Government job important or industry? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | सरकारी नोकरी महत्वाची की उद्योग?

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

सरकारी नोकरी महत्वाची की उद्योग?

शिक्षण घेवून नोकरी मिळवून नये ; एखादा उद्योग उभारावा?

*अलिकडील काळात लोकं ओरडत आहेत. ओरडत आहेत की नीटमध्ये घोटाळा झाला. ज्यातून काही राज्याच्या मुलांना पैकीच्या पैकीच गुण मिळाले. ते सगळं सेटींग होतं आणि ज्यांनी अभ्यास केला. ते मात्र मागं पडले. त्यात लोकांनी आवाज उचलला व नीटच्या त्या परीक्षेवरच आक्षेप घेत ती परीक्षा रद्द झाली. यात जे इमानदारीनं मेहनत करुन पास झाले. त्यांची मेहनत व्यर्थ गेली. तसेच ते द्वितीय प्रयत्नात पास होतीलच, याची शाश्वती नाही. हाच शिक्षणात होत असलेला खेळखंडोबा लक्षात घेवून शिक्षण घेवून नोकरी मिळवू नये तर एखादा उद्योग उभारावा. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.*
नीट, एडीए, जेईई, एम एस सी आय टी आणि इतर तत्सम स्पर्धा परीक्षा. त्या कशासाठी? तर त्या दिल्यानं सरकारी नोकरी लागते व ज्याला सरकारी नोकरी लागली, तो राजा बनतो किंवा त्याचं संपुर्ण आयुष्य राजागत सुखात जात असतं. त्यासाठी लोकं कितीतरी महागड्या शिकवण्या लावून देत असतात. कारण अशी प्रथा आहे की तशा स्वरुपाच्या शिकवण्या लावल्याशिवाय मुलं पासच होत नाहीत वा स्पर्धा परीक्षेत उच्च स्थानावर जात नाहीत.
सरकारी नोकरी. म्हणतात की सरकारी नोकरी लागली की बस लोकांची चांदी चांदी असते. एकदा का सरकारी नोकरी लागली की व्यक्ती राजाच बनून जातो. त्याला जास्त शहाणपण येतं व तो मन मानेल तसा वागू शकतो.
लोकांचा सरकारी नोकरीवर असलेल्या लोकांबाबत असा समज. शिवाय त्या सरकारी नोकरीवर असलेल्या लोकांना अपार असं सुख असतं हा दुसरा समज. त्याला कोणीच त्रास देत नाही हा तिसरा समज. तसंच त्याला कोणतीही कामं करावी लागत नाहीत हा चवथा समज आणि सर्वात मोठा समज म्हणजे तो कुणाचा गुलाम राहात नाही तर असा समज.
सरकारी नोकरी तशी चांगलीच आहे. जर वरचा अधिकारी चांगल्या स्वभावाचा असला तर. तो अधिकारी समजून घेणारा, सुशील विचारांचा. मृदू भाषी, आपली स्वतःची अक्कल लावणारा. प्रेमानं कोणत्याही गोष्टी समजून सांगणारा त्यातच न रागावणारा असावा. तसाच कोणत्याही गोष्टीचे दडपण न बाळगणारा असावा. त्याचेमध्ये राग, द्वेष लोभ, मोह यासारखे दुर्गुण नसावे. व्यतिरीक्त कोणताच स्वार्थ नसावा त्याचे मनात. तोच व्यक्ती अधिकारपदावर शोभून शकतो. शिवाय असे दुर्गुण असल्यास त्यानं ते तत्काळ आपल्या अंगातून काढून टाकायला हवेत. परंतु आजचे अधिकारी तशा स्वभावाचे नसतात. त्यामुळं त्याच्या आधिनस्थ असलेल्या करामचाऱ्यांना अतिशय त्रास होत असतो. शिवाय गुलामागत जीवन काढावं लागतं.
सरकारी नोकरी ही नावालाच सुखी असणारी नोकरी आहे. तिची अवस्था जावे त्याच्या वंशा अशी आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीला भयंकर पीडा सहन करावी लागते. शिवाय काही बोलून त्रास व्यक्तही करता येत नाही. काही बोलून मन मोकळे करायचे झाल्यास आणि तसं केल्यास लोकं त्यांची टर उडवतात. म्हणतात की आम्हाला शिकवू नका. आम्हाला माहीत आहे सरकारी नोकरी करणारे कसे असतात ते. त्यांच्यापैकी काही ऑफिसमध्ये खुर्च्या तोडत बसलेले असतात. त्यांचा दिवस रात्रीला उगवतो. ते रात्रीच बसतात कामं करायला. दिवसभर बरेचसे हिंडत असतात. कोणीच जागेवर सापडत नाहीत. परंतु हे जरी खरं असलं तरी कोणतंही काम करतांना मन लावून काम करावं लागतं. नाहीतर आकडे चुकतात. म्हणूनच रात्रीला कामं चालतात. कारण रात्री येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी कमी असते व काम करण्यात व्यत्यय वा अडथडा येत नाही. म्हणूनच रात्रीला कामं. कधीकधी घरीही फायली आणून रात्रीचा दिवस एक करुन कामं केली जातात. कधीकधी अशी कामं केल्यानं डोकं दुखतं. हे डोकं सतत दुखत असल्यानं डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. त्यातच बरेचसे सरकारी कर्मचारी हे दुर्धर आजाराचे शिकार ठरतात. दुसरं आजाराचं कारण म्हणजे सतत काम करीत असल्यानं जे काही त्याच्यातील षडरिपू अंतर्मनातून बाहेर पडतात. त्यातूनही आजार उत्पन्न होवू शकतात. शिवाय तसेच काही आजार हे वरीष्ठ अधिकारीवर्ग त्यांना देत असलेल्या त्रासातून वा गुलामागत वागणूक देण्यातून उद्भवत असतात.
सरकारी नोकरी....... सर्व लोकं आजच्या काळात सरकारी नोकरी मिळावी म्हणून उच्च शिक्षण घेत असतात. त्यांना वाटत असते की सरकारी नोकरी लागावी. त्यासाठी ते स्पर्धा परीक्षाही देत असतात आणि त्या परीक्षेत चांगल्या गुणांकनानं पास व्हावं व मी झालो पाहिजे. यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतात नव्हे तर परीक्षा देत असतात. त्यातच ती परीक्षा झाली व ते स्पर्धक चांगल्या गुणानं पास झाले की बस. नोकरी लागत असते व नोकरी कोणती असते तर ती सरकारी.
ती सरकारी नोकरी. ती सरकारी नोकरी जर राजागत असली तर संपुर्ण आयुष्य अगदी सुखात जातं. जर त्या,त्या कर्मचाऱ्यांचा तो तो अधिकारी चांगला असला तर....... तो जर चांगला नसेल तर त्या कर्मचाऱ्यांला गुलामागत आयुष्य काढावंच लागत नाही. परंतु अशा प्रकारचे अधिकारीही नसतात आणि आजच्या काळातील सरकारी नोकरी ही राजागत सुखमयही नसते. कारण जे अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्रास देत असतात. त्या अधिकाऱ्यांनाही त्रास देणारे त्यांच्या वरचे उच्चपदस्थ मंडळी असतात. जे शिकलेले तर नसतात. परंतु केवळ पैशाच्या भरवशावर त्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत असतात. त्यामुळंच त्यांना गुलामागत कार्य करावं लागतं. ती त्रास देणारी मंडळी असतात, ज्यांना आमदार, खासदार म्हणतात. तसंच अशा आमदार खासदारांवर उद्योगपतींचा दबाव असतो. कारण तीच मंडळी असे आमदार, खासदार निवडून यावेत. म्हणून पैसा लावत असतात.
सरकारी नोकरी ही अतिशय मेहनतीनंतर मिळत असते. ती कोणालाही मिळत नाही. त्यासाठी स्पर्धा परीक्षा आणि इतर बरेच वशिले लागतात. त्यातच ती मिळाली तरी वागणूक मात्र गुलामागत. त्यापेक्षा एखादा लहानसा उद्योग करणारा बरा की जो न शिकूनही सरकारी कर्मचाऱ्याएवढेच वेतन कमवतोय. परंतु कोणाची ठसन ऐकत नाही. अशा व्यक्तीला कोणी वेडे वाकडे बोलल्यास त्यांना वेळप्रसंगी त्यांची जागाही दाखवून देत असतो. एवढी ताकद त्यांच्यात असते. तो व्यक्ती शिकलेला नसला तरी स्वतंत्र्य असतो आणि सरकारी नोकरीवर असलेला व्यक्ती उच्च शिक्षीत असला आणि गुलाम जरी नसला तरी त्याला गुलामागत वागावं लागतं. नाहीतर नोकरीवरुन हात धुवावं लागतं. यातून असं दिसतं की एखादा लहानसा उद्योग बरा. कारण त्या उद्योगात तेवढा पैसा लागत नसते. फक्त थोडासा अनुभव हवा असतो. तो अनुभव कालांतरानं मिळतोच. त्यासाठी जास्तची मेहनतही करावी लागत नाही. अर्थात स्पर्धा परीक्षा द्याव्या लागत नाहीत. शिवाय स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी खाजगी शिकवण्या लावण्यासाठी जास्तचा पैसा खर्च करावा लागत नाही. शिक्षणालाही तेवढा खर्च होत नाही.
विशेष सांगायचं झाल्यास आजच्या काळातील लोकांनी जास्त शिक्षण घेतलं नाही तरी चालेल. कारण आजच्या काळात जास्तीचं शिक्षण हे आदर्श गुलाम निर्माण करणारं शिक्षण आहे. असं जास्तीचं शिक्षण घेण्याऐवजी लोकांनी एखाद्या उद्योगाचं शिक्षण घ्यावं. एखादा लहानसा उद्योग उभारावा. तो वाढवत वाढवत न्यावा व त्याच उद्योगात देशातील तंत्रज्ञ वा उच्चशिक्षित लोकं नोकरीवर नियुक्त करावेत. तसेच त्यांनी समाजात आदर्श निर्माण करावा की शिक्षण हे नोकरी करण्यासाठी शिकू नये तर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिकावे. तसंच स्वतः आत्मनिर्भर व्हावे कारण शिक्षण हे गुलामी करण्यासाठी नाही तर ते सुधारण्यासाठी आहे. आपली अवस्था बदलविण्यासाठी आहे. विशेष महत्वपुर्ण बाब ही की शिक्षणातून माणूस बनतो. पशू नाही. यासाठीच शिक्षण घेवून उद्योग उभारणे महत्वाचे व्यतिरीक्त शिक्षण घेवून सरकारी नोकरी मिळविणे महत्वाचे नाही. ज्यातून देशाची प्रगती होवू शकेल. देश सुजलाम सुफलाम होवू शकेल व देशाला महासत्ताही बनवता येवू शकेल. हे तेवढंच खरं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०