Organization leader kind ass wrestler? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | संस्थाचालक मेहरबान तर गधे पहलवान?

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

संस्थाचालक मेहरबान तर गधे पहलवान?

संस्थाचालक मेहरबान तर गधे पहलवान?

*संस्थाचालक म्हटलं तर शाळेचा सुपरवायजरच. शाळा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा घटक. अलिकडील काळात तो अमूक माझा नातेवाईक व अमूक माझा शत्रू. तसाच देण देणारा माझ्या जवळचा व देण न देणारा माझ्या दुरचा. असा भेदभाव करीत असतो. त्यातूनच शाळेची दुर्गती होत असते. तसं पाहिल्यास त्यानं असा भेदभाव करु नये. शिवाय अलिकडील काळात संस्थाचालक सरकारी नसला तरी त्याला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. तोच शाळेचा खरा सुत्रधारही असतो. तो शाळेला सुगीचे दिवस आणायचे की शाळेची दुर्गती करायची. हे ठरवू शकतो. त्यामुळंच तोच खरा सुत्रधार असल्यानं त्याची मर्जी झाल्यास व तो मेहरबान झाल्यास तोच कुणाला पहलवान तर कुणाला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच तोच व्यक्ती शाळा स्तरावर सरकारी कर्मचारी असायला हवा. जेणेकरुन शाळेला सुगीचे दिवस येतील. तो जर सरकारी कर्मचारी असेल तर शाळा चांगल्या स्तरावर जाईल व तो जर सरकारी नसेल तर शाळा रसातळालाच जाईल. म्हणूनच शाळा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून तो सरकारी कर्मचारीच असावा यात शंका नाही.*
अलिकडील काळात शाळेला चांगले दिवस आलेले दिसत नाहीत. कारण शिक्षणाची मुल्यच शाळेत शिकवली जात नाहीत. जेही सरकार येतं. ते सरकार माझंच खरं म्हणत आपण तयार केलेला अभ्यासक्रम राबवीत असतं. मग त्या अभ्यासक्रमातून चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळो अगर न मिळो. त्याचं काही सरकारला लेनदेन नसतं.
नवीन कारकिर्द व अभ्यासक्रम. नवीन अभ्यासक्रम सरकारनं आणला. त्याचा नवा आकृतीबंध ठरवला. कौशल्यावर भर दिला या अभ्यासक्रमानं. तरीही हा अभ्यासक्रम बरोबर नाही असं काही लोकांचं म्हणणं आणि तसं म्हणणारी म्हातारी माणसं जर पाहिली तर विषम्यता वाटतेय नवीन अभ्यासक्रमाबद्दल. ती जुनी माणसं म्हणतात की आमच्या काळातील चौथीचं शिक्षण जसं होतं. त्याची सर आता दहावीचं शिक्षणही करु शकत नाही. आम्हाला जे काल चौथीत यायचं. ते आज दहावीच्याही मुलांना येत नाही. असा सारासार आरोप. त्यावरुन हा आरोप खरा आहे की खोटा? यावर प्रश्नचिन्हं निर्माण होतं.
नवीन अभ्यासक्रम व नवा आकृतीबंध ही काळाची गरज आहे. बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमही बदलायला हवा आणि तो बदललाही. त्यात काठीण्यता गेली व लवचिकता आली. हे जरी खरं असलं तरी या शिक्षणानं भीतीपणा अदृश्य केला. संस्कारही नष्ट केले. हा अभ्यासक्रम शिकून मुलं संस्कार शिकत नाहीत. जसे काल महिला वर्गाच्या डोक्यावर पदर असायचा व त्या अदबीनं वयोवृद्ध माणसांचा सन्मान करायच्या नव्हे तर वडीलधारी मंडळींची इज्जत त्यांचा धर्म असायचा. ते संस्कार लहान मुलांवरही पडायचे. शिवाय ते शिक्षकांचाही सन्मान करायचे आणि एखाद्या संकटसमयीही खचून जायचे नाहीत, तर त्या संकटांचा स्वाभीमानानं सामना करायचे नव्हे तर दोन हात. आजचं शिक्षण हा सन्मान शिकवत नाही. तसंच आजचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना संकटांचा सामना करता यावा याला अनुसरुन नाही. त्यामुळंच आजचे शिक्षण शिकलेली मुलं सर्रास आत्महत्या करतात आत्मनिर्भर न होता. सर्रास पैशासाठी व मालमत्तेसाठी एकदुसऱ्याचा जीव घेतात. आजचं शिक्षण आपल्या जन्मदात्या आईवडीलांनाही ओळखत नाही. त्यांची सेवा करण्याऐवजी त्यांना चक्कं वृद्धाश्रमात टाकते.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आजच्या शिक्षणातून नीतीमत्ता, मुल्य, संस्कार व आदर ह्या साऱ्या गोष्टी कोसो दूर पळालेल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे आजच्या काळातील शिक्षणाची असलेली सुत्रे. ही सुत्रे कोण्या संस्थाचालक नावाच्या एका खाजगी व्यक्तीच्या हाती गेलेली आहेत. जो व्यक्ती आपल्या मनानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देवू शकतो. तो वेडा असेल तर वेडेपणाचं शिक्षण आणि तो नीतीधारक असेल तर चांगलं नीतीमत्तेचं शिक्षण. त्याच्यासाठी संस्कार, आदर, मुल्य, नीतीमत्ता या गोष्टी गौण असतात. शिक्षण सरकारी आहे, परंतु ते राबवणारे हात सरकारी नसतात. शिवाय असा संस्थाचालक हा आपल्याच नात्यातील माणसाला मुख्याध्यापक बनवतो व बाकी शिक्षकांना गुलाम समजून त्यांना गुलामासारखी वागणूक देतो. अशावेळेस त्या शाळेत कितीही गुणवान शिक्षक असतील तर त्यांच्या गुणात्मक कर्तृत्वांना वाव मिळत नाही आणि नात्यातीलच विनाकर्तृत्ववान लोकांना वाव मिळते. अशानच शाळेचं मुल्य ढासळतं. शिवाय संस्कार, आदर या सर्व गोष्टी फोल ठरतांना दिसतात. तसाच पुरस्कारही द्यायचाच झाला तर तो त्या संस्थाचालकांच्या नातेवाईक वर्गालाच मिळतो. तो इतरांना मिळत नाही. त्यामुळंच कधीकधी संस्थाचालक मेहरबान तर गधा पहलवान असं म्हणण्याची वेळ येते. कारण संस्थाचालक अशा माणसांची पुरस्कारासाठी शिफारस करतो. ज्याचेमध्ये मुल्य, संस्कार, आदर वा पुरस्कार स्वरुपाच्या कोणत्याच गोष्टी अंगीभूत नसतात.
संस्थाचालक मेहरबान तर गधा पहलवान बाबत सांगायचं झाल्यास अशा शाळेतून काही विद्यार्थीही चांगले शिक्षण शिकून तयार कसे होत असतील? त्याचं कारण आहे खाजगी शिकवणी वर्ग. जरी वेतन सरकारी स्वरुपात मिळत असलं तरी अशा शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना व्यवस्थीत शिकवीत नसल्यानं ते विद्यार्थी खाजगी शिकवणी लावतात व त्या भरवशावर निकाल काढतात आणि नाव अशा संस्थाचालकांच्या शाळेतील होते. ज्या शाळेचा कारभार संस्थाचालक असलेला एक खाजगी व्यक्ती पाहात असतो.
विशेष विचार करण्यालायक बाब अशी की जरी संस्थाचालक नावाचा घटक हा खाजगी जरी असला तरी त्यानं शाळेतून पाठ्यक्रम व अभ्यासक्रम राबविताना नातेवाईक व विनानातेवाईक असा भेदभाव करु नये. त्यानं शिक्षण एके शिक्षण हे एकच सुत्र ठेवावे. हेच धोरण राबवावे. तसेच शाळा जर सरकारी स्वरुपाची आहे तर त्या शाळेतून अभ्यासक्रम राबविणारा सुत्रधार संस्थाचालक हा सरकारनंच नियुक्त केलेला असावा. त्याशिवाय शाळेतून राबविला जाणारा अभ्यासक्रम हा व्यवस्थीत राबवला जाणार नाही. कारण कधी काही कारण घडल्यास अशा खाजगी संस्थाचालकाला धारेवर धरता येत नाही. यात शंका नाही. त्यामुळंच त्या संस्थाचालकाला खाजगी ठेवल्यास तो स्वतःला मेहरबान व इतर गध्यांना पहलवान केल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढंच खरं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०