु असं होत नाही. पाप ते पापच असतं. मग ते आपल्या अतिशय लहानपणातील काळात आपल्या हातून होत असलं तरी.
जगप्रसिद्ध शास्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी लाजाळूच्या झाडावर प्रयोग करुन एक जगप्रसिद्ध सिद्धांत मांडला. तो म्हणजे झाडांनाही जीव असतो. त्यासाठी त्यांनी लाजाळूच्या झाडाचा वापर केला व त्या झाडावर प्रयोग केला. मग झाडांना जर जीव आहे तर आपण आपल्या लहानपणात कितीतरी झाडांच्या रोपट्यांना उपडले आहे. भाजीचा खेळ खेळतांना. तेही पापच झालं असेल. होय, तेही पापच झालं आणि त्याची परियंती आपण जेव्हा मोठे झालो, तेव्हा आपली जडणघडण होण्यात झाली. सर्वांनाच महान तत्ववेत्ता होता आले नाही. सर्वांनाच सुखी जीवन प्राप्त झाले नाही. काहींच्या नशिबी नक्कीच दुःखदायी वेदनाच आल्या. त्याचं कारण तेच आहे. आपल्या लहानपणी आपल्या हातून कळत नकळत घडलेलं पाप. कुणाचा न कळल्यानं झालेला अपमान.
आपण जसे लहान असतो, तसे हळूहळू मोठे होत जातो आणि जसे मोठे होतो, तसं आपल्याला पापपुण्य कळायला लागतं. काहीजण सुधरतात आपले कर्मही सुधरवतात. शिवाय जे काही पाप आपल्या हातून आपल्या लहानपणी घडलेलं असतं. ते नकळत घडलेलं असतं. त्यावर आधारीत संकट आपल्याला मोठेपणी येतच असतात. त्यातच लहानपणी आपल्या हातून नकळत घडलेल्या पापाचंही क्षालन होत असतं. तेव्हा पापपुण्याचा लेखाजोखा विचारात घेतांना एवढीच गोष्ट याठिकाणी कळते आणि सांगावेसे वाटते की जेव्हाही आपल्याला सुध बुध येते व जेव्हा आपल्याला पापपुण्य कळायला लागतं. तेव्हा आपण आपल्या स्वतःला सुधारण्याची भुमिका घ्यावी. या सुधारण्यात काही गोष्टी नक्की पाळाव्यात. सत्य बोलणे, मग कितीही अतिप्रसंग का येईना हिंसा न करणे, ती झाडांची का असेना. कोणाचेही विनाकारण व कारण असतांनाही मन न दुखावणे, मग ते म्हातारे का असेना वा अनाथ, लाचार का असेना. कोणाच्याही कोणत्याही गोष्टी विनाकारण न हिसकावणे, मग तो आपला लहान भाऊ वा शेजारी का असेना आणि चोरी न करणे. ह्या पाच गोष्टी जो करीत असतो. तो नक्कीच पापच करीत असतो. मात्र या पाच गोष्टी आपल्या हातून घडू नये व याचे जो पालन करेल. त्याला कोणत्याही देवालयात जाण्याची गरज नाही. नाही अभंग स्नान करायची. कारण आपल्या पाठीमागं जर पाप असेल आणि आपण कितीही वेळा महामृत्यूंजय मंत्र म्हटला आणि कितीही वेळा घरात होमहवन केलं तरी आपलं पाप क्षालन होत नाही. त्या पापाची शिक्षा ही योग्य त्या कर्मानुसार मिळेलच मिळेल.
महत्वाचं सांगायचं झाल्यास या जगात असा कोणीच नाही की ज्यांच्या हातून पाप होणार नाही. पाप झाडांकडूनही घडतं. झाडं ही आपल्या सावलीनं लोकांचे पीक होवू देत नाहीत लोकांच्या घरांना तडे देतात तसं पाहिल्यास ते पाप ती झाडं लावणाऱ्यांचं असतं. परंतु माथ्यावर तर झाडाच्याच बसतं व ती झाडं त्यांचं पाप भरलं की तोडली जातात. कारण त्या झाडाच्या सावलीनं असंख्य लहान झाडं मरुन गेलेली असतात. ते पापच असतं काही झाडं तर जीवंत लहान लहान किडे चक्कं खात असतात आणि काही झाडं दुसऱ्याच झाडाच्या अंगावर वाढून त्या झाडाचं रक्त पीत असतात.
झाडं दुसऱ्यांची सेवा करतात. परंतु जीवंत असूनही कोणाला जास्त त्रास देत नाहीत. तरीही एन प्रकारेन पाप घडतंच झाडांच्याही हातून. म्हणूनच ती तोडली गेली व दुष्काळ निर्माण झाला. पशूपक्षी प्रसंगी किडे मुंग्या खावून पापच करतात. म्हणूनच त्यांची घरटीही झाडं नसल्यानं नष्ट झाली. शिवाय त्यांच्या हातून पाप घडल्यानं तेही कधी पतंगा आकाशात उडाल्यानं तर कधी उष्णतेनं, कधी थंडीत गारठल्यानं तर कधी मोबाईल मधून निघालेल्या लहरीनं नष्ट झालेत. आता मानवाचा क्रमांक आहे.
एकंदरीत सांगायचं झाल्यास या पापाच्या परिणामाचा परिणाम म्हणून झाडं नष्ट होत आहेत. पशूपक्षी नष्ट होत आहेत व आता मानवाचा क्रमांक आहे. तेव्हा हा संभाव्य धोका वेळीच लक्षात घेवून मानवानं आतातरी सुधरावं व आतातरी पाप करु नये. सृष्टीचं जतन करावं. जेणेकरुन तो तर टिकेलच टिकेल. त्याचबरोबर सृष्टीही टिकेल यात शंका नाही. महत्वपुर्ण बाब ही की मानवानं स्वतः तर टिकावंच टिकावं त्याचबरोबर सृष्टीलाही टिकवावं म्हणजे झालं. त्यासाठी वर दिलेले नियम पाळावे नव्हे तर पापकर्म करणे सोडावे. जेणेकरुन येणाऱ्या पिढीला त्याचा लाभ मिळेल. जी तुमचीच उद्याची पिढी असेल. आपल्याला उद्याची आपली पिढी सक्षम जर हवी असेल तर सृष्टीसाठी एवढं तरी करी. सृष्टीसाठी! एवढंही नाही? असं म्हणण्याची वेळ आणू नका म्हणजे झालं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०