Let your wife and husband love you unconditionally in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | पत्नी व पतीवर निरतिशय प्रेम करावं

Featured Books
Categories
Share

पत्नी व पतीवर निरतिशय प्रेम करावं

पतीनं पत्नीवर व पत्नीनं पतीवरही निरतिशय प्रेम करावं!

*पतीनं पत्नीवर व पत्नीनं पतीवरही प्रेम निरतिशय करावं. कारण पत्नी पतीसाठी आयुष्यभर झटत असते. ती त्याच्या अखंड आयुष्यासाठी सर्वच व्रतवैकल्ये करते. मग त्यात वटपौर्णीमा असो, की हरतालिका व्रत असो, करवाचोथ व्रत असो की इतर बरेच काही असो, स्री ही पुरुषांसाठी झटत असते. त्याला जेव्हा ती पती मानते. तेव्हा त्या पतीला ती सर्वस्व मानते. त्यातच ती हे व्रत करीत त्याच्या अखंड आयुष्यासाठी विधात्याजवळ प्रार्थना करीत असते.*
प्रेम...... आयुष्यात बहुतःश मुलं मुली प्रेम करतात. विवाहापुर्वी संबंध ठेवतात. एक स्री....... ती जेव्हा वयात येते, तेव्हा ती कोणावर तरी प्रेम करायला लागते. ती त्या पुरुषावर निरतिशय प्रेम करते. परंतू ज्यावेळी तिचा विवाह ठरतो. तेव्हा ती ते प्रेम वैगेरे सारं सोडते व आपला पती म्हणून मायबापानं सांगीतलेल्या मुलाचा स्विकार करते. त्यातच त्या भेटी, आठवणी, फिरणे, या सर्वच गोष्टीचा त्याग करते आणि पती जे म्हणेल त्यानुसार वागते. हे तेव्हापर्यंत घडते, जेव्हापर्यंत तो पती तिचं ऐकतो. परंतू जर तो पती तिचं ऐकत नसेल तर....... तर तिच्या मनात त्याच्याबद्दल असु़या निर्माण होते. याची परीयंती सतत भांडणं, घटस्फोट, विवाहबाह्य संबंध यामध्ये होते.
पतीवर निरतिशय विश्वास करणा-या स्रिया. ......हा आपला भारत देश. या देशात आपली वेगळी अशी पुरातन संस्कृती आहे. ही संस्कृती पतीला देव मानणारी आहे. कारण तो पती जो बाहेर कामाला जातो आणि घरी आपल्याला पोसतो ही त्याची ओळख. ही ओळख आजपर्यंत होती. कारण स्रीयांना आतापर्यंत कळत नव्हतं की त्या काहीच कळत नाही. फक्त पतीवर अवलंबून असतात. तसा दबावही होता वडीलधारी माणसांचा. त्याचं कारण होतं की एखाद्याची स्नुषा जर बरोबर वागली नाही. तर तिच्या माहेरची मंडळी तिच्याशी नातेच तोडत असत. कारण त्यांना भीती असायची की त्यांच्या गावचे लोकं त्यांच्या या मुलीच्या वागण्यामुळं त्यांना वाळीत तर टाकणार नाही. कारण असंच घडत होतं. परंतू कालांतरानं तिला समजलं की आपल्याला आतापर्यंत मुर्ख बनवलं गेलं. आपण तर घरी आपल्या बाहेर कामाला जाणा-या पतीपेक्षाही जास्त कामे करतो.
आजही एक स्री कामाला तर जाते आपल्या पतीएवढेच काम ती करते आणि घरी आल्यावर स्वयंपाकही. परंतू पती घरी आल्यावर काहीच करीत नाही.
एक स्री...... एकदा का तिचा विवाह झाला की ती पती एके पती करीत त्याचेसाठी आयुष्यभर झटते नव्हे तर त्याला आपला समजते. परंतू बदल्यात पती काय करतो. तिला चटके देतो. दररोज दारु पिवून येतो. तिला मारझोड करतो. पत्नी आपला आधारस्तंभ असते. ती आपल्याला आधार देते नव्हे तर चांगली पत्नी मिळाली की आपल्याच घराचा उद्धार होते. अशावेळी ती जर आपला उद्धार करु शकते तर आपण तिच्यासाठी झटलं पाहिजे की नाही. तिच्यावर प्रेम केलं पाहिजे की नाही. तिनं जर म्हटलं की दारु पिवू नका. तर आपण तिच्यासाठी ती प्यायला नको की नाही. परंतू आपण ते मुळातच करीत नाही.
महत्वपूर्ण गोष्ट ही की एक पती म्हणून आपण तिच्यावर निरतिशय प्रेम करावं आणि तिनंही आपल्यावर आपला समजून निरतिशय प्रेम करावं. परंतू आज असं घडतच नाही. आज काही काही पती आपल्या पत्नीवर जसं प्रेम करीत नाहीत. तशा अपवाद म्हणून काही स्रियाही आहेत. त्याही आपल्या पतीवर प्रेम करीत नाहीत. त्या विवाह करतात केवळ नावापुरता. अंगाला हळद लागावी म्हणून. एकदा का अंगाला हळद लागली रे लागली की त्या पतीच्या घरी येतात. परंतू त्यांना पतीत्वाचा दर्जाच देत नाही. तो पती फक्त नावापुरता राहतो. त्यांचे पती दुसरेच असतात.
महत्वाचं म्हणजे आपला हा भारत देश संस्कारक्षम असतांना आपले असे वागणे बरोबर नाही. आपण असे वागू नये. आपण कधीही विवाह बाह्य संबंध ठेवू नये.
आपण विवाह केला ना. मग तो पती कसाही राहो, त्याला सुधारायचा विचार करावा. माहितीसाठी सांगतो. पती पत्नीच्या इशा-यावर चालतो. जर असं करायचं नसेल तर स्रियांनी विवाह करु नये. पतीनही पत्नीच्या आदेशात वागावं. असे विवाहबाह्य संबंध ठेवू नये. त्यानं तिच्यावर प्रेम करावं. तिनंही त्याचेवर. यालाच संसार म्हणतात. विशेष म्हणजे संसार म्हणजे बैलगाडीची दोन चाकं. एक डगमगला की गाडी चालत नाही. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तसेच त्यानुसार वागायला पाहिजे म्हणजे झालं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०