तारीख पे तारीख
खटले हे वास्तविकतेवर आधारलेले असतात. पण काही काही खटले हे वास्तविकता सोडूनही असतात. या खटल्यात खटला दाखल करणारे पक्ष हे खरे असतात असे नाही. ती मंडळी निव्वळ द्वेषभावनेतून भांडण करतात व खटले दाखल करतात. हे खटले अगदी वैताग आणतात. कारण न्यायालयाची वेळखावू पद्धत. न्याय देणा-या न्यायाधीशांजवळ पुरेसा एवढाही वेळ नसतो की ते खटले ऐकून घेवू शकतील. मग तारीख वर तारीख करीत ते खटले वर्षोगणती सुरु असतात. या खटल्यामध्ये काही तथ्यही नसतं. पक्षकार मरुनही जातात. त्यांचा परीवारही खटले चालवायला तयार नसतो. त्यांचा वकीलही तारखेवर उभा होत नाही. तरीही खटले सुरुच असतात. ज्यात आरोपींचा गुन्हाही नसतो. तरीही जे खटले सुरु असतात. त्यात आरोपींना अतिशय त्रास होत असतो.
अशीच एक गोष्ट. या गोष्टीमध्ये एक शाळा होती. त्या शाळेतील मुख्याध्यापक अधिरथ हा शिक्षकांवर वारंवार अत्याचार करीत होता. मुख्याध्यापक अहंकारी होता. त्या मुख्याध्यापकाला अगदी वाटत होते की आपल्याला अतिरिक्त पैसा मिळायला हवा. त्यासाठी तो विचार करीत होता त्या बाबतीत. परंतू त्याला मार्ग सुचत नव्हता. शेवटी एक मार्ग सापडला. तो म्हणजे शिक्षकांना लुटणे. पण शिक्षक काही बुद्धू नव्हते. ते अत्यंत हुशार होते. त्याने त्यांना तसे पैसे मागूनही पाहिले.. परंतू तो त्यात यशस्वी ठरला नाही. तो शेवटी हरला. पण त्यानं काही हार मानली नाही.
अधिरथला असे शिक्षकांकडून पैसे मिळाले नसल्याने त्याचा पारा चढला. तो विचार करु लागला की काय करावे. शेवटी सतत विचार करता करता त्याला मार्ग सापडला. आपण शिक्षकांना घाबरंवायचं.
अधिरथनं विचार केला की आपण शिक्षकांना घाबरवायचं. मग काय तो शिक्षकांना वेगवेगळे प्रयोग करुन घाबरवू लागला. कोणाची वार्षीक वेतनवाढ न लावणे. कोणाला वरीष्ठ श्रेणी न लावणे, कोणाला वेतन स्लीप न देणे वा कोणाचे कर्ज पास न करणे इत्यादी गोष्टी ते करु लागले. त्यातच काही काही शिक्षक घाबरले व ते त्याला पैसे देवू लागले.
अधिरथ ज्या शाळेचा मुख्याध्यापक होता. त्याच शाळेत अाणखी काही शिक्षकही होते. ते काही त्या अधिरथच्या कोणत्याच गोष्टीला घाबरत नव्हते. त्यातील काही लोकं हे चांगल्या विचारांचे होते. त्यांना वाटत होते की मुख्याध्यापकाला पैसे देणे म्हणजे चांगली कृती नाही. ती वाईट कृती आहे. शेवटी ती मंडळी त्याला देण म्हणून पैसा देत नव्हती. त्यातच अधिरथला वाटलं की मी या शिक्षकांना असेच सोडून दिले तर उद्या बाकीचे शिक्षक हे मला देण म्हणून पैसे देणार नाही. तेही शिरजोरच बनतील. शेवटी त्याने त्या शिक्षकांना धमकावू लागला. काही शिक्षकांचे वेतन बंद करु लागला. अशातच एक दिवस एका शिक्षकासोबत बाचाबाचीही झाली..,मग काय ती तक्रार पोलिस स्टेशनला गेली.
शिक्षक आणि मुख्याध्यापकाची तक्रार. पोलिसांनी दोघांना समजावून पाहिले. दोघंही ऐकायला तयार नव्हते. त्यातच ज्या शिक्षकासोबत बाचाबाची झाली होती. त्याला चांगलं लागलंही होतं. शेवटी कोणीही मागं पाऊल न घेतल्यानं पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली.
पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. चार्जशीट बनवली व मुख्याध्यापकाच्या विरुद्ध खटला न्यायालयातही गेला. परंतू यामध्ये अधिरथ हा अहंकारी असल्यानं माझं कोण का बिघडवते म्हणत त्यानं त्या शिक्षकाचं वेतन बंद केलं.
त्या शिक्षकाचं नाव नरेंद्र होतं. काही दिवस बरे गेले. पण काही दिवसानंतर नरेंद्रला फरक पडू लागला. नरेंद्रचं वेतन बंद होताच त्याची उपासमार होवू लागली. कार्यालयही त्यावर काहीच तोडगा काढू पाहात नव्हतं. कार्यालयालाही देण म्हणून पैसे देत असल्यानं कार्यालय नरेंद्रच्या वेतनाबाबत चूप बसलं. शेवटी काय तर नरेंद्रला आपली मारहानीचा खटला लढता आला नाही. कारण त्याला महत्वाचा प्रश्न होता पोटाचा प्रश्न सोडविणे. तो पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी लढत होता. तसेच दोन दोन ठिकाणी त्याला पैसे लावणे शक्य नव्हते.
दोन खटले. त्यातच मारहानीप्रकरणातील काही साक्षीदार. ते साक्षीदार शाळेतीलच होते. काहींनी तर साक्षी दिल्याच नाही. त्यातच त्या साक्षीदारावर दबाव टाकून मुख्याध्यापकानं त्यातील ब-याच लोकांना आपल्याकडे वळवले. शेवटी एकच साक्षीदार उरला. त्यानं मात्र साक्ष दिली.
एका शिक्षकाची ती साक्ष. त्यावर खटला टिकू शकला नाही. शेवटी नरेंद्रला तो खटला हारावा लागला.
खटल्यात पराभव झाला. परंतू त्यात नरेंद्रला वाईट वाटलं नाही. कारण त्याने दुसरा खटला जिंकला होता. तो म्हणजे पोटाचा. पोटाचा प्रश्न त्याने सोडवला होता.
खटले निपटले. तसा नरेंद्रला आनंद झाला. तसे सहा महिने पुरते निघून गेले.
एक दिवस पोष्टमेननं नरेंद्र व त्या खटल्यातील साक्षीदार चारुदत्तला एक पत्र दिलं. त्यात लिहिलं होतं की त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आलेला असून मुख्याध्यापकानं तो खटला दाखल केलेला आहे. त्या खटल्यानुसार त्या दोघांनीही संगनमत करुन खोटी तक्रार दाखल केलेली होती. त्यामुळे मागील खटल्यातील दोष त्याचेवर नसून त्यामध्ये दोष चारुदत्त व नरेंद्रचाच आहे.
मुख्याध्यापकानं दाखल केलेला खटला. आरोप पाच जण होते. त्यात दोन पोलिसवालेही होते. त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी चुकीच्या पद्धतीनं चौकशी न करता गुन्ह्याची नोंद केली.
मुख्याध्यापकानं तो खटला दाखल केला. त्यात त्यांचा फायदाच होता. तो शाळेतील शिक्षकांना म्हणत असे.मला खटल्याला पैसे लागतात. पैसे द्या. शाळेतील शिक्षकांचाच खटला लढतो आहे. नाही देत असाल तर वेतन बंद करतो नव्हे तर ही धमकीही तो खरी करुन दाखवत असे. ज्याने विरोध केला. त्याचे वेतन कार्यालयाशी संगनमत करुन दोन दोन वर्षापेक्षा जास्त अवधीसाठी अर्थात अनिश्चीत कालावधीसाठी बंद करीत असे. त्यामुळे त्याच धाकानं बाकीची शिक्षकमंडळी त्याला पैसे देत होती.
आज खटला सुरु होता. पण वर कोणतातरी विधाताही अधिरथच्या कृत्यावर नजर ठेवून होता. तोच दिवस उजळला व अधिरथ कोरोनाच्या मृत्यूसत्रात अधिरथ जगाचा निरोप घेत चालता झाला. त्यामुळं सर्वजण म्हणत होते की खटला संपला. परंतू खटला संपला नव्हता.
ही वेडीवाकडी केस.......खरं तर यात चारुदत्त व नरेंद्राचा कोणताच गुन्हा नव्हता. गुन्हा होता अधिरथचाच. त्यानं पैसे कमविण्यासाठी चारुदत्त व नरेंद्रावर खटला दाखल केला होता. हे न्यायाधीश महोदयांनाही कळत होतं. तरीही न्यायाधीश महोदय खटला संपवायला तयार नव्हते नव्हे तर तारीख वर तारीख करुन अजूनही तारखा सुरुच होत्या. खटल्याचा पक्षकार स्वतः मरण पावला तरी. जणू असं वाटत होतं की कदाचित या खटल्यात जणू दुसरा वारस उभा होण्याची न्यायाधीश नाच तर पाहात नसावेत.
आज अधिरथ मरण पावला होता. नियतीनं त्या दोघांनाही अधिरथच्या त्रासातून मुक्त केले होते. परंतू अजूनही त्यांचा त्रास सुरुच होता. तो म्हणजे तारीख वर तारीख. ती तारीख संपण्याची चिन्हं दिसत नव्हती. असं वाटत होतं की आपणही अधिरथसारखं एक दिवस संपून जावू. पण न्यायालयाची तारीख वर तारीख कधीच संपणार नाही की काय की या खटल्याचे दुरगामी परीणाम न्यायालयाच्या तारीखवर तारीख नुसार त्यांच्या वारसांनाही भोगावे लागतील की काय? जणू ह्या खटल्यात काही तथ्य नसलं तरी चारुदत्त आणि नरेंद्रला त्या तारीखवर तारखेच्या वेदना सहन कराव्या लागत होत्या. प्रचंड मनातील दुःख सहन करुन.........
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०