Those dumb pets in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | ते मुके घरचे प्राणी

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

ते मुके घरचे प्राणी

आपल्या घरच्या मुक्या प्राण्यांना मारु नका हो

आपण घरी वावरतांना आपल्याला आपल्या घरी नेहमीच काही प्राणी वावरतांना दिसतात. कधी पाल दिसते तर कधी मुंग्या माकोडे दिसतात कधी उंदरं दिसतात तर कधी नेहमीच आपल्या घरी येत असलेली मांजर. कधी एखाद्या वेळेस सापही दृष्टीस पडतो तर कधी झुरळं. कधी डास आपल्याला चावत असतात तर कधी कुत्री आपल्या निदर्शनास येत असतात. आपण त्यांना नेहमीच मारत असतो. कधी आपण त्यांची हिंसा करीत असतो. जे प्राणी मुके असतात व आपले सुख दुःख आपल्याला सांगू शकत नाहीत.
हे प्राणी. या प्राण्यांपैकी काही प्राण्यांचा आपल्याला त्रास होत असतो तर काही प्राण्यांचा आपल्याला फायदा. फायदा देणारे आपल्या घरचे प्राणी म्हटल्यास सर्व पाळीव प्राण्यांचे आपल्याला नावे घेता येतील. ज्यात गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांचा उल्लेख करता येईल.
साप....... साप या प्राण्यांची भल्ल्या भल्ल्यांना भीती वाटत असते. काहींना उंदरांची भीती वाटते तर काहींना झुरळ आणि मच्छरांचीही. काही रातकिड्यांना भीत असतात तर काहीजणं साध्या पालीलाही. गोम वा कनेला नावाचे प्राणी तर आपल्या भीतीचे आधारस्तंभच आहेत. त्यातच वाघ, सिंहाला आपण प्रत्यक्षात पाहिलेले
नसते तरीही एकंदर कोणी त्याचे वर्णन केल्यास आपण भीतच असतो.
कोण असतात हे प्राणी आणि आपण त्यांना का भीतो? हा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामनात असतो. त्याचं उत्तर आहे की ते आपले नातेवाईक असतात. आता नातेवाईक म्हटल्यास आतिशयोक्ती केली असं कोणीही म्हणेल. कारण जन्म पुनर्जन्मावर काही लोकांना विश्वास नाही व पुनर्जन्म म्हणजे एक अंधश्रद्धा असून ते आजच्या शिकलेल्या पाश्चात्य विचारसरणीच्या लोकांना थोतांड वाटते.
पुनर्जन्माबाबत विचार केल्यास पुनर्जन्म हा असेल का? तर याचं उत्तर असं निश्चीतच सांगता येईल. ते म्हणजे पुनर्जन्म असतो व आपल्या घरातील सर्व प्रकारचे प्राणी हे आपल्याच संबंधातील असतात. जे आपल्या आजुबाजूला वावरत असतात. ज्याच्याशी आपला संबंध आलेला असतो.
पुनर्जन्माबाबत एक बातमी काही दिवसापुर्वी वर्तमानपत्रातून वाचली होती. ती बातमी होती वर्धा जिल्ह्यातील. ज्या मुलीचा अपघातात वर्धा जिल्ह्यातील त्या छोट्याशा गावी मृत्यू झाला होता व तिनं यवतमाळ जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म घेतला होता व ती थोडीशी मोठी होताच आपण पुर्वी कुठे राहात होतो हे सांगत होती. हे वास्तविकतेचं उदाहरणच होतं की ज्यावेळेस तिला वर्धा जिल्ह्यातील त्या लहानशा खेड्यात आणण्यात आलं. तेव्हा तिनं सांगीतलेल्या सर्व गोष्टी तपासण्यात आल्या व तपासाअंती कळलं की तिचा पुनर्जन्म झालाय.
पुनर्जन्म हे थोतांड आहे की नाही हे काही निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु काही गोष्टी अशा चमत्कारीक दिसून येतात. एक अशीच गोष्ट उत्तरप्रदेशातही घडली होती पुनर्जन्माची. जी छापून आली होती वर्तमानपत्रात. ह्या बातम्या वाचल्या की चमत्कारच वाटल्याशिवाय राहात नाही. तसं पाहिल्यास पुनर्जन्माची माहिती ही महापुराणात लिहिली आहे. ज्या पुराणांना आजचा समाज हा थोतांड समजतो.
महत्वपुर्ण बाब ही की पुनर्जन्माबाबत मी भाष्य करीत नाही. परंतु जन्माबाबत भाष्य नक्कीच मला करता येईल आणि म्हणता येईल की आपल्याला मागच्या जन्मात ज्यानं त्रास दिला. त्या प्राण्यांना आपण या जन्मात त्रास देतो जशात तसे या नियमाप्रमाणेच. कारण बेडूक जर किड्याला खात असेल तर ते मरण पावल्यानंतर त्यालाही किडेच खातात हा निसर्ग नियम आहे. मग मागील जन्मात आपल्याला ज्या कोंबडीनं मानवरुपात खाल्लं असेल, त्या कोंबडीला आपण या जन्मात कापून खातो. ज्या एखाद्या माणसाला आपण मागील जन्मात त्रास दिला असेल, तो या जन्मात आपल्याच घरात प्राणी म्हणून येवून आपल्याला त्रास देत असतो हे सत्य नाकारता येत नाही. जसा मच्छर चावून रोग होणे. एखाद्या विषाणूनं आजार होणे. कुंत्रा, साप दंश होणे. शिवाय ज्या गोष्टीची या जन्मात आपल्याला सर्वात भीती वाटते. विचार करता येईल की त्याच गोष्टीनं मागील जन्मात आपला मृत्यू झाला असेल वेळोवेळी. जसा एकदा जन्म झाल्यानंतर साप दंश होवून मरणे, दुसऱ्या जन्मास मच्छर दंश होवून मरणे, तिसऱ्या जन्मात श्वान दंश. वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळ्या प्राण्यांच्या दंश. ते आपल्या मरणाचे माध्यम. म्हणूनच या जन्मात त्यांची भीती वाटणे साहजीकच आहे आणि सर्वात जास्त भीती ज्याची वाटते. त्या प्राण्यानं लगतच्याच जन्मात आपलं काम तमाम केलं होतं असं वाटणंही साहजीकच आहे. या पुनर्जन्माच्या तत्त्वानुसार विशेष म्हणजे आपल्या घरातील सर्व प्राणी जे आपल्याला दिसतात, ते जशास तसे या तत्त्वानुसार आपल्या घरातील परीसरात जन्माला आलेले असतात. ज्यांना आपल्या आपल्या मागील जन्माच्या कित्येक पिढीच्या जन्मात त्रास दिला असेल, ते प्राणी आपल्याला त्रास देण्यासाठी आणि ज्यांना आपण मागील पिढीजात जन्मात मदत केली असेल, ते आपल्याला मदत करण्यासाठी प्राणी रुपात जन्मास आलेले असतात. जे त्रास देतात आपल्याला. ते बदला घेण्यासाठी जन्मास आलेले असतात व जे त्रास देत नाहीत आपल्याला. ते मदत करण्यासाठी जन्मास आलेले असतात. त्यामुळंच कोणत्या प्राण्यानं आपल्याला त्रास दिला तर आपण त्यांना त्रास देवू नये वा त्याला मारु नये वा कोणत्याही स्वरुपाची हिंसा करु नये. ज्या हिंसेत कदाचीत मागील जन्मातील आपले नातेवाईकही असू शकतात वा आपले भाऊबंद वा आपले आईवडील. ज्या नातेवाईकानं वा भाऊबंदानं वा आपल्या आईवडीलांनी आपल्याला मदत करण्यासाठी आपल्या घरी जन्म घेतलेला असतो यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०