Malika....Aayushyatlya Anubhvanchi -10 in Marathi Short Stories by Arpita books and stories PDF | मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 10

The Author
Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 10

पान 10                                           

              

                 आमच्या हॉस्टेल मध्ये रंगपंचमी खेळायला परमिशन नव्हती. तरी पण आम्ही बाथरूम मध्ये पाणी खेळायला सुरुवात केली. बादल्या भरून एकमेकांच्या अंगावर पाणी ओतायचो.

खरतर मला कसलीच रंगपंचमी खेळायला नाही आवडत. ती मी मुलींसोबत खेळलेली पहिली रंगपंचमी ,आणि ते सुद्धा फक्त पाण्याने . मला रंग - पाणी अस नाही आवडत खेळायला पहिल्यापासूनच

. आता आमची मस्ती चालू असताना सईने आमचं नाव रेक्टर मॅडम ला सांगितल. बाईंनी आम्हा सगळ्यांना ऑफिस मध्ये बोलवल. खूप ओरडल्या. नेहमी प्रमाणे सगळं ऐकून घेतलं आणि रूम मध्ये

आल्यावर सगळ्या सईसोबत भांडायला लागल्या . माहिती होत सगळ्यांना की , तिनेच नाव सांगितलं आहे . कोणीतरी पाहिलं होत तिला , बाईंना नाव सांगताना . आणि तिला विचारल्यावर ती पण

म्हणाली की , मीच सांगितलं तुमचं नाव. त्यामुळे सगळे तिच्या अंगावर ओरडत होते . तर ती म्हणाली , " मारा  मला मारा " म्हणजे ती आमचा हात घेऊन तिच्या गालात मारत होती . आणि हे तीच

नेहमीच होतं .  तिने काही केल्यावर जर तिला कोणी काय बोललं की ,  "मग मारा मला मारा" हेच बोलायची ती . रंगपंचमीच्या वेळेस पण असं म्हणल्यामुळे अभिलाषा ने तर खरंच तिला दोन

कानाखाली ठेऊन दिल्या  तिथून पुढे ती परत मला मारा असं कधीच नाही बोलली .

 

                अजून एक बाथरूम संबंधित किस्सा म्हणजे एकदा मला श्रावणीने रात्री वॉशरूम ला सोबत जाण्यासाठी उठवलं मध्यरात्री .आणि तेव्हा आम्ही वरती राहायचो आणि वॉशरूम खाली

होत. त्यामुळे मी तिच्यासोबत गेले . तेव्हा आमच बाथरूम खूप मोठं होत , एखाद्या बेडरूम सारखं . एका बाजूला ला बेसिन , पाण्याचा मोठा गिझर , त्या समोर मोकळी जागा होती . आणि एका

बाजूला वॉशरूम आणि बाथरूम हे वेगवेगळे .आणि या सगळ्याला एक मोठा दरवाजा. त्यामुळे बाथरूम मध्ये एका रूम एवढी बरीच मोठी जागा होती. मी गेले तिच्यासोबत मग वॉशरूम ला . नंतर

बाहेर आल्यावर दोघी बघतो तर काय ? त्या मोठ्या दरवाज्याच्या बाहेर ४ -५ कुत्रे मोठ्याने भुंकत होते. आम्हाला तर वरती रूम मध्ये जायचं होत .पण , जाणार कस ?आणि दोघींना पण भीती वाटत

होती. आणि त्यांना हाकललं तरी ते जात नव्हते. मग मी पटकन ते मोठं दार आतून लावलं . आणि श्रावणी ला म्हणाले ," थोड्यावेळ आपण इथेच थांबू ." मग मी आत बाथरूम जाऊन दोघींना

बसायला दोन स्टूल आणले आणि तिथेच बसलो थोडावेळ आम्ही . मला तर तिथे पण झोप लागत होती. थोड्या वेळानी पाहिलं तर , नव्हते कुत्रे तिथे . आम्ही पटकन रूम मध्ये परत झोपायला गेलो .

 

              सातवीत असताना आमची शाळेची ट्रिप शिवनेरी ला गेली होती . तेव्हा आमच्यासोबत घोलप बाई होत्या . आणि जुन्नर लाच प्रेरणा राहत असल्यामुळे तिथे तिचे पालक तिला भेटीला आले

होते . तिच्या कडे बघून आम्हाला पण आमच्या पालकांची आठवण आली होती तेव्हा . वाटलं , आपली ट्रिप आपल्या गावाला गेली असती तर , आपले पण पालक आपल्याला असेच भेटायला आले

असते .नाहीतर , ते पण आता आपल्या सोबत पाहिजे होते .

 

             असाच माझ्यासोबत घडलेला अजून एक प्रसंग असा -  माझे पप्पा एकदा असेच काही कामानिमित्त पुण्याला आले होते . आणि तसाच मला पण भेटून होईल म्हणून ते मला खाऊ घेऊन

माझ्या हॉस्टेल आले . पण , भेटण्याचा दिवस नसल्यामुळे त्यांना वॉचमन ने मला भेण्यासाठी आत मध्ये सोडलं नाही . त्यांनी खूप विनंती केली त्यांना पण , नाही सोडलं त्यांना. त्यांनी माझ्यासाठी

आणलेला खाऊ वॉचमन जवळ दिला . वॉचमन काक्कांनी हॉस्टेल ऑफिस मध्ये ती खाऊची पिशवी दिली . रेक्टर मॅडम मला ती पिशवी नेण्यासाठी बोलवलं . मी विचारलं , " बाई कधी आलंय

पार्सल " त्या म्हणाल्या ,"आत्ताच ". मी ती खाऊची पिशवी घेतली आणि ऑफिस मधून बाहेर येऊन पळत हॉस्टेल च्या गेट कडे निघाले . मला वाटलं ,आताच पार्सल आलंय तर, कदाचित पप्पा मला

गेटवर भेटतील . मी पळत आले तरं ,मला लांबून पप्पा दिसले. मला खूप आनंद झाला .मी त्यांना खूप आवाज देत होते पण , त्यांना आवाज गेला नाही . आणि मी गेट जवळ येईपर्यंत तर ते निघून

गेले होते . पण , मला लांबून दिसत होते . मी तरी पण खूप आवाज देत होते . पण त्यांनी नाही पाहिलं मागे परत .आणि मी मात्र त्यांना ते लांब गेले तरी बघत होते. त्या दिवशी मी खूप रडले .

आमच्या मध्ये असलेल्या फक्त एका गेटमुळे आम्ही भेटलो नाही त्या दिवशी. याच खूप जास्त वाईट वाटलं . किती आशेने आले असतील पप्पा मला भेटायला ? पण

, भेटायचं तरं लांबच, मी त्यांना नीट बघू सुद्धा शकले नाही . 

 

          खरंच ,आपल्या माणसांची किंमत घराबाहेर पडल्याशिवाय कळत नाही . आणि "आपली माणसं आपल्यापासून खूप लांब जातायेत. तरीही आपण त्यांना थांबवू शकत नाही ." ही भावना खूप

त्रासदायक असते . हे मला तेव्हा खूप जास्त जाणवलं.   आता पण , मी हे लिहीत असताना माझ्या डोळ्यासमोर पुन्हा तो प्रसंग उभा राहिला आणि नकळत डोळे पाणावले .  

 

   पुढचं पान  लवकरच .........