Kimiyagaar - 44 - Last Part in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 44 - (अंतिम भाग)

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

किमयागार - 44 - (अंतिम भाग)

किमयागार -खजिना

आता तो खजिना शोधण्याच्या अंतिम टप्प्यात आला होता. जोपर्यंत उद्देश सफल होत नाही तोपर्यंत कोणतेही कार्य पूर्ण होत नाही.
तरुणाच्या डोळ्यातून अश्रु आले. त्याच्या लक्षात आले की वाळूवर जिथे अश्रू पडले होते तिथे पवित्र किडे आले होते, हे किडे ईश्वराचा संकेत असतात असे त्याने ऐकले होते.
तरुणाने खणण्यास सुरुवात केली.
क्रिस्टल व्यापारी म्हणाला होता पिरॅमिड कोणीही बांधू शकतो पण तरुणाच्या लक्षात आले की त्याने दगडावर दगड ठेवण्यात आयुष्य घालवले तरी ते शक्य नाही.
रात्रभर खणून पण त्याला काही सापडले नाही. इतक्यात त्याला काही सैनिक तिथे आले, त्यांचे चेहरे दिसत नव्हते.
एकाने विचारले तू येथे काय करत आहेस. तरुणाने घाबरल्यामुळे काही उत्तर दिले नाही, तो खजिन्याजवळ पोहोचला होता पण आता काय होणार असे त्याला वाटू लागले. आम्ही सैनिक आहोत, आम्हाला पैसे हवे आहेत ते म्हणाले.
तू काय लपवत आहेस. तरूण म्हणाला, मी काही लपवत नाही, पण त्यातील एकाने त्याची बॅग तपासली , तो म्हणाला यात सोने आहे. चंद्र प्रकाशात अरबाच्या डोळ्यात तरुणाला मृत्यू दिसला. तो इथे सोने लपवत असेल, ते म्हणाले खोदकाम चालू ठेव.‌
पण खोदकाम करून काही सापडले नाही.
दिवस उजाडला आणि त्या लोकांनी त्याल मारण्यास सुरुवात केली. त्याचे कपडे फाटले, अंगातून रक्त येऊ लागले. तू जर मरणार असशील तर पैशाचा काय उपयोग, पैसा दरवेळी माणसाचे जीवन वाचवू शकत नाही.
किमयागाराचे शब्द त्याला आठवले.
तरूण ओरडला , मी खजिन्यासाठी खणत आहे. त्याने आपल्याला पिरॅमिड मध्ये खजिना मिळेल असे स्वप्न दोनदा पडले होते ते सांगितले. प्रमुख म्हणाला, सोडा त्याला, त्याच्याकडे कांहीं नाहीं, हे सोने त्याने कुठे तरी चोरले असेल.
तरूण वाळूवर पडला होता, प्रमुख म्हणाला, चला जाऊया पण तरुणाला तो म्हणाला,
तू मरणार नाहीस, तू जिवंत राहशील आणि तुला कळेल की माणसाने एवढे मुर्ख असू नये. दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी मला एक स्वप्न दोनदा पडले होते. मला दिसले, मी स्पेन मध्ये गेले पाहिजे, तिथे एक पडके चर्च आहे, जिथे मेंढपाळ व मेंढ्या रात्र घालवतात. तिथे उंबराचे झाड आहे, मला सांगितले गेले की त्या झाडाखाली खणले तर मला खजिना मिळेल. पण मी स्वप्नावर विश्वास ठेवून वाळवंट पार करून जाण्याईतका मुर्ख नाही. आणि तो हसला व निघून गेला.‌
तरूण थरथरत उभा राहिला, त्याने पिरॅमिड कडे बघितले त्याला वाटले की ते त्याच्याकडे बघून हसत आहेत.
तो त्यांच्याकडे बघून हसला. त्याचे हृदय आनंदाने भरून आले होते.
त्याला खजिन्याचे ठिकाण कळले होते.
तरूण पडक्या चर्चजवळ रात्री पोहोचला. उंबराचे झाड होते आणि अर्धवट नष्ट झालेल्या छपरातून तारे दिसत होते. त्याला तो दिवस आठवला जेव्हा तो मेंढ्यांना घेऊन तिथे आला होता. आणि आता तो परत आला होता पण मेंढ्याना घेऊन नाही तर कुदळ फावडे घेऊन. तो आकाशाकडे बघत होता. त्याने पिशवीतील वाईनची बाटली काढली व थोडे घुटके घेतले.
वाळवंटातील किमयागाराबरोबरची रात्र आठवली. त्याला त्याचा सर्व प्रवास आठवला आणि देवाने कशा विचित्र मार्गाने खजिना दाखवला याचा तो विचार करत होता. त्याने स्वप्नाला महत्व दिले नसते तर त्याला जिप्सी म्हातारी, राजा , चोर, असो ही यादी तर खुप मोठी आहे तरुणाचे विचार चालू होते, या मार्गाने शकून दिसले होते आणि आपले काही चुकले असे वाटत नव्हते. सूर्य वर आला तेव्हा तो उंबराच्या झाडाखाली खणू लागला. तो आकाशाकडे बघत म्हणाला, तू मोठा जादुगार आहेस, तू मठात सोने ठेवले होतेस ते याचसाठी की मी या चर्चकडे परत येऊ शकेन.
तो मठातील माणूस तेव्हा माझ्या कडे बघून हसला होता. या सगळ्या पासून तू मला वाचवू शकला नसतास कां?. त्याला वाऱ्यामधून ऐकू आले, नाही, कारण मग तुला ते सुंदर पिरॅमिड कसे दिसले असते?
तरूण खणत होता. अर्ध्या तासाने काही कठीण लागले आणि थोड्या वेळाने एक पेटी मिळाली.
त्यात स्पॅनिश सोन्याची नाणी, मुल्यवान वस्तू, पिसे लावलेला सोन्याचा मुखवटा, रत्नजडित दगडी मूर्ती होत्या. रणधुमाळीत कोणीतरी हे सर्व लपवले असणार.
त्याने उरीम व थुम्मीम पिशवीतून काढून पेटीत ठेवले. त्याने त्यांचा वापर मार्केट मध्ये केला होता. ते पण खजिन्याचा भाग होते आणि परत कधीही तो ज्याला भेटू शकणार नव्हता त्या राजाची आठवण होते.
तरूण विचार करत होता, माणूस नियतीच्या शोधात बाहेर पडतो, त्याला मदत मिळतेच. त्याला आठवले की त्याला तरिफाला जायचे होते कारण जिप्सीला दहावा हिस्सा द्यायचा होता. जिप्सी खरेच खुप हुशार असतात.
वारा परत वाहू लागला होता. तो लवेंटर म्हणजे आफ्रिकेकडून आलेला वारा होता. तो त्याच्या बरोबर वाळूचा वास घेऊन आला नव्हता, किंवा मूर लोकांच्या आक्रमणाची सूचना.
तो घेऊन आला होता ओळखीचा असलेला सुगंध जो हळूवारपणे त्याच्या ओठाला स्पर्श करत होता. तीने पहिल्यांदाच हे केले होते.
तरूण म्हणाला, फातिमा! मी येतोय.
शुभम भवतु.
समाप्त.
या कादंबरीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. शेवटचे काही भाग महत्वाचे आहेत.अधिक वाचक मिळोत ही प्रार्थना.तसेच इथून पुढे माझ्या लेखन प्रयत्नाना प्रतिसाद द्यावा ही विनंती.