Kimiyagaar - 33 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 33

Featured Books
  • આંખની વાતો

      પુષ્ટિ  બગીચામાં ફરતી હતી અને પોતાના ભૂતકાળની વાતો યાદ કરત...

  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

Categories
Share

किमयागार - 33

किमयागार
तरुण म्हणाला, मला आत्ता तरी खजिना सापडला आहे असेच वाटते.
माझ्याकडे उंट आहेत, माझ्याकडे क्रिस्टल दुकानात मिळवलेले पैसे आहेत आणि पन्नास सोन्याची नाणी आहेत. माझ्या देशात तर मी श्रीमंत माणूस समजला जाईन.‌ किमयागार म्हणाला पण यातले काही पिरॅमिड मुळे मिळालेले नाही.
तरुण म्हणाला, मला फातिमा मिळाली आहे ती पण एखाद्या खजिन्यासारखीच आहे.
ते आता शांतपणे जेवण करत होते. किमयागाराने एक बाटली उघडली व त्यातील लाल पेय तरुणाच्या ग्लास मध्ये ओतले. तरुणाने आतापर्यंत चाखलेल्या वाईनमधील ही सर्वात छान वाईन होती.
तरुण म्हणाला,
इथे वाईनला बंदी आहे ना ?.
किमयागार म्हणाला, " माणसाच्या तोंडातून आत जाते ते वाईट नसते, तर माणसाच्या तोंडातून जे निघते ते वाईट असते ".
किमयागाराचे वागणे घाबरवणारे असले तरी, वाइन घेतल्यानंतर तरुण थोडा सावरला होता.
जेवण झाल्यावर ते दोघे बाहेर आले.
शितल चांदणे पडले होते. किमयागार म्हणाला, तुला अजून वाईन घ्यायची असेल तर घे. मजा कर. किमयागाराच्या लक्षात आले होते की तरुण थोडा सावरला आहे.
तू युद्धाच्या तयारीत असलेल्या वीराप्रमाणे आज रात्री विश्रांती घे. तुझे हृदय सांगेल तेथे तुला खजिना सापडेल.
किमयागार-जाणिव स्वप्नाची
तू खजिन्याच्या शोधात बाहेर पडणे गरजेचे आहे. त्यामुळेच तू आतापर्यंत जे शिकलास व केलेस त्याला अर्थ प्राप्त होईल. तू उद्या उंट विकून घोडा घे. उंट विश्वासघातकी असतात.
ते हजारो पावले अशी चालतात की जणू थकतचं नाहीत पण अचानक ते खाली बसतात व मरतात. पण घोडे थोड्या वेळाने थकतात व मरणार असतील तर आधी कळते.
त्यानंतरच्या रात्री तरुण किमयागाराच्या तंबू समोर आला. किमयागार तयारच होता.
तो स्वतःच्या उमद्या घोड्यावर स्वार झाला आणि शिक्षित बहिरी ससाण्याला खांद्यावर घेतले.
तो तरुणाला म्हणाला वाळवंटात जीवन कुठे आहे ते मला दाखव.
वाळवंटातील जीवन म्हणजेच जिवंत प्राणी इ. कुठे आहेत ते ज्याला कळेल त्यालाच खजीन्याचा मार्ग सापडेल.
ते दोघे चंद्रप्रकाशात प्रवास करीत होते. ते तरुणाला जेथे आकाशातील बहिरी ससाणे दिसले होते त्याठिकाणी पोहोचले होते पण आता तेथे फक्त वारा आणि शांतता होती.
तरुण म्हणाला, वाळवंटात जीवन कसे शोधायचे हे मला माहीत नाही तसेच त्यासाठी कुठे पहावे हेही माहीत नाही.
किमयागार म्हणाला, जीवन जीवनाला आकर्षित करीत असते.
तरुणाला काय ते समजले.
दगड आणि वाळूवरुन धावणाऱ्या घोड्याचा लगाम त्याने सैल केला. अर्धा तास प्रवास झाला. आता कोठे ही खजुराची झाडे दिसत नव्हती. आकाशात चंद्र होता. आणि वाळू व दगडावर रुपेरी प्रकाशाचे अस्तित्व दिसत होते. अचानक तरुणाचा घोडा हळू चालू लागला. तरुण किमयागाराला म्हणाला, इथे जिवन आहे. मला जरी वाळवंटाची भाषा कळत नसली तरी घोड्याला कळते. किमयागार काही बोलला नाही.
दोघे खाली उतरले आणि किमयागार दगडामध्ये शोधू लागला किमयागार अचानक जमीनीवर वाकला , दगडांच्या मध्ये एक भोक होते. किमयागाराने त्यात हात घातला, खांद्यापर्यंत हात आत गेला आणि इतक्या वेगाने बाहेर आला की तरुण दचकला.
त्याच्या हातात एक साप होता. तरुण किमयागारापासून थोडा दूर खाली बसला. साप फुत्कार टाकत होता आणि वाळवंटाची शांतता भंग पावत होती. तो कोब्रा होता. त्याचे विष काही क्षणात माणसाला मारू शकते. तरुणाला वाटत होते की, जेव्हा किमयागाराने हात घातला होता तेंव्हा तो त्याला चावला असावा पण किमयागार शांत होता.
इंग्रजाने सांगितले होते, किमयागार दोनशे वर्षाचा आहे. त्यामुळे तो हे करु शकतो. किमयागार घोड्याकडे गेला व एक कट्यार घेऊन आला आणि पात्याने एक वर्तुळ तयार केले व त्यात सापाला ठेवले. साप लगेच शांत झाला. किमयागार म्हणाला, घाबरू नकोस तो वर्तुळातून बाहेर येणार नाही. पण तू वाळवंटातील जीवन शोधलेस हा चांगला शकुन मिळाला.
तरुण म्हणाला हे इतके महत्वाचे आहे का?. किमयागार म्हणाला पिरॅमिड भोवती वाळवंट आहे.
तरुण पिरॅमिड बद्दल बोलू इच्छित नव्हता. त्याचे अंतःकरण जड झाले होते. त्याला कालपासून एक वेगळेच दुःख झाले होते. त्याला वाटत होते की, खजिन्याचा घेणे म्हणजे फातिमाला गमावण्यासारखे आहे.
किमयागार म्हणाला, मी तुला वाळवंटात मार्गदर्शन करणार आहे. तरुण म्हणाला, मला ओॲसिसवर राहायचे होते, माझ्या दृष्टीने फातिमा खजिन्यापेक्षा महत्वाची आहे.
फातिमा वाळवंटातील स्री आहे, किमयागार म्हणाला, तीला माहित आहे की, पुरुषांना परत येण्यासाठी बाहेर जावेंच लागते. तिची अपेक्षा असणार की तुला जे पाहिजे आहे ते तू शोधावेस.
आणि मी थांबायचे ठरवले तर?. तरुणाने विचारले.