व्यापारी बना?
व्यापारी बना असं म्हटल्यास लोकं म्हणतील की महोदय, आपण व्यापारी आहात का? व्यापार कराल तेव्हा समजेल. त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. कारण व्यापार करणं काही सोपं काम नाही. व्यापार करणं कठीण काम आहे. त्यामुळं असा संदेश देतांना आतिशयोक्ती वाटते.
व्यापारी बना असा संदेश देतांना आतिशयोक्ती वाटू नये. कारण व्यापारानं माणसाचा खरा विकास होतो. माणसाची भरभराट होते. तो जीवनात पुढे जात असतो. जर व्यापार चालला तर........
कोणताही व्यापार हा सर्वांना लाभदायक असतो असे नाही. काही व्यापारात माणसं बुडतात. मग जवळ असणारी सर्व मालमत्ता विकून टाकावी लागते. बरं व्यापार हा चारही दिवस चालत नाही. कधी चालतो तर कधी नाही. कधी जास्त नुकसानदायक ठरतो व्यापार तर कधी कमी नुकसानदायक. फायद्याचा विचार केल्यास कधी जास्त फायदा करतो माणसाचा तर कधी कमी. तसेच व्यापार हा सदोदीत चालेलच असा नाही. म्हणून व्याटार करायला कोणीही धजत नाही. त्यामुळं त्याबाबत कोणीही म्हणतात की छोटीशी का असेना, नोकरी हवी.
नोकरी.......ज्याप्रमाणे व्यापारात जबाबदारी असते. तशीच जबाबदारी नोकरीतही असते. परंतू आपण नोकरीतील जबाबदारी लक्षात घेतो. परंतू व्यापारातील जबाबदारी लक्षात घेत नाही. म्हणूनच नेमके आपण व्यापारात बुडतो.
व्यापार करतांना जर नोकरीसारखं व्यापाराला सांभाळलं तर व्यापारातही माणसं यशस्वी होवू शकतात. जसे. नोकरीला जातांना वेळेवर जावे लागते. वेळ झाल्यानंतरच परत घरी जावं लागते. काम करावंच लागते. ते नाही केल्यास पैसे मिळत नाहीत. तसंच जास्तीच्या सुट्ट्या मारता येत नाहीत. वैगेरे बरेच नियम असतात नोकरीमध्ये. तसे नियम व्यापाराचेही असतात. परंतू व्यापाराचे नियम आपण पाळत नाही. म्हणून व्यापारात आपलं नुकसान होत असतं.
व्यापाराचेही काही नियम आहेत. जसं आपण नोकरीत वेळेवर जातो. तसा व्यापार ज्या ठिकाणी असतो. तिथं वेळेवर जायला हवं. नोकरी ज्यावेळी सुटते. तसा व्यापारही बंद करण्याची वेळ असावी. तसंच ज्याप्रमाणे नोकरीला आपण दररोज जातो. थोड्याशाही जास्तच्या रजा घेत नाही. तशा व्यापारातही रजा घेवू नये. सततच्या रजेनं व्यापार बुडतो. हे आपल्याला माहीत आहे. तरीही आपण व्यापार करतांना त्यात आपल्या घरचाच धंदा असल्यागत आपण व्यापार करीत असतो. मग व्यापारात नुकसान होणार नाही तर काय आणि त्यानंतर आपला व्यापार बुडला की आपण आपल्या प्रारब्धाला दोषी ठरवत व्यापारात नुकसान होतं असं सर्रासपणे सांगत सुटतो व व्यापाराला बदनाम करतो.
मुळात व्यापाराची दिशा बदनामीकारक नाही. आपल्याला माहीत नाही की ज्यांनी ज्यांनी इमानीइतबारे व्यापार केला, तो तो घटक विकसीत झालेला आहे. आता इंग्लंडचंच उदाहरण घेवू. इंग्लंडमध्ये औद्योगीक क्रांती झाली हे आपल्याला माहीत आहे. या औद्योगीक क्रांतीतून व्यापार भरभराटीस आला व आलेला पैसा त्यांना गुंतवता यावा म्हणून त्यांनी बाजारपेठा शोधल्या. त्या बाजारपेठेतमध्ये भारताचाही समावेश आहे. आज याच व्यापारीक दृष्टीकोणातून भारतात आलेल्या इंग्रजांनी भारताला गुलाम करुन या भारतात राज्य केले. ही गुलामी केवळ आणि केवळ व्यापारात इंग्रजांनी केलेल्या प्रगतीतून लादलेली होती. प्रगत असलेल्या भारताला गुलाम करण्यासाठी व्यापार हेच प्रगत माध्यम होतं. आजही आपण पाहतो की जो कोणी व्यापार करतो तो सुखी आणि समृद्ध जीवन जगत असतो. जो व्यापार करतो, तो मालक बनतो व तो इतरांनाही रोजगार देतो व आपल्या व्यापारात ज्याला रोजगार देतो, त्याला गुलामागत वागवत असतो. हे व्यापाराचे गणित आहे आणि त्यात सत्यताही आहे. त्यातच व्यापाराचे सुत्र असे की नियमीत व्यापार करणे. ते सुत्र असा व्यापार करणारा वायक्ती पाळतो. तोच इमानदार व्यापारी असतो. तो कधीच व्यापार बंद ठेवत नाही. तो व्यापार नियमीत चालवतो व नोकरदारांना जास्तीच्या सुट्ट्या देत नाही. याबाबत मी एक अनुभव सांगतो.
एक व्यक्ती नोकरीवर होता. तो दुस-याच्या कारखान्यात काम करीत होता. त्याचे महिण्याचे सुरुवातीचे दिवस चांगले जायचे. परंतू जेव्हा महिना भरायचा, तेव्हा शेवटच्या काळात त्याला पैशाची समस्या यायची व तो घरखर्च भागविण्यासाठी आजुबाजूतून उसनवारी पैसे घ्यायचा. शेवटी त्यानं त्यावर विचार केला आणि निर्णय घेतला की आपण कोणतातरी व्यापार टाकावा. असे विचार करुन तूयानं व्यापार टाकला.
आज त्यानं व्यापार टाकला होता. तो नियमीत चालवत होता. आता त्याला कोणत्याही महिन्याला अडचण जात नव्हती. कोणत्याही स्वरुपाची समस्या येत नव्हती. कारण त्याचा व्यापार चांगला चालत होता. त्यातच एक दिवस त्यानं नोकरीही सोडली होती.
महत्वाचं सांगायचं म्हणजे व्यापारानं माणसाची भरभराट होते. जर तो इमानदारीनं चालवला तर..... माणसानं व्यापारी बनावं. व्यापार इमानदारीनं करावा. त्याचे जे नियम असतात, त्या नियमानं चालावं. सुसूत्रता पाळावी. जेणेकरुन व्यापार कधीच बुडणार नाही व तुम्हीही आत्मनिर्भर व्हाल नव्हे तर आपल्याबरोबर इतरांचेही पोट भरु शकाल हे निर्वीवाद सत्य आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०