संयोगीता
हिंदूस्थान असा देश की ज्या देशात लोभाला अधिक महत्व दिलं गेलं. हे पुरातन काळापासून अस्तीत्वात आहे. आजपर्यंत जे काही युग झाले असे हिंदूंचे ग्रंथ मांडतात. त्या ग्रंथानुसार अगदी कृतयुगापासून जर पाहिलं तर लोभानं कोणाला सोडलेलं नाही. ज्यावेळी समुद्रमंथन झालं. त्यावेळी जी वस्तूंची वाटणी झाली. त्या वाटणीतही लोभच दिसून येतो. इंद्र हा देवांचा राजा असून त्याला आपलं राजपद जावू नये असंच वाटायचं. त्यामुळं देव आणि दानवाचे युद्ध होत. त्यातच सर्व जगाची माहिती ठेवणारा नारद हा ज्याप्रमाणे देवांना माहिती द्यायचा. त्याचप्रमाणे दानवांनाही माहिती द्यायचा. पण त्याच्या मनात कपट नव्हता. परंतू जसजसा काळ बदलला आणि अमृतवाटप झालं. त्यानुसार दोघांनाही अमृताची समान वाटणी न झाल्यानं व अमृताची रांगेनुसार वाटणी झाल्यानं राक्षसवीर देवांच्या रांगेत बसला. त्यानं अगदी ती बेईमानी नसली तरी ती बेईमानी करुन अमृत प्राशन केलं. त्यातच तो अमर होवू नये. म्हणून त्याचा शिरच्छेद केला गेला. तेच घडलं त्रेतायुगातही.
त्रेतायुगात तर विभीषणाला त्याच्या कुरघोडी स्वभावानं रावणानं हाकलून दिलं. त्यातच घरका भेदी लंका ढहाये झाल्यानं रावणाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आला द्वापरकाळ.
द्वापर काळ तर रक्तरंजीतच राहिला. या काळात ऐन सुईच्या टोकावरही मावेल, एवढीही जमीन मी देणार नाही असं दुर्योधनानं म्हटलं. त्याचं कारणही तसंच होतं. त्या दुर्योधनाला ती पाच पांडवं त्याच्या काकाची मुलं वाटतच नव्हती. मग ती काकाची नाहीत तर त्यांना राजसत्तेत वाटा का द्यायचा? कारण पंडूने किंदम ऋषीचा वध केल्यानं त्यानं दिलेल्या शापानं त्याला मुलं होणार नाही हे दुर्योधनाला माहित होतं. त्यामुळं माझ्या काकाला मुलं झालीच कशी? हा दुर्योधनाचा प्रश्न होता. त्यातच द्युतकलेत खुद्द द्रोपदीला डावावर लावण्याचा काही अधिकार नसतांना पांडवांनी तिला डावावर आपली मालमत्ता म्हणून लावलं आणि ते हरले. त्यातच झालेल्या अपमानाचा बदला द्रोपदीनं घेतला. परंतू द्युत खेळणे आणि त्यात आपल्या पत्नीला डावावर लावणे ही काही मर्द म्हणून पांडवांना शोभणारी गोष्ट नव्हती.
आता हे युग पाहिले की नाही असे प्रश्न करणारी मंडळी जेव्हा पाषाणयुगापासून मानवाचा अभ्यास करायला लागली. तेव्हा माकडापासून उत्क्रांत होत होत माणूस बनला हे डार्वीनच्या सिद्धांतानुसार सिद्ध झालं. त्यातच धर्मही स्थापन झाले असेही ग्रंथ सांगतात. मग जिथे धर्म तिथे कलह उत्पन्न झाले. शेवटी लोकांनी आपआपला धर्म वाढविण्यासाठी काहींनी प्रेमानं तर काहींनी लोभानं तर काहींनी दहशतवादानं आपआपला धर्म वाढवला. परंतू यामध्ये धर्म वाढवितांना दहशतवाद आणायला नको होता. परंतू तो आणल्यानं दुही माजली. यामध्ये मी श्रेष्ठ अशी भावनाही तयार झाली. त्यातच अशी भावना तयार झाल्यानं जो भावाभावात संघर्ष निर्माण झाला. त्याचाच परिपाक की काय, मै नही तो तु भी नही अशा इर्षेनं अरबांना भारतात यायला भाग पाडलं गेलं. त्यातूनच पहिला मुस्लीम व्यक्ती आला. त्याचं नाव मोहम्मद बिन कासीम. त्यानं आपला इस्लाम धर्म राजा दाहिरनं कबूल करावा. म्हणून त्याचेवर अनन्वीत अत्याचार केले. पुढे त्याचे मुंडके कापून ते आपला काका हज्जाजला पाठवले. त्यानंतरच्या काळात सत्तेवर आलेल्या पृथ्वीराज चौहानचेही तसेच हाल केले. त्याचेही आधी डोळे फोडले गेले. नंतर त्यानं स्वतः मृत्यूस कवटाळले. त्यानंतर संभाजीचेही मोगलांनी तसेच हाल केले. त्यांचेही डोळे फोडले. जीभही कापली.
हे सर्व का घडलं? याची जर शहानिशा केली तर आपलेच लोकं याला कारणीभूत ठरले आहेत. राजा दाहिरचेवेळी या देशातच राहात असलेल्या मोक्षवासव व ज्ञानमत यांनी कुरघोडी करुन मोहम्मद बिन कासीमला भारतात बोलवलं. बदल्यात सिंधचं राज्य मागीतलं. त्यासाठी त्यांना मदत केली. त्यातच राजा दाहिर जरी शूर असला तरी मारला गेला. पण शेवटी काय मिळालं ज्ञानमताला. मोहम्मद बिन कासीमनं त्या दोघांनाही ठार केलं. तूम उनके नही तो हमारे कहाँ हो सकते है। असं म्हणत. यातच मोहम्मद बिन कासीमचं बरोबर होतं. तरीही लोकं सुधारले नाहीत. म्हणूनच पुढे पृथ्वीराज चौहान घडलं.
पृथ्वीराज चौहानच्या वेळीही याच देशातल्या जयचंदानं मोहम्मद घोरीला बोलावलं. बदल्यात दिल्लीचं राज्य मागीतलं. यातच मोहम्मद घोरी आला. त्यानं जयचंदाच्या मदतीनं पृथ्वीराज चौहानला बंदी बनवलं. त्यातच त्याचे डोळे व पृथ्वीराजचा अंत. जयचंदालाही काही मिळालं नाही. त्यावेळीही तू उनका नही तो हमारा क्या होगा। म्हणत मोहम्मद घोरीनं जयचंदाला दिल्ली येथे फासीवर लटकवलं. त्यानंतरही लोकं सुधारले नाही. अगदी संभाजी महाराजांच्या काळातही गणोजी शिर्केनं बदला घेण्यासाठी फितूरी केली व संभाजीला पकडून मुकरर्बखानाच्या हवाला केलं. त्यातच बिचा-या संभाजीला विरमरण पत्करावं लागलं. सगळी फितूरी आणि सगळ्या त्याच इतिहासाच्या पुनरावृत्त्या.
ज्यावेळी इंग्रज भारतात आले. तेव्हाही तेच घडलं.रघुनाथरावानं राजा बनण्यासाठी इंग्रजांची मनधरणी केली. तसेच मिरकासीमला मारण्यासाठी मिरजाफरही इंग्रजांना मिळाला. परंतू इंग्रजांनी मिरजाफरला मदत केली. परंतू राजपद दिलं का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. तसेच रघुनाथरावांना राजपद दिलं का? त्याचेही उत्तर नाही असंच आहे.
ज्यावेळी इंग्रजांचं राजकारण या देशात सुरु होतं. त्यावेळीही काही लोकं इंग्रजांना मदत करीत होते. काही लोकं मदत करीत नव्हते. जे मदत करीत नव्हते. ते क्रांतीकारक म्हणून ओळखले जाई. पण जे मदत करीत होते. त्यांना तरी काय मिळालं? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे.
आज देश स्वतंत्र्य आहे. आमच्या इतिहासाची नेहमी पुनरावृत्ती होत आहे. ते आम्हाला माहित आहे. तरीही आम्ही आजही सुधरायला तयार नाही. साध्या लहान लहान गोष्टीसाठी आम्ही आमचं जमीर विकतो आहोत आणि स्वतःला गुलाम करुन घेतो आहोत. आमच्या अशाच स्वभावामुळे आमच्यावर परकीय लोकं राज्य करतील नाहीतर काय? आज धर्मांधता एवढी वाढलेली आहे की धर्मासाठी आम्ही काय करतो आहोत ते आम्हालाच कळत नाही.
आमच्या या देशात आज अनेक धर्म वास करीत असले तरी पुर्वीपासून असणारे या देशातील हिंदू राजे हे सहिष्णू होते. तसेच ते दयावानंही. त्यांनी मोहम्मद बिन कासीमनं केलेल्या चौदा स्वा-यानंतरही पंधराव्या स्वारीवेळी माफ केले. तसेच मोहम्मद घोरीनं केलेल्या बारा स्वा-यानंतरही त्याला माफ केले. परंतू त्या मोहम्मद बिन कासीम तसेच मोहम्मद घोरीनं काय केलं? त्यांनी एकदा जिंकल्यानंतर त्यांना मरायला भाग पाडलं. हा हिंदूस्थानचा इतिहास आहे. आम्ही दयाळू आहोत. आमचा भारतही दयाळू आहे. या धरणीवर पराक्रमी, दयाळू राजे जन्माला येतात. तसेच देवही जन्म घेतो. तसेच फितूरही जन्माला येतात. छत्रपती शिवाजी राजांनी म्हटलं की फितूरीमुळं राज्याला धोका असतो. म्हणून लोकहो पराक्रमी म्हणून जन्माला या. दयाळू म्हणून जन्माला या. फितूर म्हणून नाही. तसेच आतातरी बदला. कारण आपला भारत सहिष्णू आहे. दयावान आहे हे आधी लक्षात घेण्याची गरज आहे.
************************************************************************************************
ती अग्नी निघत होती त्या राखेतून. ती राख शांत झाली नव्हती. त्या राखेत त्या जीवंत स्रीयांचं शरीर होतं. ज्यांनी आपल्या पतीप्रती नव्हे तर आपल्या देशाप्रती स्वाभिमान बाळगला होता. ज्यांनी आपल्या देशासाठी अब्रू विकली नव्हती. तर देशाची शान अबाधीत ठेवण्यासाठी जोहार केला होता.
जोहार आणि तोही लाल किल्ल्यात. लाल किल्ल्यालाही लाज वाटत होती तो जोहार पाहून. कारण त्या किल्ल्यानं त्यांचं अस्तित्व नव्हे तर अब्रू वाचवली नव्हती. म्हणून की काय, त्या किल्ल्यात त्या विरांगणांच्या चितांची आग धगधगत होती.
सारा आसमंत त्या चिता पाहून घाबरला होता. त्यांच्या छातीतही धगधगत होत्या त्या ज्वाला. ज्या हिंदूस्थानच्या गर्भातून निघत होत्या. जो हिंदूस्थान. त्या हिंदूस्थाननं आपल्या सुरक्षीततेसाठी कित्येक हिंदूस्थानी राजांचे रक्त प्राशन केले होते. तरीही त्या हिंदूस्थानची तहान भागली नव्हती. कारण या देशात गद्दारांची फौज होती.
हिंदूस्थान......... ह्या हिंदूस्थानची लाल माती कित्येक सालापासून प्रसिद्ध होती. ह्या हिंदूस्थानच्या भुमीवर कित्येक वीर पैदा झाले होते. तसेच हा हिंदूस्थान पुरातन काळापासून वीरांच्या जन्माची खुन राहिला होता. ज्या हिंदूस्थानला पूर्वी सोन्याची चिडीया म्हणत असत. त्यामुळंच विदेशी मंडळी या देशात येत असत आणि ह्या हिंदूस्थानला नेस्तनाबूत करीत असत.
लाल किल्ल्यानं अनुभवलेला तो प्रसंग मनाला हेलावणारा होता. प्रसंग होता राणी संयोगीतेचा. ज्या राणीनं राजा मरताच क्षणाचीही वाट न पाहता लाल किल्ल्यावर जोहार केला होता. कारण तिला माहित होतं की या देशात आता मोगली राज येणार आहे. तो मोगली राज, ज्या मोगलांनी आतापर्यंतच्या काळात स्रीयांची रक्षा केली नव्हती तर त्या स्रीयांना आपल्या देशात नेवून आपल्या काजीच्या स्वाधीन केलं होतं.
राजा दाहिर.......असाच हिंदूस्थानातील सिंधचा एक राजा होता की ज्या राजाला हरविल्यावर मोहम्मद बिन कासीमनं त्याच्या दोन्ही मुलींना म्हणजे परिमाल व सुर्यकुमारींना बगदादच्या काजीच्या स्वाधीन केले होते. तो इतिहास संयोगीतेला माहित होता. त्यामुळंच तिनं लाल किल्ल्यावर जोहार करण्याचा निर्णय घेतला.
जोहार झाला होता. संयोगीतासह राज्यातील अनेक महिलांची राखरांगोळी झाली होती. ती राख दिसत होती. बाकी काही दिसत नव्हतं त्या लाल किल्ल्याच्या चार दिवारीत.
कुतूबुद्दीन ऐबक. गुलाम होता तो मोहम्मद घोरीचा. पण तो शूर असल्यानं त्याला घोरीनं आपल्या सैन्य अभियानाचा प्रमुख बनवलं होतं. तो तुर्कस्थानचा रहिवासी असून त्याचे मायबापही तुर्कीच होते.
त्यावेळी गुलाम विकायची प्रथा होती. त्यातच दास व्यापारी हे गावोगावी, देशोदेशी जावून व्यापार करीत असत. ते दासांना घेत असत आणि त्यातच ते व्यापारी त्यांना योग्य प्रशिक्षण देवून राजांची सेवा करण्यासाठी राजसत्तेला विकून टाकत असत. राजेही आपली सेवा करण्यासाठी गुलाम हवे म्हणून गुलाम खरेदी करीत होते. त्यातील कुतूबुद्दीन ऐबक हा एक बालक होय. पुढे त्यानं गुलाम वंशाची स्थापना केली.
दास व्यापारी लोकांनी कुतूबुद्दीनला काजी फकरुद्दीन अब्दूल अजीज कूफीला विकलं. त्या काजीनं कुतूबुद्दीनला सैन्य आणि धार्मीक शिक्षण दिलं. त्यासोबतच आपल्या मुलांनाही. परंतू अब्दूल अजीज मेल्यानंतर त्याच्या मुलांनी कुतूबुद्दीनला परत विकलं. त्याला आता मोहम्मद घोरीनं विकत घेतलं होतं. घोरीनं त्याला सैन्य अभियानाच्या प्रमुखपदापुर्वी त्याला घोडदळाचा प्रमुख बनवलं.
ज्यावेळी हा कुतूबुद्दीन ऐबक लहान होता. त्याला चंद्रमा की देवता असे प्रेमाने म्हणत असत. परंतू दुर्दैवानं निशापूरच्या बाजारात विकल्यानंतर त्याला कोणीही चंद्रमा ची देवता म्हणू शकत नव्हते. कारण तो आता गुलाम झाला होता.
असा हा कुतूबुद्दीन ऐबक. ज्यावेळी पृथ्वीराज चव्हानला बंदी बनवलं गेलं आणि त्याला गजनीला नेण्यात आलं. त्यावेळी त्यानं कुतूबुद्दीनला आदेश दिला की त्यानं पृथ्वीराज चव्हानच्या सर्व राण्या व मुलींना घेवून गजनीला यावं. त्या सर्वांना आपण काजीला भेट देवू.
तसं पाहिल्यास त्यावेळी लढाईत जिंकलेल्या राजे रजवाड्यांच्या सुंदर सुंदर राण्या तसेच त्यांच्या मुलींनाही परकीय मुस्लीम शासक आपल्या काजींना हरमसाठी भेट देत असत. राजा दाहिरच्या वेळीही तसंच घडलं होतं. अगदी आजही तेच करण्यासाठी मोहम्मद घोरीच्या आदेशानुसार कुतूबुद्दीन ऐबक करीत होता. त्यानं दिल्लीच्या लाल किल्ल्याला वेढा घातला होता. ज्या किल्ल्यात संयोगीतेसह इतरही काही राण्या व राज्यातील काही महिलाही उपस्थीत होत्या. ज्या स्रियांचे पती तराईच्या लढाईत मारले गेले होते.
सतीप्रथा वाईट प्रथा होती. पतीच्या निधनानंतर त्या पतीच्या शय्येवर सती जाणं अर्थात अग्नीहोमकुंडात स्वतःला जाळून घेवून संपवणं. ही कुप्रथा होती. पण संयोगीता आपल्यासाठी व आपल्या सखींसाठी ती प्रथा वापरणार होती. त्याचं कारणही तसंच होतं. पती मरणानंतरही आपल्या पतीची अस्मीता दुखावली जाणार नाही हा तिचा उद्देश होता. तसेच फक्त एवढाच उद्देश नव्हता तर अखंड हिंदुस्थानची अस्मीता दुखावली जावू नये हा ही तिचा उद्देश होता. त्यासाठीच ती जोहार करणार होती.
सतीप्रथा ही तिच्यासाठी तिचा स्वाभीमान टिकविणारी प्रथा वाटत होती. कारण जर तिनं ती प्रथा वापरली नसती तर तिचाच नाही तर या अखंड हिंदूस्थानचं सौभाग्य मोहम्मद घोरीनं धुळीस मिळवलं असतं. यात किंचीतही कमीत्व नव्हतं.
************************************************************************************************
कुतूबुद्दीननं दिल्ली स्थित लालकिल्ल्याला वेढा घातला होता. त्याचेजवळ भरपूर सैन्य होते. ते सैन्य जे मोहम्मद घोरीचे गुलाम होते. त्या सैन्यात केवळ इतर देशातीलच नाही तर भारतातीलही गुलाम होते. ती गुलामांची फौज घेवून कुतूबुद्दीन हत्तीवर आरुढ होवून बसला होता.
दिल्लीचा लाल किल्ला अभेद्य असा किल्ला होता. त्याच्या चारही बाजूंनी खुप दूरवर यमुना नदीचं पाणी खुप खोलवर पसरलं होतं. समजा शत्रू ते पाणी पार करायला निघालाच तर त्या पाण्यात ते मरुन जातील. कारण त्या पाण्यात मोठमोठ्या मगरी होत्या. तसेच किल्याच्या तटबंदीवर काही पहारेकरीही होते. जे भाल्यानं वा बाणानं त्या पाण्यात शिरणा-या सैनिकांचा वेध घेवू शकत होते.
त्या किल्ल्याला एकच दरवाजा होता. त्या दरवाजाच्या बाहेर एक पुल बांधला होता. ज्या पुलावरुन किल्ल्यातील प्रजाजन जाणं येणं करीत असत. असा तो किल्ला अभेद्य असा किल्ला होता. त्या किल्याला सहजासहजी कोणाला जिंकता येत नव्हते.
आज लाल किल्ल्याभोवती यमुनेचं पाणी दिसत नाही. यमुना दूरुन वाहते. पण त्या पाण्यात मगरी दिसत नाही. तसेच ते तटबंदीवर उभे राहणारे सैनिकही दिसत नाहीत. जे भाल्याचे अचूक नेम लावायचे नव्हे तर बाणाचेही अचूक नेम लावायचे.
संयोगीतेनं जोहार करण्यासाठी किल्ल्यात चिता तयार केल्या होत्या. तिला माहित होतं की शत्रू हा तो किल्ल्याच्या दरवाजाच्या बाहेर असणारा पुलंही तोडून टाकून किल्ल्यात प्रवेश करील व आपल्याला पकडून नेवून आपले शिलभंग करेल. अगदी यामुळंच त्या चिता. तिला पावलोपावली शत्रूंच्या हालचालीची माहिती मिळत होती. तसं पाहता संयोगीता विचार करीत होती की आपले सैन्य कमी आहेत. ते सैनिक शत्रू सैन्यासाठी पुरणार नाहीत. तो शत्रू......... ज्या शत्रूचं बल मोठं आहे. त्यांच्याजवळ शेकडो हत्ती आहेत.
तो लाल किल्ल्याचा दरवाजाही अभेद्य होता. त्याला शेकडो अनकुंचीदार खिळे लावले होते. जर त्या दरवाज्याला हत्तीने धडक मारलीच तर त्या हत्तीच्या मस्तकात ते खिळे शिरतील व ते हत्ती मरतील. त्यातच दरवाजा तुटणार नाही व आपण सुरक्षीत राहू शकू.
किल्ल्याच्या बाहेरच शत्रू सैन्यात जयचंदाचा मुलगा होता. तो बहिणीची रक्षा करायची सोडून शत्रूंशी हातमिळवणी करुन होता. त्याचं कारणंही तसंच होतं. त्याचा बाप जयचंदाचं राजा पृथ्वीराजशी पटत नव्हतं. त्याची चारपाच कारणं होती. पहिलं कारण होतं संयोगीतेचा विवाह.
संयोगीता ही जयचंदाची मुलगी होती. ती खुपच सुंदर होती. तिनं पृथ्वीराजाचे अनेक किस्से ऐकले होते. ते किस्से ऐकून तिचं प्रेम पृथ्वीराजवर निर्माण झालं होतं. ते अपरीमीत प्रेम होतं. कधीकधी ती त्याच्या स्वप्नातही येत असे. तो कधीतरी मिळणार असं तिला वाटत होतं. पण तो तिला कसा मिळणार. तिलाही भीती होती की कदाचित तो मिळायच्या पुर्वी आपले वडील आपली हत्या करेल. परंतू तिनं क्रिष्ण गाथा ऐकली होती. क्रिष्ण रुख्मीनीचा विवाह हे असच एक उदाहरण होतं तिच्यासमोर. त्यामध्येही तिचा भाऊ हा तिच्या क्रिष्णाचा शत्रूच होता हे तिला माहित होतं. तरीही तिनं श्रीकृष्णाशी पळून जाऊन विवाह केला. हे तिला माहित झालं होतं. त्यामुळं तिही त्या इतिहासाची पुनरावृत्ती करु पाहात होती.
दुसरं कारण होतं. ते म्हणजे राजपद. दिल्लीचा राजा अनंगपालनं पृथ्वीराजला दिल्लीचा राजा बनवलं होतं. त्या दिल्लीचं राजपद आपल्याला मिळेल असं जयचंदाला वाटत होतं. त्याचं कारणंही तसंच होतं. ते म्हणजे जयचंद व पृथ्वीराज हे दोघंही अनंगपालचे नातू होते. एक मोठ्या मुलीचा मुलगा होता तर दुसरा लहान मुलीचा. जयचंद हा मोठा होता. त्यामुळं त्याला साहजीकच वाटत होतं की अनंगपाल नंतर तोच राजा बनावा.
तिसरं कारण होतं ते म्हणजे जयचंदाच्या बापाचा मृत्यू. जयचंदाचे वडील विजयचंद हे पृथ्वीराजचे वडील सोमेश्वर चव्हाणचे चांगले मित्र होते. काही ग्रंथात विजयचंद व सोमेश्वर ह्या दोघांनीही दिल्लीचा शासक अनंगपालच्या मुलींशी विवाह केला असा उल्लेख आहे. तर काही ग्रंथात सोमेश्वरचा विवाह ज्या कर्पूरीदेवीशी झाला. ती कर्पूरादेवी त्रिपुरी शासक अचल यांची पुत्री होती. हे डॉक्टर पारसनाथ सिंह यांनी पृथ्वीराज आणि त्यांचा काळ या पुस्तकात लिहिलेलं आहे. तसेच रम्भामंजरी पुस्तकानुसार विजयचंद्रच्या राणीचं नाव सुंदरी देवी होतं. ही दिल्लीचा शासक अनंगपालची मोठी मुलगी होती.
सोमेश्वर चव्हान हा अर्णोराज चव्हानचा लहान मुलगा होता. अर्णोराज चव्हाणच्या मृत्यूनंतर सोमेश्वर चव्हाननं काही काळ हा चालुक्य राजा कुमारपाल यांच्या दरबारात व्यथीत केला. त्याच ठिकाणी पृथ्वीराज चव्हानचा जन्म झाला.
जेव्हा कुमारपालनं कोकण देशचा राजा मल्लिकार्जूनवर आक्रमण केलं. त्यावेळी सोमेश्वरनं शत्रूच्या हत्तीवर कुदून मल्लिकार्जूनचा वध केला.
************************************************************************************************
चव्हान वंशाचा संस्थापक चाहमान राजाला मानलं जातं. त्याच्याच नावावरुन चव्हान नाव पाडलं गेलं. पुढं चव्हान वंश भारतात अग्रेसर झाला. याच चाहमानच्या वंशात वासूदेव नावाचा एक व्यक्ती होवून गेला.ज्यानं साम्भर नावाच्या गावी चव्हान राज्य स्थापन केलं. तसेच त्याच गावी एक तलावही बांधला. तोच तलाव साम्भर झीलच्या नावानं ओळखला जावू लागला. याच चव्हान राजांपैकी दुर्बलराज प्रथम याने अनेक युद्ध केलीत व भरपूर धन गोळा केलं. ज्यामुळं चव्हान राज्य बळकट बनलं.
याच दुर्बलराजाच्या मुलाचं नाव गुवक होतं. पुढं त्याला गोविंद म्हटलं जावू लागलं. ज्यानं पुढे सिंधच्या मुस्लीम राज्यपालाला हरवलं होतं. या गोविंदानंतर त्याचा मुलगा चंद्रराज गादीवर बसला. त्यानंतर पुन्हा गुवक द्वितीय राजा बनला. गुवक द्वितीय राजानंतर त्याचा मुलगा चंदन राजा बनला. या चंदननं तोमर राजा रुद्रेणला हरवलं. त्यातच त्याला ठार केलं. त्यानंतर त्याचा मुलगा वाक्पतिराज गादीवर बसला.
वाक्पतिराजच्या नंतर त्याचा मुलगा सिंहराज गादीवर बसला. त्यानं प्रतिहाराशी मुकाबला केला. त्यानं दिल्लीच्या तोमर राजालाही हरवलं. त्यानंतर त्याचा मुलगा विग्रहराज द्वितीय राजा बनला.त्यानं गुजरातचा शासक मुलराजला पराजीत केलं. तसेच त्याने मुस्लीम लुटारुंनाही पराजीत केलं होतं.
विग्रहराजनंतर त्याचा लहान भाऊ दुर्बल राज द्वितीय राजा बनला. त्यानं नाडालच्या चव्हान राजाला पराजीत केलं. त्यानंतर त्याचा उत्तराधिकारी गोविंद राज तिसरा राजा बनला. त्यानं मुस्लीम शासकांना हारवलं. त्यानंतर वाक्प्रती द्वितीय राजा बनला. त्यानं मेवाडचा राजा अम्बाप्रसादला युद्धात हारवलं. वाक्प्रतीच्या नंतर वीर्यराम राजा बनला.
दुर्दैव असं की या वीर्यरामला नाडौलच्या चव्हानांनी हरवलं. त्यानंतर मालवाच्या परमार वंशाचा राजा नरेश भोजनं त्यांना हरवलं.
सिंहराजचा उत्तराधिकारी दुर्बलराज तृतीय झाला. त्यानं गुजरातच्या राजाला हारवलं. त्यानंतर त्याचा भाऊ वीरसींग व विग्रहराज तृतीय राजा बनले. याच विग्रहराज तृतीयनंतर त्याचा मुलगा पृथ्वीराज प्रथम राजा बनला. त्यानंतर त्याचा मुलगा अजयराज राजा बनला. या अजयराजनं अजमेर शहर वसवलं. तो फार पराक्रमी राजा होता. त्यानं मालवाचा परमार राजा नरवर्धनलाही हरवलं. तसेच गजनीच्या सेनेचाही पराभव केला. त्यानंतर त्याचा मुलगा अर्णोराज राजा बनला.
अर्णोराज राजा.......त्यानं अनुक्रमे ११३३ इ ते ११५५ इ पर्यंत राज्य केलं. त्यानं मुस्लीम शासकांना हरवलं तसेच चालुक्यांनाही हरवलं. परंतू त्याचा मुलगा जगदेवनंच त्याचा वध केला.
जगदेवनं आपल्या बापाचीच हत्या केल्यानंतर राजसिंहासन प्राप्त केलं. त्यानं जास्त दिवस शासन केलं नाही. त्याचा भाऊ विग्रहराज यानं काही दिवसातच त्याची हत्या केली. त्यानंतर विग्रहराज चतुर्थनं इ स ११५८ ते इ स ११६३ पर्यंत राज्य केले. याच राजानं तोमरांना पराजीत करुन दिल्ली तसेच आसपासच्या प्रदेशावर कब्जा केला. याच विग्रहराजानं मुसलमानाला पराजीत केलं. त्यानं पंजाबचाही काही भाग आपल्या ताब्यात घेतला. त्यानं चालूक्य राजा कुमारपाललाही हरवलं. तसेच त्यानं दुर्गाची निर्मीती केली.
विग्रहराजनंतर बढ अपर गांगेय राजा बनला. तो लवकर मरण पावला. त्यानंतर पृथ्वीराज द्वितीय राजा बनला. त्यानं ११६९ पर्यंत शासन केलं. त्यानं काही किल्ल्याची निर्मीती केली. तो मरण पावल्यानंतर अर्णोराजचा मुलगा सोमेश्वर राजा बनला.
सोमेश्वर राजा बनला. त्याचा बालपणा हा गुजरातमध्येच गेला होता. त्याची आई कंचनदेवी ही चालुक्यराजा सिद्धराज. जयसिंहची मुलगी होती. परंतू सिद्धराजशी अर्णोराजचे संबंध चांगले नव्हते. परंतू तरीही सोमेश्वरचं लालनपालन कुमारपालनं केले होते. त्यानं कुमारपालच्या देखरेखीखाली अनेक युद्धात भाग घेतला. त्यामुळं सोमेश्वरलाही युद्धाचा अनुभव झाला होता. सोमेश्वर राजा बनताच त्यानंही अनेक युद्ध केले. त्यातच त्याला दोन मुलं झाली. एक हरिराज व दुसरा पृथ्वीराज. हाच पृथ्वीराज तृतीय होता.
सोमेश्वरच्या सास-यानं म्हणजे अचलराज चेदि यानं अजमेरच्या गादीवर सोमेश्वरला बसवलं. कारण अजमेरला ११६९ मध्ये असलेल्या पृथ्वीराज द्वितीयच्या मृत्यूनंतर तो निःसंतान असल्यानं सोमेश्वरला अजमेरचा शासक बनवलं.
सोमेश्वर प्रतापी राजा होता. त्यानं बीजोलिया, रेवासा, थोड,अणवाक आदी भाग जिंकून घेतला. परंतू याच ठिकाणी भर दरबारात सोमेश्वरचा भाऊ कानराईनं भर दरबारात काही कारणास्तव अन्हिलवाडाचा राजा प्रतापसिंह सोलंकीची हत्या केली. त्यातच प्रतापसिंहचा मुलगा शासक भोला भीमनं बदल्याच्या भावनेनं अजमेरवर आक्रमण केलं. त्यातच सोमेश्वर मारला गेला. त्यातच याच बदल्याच्या अग्नीतांडवात सोमेश्वरच्या मुलानं म्हणजेच पृथ्वीराजनं गुजरातवर आक्रमण केलं. त्यातच भोला भीम मारला गेला.
************************************************************************************************
चव्हान वंशाच्या उत्पत्तीचा इतिहास पाहता काही पुराणं आपले विचार मांडतात आणि सांगतात की ज्या वेळी आबू पर्वतावर काही ऋषीमुनी होमयज्ञ करीत होते. त्यावेळी काही राक्षस त्यांच्या होमयज्ञामध्ये बाधा उत्पन्न करीत असत. हा त्यांचा यज्ञ शांततेसाठी असायचा. सृष्टीतील प्रदूषण दूर करण्यासाठी हा यज्ञ होता. परंतू राक्षसांच्या सततच्या त्रासानं ते ऋषीमुनी कंटाळले व त्यांनी आपला होमयज्ञ यशस्वी व्हावा यासाठी पुर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशेला चार असे समाजातील व्यक्ती उभे केले. जे शूरवीर होते.
राक्षस म्हणजे नेमके कोण? ते दरोडेखोर असावेत. परंतू शास्रपुराणात त्या दरोडेखोरांना राक्षस संबोधले गेले असावे अशी शंका नाकारता येत नाही. अशा दरोडेखोरांना अडविण्यासाठी चारही दिशेला ज्या शुरवीर लोकांना उभे केले. त्यात प्रतिहार, परमार, चव्हाण व सोलंकी ह्यांचा समावेश होतो. ह्याच लोकांचा वंशवेल वाढला व तेच आपआपल्या राज्याचे आधारस्तंभ बनले. मग तिच मंडळी आपआपले राज्य वाचविण्यासाठी प्रसंगी आपल्या जीवावर खेळून प्रजेला वाचवू लागले. त्यातीलच एक राजा सोमेश्वर व त्याचा मुलगा पृथ्वीराज होय.
चव्हान वंशात अनेक राजे हे पराक्रमी होवून गेले. त्यातील शेवटचा पराक्रमी राजा म्हणजे पृथ्वीराज चौहान होय. कारण त्यानंतर चव्हान वंश लयास गेला व दिल्ली तख्तावर मुस्लीमांचं राज्य निर्माण झालं.
सोमेश्वर चव्हान व विजयचंद हे चांगले मित्र होते. ते असे चांगले मित्र की एकमेकांना युद्धप्रसंगीही मदत करीत असत. चव्हानला अग्नीवंशी समजण्यात येत असे. ते शाकंबरी देवीची पुजा करीत. एकदाची ती लढाई. अनंगपालच्या राठोडसोबतच्या लढाईचा क्षण. या लढाईत विजयचंद देखीत सहभागी झाला होता. त्यातच ते युद्ध जिंकलं गेलं व अनंगपाल सोमेश्वर व विदयचंदवर मोहीत होवून विजयचंदला रुपसुंदरी व सोमेश्वरला कमलावती अशा दोन्ही मुली दिल्या. तेव्हापासून अनंगपालचे सोमेश्वर व विजयचंदशी चांगले घट्ट नाते तयार झाले.
इ स ११६९ ला सोमेश्वर गादीवर आल्यानंतर त्याचा मित्र विजयचंदही कनौजच्या गादीवर बसला. यवन नेहमी नेहमी हिंदूस्थानवर स्वा-या करीत असत. कारण या भारताला सम्राट समुद्रगुप्तच्या काळापासूनच सोन्याची चिडीया म्हणत असत. इथे सोने जास्त प्रमाणात उपलब्ध होते. तसेच व्यापारी मालाचा जेव्हा शोध लागला. तेव्हा येथील व्यापारी मालही चांगल्या प्रतीचा असायचा. त्यातच या देशातील लोकं कष्टीक असल्यानं त्यांना गुलाम चांगली किंमत मिळत होती. शिवाय या देशातील मुली ह्या सुंदर असल्यानं त्या विदेशी लोकांना आवडायच्या. त्यातच त्यांचीही खरेदी विक्री केली जात असे. खुद्द काजीच या देशातील मुलींवर भाळत असे. त्यामुळं यवन नेहमीनेहमी लढाया करण्यासाठी हिंदूस्थानवर स्वा-या करीत. त्यांचं या देशातील शुरवीर राजांसमोर काही एक चालायचं नाही. ते स्वा-या तर करीत. पण युद्ध हारत असत. तसेच येथील राजे पराक्रमी असले तरी दयाळू असल्यानं ते उदार मनानं माफही करीत असत. ते राजे उदार मनाने माफ करीत असल्यानं वारंवार त्यांना स्वा-या करायला मार्ग मोकळा होत असे. त्यांना वाटायचे की एक ना एक दिवस आपण यांना जिंकू आणि हिंदूस्थानवर हुकूमत गाजवू.
भारतीय लोकं हे युद्धाच्या परंपरा व नियम पाळत असत. त्यात सुर्य मावळला की शत्रू कितीही कचाट्यात सापडला असला तरी ते त्याला मारत नसत. राजा दाहिरच्या वेळीही तसंच झालं होतं. देवल बंदराच्या लढाईत एकदा मोहम्मद बिन कासीम राजा दाहिरच्या मुलाच्या कचाट्यात सापडला होता. तरीही सुर्य मावळल्यामुळं नियम आड आल्यानं त्या मुलानं त्याला सोडून दिलं होतं. परंतू रात्री युद्ध करायचा नियम नसतांनाही ज्ञानमताच्या साहाय्यानं मोहम्मद बिन कासीमनं ऐन मध्यरात्री सगळे गाढ झोपेत असतांना देवलच्या किल्ल्यावर हल्ला चढवला होता. त्यामुळं राजा दाहिरच्या मुलाला देवलचा किल्ला लढवितांना अपयश आलं होतं.
ते विदेशी सगळे नियम धाब्यावर बसवत असत. हेच पृथ्वीराज चव्हानच्या बाबतीतही घडलं होतं. त्यालाही तसंच पकडण्यात आलं. ऐन मध्यरात्री राजा पृथ्वीराज गाढ झोपेत असतांना.
************************************
एकदा यवनांनी हिंदूस्थानवर केलेला हल्ला. त्यात विजयचंदनं सोमेश्वरला मदत केली. त्या लढाईत विजयही मिळाला सोमेश्वरला. परंतू त्या लढाईत विजयचंद मारला गेला. त्यावेळी जयचंद लहान होता.
विजयचंद मरण पावताच जयचंद अगदी अल्पवयात गादीवर बसला. तसा तो लहान असल्यानं रुपसुंदरी राज्य सांभाळत होती. त्यातच विजयचंदचा एक भाऊ होता जयमल. त्याची इच्छा होती की यात सोमेश्वरमुळंच त्याचा भाऊ ठार झाला असावा.
जयचंद गादीवर बसताच त्याच्या कानाशी लागून व रुपसुंदरीला भडकवून विजयचंद हा सोमेश्वरमुळंच मरण पावला असं सांगून जयमल भडकवू लागला.परंतू जयचंद आणि रुपसुंदरी भडकले नाहीत. त्यातच जयमलचं भावावर असलेलं निरतिशय प्रेम. जयचंद व रुपसुंदरी भडकले जरी नसले तरी तो मात्र भडकला होता. त्याला वाटत होतं की तो एक ना एक दिवस जयचंदला सोमेश्वरच्या विरोधात भडकवेलंच. अशी जणू भीष्मप्रतिज्ञा करुनच जयमल तयारीला लागला होता. त्यातच पृथ्वीराजचा जन्म झाला.
************************************
पृथ्वीराज व चंदबरदाईचा जन्म एकाच दिवशी व एकाच तारखेला झाला होता. तो योगायोगच होता. त्यामुळं त्याच योगायोगानं ते एकमेकांचे जीवलग मित्र बनले होते. पृथ्वीराज जेव्हा लहान होता. तेव्हा त्याचे वडील सोमेश्वर यांनी त्याला शिक्षणासाठी आबू पर्वतावरच ऋषीच्या आश्रमात पाठवले. याच ऋषीच्या आश्रमात राहून पृथ्वीराजनं वेगवेगळ्या स्वरुपाच्या शिक्षा ग्रहण केल्या.
सर्वात मोठं होतं लष्करी शिक्षण. पृथ्वीराजनं राजकीय शिक्षण, तलवारबाजी व भाल्यासह शब्दभेदी बाण चालविण्याचीही शिक्षा घेतली होती. लहानपणापासूनच तो फारच हुशार होता. त्याचे किस्से लोकं आपल्या मुलांना सांगत असत.
संयोगीता ही अशीच मुलगी. जसजसा पृथ्वीराज लहानपणापासून पराक्रम करायचा. त्याचे किस्से इतर लोकं जसे आपल्या मुलांना सांगायचे. तसेच किस्से जयचंदच्या पत्नीनंही संयोगीतेला सांगीतले होते. त्यातच एक किस्साही तिनं ऐकला होता पृथ्वीराजबद्दल. तो किस्सा होता चंद्रलेखाचा.
चंद्रलेखा ही फारच सुंदर होती. तिच्यावर बरेच लोकं मोहित झाले होते. पण तिचं प्रेम होतं मिहिर हुसैनवर. मिहिर हुसेन हाही गजनीत राहात असे. ज्या गजनीत मोहम्मद घोरी राज्य करीत होता. अचानक एके प्रसंगी मोहम्मद घोरीच्या समक्ष चंद्रलेखा आली असता त्याचं तिच्यावर प्रेम जडलं व त्यानं तिला मागणी घातली. परंतू तिनं ती मागणी साफ नाकारली व मिहिर हुसैनला त्याबद्दल सांगीतलं.
मिहिर क्षणाचाही विलंब न करता भारतात आला. त्यानं युवराज पृथ्वीराजचा आश्रय घेतला. ही गोष्ट मोहम्मद घोरीला माहित झाली व मोहम्मद घोरी मिहिरला ठार करण्यासाठी सैन्य घेवून भारतात आला. त्यातच त्याला पृथ्वीराजचा फार राग आला होता.
************************************
भारतीय राजे हे वचनाचे पक्के होते. 'प्राण जाय पर वचन न जाय' अशी त्यांची भुमिका होती. त्यातच पृथ्वीराजनं मिहिर हुसेनला त्याचं आणि चित्रलेखाचं रक्षण करायचं वचन दिलं होतं. अशावेळी मोहम्मद घोरी आला.
मोहम्मद घोरीनं एका दूताकरवी पृथ्वीराजला संदेश पाठवला की त्यानं ब-या बोलानं मिहिर हुसेन व चित्रलेखाला त्याच्या हवाली करावं. तसं पाहता पृथ्वीराज हा भारतीय राजा असल्यानं व त्यानं मिहिर हुसेनला व चित्रलेखाला तसं वचन दिल्यानं त्यानं मोहम्मद घोरीच्या दूतांकडून संदेश पाठवला आणि ठामपणानं सांगीतलं की तो चित्रलेखाला मोहम्मद घोरीच्या ताब्यात देणार नाही. मग युद्ध झालं तरी चालेल.
पृथ्वीराजनं मोहम्मद घोरीचा धुडकावलेला प्रस्ताव. त्यावर मोहम्मद घोरी फारच चिडला. त्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यानं युद्धाचं रणशिंग फुंकलं.
युद्ध सुरु झालं होतं. दोन्ही सेना लढू लागल्या होत्या. त्यातच पृथ्वीराज युद्ध जिंकला. पण दुर्दैव असं की मिहिर हुसेन या युद्धात वीरगतीस प्राप्त झाला. तसेच त्याला जिथे दफन करण्यात आलं. तिथेच चित्रलेखाही सती गेली. त्यातच पुन्हा एकदा घोरीनं पृथ्वीराजला माफी मागीतली व पृथ्वीराजानं उदार मनानं त्याला माफ करुन टाकलं.
हेच मदतीचे व उदार मनाचे किस्से संयोगीता ऐकत होती. त्यातच ती एकतर्फी का होईना, पृथ्वीराजवर प्रेम करीत चालली होती. तिला वाटत होतं की जो व्यक्ती परकिय शत्रूलाही शरण देतो. त्याच्या प्रेमाचं रक्षण करण्यासाठी तो प्रसंगी युद्ध लढतो नव्हे तर शत्रूलाही माफ करतो. तो महान राजा आहे. आपण त्याच्याशीच विवाह करायला हवा. काहीही झाले तरीही.......
संयोगीता पृथ्वीराजवर प्रेम करु लागली होती. जो तिच्या बापाचाच शत्रू होता. जिच्या वडीलाला आता पूर्णतः वाटत होतं की तिच्या आजोबा विजयचंदला सोमेश्वरनं जाणूनबूजून मारलं.
जयचंदचे वडील विजयचंदचे मृत्यूला कवटाळताच जयमलनं जयचंदचे भरलेले कान, त्यातच आणखी यवनासोबत एक लढाई झाली. त्यावेळी त्या लढाईत जयचंद व जयमलही होता. या लढाईत पृथ्वीराजचा विजय तर झालाच. पण जयचंद गंभीर जखमी झाला. त्याला त्याच अवस्थेत कसेबसे जयमलने वाचवून आणले आणि सांगीतले की यात पृथ्वीराजचा डाव होता की जयचंद मरताच कनौजची राजगादी वा राज्य मिळवता येईल. यासाठीच त्याच्या वडीलानं विजयचंदला मरु दिलं. कारण त्याचे लक्ष केवळ कनौजवरच नाही तर दिल्लीवर आहे. जी दिल्लीची राजगादी जयचंदला मिळू शकते. याचा परीणाम असा की आता जयचंदच्या लक्षात आलं. पृथ्वीराज हा आपला शत्रू आहे. आता त्याचेसोबत शत्रूसारखाच व्यवहार करावा. हेच तिसरं कारण पृथ्वीराजला समाप्त करणारं ठरलं.
चवथं कारण होतं, ते म्हणजे संयोगीताचा विवाह. संयोगीता जयचंदची पुत्री होती. तिचं पृथ्वीराजवर निरतिशय प्रेम होतं. ती सुंदर होती. ती कुणाच्याही लक्षात येईल अशी.
बालपणापासून संयोगीता ही तेजस्वी होती. तिला बाल्यावस्थेतच हत्तीवर बसणे, घोड्यावर बसून घुडसवारी करणे ह्या गोष्टीची विशेष आवड होती. तिला लढाईत मोठमोठे पराक्रम करणे फार आवडत असे. तिला लहानपणापासूनच शिकारही आवडत होती. तिनं राजप्रासादात राहात असतांना तलवारबाजीचं व भाल्याचं शिक्षण घेतलं होतं. तशी ती वंशानं राजपूत असल्यानं राजपुतांच्या स्रिया ह्या कणखर असाव्यात हे ती आधीपासूनच जाणून होती.
तिला ज्याप्रमाणे पराक्रम आवडत असे. त्याप्रमाणे तिला विशेष करुन पराक्रमाच्या गोष्टीही आवडत. तिला पराक्रमाच्या गोष्टी तिची आजी रुपसुंदरी सांगत असे.
ती राजधानी शेजारी असलेल्या रोपवाटीकेत जायची आणि विचार करायची की आपण काय करायला हवं. जसजसी ती तरुणाईत येवू लागली. तसतसी ती राजांच्या परीक्रमांच्या गोष्टी ऐकायला लागली. त्यातच अगदी कमी वयात पृथ्वीराज जिंकत असलेल्या लढाईचं वर्णनही ती ऐकायची.
पृथ्वीराज लहान होता. तरी तो एकटा घोड्यावर स्वार होवून दिल्लीला त्याचे आजोबा अनंगपालला भेटायला जायचा. वाटेत काही इर्षावान राजे त्याची वाट अडवत. त्यावेळी तो त्यांचा मुकाबला करायचा. त्यातच हिंस्र प्राण्यांचाही. एकदा तर त्यानं एका सिंहाशी टक्कर घेवून त्याचा जबडाही फाडला होता.
राजा जयचंदाची मुलगीही कधीकधी अनंगपालच्या घरी जायची. कारण तिचेही दिल्ली दरबाराशी संबंध होते नव्हे तर तिची नाळ दिल्ली दरबाराशी जुळलेली होती. त्यातच या दिल्लीमध्ये तिची एकदा पृथ्वीराजशी भेट झाली.
पृथ्वीराजही तरुण झाला होता. त्याचे विवाहही झाले होते. पण तरीही तो सुंदर दिसत होता. तसं त्याला पहिल्यावेळी पाहताच तो तिला आवडला आणि ती त्याच्या प्रेमात पडली.
जसजसे दिवसं जावू लागले. संयोगीतेचं प्रेम तसतसं वाढायला लागलं होतं. तिला तोच तिच्या स्वप्नातही दिसत होता. त्यातच तोच आपल्याला पती म्हणून मिळावा हेही तिच्या मनानं हेरलं होतं. जसजसे दिवसं जावू लागले. तसतसे तिला राहावसं वाटत नव्हतं.
आपली मुलगी संयोगीता वयात येत आहे हे पाहून राजा जयसिंगाला तिच्या विवाहाची चिंता पडली. एकदा त्यानं संयोगीतेला विचारलं की तिचा विवाह करायचा आहे. तेव्हा तिच्या मनात असलेलं तिनं सांगावं. तसं राजपुतांमध्ये इच्छित वर मिळविण्याची मुभा होती. संयोगीता म्हणाली,
"पिताश्री, माझ्या मनात पृथ्वीराज असून मला पृथ्वीराज सोबतच विवाह करायचा आहे. काय आपण सहमती द्याल."
"पुत्री, काय म्हटलं. विवाह अन् तोही पृथ्वीराज सोबत! तुला कळतंय तरी का की तो आपला शत्रू आहे."
"ते वैगेरे काही नाही पिताश्री. मी त्याला मनापासून वरलं म्हणजे वरलं. मी त्याला माझ्या ह्रृदयात बसवलं आहे. मी विवाह करील तर त्याचेशीच करील."
"पुत्री, तू वेडी तर झाली नाही. हं,मी तुझ्यासाठी एक करु शकते. ते म्हणजे तुझं स्वयंवर घोषीत करु शकते. मग जो राजा तुला आवडेल. त्याच्याशी तू विवाह करु शकते."
"अन् नाही आवडला तर........"
"आवडेलच तुला. देशोदेशीचे राजकुमार येतील. शुरवीर. तसं पाहिलं तर पृथ्वीराज माझ्या दरबारातील द्वारपाल शोभू शकतो. मी तर त्याची मुर्ती बनून द्वारपालच्या जागेवर ठेवेल. त्याची योग्यताच द्वारपाल बनण्याची आहे."
"पिताश्री, तो शुरवीर आहे. माहित आहे एकदा त्यानं वाघाचाही जबडा फाडला होता. अन् विशेष म्हणजे त्यानं चित्रलेखालाही संरक्षण दिलं होतं."
"हो, ते सगळं बरोबर आहे. पण पुत्री तो आहे आपला शत्रू ना. माहित आहे, ज्यावेळी त्याचे वडील सोमेश्वरचं युद्ध झालं. त्याला मदत कोणी केली होती?"
"कोणी केली होती?"
"तुझ्या आजोबानं. अन् बदल्यात काय मिळालं आपल्याला? आपण हिरावून बसलो तुझ्या आजोबांना. माहित आहे तुला. सोमेश्वरनं जर मनात विचार केला असता तर माझे वडील विजयचंद वाचले असते. पण सोमेश्वरनं तसं केलं नाही. कारण त्याचा डोळा होता आपल्या कनौजवर. अन् दुसरी गोष्ट. जेव्हा परत यवनानं अजमेरवर राज्यावर आक्रमण केलं. तेव्हाही मी प्रत्यक्ष लढाईत भाग घेवून यवनावर विजय मिळवला. पण काय झालं, माहित आहे. मी जबर जखमी झालो. बरं झालं तुझे दुसरे आजोबा जयमल आले आणि त्यांनी मला वाचवलं. म्हणून मी वाचलो. नाहीतर मी आज दिसलो नसतो. अन् हो हे राज्यही दिसले नसते."
"पिताश्री तुम्ही गैरसमजुतीचे शिकार झाले आहात. तुम्हाला कसं समजवावं तेच मला कळत नाही."
"ते काही नाही. तू त्याचा नाद सोड म्हणजे सोड."
संयोगीता चूप बसली. तिला काय करावं तेच सुचत नव्हतं. त्या दिवसापासून ती अगदी रुक्ष वाटत होती. तिचं जेवणही कमी झालं होतं. तिला सारखी पृथ्वीराजचीच आठवण येत होती.
तिला येणारी पृथ्वीराजची आठवण तिला बेचैन करुन जात होती. काय करावं ते सुचत नव्हते. वडील जयचंदाला तिनं समजावून पाहिलं. परंतू काहीच उपयोग झाला नाही. तसं तिला वाटलं. आपण एक पत्र लिहावं पृथ्वीराजला आणि ते पत्र पाठवावं पृथ्वीराजला. तसा विचार तिच्या मनात येताच तिनं पृथ्वीराजला पत्र लिहिलं. त्यात लिहिलं की
'हे प्रियवरा, मी तुम्हाला मनापासून वरले आहे. तुम्हालाच माझे प्राणनाथ बनविण्याची इच्छा आहे. पण यात माझे वडील जयचंद यांचा विरोध आहे. काय करावे सुचत नाही. मी तुमचे किस्से स्वतः या कानानं ऐकले आहेत. तुमचं सिंहाचं तोंड फाडण्याचं धाडस इतर कुणाही राजकुमारांना जमणार नाही. तुमचं दिल्लीला एकटं जाणं हे कुणालाही जमणार नाही. एवढं विलक्षण धाडस तुम्ही केलं आहे. एवढंच नाही तर तुम्ही या लहान वयात अनेक लढायात पराक्रम केलेला असून तुम्ही शुरवीर आहात असे मला वाटते. तेव्हा तुम्ही जर खरंच शुरवीर असाल तर मला या जोखडातून मुक्त करुन न्याल व माझ्याशी विवाह कराल एवढीच आशा करते.
तुमचीच सखी
संयोगीता
************************************
संयोगीताचं प्रेम वाढत चाललं होतं. त्याचबरोबर तिच्या आशाही वाढत चालल्या होत्या. तिचे पत्रावर पत्र पृथ्वीराजला जयचंदाच्या आडून पाठवणे सुरु होते. त्याचे उत्तरही पृथ्वीराज पाठवून तिच्या मनात आशा पल्लवीत करीत होता. त्यातच संयोगीताला आता दिवस काढणे कठीण झाले होते. तिची कांती सुकत चालली होती. तिचे ओठ सुकत चालले होते. चेहरा निस्तेज पडत चालला होता. डोळ्याखाली काळी वर्तूळं फेर धरुन नाचू लागली होती. ओठावर काळा रंग येवून ठेपला होता.
जयचंदचं आपल्या मुलीकडं जेव्हा लक्ष गेलं. तेव्हा त्याच्या मनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. त्याला कारण तेही नेमकं कोणतं ते कळायला मार्ग नव्हता. त्याला वाटायला लागलं की असंच जर सुरु राहिलं तर एक दिवस आपली मुलगी आपल्या हातातून जाईल. तसा तो विचार करु लागला. विचाराअंती त्यानं संयोगीतेची भेट घेतली.
"संयोगीता, असं कोणतं कारण आहे की तू एवढी निराश दिसतेय?"
"..........." संयोगीता काहीच बोलली नाही. तसा पुन्हा जयचंद म्हणाला.
"संयोगीता, मी काय म्हणत आहे. ते कळत आहे का?"
संयोगीता भानावर आली. तशी म्हणाली,
"काय पिताश्री?"
"मी म्हटलं तू अशी उदास का? काय कारण आहे?"
"काही नाही पिताश्री." संयोगीता बोलली.
संयोगीता बोलली खरी. पण त्या बोलण्यानं राजा जयचंदाला अजून चिंतेत टाकलं. तोही विचार करु लागला. त्यातच त्याला विचार आला की आता आपल्या मुलीचा विवाह करायला हवा.
************************************
संयोगीता खुप लाडाची मुलगी होती जयचंदाची. तो संयोगीतेवर निरतिशय प्रेम करीत होता. त्यामुळं त्याला चिंतेची गोष्ट वाटत होती. ती चिंता त्याला सतावत होती की तिचा विवाह करायला हवा.
आज जयचंद विचार करीत होता की संयोगीताचा विवाह हा करणे भाग आहे. कारण तो विवाह जर केला तर आपली मुलगी सुखी होईल असं त्याला वाटलं. त्यातच त्यानं विवाह करण्यासंबंधी संयोगीतेची भेट घेतली. म्हणाला,
"बाळ संयोगीता. तू उपवर झाली आहेस. तुझा विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा तू तुझ्या विवाहासाठी तयार हो. सांग तुझ्यासाठी मुलगा पाहू की तुझा विवाह स्वयंवर पद्धतीनं करु?"
जयचंदाचा प्रश्न. संयोगीता म्हणाली,
"पिताश्री, आपल्याला जसं वाटते तसं करा."
जयचंद स्वतःला चक्रवर्ती राजा म्हणवत होता. त्याला त्याचं चक्रवर्तीपण जाणवत होतं. त्यातच त्यानं स्वयंवराची घोषणा केली.
ज्यावेळी राजा जयचंदानं संयोगीताच्या स्वयंवराची घोषणा केली. त्यावेळी त्यानं त्या स्वयंवराचं आमंत्रण सा-या राजारजवाड्यांना दिली होती. ते राजेरजवाडे जे संयोगीतेला पसंत नव्हते. पण पृथ्वीराजला काही त्यानं सुचना दिली नाही. त्यातच त्यानं बाकी राजेरजवाड्यांना दाखविण्यासाठी पृथ्वीराजचा पुतळा बनवला. तसेच तो पुतळा आपल्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्याची घोषणा केली. तो पुतळा बनविण्यामागेही काहीतरी त्याचा हेतू होता. तो हेतू म्हणजे पृथ्वीराजचा अपमान करणे.
संयोगीताला त्यानं सांगीतलं की तिनं तिच्या पसंतीच्या इच्छीत वराला निवडावं. जो तिच्या आवडीचा असेल.
************************************
संयोगीतेचा स्वयंवर जाहिर झाला होता. त्यातच जयचंद पृथ्वीराजचा पुतळा बनवून तो पुतळा प्रवेशद्वाराजवळ ठेवणार आहे हेही जाहिर झालं होतं. त्यातच आपल्या वडीलाचा डाव संयोगीतेला समजून आला होता. तशी ती विचार करु लागली त्यावर उपाय काढण्याचा. क्षणातच तिला उपाय सापडला. आपण त्या पुतळ्यालाच वरमाला घालावी. जेणेकरुन राजा पृथ्वीराजच आपला पती बनेल. त्यानंतर जे होईल ते पाहिलं जाईल.
विचाराचा अवकाश.........तिनं पृथ्वीराजला चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीत पृथ्वीराजला स्वयंवराची संपुर्ण माहिती दिली आणि येण्याचं आमंत्रण दिलं. त्यातच त्या पुतळ्याचीही कल्पना दिली आणि सांगीतलं की पृथ्वीराजनं यावं व तिला घेवून जावं. जर शुरवीर असेल तर.
ती पृथ्वीराजची परीक्षाच होती. संयोगीतेवर तो प्रेम करीत होता. त्याला वाटत होतं की त्याला संयोगीता मिळावी. त्यामुळं त्यानं योजना बनवली.
स्वयंवराचा दिवस उजळला होता. त्या दिवशी राजा जयचंदनं एक पुतळा बनवला होता. तो पुतळा प्रवेशद्वारापाशी ठेवला. तसं पाहता सर्वत्र आसनं ठेवण्यात आली होती. त्या आसनावर देशोदेशीचे राजे बसले होते. त्या राजांच्या मिशा लांब लांब होत्या. त्या मिशांवर ते सारखे सारखे पीळ देत होते. त्या सर्व राजांना वाटत होतं की त्यांच्याएवढा शुरवीर जगात कोणीच नाही. अशात विवाहसभेत पृथ्वीराजही जातीनं हजर होता. तो योजनेनुसार त्या पुतळ्याच्या आड लपला होता. त्याला माहित होतं की संयोगीता ज्यावेळी पुतळ्याला वरमाला घालायला येईल. त्यावेळी आपण बाहेर निघून संयोगीतेला घेवून पळून जावं.
या ठिकाणी केवळ पृथ्वीराजच नाही तर त्याचे काही मात्तबर सेवकही हजर होते. त्यात कैमारही होता.. पण ते वेगवेगळ्या पोशाखात हजर होते.
संयोगीतेला सजविण्यात आले होते. तिनं लाल वस्र घातले होते. त्यातच तिच्या हातात वरमाला देण्यात आली. ठरल्याप्रमाणे संयोगीता बाहेर आली. तिच्या हातात वरमाला होती. तसा राजपंडीत तिला घेवून एका एका राजकुमाराजवळ जावू लागला. त्यातच त्या राजकुमाराचा परीचयही सांगू लागला. त्यातच तो परीचय सांगत असतांना ते राजकुमार स्वतःच्या मिशांना पीळ काढू लागले.
एक एक करता करता सर्व राजकुमार संपले होते. आता जयचंदाला चिंता पडली होती की ती विवाहासाठी एकतरी वर निवडणार की नाही. तोच तो म्हणाला,
"पुत्री या राजकुमारांमधून एकतरी वर निवड कर."
जयचंदाचं ते बोलणं राजकुमारी संयोगीतानं न ऐकल्यासारखं केलं. तसं तिनं इकडं तिकडं पाहिलं. तिला योजनेनुसार तो पुतळा दिसला.. तशी धावतच ती त्या पुतळ्याजवळ गेली.त्याला अक्षदा लावल्या व त्याला वरमालाही घातली.
संयोगीता करीत असलेलं दृश्य सगळे राजकुमार पाहात होते. ते म्हणाले,
"पुतळा! या पुतळ्याशी विवाह केला!" ते हसत होते. तोच त्या पुतळ्यापाठीमागे लपलेला पृथ्वीराज बाहेर आला. त्यानं आपल्या म्यानातून तलवार उपसली. तसा तो म्हणाला,
"चूप बसा राजकुमारांनो, आता हसू नका. मी या संयोगीतेचा पती. अजमेरचा राजा पृथ्वीराज. सोमेश्वरपुत्र पृथ्वीराज. नियमानुसार ही माझी पट्टराणी झालेली आहे. हिनं माझ्याच पुतळ्याच्या गळ्यात वरमाला घातलेली आहे. त्यामुळं ती वरमाला माझ्याच गळ्यात पडली आहे असं समजण्यात काहीच हरकत नाही. अन् ज्या ज्या राजांना ही गोष्ट मान्य नसेल. त्यांनी माझ्याशी युद्ध करावं.
दरबारात वेगवेगळे राजे महाराजे होते. पृथ्वीराजचं आव्हान ऐकताच त्यांचं पित्त खवळलं. ते लढाईसाठी तयार झाले. पृथ्वीराज लढू लागला त्या वीरांशी. त्यानं थोड्याच वेळात काही राजांचा पराभव केला. परंतू त्याच दरबारात जयचंदही ते दृश्य पाहात होता. त्यानं आपले सैन्य घेतले व तोही सैन्यतुकडी घेवून मैदानात आला. तोच त्यानं पाहिलं की त्याची मुलगी ही पृथ्वीराजच्या पाठीमागं बसलेली होती. त्याचा अर्थ असा निघत होता की राजा पृथ्वीराजने संयोगीताचे अपहरण केलेले नसून नियमानुसार संयोगीतानेच पृथ्वीराजचे अपहरण केलेले आहे. त्यामुळं नाईलाजानं जयचंदला चूप बसावं लागलं.
सर्व राजे महाराजे पृथ्वीराजशी लढत होते. हे पाहून बरी वेळ नाही याचा विचार करुन पृथ्वीराज संयोगीतेला घेवून पळून जावू लागला. त्यातच त्याच्या मातब्बर सामंतांनी बाकीच्या राजांना वेठीस धरलं. परंतू आपला राजा पृथ्वीराजावर आच येवू दिली नाही. याच मुठभेडमध्ये पृथ्वीराजचा प्रधानमंत्री कैमार वीरगतीस प्राप्त झाला.
******************************************************
पृथ्वीराज व संयोगीताचा विवाह पार पडला होता. परंतू जयचंद आणि पृथ्वीराजचे आता संबंध दृढ झाले नव्हते तर त्या संबंधात आता अजून दुरावा निर्माण झाला होता. जयचंदाला आपल्या मुलीचाच नाही तर पृथ्वीराजचाही फार राग आला होता. त्यातच त्याला वाटत होतं की आता आपण जीवंत राहून बरोबर नाही. तसं पाहता जयमल त्याला भडकवीत असे.
जयचंदला संयोगीताच्या विवाहाने प्रचंड राग आला होता. काय करावे आणि काय नाही असे त्याला वाटत होते. त्यातच त्यानं जयमलचा सल्ला घेतला. त्यानं सांगीतलं की आता आपण यात घोरीची मदत घ्यावी. जी मुलगी बापाचं न ऐकता विवाह करते. तिला आणि तिच्या पतीला मारुन टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यात आपले दोन फायदे होवू शकतात.,एक म्हणजे विजयचंदच्या वधाचा बदला निघू शकतो व दुसरा फायदा म्हणजे आपल्याला दिल्लीची राजगादी मिळू शकते. कारण घोरी हा परदेशी आहे. तो या देशात राहणार नाही. तेव्हा या देशात गादीवर कोणाला बसवेल? आपल्यालाच की नाही. पण त्यासाठी घोरीकडून ती अट कबूल करवून घ्यावी लागेल हे तेवढं मात्र खरं.
आपल्या काकानं दिलेला सल्ला जयचंदला लाखमोलाचा वाटला. त्यानं घोरीला निरोप पाठवला की त्यानं हिंदूस्थानात यावं आणि आपल्याला पृथ्वीराजला हरवायला मदत करावी.
मोहम्मद घोरी. त्यालाही पृथ्वीराजला हरवायची मनापासून इच्छा होती. त्यानं यापुर्वी हिंदूस्थानवर सतरा स्वा-या केल्या होत्या. परंतू सर्वच लढाईत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतू त्यावेळी जयचंदसारखा कोणी फितूर नव्हता त्याचेजवळ की ज्याच्या साहाय्यानं तो पृथ्वीराजला जिंकू शकेल. या सतरा स्वा-यात पृथ्वीराजनं मोहम्मद घोरीला सतरा वेळा माफ केलं होतं.
ज्याप्रमाणे जयचंद आपल्या अपमानाचा व वडीलाच्या हत्येचा बदला घेवू पाहात होता. त्याप्रमाणे मोहम्मद घोरीही पृथ्वीराज पासून बदला घेवू पाहात होता. कारण पृथ्वीराज मुळंच मिहिर हुसेनची प्रेमिका त्याला मिळाली नव्हती.
बेला पृथ्वीराजची मुलगी होती. तसेच कल्याणी जयचंदची मुलगी होती. दोन्हीही त्या राजांच्या सुपुत्री नव्हत्या तर त्या हिंदूस्थानच्या सुपुत्री होत्या. तो हिंदूस्थान ज्या हिंदूस्थानावर यवनांची नजर होती.
बेला व कल्याणी लहानपणापासूनच सुंदर होत्या. तसेच त्या निर्भीडही होत्या. त्यांच्या शरारतींना हिंदूस्थान ओळखत होता.
राजा पृथ्वीराज व जयचंदाचे बिघडलेले संबंध त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. परंतू त्यांना ओळखता आले नव्हते की या आपल्या मायबापाच्या आपसी वादात उद्या घोरी आपल्याला घेवून गजनीला जाईल व आपल्याला काजीच्या स्वाधीन करेल.
भारत देश मुळापासून महान अशा शुरवीरांचा देश राहिला आहे. या शुरवीर राजेरजवाड्यांनी आपआपल्या रक्तांनी या देशाचा इतिहास लिहिलेला आहे. अशा शुरवीरांच्या यादीत स्रीयांही अग्रभागी राहिल्या आहेत. या देशात गार्गी, मैत्रेयीसारख्या शास्रोक्त खेळणा-या स्रीयांपासून तर आजच्या काळातील स्रीयापर्यंत प्रत्येक स्रीयांनी आपली भुमिका बजावली आहे. आपल्या देहाच्या शेवटच्या थेंबापर्यंत या स्रीया परकीय शत्रूंशी लढल्या नव्हे तर या स्रीयांनी मरणही पत्करलं. पण त्या कोणाच्या गुलाम झाल्या नाहीत. त्या स्रीयांनी प्रसंगी जोहार केला. पण परकीय लोकांकडून आपले शिलभंग होवू दिले नाही. त्यांनी आखरी वेळेपर्यंत भारताची अब्रू राखली.
सतीप्रथा वाईटच प्रथा होती. तरीही त्या स्रीयांंना ह्या प्रथा प्रतिष्ठेच्या वाटत होत्या. त्याचं कारण होतं त्यांची अब्रू.
भारतीय स्रीया ज्या लढल्या. त्या रांगेत गार्गी, मैत्रेयीच नाही तर आधुनिक काळातील जीजाबाई, येशूबाई, अहिल्याबाई, ताराबाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा समावेश होतो.
भारतीय इतिहासात आज जिजाबाईच नाही तर सावित्रीबाई व रमाबाईचंही नाव घेण्यात येतं. पण रमाबाईच्या जोडीला असलेल्या सविताचं नाव घेतलं जात नाही. महाराज संभाजीची पत्नी येशूबाईचं नाव घेतलं जात नाही. तसेच जो महाराज पृथ्वीराज धर्मासाठी मरण पावला. त्याचेही संभाजीसारखेच डोळे फोडण्यात आले. पण त्यानं धर्म बदलविला नाही. त्या महाराजांची पत्नी संयोगीता व तिची ननद प्रथा यांनी घोरीच्या हाती लागून आपलं शिलभंग होवू नये विदेशी लोकांच्या हातून व या भारताची अब्रू जावू नये म्हणून जोहार केला. तसेच जयचंदची मुलगी कल्याणी व पृथ्वीराजची मुलगी बेला यांनी गजनी दरबारी पृथ्वीराज व जयचंद वधाचा बदला तर घेतला. पण आपलं शिलभंग होवू नये म्हणून आत्मबलिदान पत्करलं. त्याहीपुर्वी झालेल्या राजा दाहिरच्या मुली परिमल व सुर्यकुमारींनी याच भारताची अस्मीता अबाधीत ठेवण्यासाठी बदला घेवून आत्मबलिदान पत्करलं. परंतू आज समाजाला बेला, कल्याणी, परीमल व सुर्यकुमारी नेमक्या कोण? हे काही अजूनही माहित नाही. त्यातच संयोगीताही ब-याच जणांना माहित नाही.
राजकुमारी बेला व कल्याणी तसेच राजकुमारी परीमल व सुर्यकुमारी या ख-याा विरांगणा की त्यांनी हिंदूस्थानला अपमानीत करणा-या विदेशी लोकांना सबक तर शिकवलाच. व्यतिरीक्त या भारतातंही शिलभंग होवू दिलं नाही. तसेच महाराज संभाजीच्या कैदेनंतर जराही न डगमगता मराठ्यांचं साम्राज्य शाबूत ठेवणारी येशूबाई तसेच राजारामाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत औरंगजेबाला शिकस्त देणारी महाराणी ताराबाईंनी मराठी साम्राज्य टिकवून ठेवलं. त्या विरांगणांनाही आज आठविण्याची गरज आहे.
आज या हिंदूस्थानच्या धरणीवर अनेक स्रीया अशा झाल्या की ज्यांचे पती रणमैदानावर वीरगतीस प्राप्त झाले.. पण त्याही डगमगल्या नाहीत. त्यांनी परकीय लोकांचा मुकाबला केला. बदले तर घेतले. पण देशाची अब्रू जावू दिली नाही. त्या स्रीयांसमोर खरं तर भारतीय लोकांनी नतमस्तकच व्हायला हव. पण आमचा भारतीय समाज हा खरं तर स्वार्थी आहे. तो फक्त आपला स्वार्थ पाहतो. यामुळंच हा भारतीय समाज विदेशी लोकांचे गुलाम झाला. तसेच त्यांचे गंभीर परीणाम देशातील सर्वसामान्य जनतेला भोगावे लागले.
महत्वाची गोष्ट अशी की आजच्या या भारतीय समाजानं आज तरी सुधरावं. स्वार्थपणा सोडावा व चांगलं वागावं. जेणेकरुन पुढच्या पिढीला कधीतरी गुलाम व्हावे लागणार नाही व गुलामी सहन करावी लागणार नाही.
************************************************************************************************
जयचंदच्या बोलावण्यानुसार मोहम्मद घोरी अठराव्या वेळी भारतात आला. त्यानं पृथ्वीराजला संदेश पाठवला की त्यानं यावेळी शरणागती पत्करावी व इस्लाम कबूल करावं. कारण यावेळी तो पुष्कळ फौजफाट्यासह भारतात आला आहेे. यावेळी तो कोणाला हारणार नाही. तसं पाहता प्रत्येकवेळीच घोरी भारतात येवून अशाप्रकारच्या धमक्या द्यायचा. पण जेव्हा तो पराभव पत्करायचा. तेव्हा आपोआपच शरणागती पत्करुन पृथ्वीराज त्याला माफ करुन द्यायचा. ह्या धमक्या आज पृथ्वीराजच्या अंगवळणी पडल्या होत्या. त्यातच त्यानं हार मानली नाही. त्याला माहित होतं की यावेळी जयचंदही मोहम्मद घोरीला मिळाला आहे.
घोरीच्या जाचक अटी.. म्हणे इस्लाम कबूल कर. पण स्वाभिमानी व आपल्या धर्माचा प्रेमी असलेल्या राजा पृथ्वीराजनं मोहम्मद घोरीच्या अटी मान्य केल्या नाहीत.. त्यातच युद्ध झालं. त्या युद्धात मोहम्मद घोरीचा पराभव झाला आणि आता घोरीवर पृथ्वीराज आपल्या धनुष्यातून बाण चालविणार. तोच सुर्य मावळला आणि हिंदूस्थानच्या युद्धाच्या नियमानुसार मोहम्मद घोरी वाचला.
रात्र झाली होती. मध्यरात्र ओसरली होती. पृथ्वीराज झोपला होता अगदी गाढ. त्याचबरोबर त्याचे सैनिकही गाढ झोपेत गेले होते. मात्र अजूनही मोहम्मद घोरी जागाच होता आपल्या काही निवडक सैनिकांसह. तो आपल्या सैनिकांना चिथावण्या देत होता. तसं त्यानं त्याच रात्री जयचंदाची भेट घेतली. म्हणाला,
"आलमवीर जयचंदा, आमच्यावर तुम्ही आमच्या बाजूनं असतांनाही पृथ्वीराज भारी पडतोय. आज आमचा पराभव झाला. आमचा जीवच जात होता आज. पण सुदैवानं आम्ही वाचलो. तो तुमचा सुर्य अस्तास गेला म्हणून आम्ही वाचलो. आम्ही सुर्याला मानत नाही. चंद्रास मानतो. तरीही तुमच्या सुर्यानं वाचवलं आम्हास. पण नाही. आम्ही आमच्या चंद्राची साक्ष घेवून सांगतोय की तुमच्या कोणत्याही हिंदूस्थानच्या राजाला आम्हाला पराजयी करता येत नाही..,तेव्हा काय करावे ते सांगावे आम्हास."
राजा जयचंद चूप होता.तो विचार करीत होता. पृथ्वीराजला कसं हरवता येईल व अपमानाचा कसा बदला घेता येईल. तसा मोहम्मद घोरी म्हणाला,
"सांगावे आलमवीर. काही सल्ला द्यावा आम्हास."
"मी काय सल्ला देणार तुम्हास."
"मग मीच सांगतो तुम्हाला सल्ला. पटते काय ते बघावं."
"बरं. सांगा तुमच्या मनात काय आहे ते." जयचंद म्हणाला. तसा मोहम्मद घोरी सांगू लागला.
"या चंद्राच्या साक्षीनं सांगतोय. आम्ही पृथ्वीराजवर आताच स्वारी करतोय."
"म्हणजे?" जयचंद म्हणाला.
"आता यावेळी."
"पण आता तर रात्र आहे."
"मग कोणं सांगीतलं की रात्री युद्ध करायचं नसतं."
"पण आमच्याकडे रात्री युद्ध करायचा नियम नाही.,आमच्याकडे सुर्य मावळला की युद्ध बंद होतंय. तसं निहत्यार व्यक्तींवर स्वारी करता येत नाही."
"ते तुमच्या देशाचे नियम झाले. आमच्या देशाचे नियम नाही. हं, युद्ध जिंकायचं आहे ना. मग सारे नियम धाब्यावर बसवूनच जिंकावं लागेल की नाही. हं मला सांगा, तुम्हाला दिल्लीचा वजीरेआलम बनायचं आहे ना?"
"म्हणजे?"
"म्हणजे दिल्लीचा बादशाहा. आलमवीर दिल्ली सल्तनत का."
"होय."
"मग आम्ही जसं करतो त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही ही लढाई जिंकतपर्यंत चूप बसा म्हणतो."
"पण यावेळी राजा पृथ्वीराज हा निहत्ता असेल."
"म्हणजे?"
"शस्र नसेल ना त्याच्या हातात."
"मी सांगीतलं नाा आधी की ते तुमच्या हिंदूस्थानचे नियम झाले युद्धाचे. आमचे नाही. आम्हाला हो हे युद्ध जिंकण्यासाठी आमच्या नियमानं चालू द्यावे. तुम्हाला दिल्ली सल्तनतचे राजे बनवायचे आहे ना. मग चूप बसावे तुम्ही."
जयचंद चूप बसला. त्याला दिल्लीचा राजा पृथ्वीराज नसावा असे वाटत होते. त्यातच त्याला स्वतः दिल्ली दरबाराचा राजा बनायचे होते.
****************************************************************************************
ती रात्र पृथ्वीराजसाठी काळरात्र ठरली होती. कारण त्याच रात्री पृथ्वीराज पकडला जाणार होता मोहम्मद घोरीच्या नियमाच्या पायमल्लीनं.
जयचंद चूप बसताच घोरी आपल्या सैनिकांना म्हणाला,
"सांगीतल्यानुसार सर्वजण तयार आहात ना."
घोरीच्या बोलण्यानुसार सर्वांनी होकार दिला. त्याचबरोबर सर्व सैनिक महाराज पृथ्वीराजच्या शामियानाकडे चालू लागले. ज्या ठिकाणी महाराज पृथ्वीराज गाढ झोपेत होते. तसा पृथ्वीराज सापडताच मोहम्मद घोरीनं त्याच्या मानेवर तलवार लावली व त्याला बंदी बवनलं. तसा कल्लोळ झाला व त्या कल्लोळात सगळे पृथ्वीराजचे सैनिक सैरावैरा जीव वाचवीत पळायला लागले. त्यातच मोहम्मद घोरीचे सैनिक पृथ्वीराजच्या सैन्याला सैरावैरा राक्षसासारखे कापत सुटले होते. तसं पाहता महाराज पृथ्वीराज बंदी झाल्यानं पृथ्वीराज युद्ध हारला होताच. तसा पृथ्वीराज डोळे कुस्कारत म्हणाला,
"कोण कोण?"
"मी घोरी. तुला बंदी बनवायला आलोय."
"हा कोणता नियम? एवढ्या रात्री बंदी बनविण्याचा नियम कोणी बनवला? तू समोर ये मर्द असशील तर......."
पृथ्वीराजनं असं म्हणताच मोहम्मद घोरीनं त्या महान राजाच्या कानशिलात एक भडकावली. तसेच त्याचे मुख दोन बोटाच्या चिमटीत धरुन त्या अंधा-या रात्री अक्राळ विक्राळ चेहरा करीत म्हणाला,
"चूप बस. आता जर गुस्ताखी करशील तर तुझी गर्दनच उडवीन." परंतू तो सिंहाचा जबडा फाडणारा महाराज पृथ्वीराज होता. तसा तो आपल्या सैनिकांना म्हणाला,
"घेवून चला रे तिकडे आपल्या गजनीला. याला गजनीला पाहून घेवू."
मोहम्मद घोरीचे ते शब्द. त्यासाठी त्यांनी महाराजा पृथ्वीराजला त्या भयाण रात्री साखळदंडात जखडलं व राजाच्या मदतीला कोणी येवू नये व आपल्या तावडीतून पृथ्वीराज सुटू नये म्हणून तेवढ्याच रात्री त्याला गजनीला रवाना केलं गेलं. ती तेवढीच भयाण रात्र. ज्याप्रमाणे मोहम्मद घोरीनं पृथ्वीराजला बंदी बनवलं आणि आदेश दिला की याला गजनीला घेवून चला. तसाच दुसराही आदेश दिला की या राज्यात असणा-या या राजांच्या सगळ्या राण्या व याच्या कन्यांनाही घेवून चला गजनीला. त्याचबरोबर त्याचा गुलाम कुतूबुद्दीन ऐबक ती तयारी करु लागला. पृथ्वीराजच्या त्या राण्यांना गजनीला नेण्यासाठी. तसेच त्याचबरोबर त्यांच्या दरबारातील अनेक सुंदर सुंदर मुलींना तसेच त्याच्या मुलींनाही गजनीला नेण्यासाठी. ज्या राजानं आतापर्यंत सतरा वेळा स्वा-या करुन हारणा-या मोहम्मद घोरीला माफ केलं. त्या राजाचा एकदाच व तोही पहिल्या वेळी पराभव होताच त्याचेसोबत असं वर्तन करतांना मोहम्मद घोरीलाही वैषमयतः वाटत नव्हती.
****************************************************************************************
लाल किल्ला हा दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव लाल संगमरवरी दगडावरून पडलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला गेला. दिल्लीच्या ऐतिहासिक, जुन्या दिल्ली भागात लाल किला किंवा लाल किल्ला लाल वाळूचा खडकांनी बनलेला आहे. हा किल्ला पाचव्या मुघल बादशहा शाहजहांने बांधला होता. या ऐतिहासिक किल्ल्याची २००७ साली युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून निवड केली होती.
मोज माप. लाल किला सलीमगडच्या पूर्वेकडील बाजूला आहे. लाल वाळूचा खडकाच्या तटबंदी आणि भिंतींमुळे हे नाव पडले. यामुळेच त्याला चार भिंती बनतात. ही भिंत १.५ मैल (२.५ कि.मी.) लांबीची असून नदीच्या काठापासून ६० फूट (१६ मीटर) उंच आणि शहरातून ११० फूट (३५ मीटर) उंच आहे. याचे मोजमाप केल्यानंतर असे लक्षात आले कि, ८२ मीटर चौरस ग्रीड (चौखाना) वापरण्याची योजना आखली गेली आहे. लाल किल्ल्याचे पूर्ण नियोजन केले होते आणि त्यानंतरच्या बदलांमुळे त्याच्या योजनेच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल होऊ दिला नाही, अठराव्या शतकात त्यातील बर्याच भागांचे नुकसान काही दरोडेखोरांनी व हल्लेखोरांनी केले होते. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्याच्या युद्धानंतर हा किल्ला ब्रिटीश सैन्याच्या मुख्यालयाच्या रूपात वापरला जात असे. या सैन्याने आपल्या जवळपास ऐंशी टक्के मंडप आणि बागांचा नाश केला. ही नष्ट केलेली बाग आणि उर्वरित भाग पुनर्संचयित करण्याची योजना उम्मेद दानिश यांनी १९०३ मध्ये सुरू केली.
हा किल्ला आणि राजवाडा हा शहजानाबाद मध्ययुगीन शहराचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. लाल किल्ल्याची योजना, व्यवस्था आणि सौंदर्य हे मुगल सर्जनशीलताचे शिरोबिंदू आहेत, जे शाहजहांच्या कारकिर्दीत शिखरावर पोहोचले. या किल्ल्याचे बांधकाम झाल्यानंतर स्वत: शाहजहांने बरीच विकास कामे केली. औरंगजेब आणि शेवटच्या मोगल राज्यकर्त्यांनी बरेच विकासकाम केले. ब्रिटिश काळात १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यानंतर संपूर्ण ढाच्यामध्ये बरेच मूलभूत बदल केले गेले. ब्रिटीश काळात हा किल्ला प्रामुख्याने तळ म्हणून वापरला जात असे. स्वातंत्र्यानंतरही २००३ पर्यंत अनेक महत्त्वाचे भाग सैन्याच्या नियंत्रणाखाली राहिले. लाल किल्ला हा मोगल सम्राट शाहजहांची नवीन राजधानी शाहजहानाबादचा राजवाडा होता. हे दिल्ली शहराचे सातवे मुस्लिम-नगर होते. आपल्या राजवटीची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी तसेच नवीन बांधण्याच्या महत्त्वाकांक्षेला नवीन संधी देण्यासाठी त्यांनी आपली आग्रा येथील राजधानी बदलून दिल्ली येथे स्थलांतरित केली. हे देखील त्याचे मुख्य हेतू होते. हा किल्ला देखील ताजमहाल आणि आग्रा किल्ल्याप्रमाणे यमुना नदीच्या काठावर वसलेला आहे. त्याच नदीच्या पाण्याने किल्ल्याला वेढले व खंदक भरला. त्याच्या ईशान्य दिशेची भिंत जुन्या किल्ल्याला वेढलेली होती, त्याला सलीमगडचा किल्ला देखील म्हटले जाते. सलीमगड किल्ला इस्लाम शाह सूरी यांनी १५४६ मध्ये बांधला होता. लाल किल्ल्याचे बांधकाम १६३८ मध्ये सुरू झाले आणि १६४८ मध्ये ते पूर्ण झाले. परंतु काही मतांनुसार, याला प्राचीन किल्ला आणि लालकोट शहर असे म्हटले जाते, ज्याला शाहजहांने ताब्यात घेतला आणि तो बांधला. लालकोट बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात राजा पृथ्वीराज चौहान यांची राजधानी होती. ११ मार्च १७८३ रोजी शीखांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि दिवाण-ए-आम ताब्यात घेतला. मोगल वझिरांनी आपल्या शीख साथीदारांना शहरात आत्मसमर्पण केले. करोर सिंघिया मिस्लचे सरदार बघेलसिंग धालीवाल यांच्या आदेशाखाली हे काम झाले.
वास्तुकला. लाल किल्ल्यात उच्च दर्जाचे कला आणि कलाकारांचे कार्य आहे. इथली कलाकृती पर्शियन, युरोपियन आणि भारतीय कला यांचे संश्लेषण आहे, ज्याचा परिणाम विशिष्ट आणि वेगळी शाहजहानी शैली होती. रंग, अभिव्यक्ती आणि स्वरुपात ही शैली उत्कृष्ट आहे. लाल किला हा दिल्लीतील एक महत्त्वाचा इमारत गट आहे, ज्यामध्ये भारतीय इतिहास आणि त्याच्या कलांचा समावेश आहे. त्याचे महत्त्व काळाच्या मर्यादेपेक्षा अधिक आहे. हे बांधकाम कौशल्य आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. सन १९१३ मध्ये, हे राष्ट्रीय महत्त्व स्मारक घोषित होण्यापूर्वी, नंतरचा काळ जपण्यासाठी आणि जतन करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याच्या भिंती अत्यंत जटिलतेने कोरलेल्या आहेत. दिल्ली दरवाजा आणि लाहोर दरवाजा या दोन मुख्य दरवाजांवर या भिंती खुल्या आहेत. लाहोर गेट हे मुख्य प्रवेशद्वार आहे. आत चट्टे चौक आहे, ज्याच्या भिंती दुकाने लावलेल्या आहेत. यानंतर एक मोठी मोकळी जागा आहे, जिथे ते लांब उत्तर-दक्षिण रस्ता विभागते. हा रस्ता किल्ल्याला सैन्य व नागरी वाड्यांच्या काही भागात विभागत असे. या रस्त्याच्या दक्षिण टोकाला दिल्ली गेट आहे.
कोरीव काम. लाहोर गेट ते चट्टा चौक जाणाऱ्या रस्त्यापासून पूर्वेकडील मैदानाच्या पूर्वेकडील बाजूला कार्निवल बांधले गेले आहे. हे संगीतकारांसाठी राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे.
दीवान-ए-आम. या गेटच्या पलीकडे आणखी एक मोकळे मैदान आहे, जे दिवाणे-ए-आमचे अंगण असायचे. दिवाण-ए-आम. सर्वसामान्यांसाठी हा मोठा अंगण होता. दिवाणच्या पूर्वेकडील भिंतीच्या मध्यभागी एक शोभिवंत सिंहासन बांधले गेले. हे सम्राटासाठी तयार केले गेले होते आणि हे सुलेमानच्या राजगादीचे प्रतिरूप होते.
नहर-ए-बहिश्त. सिंहासनाच्या मागील बाजूस शाही खासगी खोल्या स्थापण्यात आल्या आहेत. या प्रदेशात, पूर्व टोकाला यमुना नदीच्या काठावरुन उंच मंचावर बांधलेल्या घुमट इमारतींची एक पंक्ती आहे. हे मंडप नहेर-ए-बहिष्ट नावाच्या छोट्या कालव्याने जोडलेले आहेत, जे सर्व कक्षांच्या मध्यभागी जाते. किल्ल्याच्या ईशान्य टोकाला असलेल्या शाह बुर्जवर यमुनेमधून पाणी चढवले जाते, तेथून या कालव्याला पाणीपुरवठा होतो. हा किल्ला कुराणात नमूद केलेल्या स्वर्ग किंवा स्वर्गानुसार तयार करण्यात आला आहे. येथे लिहिलेला एक श्लोक म्हणतो,
पृथ्वीवर कुठेही स्वर्ग असल्यास, ते येथे आहे, ते येथे आहे, ते येथे आहे. हा वाडा मूळतः इस्लामिक स्वरुपात बनविला गेला आहे, परंतु प्रत्येक मंडप त्याच्या वास्तुशिल्पामध्ये हिंदू वास्तुकला प्रकट करतो. लाल किल्ल्याचा राजवाडा शाहजनी शैलीचा उत्कृष्ट नमुना दर्शवितो.
राजवाड्यातील दक्षिणेकडील दोन वाडे स्त्रियांसाठी बनवले आहेत, त्यांना जनाना म्हणतात: मुमताज महल, जो आता एक संग्रहालय बनले आहे आणि रंग महल, ज्यात संगमरवरी तलावांची छप्पर आहेत, ज्यामध्ये नाणार-ए-बहिष्तात पाणी आहे.
दक्षिणेकडील तिसरा मंडप म्हणजे खास महल. त्यात शाही खोल्या आहेत. यामध्ये रॉयल बेडरूम, प्रार्थना हॉल, व्हरांडा आणि मुसम्मन बुर्ज यांचा समावेश आहे. या बुर्ज्यासह, सम्राट जनता पाहत असे.
पुढील मंडप म्हणजे दिवाण-ए-खास, जे राजाचे स्वतंत्र-खासगी असेंब्ली हॉल होते. हे सचिवात्मक आणि कॅबिनेट आणि नगरसेवकांसह बैठकींसाठी वापरले जाते, मंडपामध्ये पेट्रा ड्युरापासून फुलांच्या आकाराचे बनविलेले खांब आहेत. त्यात सोन्याचे नाणीही आहेत, आणि मौल्यवान रत्नेही आहेत. त्याची मूळ छप्पर लाकडे बांधलेल्या छतासह बदलले गेले आहे. यात आता चांदी सोन्याने सजली आहे. पुढील मंडप हमाम आहे, जो एक शाही स्नान होता, आणि तुर्की शैलीमध्ये बनविला गेला आहे. येथे संगमावर मुगल अलंकार आणि रंगीबेरंगी दगड आहेत.
हमामाच्या पश्चिमेला मोती मशिदी बांधली आहे. पुढे ते १६५९ मध्ये बांधले गेले होते, ते औरंगजेबाची खासगी मशीद होती. हे लहान तीन घुमटाकार, कोरीव पांढर्या संगमरवरीचे बनलेले आहे. याच्या मुख्य उपखंडात तीन कमानी आहेत ज्या अंगणात उतरतात.ज्या ठिकाणी फुलांचा गुच्छ आहे. हयात बख़्श बाग
याच्या उत्तरेस हयात बक्ष बाग नावाचा एक मोठा औपचारिक बाग आहे. याचा अर्थ जीवनाची बाग. दोन कुळांनी हे दुभाजक आहे. एक मंडप उत्तर दक्षिण कुल्याच्या दोन्ही टोकांवर वसलेला आहे आणि तिसरा नंतर १८४२ मध्ये शेवटचा मोगल सम्राट बहादूर शाह जफरने बांधला होता. हे दोन्ही क्रूच्या सभेच्या मध्यभागी तयार केले गेले आहे. मुघल सम्राट शाहजहानने ह्या किल्ल्याला इ.स. १६३८ साली बांधण्यास सुरुवात केले व तो इ.स. १६४८ मध्ये पूर्ण झाला. लाल किल्ला हा जगातील भव्य राजवाडयापैकी एक आहे. भारताच्या इतिहासाशी हा किल्लाचे खोल संबंध आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती.
आधुनिक युगातील महत्त्व. लाल किल्ला हे दिल्ली शहराचे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान देशाच्या लोकांना संबोधित करतात. हे दिल्लीतील सर्वात मोठे स्मारक आहे. एक वेळ असा होता की या इमारतीत गटामध्ये ३००० लोक राहत असत. पण १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर हा किल्ला ब्रिटीश सैन्याने ताब्यात घेतला आणि अनेक रहिवासी महल नष्ट झाली. हे ब्रिटिश सैन्याचे मुख्यालयही बनविले गेले. या संघर्षानंतर लवकरच बहादूर शाह जफरवर खटला चालविण्यात आला. येथेच नोव्हेंबर १९४५ मध्ये भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या तीन अधिकाऱ्यांवर कोर्ट मार्शल केली. स्वातंत्र्यानंतर १९४७ मध्ये हे घडले. यानंतर भारतीय सैन्याने या किल्ल्याचा ताबा घेतला. नंतर डिसेंबर २००३ मध्ये भारतीय सैन्याने ते भारतीय पर्यटन अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. या किल्ल्यावर डिसेंबर दोनहजार मध्ये लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यात दोन सैनिक आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. याला काश्मीरमधील भारत-पाकिस्तान शांतता प्रक्रिया विस्कळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे माध्यमांनी वर्णन केले.
लालकिल्ला हा दिल्लीला असून त्याचं बांधकाम शहाजहाननं केलेलं आहे. तो किल्ला १६४८ ला पूर्ण झाला. असं जरी असलं तरी त्याहीपुर्वी या जागेवर लालकोट नावाचा तो किल्ला होता. हे नाकारता येत नाही.
या लाल किल्ल्याला पृथ्वीराज चव्हानच्या काळात लालकोट म्हणत. कारण येथील माती ही लाल रंगाची होती. हा लालकोट पृथ्वीराज चव्हानच्याही आधी पासून अनंगपालची राजधानी राहिलेली आहे. या किल्ल्याची एक भिंत आणखी एका किल्ल्याला लागलेली आहे.त्याला सलीमगड म्हणत. या सलीमगडचा किल्ला इस्लाम शाह सुरीनं १५४६ ला बांधला. काही इतिहासकाराच्या मतानुसार या लालकोटावर शहाजहाननं कब्जा करुन त्या जागेवर लालकिल्ला बांधला. आता जर या किल्ल्याला पाहिलं हा लालकोट पूर्णतः शहाजहानी शैलीमध्ये लाल किल्ल्याच्या रुपानं उभा आहे.
या किल्ल्याला लाल किल्ला हे नाव लाल दगडामुळे मिळाले असून याच्या भिंती १.५ मील लांब म्हणजे २.५ किमी लांब आहे.नदी तटावर याची उचाई साठ फुट आहे. तसेच शहरी भागात ती उचाई एकशे दहा फुट आहे.
या किल्ल्याची कलाकृती ही फारशी, युरोपीय व भारतीयांनी केलेली असून हा किल्ला स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना आहे.
या किल्ल्यात बांधकाम केलेल्या वस्तू मध्ये नक्करखाना ही एक वास्तू होय. हा महाल खास करुन संगीतकारांसाठी बनविण्यात आला होता. दुसरी वास्तू आहे दिवाण ए आम. हे किल्ल्यातील एका मैदानाला दिलेले नाव आहे. त्यानंतर नहर ए बहिश्त. हा एक नहर आहे. नहर अर्थात कालवा. त्या ठिकाणी अनेक इमारती उभ्या आहेत. हेे अनेक इमारतीचं नाव आहे. म्हणून याला नहर ए बहिश्त म्हटलं जातं. या इमारतीत अनेक चबुतरे असून या चबुत-यावर बसले असता यमुना नदीचे किनारे दृष्टीस पडतात. या इमारती बांधण्याचा उद्देश म्हणजे स्वर्गाची प्राप्ति करुन घेणे. कारण या ठिकाणाहून जो परीसर दृष्टीस पडतो. तो परीसर स्वर्गासारखाच दिसतो असं तज्ञांचं मत. अगर पृथ्वीवर स्वर्ग आहे तर तो इथंच आहे. यासाठी हा भाग बांधला गेला असावा. हा महाल इस्लामी रुप धारण करीत असला तरी प्रत्येक मंडप हा हिंदू वास्तूकला दाखवत असते. त्यानंतर या महालात जनानखाना देखील आहे. हा जनानखाना दक्षीण भागात आहे. त्या ठिकाणी नहर ए बहिश्तमधून पाणी येत असते. त्यानंतर खासमहल आहे. हाही महाल दक्षीण परीसरातच आहे. या महालातून बादशहा लोकांना दर्शन देत होते.
दिवान ए खास. हा भाग म्हणजे एक सभामंडप होता. सभा घेण्यासाठी जी भव्यदिव्य इमारतीची उभारणी झाली. त्या सभामंडपाला दिवान ए खास म्हणत. त्यानंतर मोतीमशिद. ही औरंगजेबाची खाजगी मशिद होती. जी संगमरवरानं बनवलेली आहे. त्यानंतर हयात बख्श बाग. ही एक बाग असून या बागेत राण्या निवास करीत असत.
असा हा लाल किल्ला. हा लाल किल्ला पृथ्वीराज चव्हानच्या काळापुर्वीही अस्तीत्वात होता. त्याचं नाव लालकोट होतं. ज्याप्रमाणे मुस्लीम भारतात आले. त्यांनी येथे राज्य करीत असतांना पाहिलं की येथे बौद्ध व हिंदू वास्तू डौलानं उभ्या आहेत. त्या वास्तू येथील मुस्लीम शासकांनी तोडून त्यावर आपल्या इमारती उभ्या केल्या. येथील हिंदू आणि बौद्ध संस्कृत्या लोप करण्यासाठी. तेच शहाजहाननं लालकोटाच्याही बाबतीत केलं हे सत्य नाकारता येत नाही.
दिल्लीचा लाल किल्ला हा रक्षात्मक किल्ला होता. ह्या किल्ल्याला लालकोट नावानं इसवी सनाच्या ७७३ मध्ये प्रसिद्धी मिळाली होती. ही निर्मीती तोमर शासक अनंगपाल यानं केली होती. हा एक आयताकार किल्ला होता.
दिल्ली या शहराचं नाव राजा ढिल्लूच्या नावावरुन पडलं. ह्या राजा ढिल्लूनं दिल्हीका शहर वसवलं. हे मध्यकाळातील पहिलं शहर होतं की जे पश्चीम व दक्षीण सीमेवर स्थित होतं. या शहराला दिल्हीका नाव ठेवण्यापुर्वी योगिनीपुरा हे नाव होते. जे नाव योगीनी देवीच्या नावावरुन पडले.
या दिल्लीला जास्त प्रमाणात महत्त्व तोमर राजा अनंगपालच्या काळात आलं. ज्यावेळी या अनंगपाल तोमरनं आपलं राज्य या दिल्लीच्या लालकोटावरुन चालवलं. त्यानंतर अजमेरच्या चव्हानानं त्याचं नाव किल्ला राय पिथौरा ठेवलं. हे लालकोटाला पृथ्वीराज चौहान नंतर आलेल्या गुलाम वंशाचा शासक कुतूबुद्दीन ऐबकनं नष्ट केलं. कारण त्याला पृथ्वीराज चव्हानची महाराणी संयोगीता व तिची ननद प्रथाचा राग आला होता. ज्यावेळी मोहम्मद घोरीनं कुतूबुद्दीनला आदेश दिला होता की हिंदूस्थानातील पृथ्वीराज दरबारातील तमाम सुंदर स्रीयांना नव्हे तर पृथ्वीराजच्या मुली व पत्नींना गजनीला आणावं. परंतू याच लालकोटात त्यांनी जोहार केल्यानं व त्या जोहारामुळं कुतूबुद्दीनच्या त्या स्रीया हाती न लागल्यानं त्याला जो राग आला. त्या रागाची परियंती लालकोटचं अस्तीत्व नष्ट करण्यात झाली. त्यानंतर त्या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व जाणून घेवून बादशहा शहाजहाननं त्याच जागेवर एक किल्ला बांधला. त्याचं नावंही लालकोट वरुन लालकिल्ला ठेवण्यात आलं.
लालकोटाचे बांधकाम व निर्माण व विस्तार हा तोमर शासकांनी केलं. त्यावेळचा शासक अनंगपाल तोमर प्रथम याने सुरजकुंडपासून दहा किमी अंतरावर हा किल्ला बांधला. त्यानंतर अजमेर शासक विग्रहराज चव्हाननं तोमर प्रथमला हटवून लालकोटला आपल्या राज्यात जोडलं. ज्यावेळी पृथ्वीराज चव्हान दिल्लीच्या गादीवर आला. त्यावेळी त्यानं या जागेवर विशाल किल्ला बनवला. एच सी फांशवा लिखित पुस्तक दिल्ली पास्ट अँड प्रेझेंटनुसार महत्वाचं म्हणजे दिल्लीमधील लालकोट हा सर्वात पुरातन हिंदू किल्ला आहे. तसेच मुस्लींमांचा नवीनतम लाल किल्ला आहे. .
पृथ्वीराजचा जीवलग मित्र होता चंदबरदाई. त्याचा व चंदबरदाईचा जन्म एकाच सालाचा असून तो कवी होता. त्याला युद्धकलाई येत होती.
चंदबरदाई हा एक अनाथ बालक होता. जो सोमेश्वरला सापडला होता. पृथ्वीराज व चंदबरदाई हे दोघं मित्र असून दोघंही सोबतच वाढले होते. ते स्वतःला भावाप्रमाणे वागवत असत.
***************************************************************************************
मोहम्मद गझनी हा सुबुक्तीगीनचा मुलगा होता. तो अफगानिस्तान मधील गझनीच्या यामिनी घराण्यातील सर्वश्रेष्ठ व पराक्रमी सुलतान. बापाबरोबर युद्धात राहून त्यानं लष्करी शिक्षण घेतलं होतं. त्यातच त्याचा सावत्रभाऊ इस्माईलशी भांडून तो गझनीच्या गादीवर आला. राजगादीवर येताच त्यानं हेरात, बाल्ख व खोरासानचा प्रदेश जिंकून तो आपल्या राज्याला जोडला. त्याचा पराक्रम मान्य करुन बगदादच्या खलिफानं त्यास अमीनुल्मिल्लत व यमीनुदौला हे किताब दिले. धर्मप्रसार व राज्यविस्तार या उद्देशानं हिंदूस्थानवर सतत स्वा-या केल्या. त्यानं मुलतान पंजाबवरही स्वा-या केल्या. तो सतत १००१ ते १०२४ पर्यंत हिंदूस्थानवर सतत स्वा-या करीत राहिला. त्यानंतर तो १०२७ मध्ये मरण पावला. त्याला सात मुलं होती. त्यापैकी मसऊद व मुहम्मद हे दोन राज्याधिकारी बनले. यातील मोहम्मदानं गजनीला वैभवसंपन्न बनवलं. गजनीतील रस्ते सुधारुन दुकानाची सोय केली. वजनमापाचीही सोय केली. खलिफाने कह्यफुद्दौला वल्-इस्लाम अशी एक पदवी दिली. त्यानंतर या ऐश्वर्य संपन्न गजनीवर ताबा मिळवला तो मोहम्मद घोरीनं. दहाव्या शतकात अफगानिस्तान मधील घोर प्रांतियांनी ह्या गजनीत आपली सत्ता स्थापन केली. त्यापुर्वी १००९ मध्ये मोहम्मद गजनीने घोर प्रांतावर आपली सत्ता स्थापन केल्यानंतर कुत्बुद्दीन व सैफुद्दीन घोरी यांना ठार केले. त्याचा बदला म्हणून त्यांचा भाऊ अलाउद्दीन याने गजनीवर चाल करुन तेथे एकतर्फी सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्याचा मुलगा दुसरा सैफुद्दीन ११५६ मध्ये गादीवर आला. त्याचा खुन ११५७ मध्ये त्याचा चुलतभाऊ घियासुद्दीनने केला व तो गादीवर बसला. त्याने ११७३ मध्ये गजनीच्या गादीवर आपला भाऊ शिहाबुद्दीन यास नेमले. हाच पुढे मोहम्मद घोरी म्हणून प्रसिद्ध झाला. तोच उत्तर भारतातील यवनीराज्याचा पहिला शासक अन् संस्थापक म्हणून तो प्रसिद्ध झाला.
************************************************************************************************
कुतूबुद्दीननं लालकोटचा दरवाजा पाहिला. त्या दरवाज्याला अनकुंचीदार खिळे होते. त्यातच त्यानं विचार केला की हे अनकुंचीदार खिळे.......या हत्तीच्या मस्तकाला खुपसून आपले कित्येक हत्ती प्राणास मुकतील. त्यातच महाराणी संयोगीतानं किल्ल्यात जाणारा, यमुनेचं पाणी तोडून किल्ल्यात जाणारा पुल तोडून टाकल्यानं कुतूबुद्दीन विचार करीत होता. तो या दोन्ही गोष्टीचा विचार करीत होता की दरवाजा तोडायचा कसा व ह्या यमुनेचं पाणी पार करायचं कसं? त्यातच त्याला उत्तरही सापडलं.
यमुनेचं पाणी किल्ल्याच्या सभोवार आहे. त्या पाण्याला छेदत लाल किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पुल बांधायचा. पण पुल बांधणं काही एकाच दिवसात होणारी घटना नव्हती. त्यातच तो आपल्या सरदारांना म्हणाला,
"हे जेवढे आपल्या जवळ हिंदूस्थानचे गुलाम आहेत ना. त्यांना ठार करुन त्यांच्या शरीरानं पुल बनवा. आवश्यकता पडल्यास जे हिंदूस्थानचे सैनिक आहेत. मग ते जयचंदाचे का असेना. त्यांनाही या पाण्यात टाका. त्यावरुन हत्ती जावू द्या. त्या लालकोटाच्या दरवाजापर्यंत."
कुतूबुद्दीन बोलून गेला खरा. त्याच्या माणसांनी खचाखच लाशांचे ढेर पाडले. ती करकर कापली हिंदूस्थानची माणसं. जी माणसं गुलाम झाली होती मोहम्मद घोरीची.
आता दिल्लीत लालकोटाजवळ रक्ताचे पाट वाहात होते. ते रक्त त्या यमुनेच्या पाण्यात मिसळल्यानं यमुनाही धास्तावली होती. ते यमुनेचं पाणी लालही लाल दिसत होते. त्यातच प्रेतांचे ढीगचे ढीग यमुनेत रचले जावू लागले. त्यातच त्या प्रेतांच्या ढिगापासून यमुनेच्या त्या कालव्यावर पुल तयार झाला. तसं कुतूबुुद्दीनला दिसलं. तसा तो म्हणाला,
"हं, आता चालवा त्यावरुन हत्ती आणि सैन्यही चालवा. तसेच तो लालकोटाचा दरवाजा तोडा. त्या हत्तीच्या धडकेनं."
कुतूबुद्दीनचा आदेश. दरवाजा तोडायला सुरुवात झाली. पण दरवाजा काही तुटत नव्हता. काय करावं सुचत नव्हतं. पण तो तोडावाच लागणार होता कुतूबुद्दीनला. कारण तो मोहम्मद घोरीचा आदर्श गुलाम होता. तोच एक दूत स्वतः कुतूबुद्दीनजवळ येवून म्हणाला,
"जहापनाह, दरवाजा तुटत नाही. काय करावं?"
"सोपं आहे. त्या खिळ्यात जयचंदचा मुलगा धीरचंदला चिपकवा. त्यानंतर हत्तीच्या धडकेनं तोडा दरवाजा."
शिपाई कुतूबुद्दीनचा सल्ला ऐकून चालता झाला. तसं त्या शिपायानं आपल्या जहापनाहची पैरवी केली. त्या दरवाजाच्या अनकुंचीदार खिळ्याला जयचंदचा मुलगा धीरचंदला चिपकवलं व हत्तीच्या धडकेनं किल्ल्याचा दरवाजा तोडला.
मोहम्मद घोरीनं पृथ्वीराजला गजनीला नेलं होतं. त्यानं या हिंदूस्थानचा कारभार आपला गुलाम कुतूबुद्दीन ऐबकच्या हातात सोपवला होता. घोरी बोलत होता.
"तू पृथ्वीराज! तुला पृथ्वीराज म्हणतात वाटते. तूला माहित आहे की मी तुुला का पकडलं. बदला........बदला घेतला मी. बदल्याच्या भावनेनं मी तुला साखळदंडात जखडलं. माहित आहे कशाचा बदला घेतला मी?"
पृथ्वीराज शांतपणे उभा होता. त्याला माहित नव्हतं की बदला कशाचा आहे. तसा तो म्हणाला,
"तू काय बदला घेतोय. अरे गद्दारा. तू तर भागूबिल्लीसारखा आहेस. बाईलवेडाही. तुझ्यात अन् त्या बायात काहीच फरक नाही. अरे लढायचं होतं तर पुढं येवून लढायचं होतं. हे असं भागूबाईसारखं पाठीमागून खंजर मारणं शुरवीराला शोभत नाही. तू शुरवीर नाही. धोकेबाज आहेस. लबाड आहेस. तू तर आता माफीच्याही लायक नाहीस."
"अरे, मी तुझी माफी मागतो का? आम्ही अफगाणी लोकं. आम्ही कोणाची माफी कधीच मागत नाही. आम्ही बदला घेतो बदला आणि आम्ही तुझ्याकडून बदला घेतला."
"बदला! बदला कशाचा? मी असा काय गुन्हा केला?"
"आठव. आठव की तू काय केलं. तू मला चित्रलेखा मिळू दिली का? आठवते का चित्रलेखा?"
"हो, पण तूझा आणि तिचा कोणता संबंध?"
"संबंध! माझं प्रेम होतं तिच्यावर. माझी प्रेमिका होती ती."
"हो, ती तुझी प्रेमिका होती की तुझी हवस होती. तिचं तर मिहिरवर प्रेम होतं. माहित आहे का, तिनं त्या मिहिरच्या कबरेमध्येच जीव सोडला. जर तिचा प्रेम असता तुझ्यावर तर तिनंं त्या मिहिरच्या कबरेत स्वतःला जीवंत दफन करुन घेतलंं असतं का?"
"आम्ही ते जाणत नाही. तो आमचा पेशा नाही."
"म्हणूनच मला असंं साखळदंडात जखडलं का हवससाठी."
"जास्त बोलायची गरज नाही."
तसा पृथ्वीराज डोळे काढून घोरीकडं रोखानं पाहू लागला. त्याचे डोळे विस्फारलेले होते. त्यातच घोरी म्हणाला,
"डोळे मोठे करुन कोणाकडं पाहते. डोळे खाली कर. नाहीतर तुझे डोळेच फोडून टाकीन."
"फोडून टाक तुझ्यात हिंमत असेल तर."
मोहम्मद घोरीला भयंकर राग आला होता. त्यातच त्यानं शिपायाला आदेश दिला की त्याचे डोळे फोडून टाकावे.
आदेशच त्याचा. मोहम्मद घोरीला जो राग आला. त्या रागाची परीयंती की त्याचे डोळे फोडण्यात जल्लाद समोर येत होता. तसा पृथ्वीराज म्हणाला,
"निर्लज्जा, बुजदिला. मला साखळदंडात बांधून माझे डोळे फोडते का? हं, तुझ्यात हिंमत तरी आहे का?"
मोहम्मद घोरीनं दिलेला जल्लादाला आदेश. त्याचे डोळे. पृथ्वीराजचे डोळे फोडण्यात आले होते. ते डोळे फोडताच त्याचेसमोर काळाकुट्ट अंधार पसरला. त्याला काहीच दिसत नव्हतं. आता फक्त त्याच्या मनात आठवणी उरल्या होत्या. त्या गतकाळातील आठवणी. तो विचार करीत होता.
आपण यानं सतरा स्वा-या करुन यानं पराभव पत्करताही आपण याला अभय दिलं. माफ करुन टाकलं आणि यानं माझा एक पराभव करताच मला साखळदंडात कैद केलं. आज माझे डोळेही फोडले. किती भयंकर वेदना. डोळ्याची किती अंगार होत आहे.
खरंच मला आज मुर्ख म्हणावं लागेल. कारण शत्रू माझ्यावर चाल करुन येत होता. तो पराभवी होत होता. तरीही मी सढळ हातानं त्याला माफ करीत होतो. त्याची दयेची याचिका पाहून. आम्ही स्वतःला फार दयावान समजत होतो. अगदी देवच संचारायचा आमच्यात. अन् आज काय झालं आमचं. आम्हाला यानं सोडलं का? खरं तर आम्ही मुर्ख अन् हा घोरी हुशार निघाला. खरं तर याला मानलं पाहिजे. याच्या अक्कलहुशारीची प्रशंसाच केली पाहिजे. आमच्या अशा प्रकारच्या मुर्खपणाने आम्ही आमच्या देशातील जनतेलाही फसवलं. खरं तर आम्हाला आज जगण्याचा अधिकार नाही. आम्ही आजपर्यंत मोठमोठ्या गोष्टी सांगीतल्या. प्रजेचं रक्षण करु म्हटलं. पण नाही. जिथं आम्ही आमचंच रक्षण करु शकलो नाही. तिथं प्रजेचं रक्षण कसं करणार. आमच्यामुळं आज आमची प्रजाही संकटात पडली आहे. त्या प्रजेलाही या घोरीनं बंदीस्त केलं असेल माझ्यासारखं. त्या माझ्या देशातील कित्येक आया बहिणीवर हा घोरी आणि ही घोरीची माणसं अत्याचार करीत असतील. जसे माझे डोळे फोडले तसेच. आज माझा अंतकाळ जवळ आहे. ती संयोगीता कशी असेल. कुठे असेल. अन् ती प्रथा. तो गोविंद माझा एकुलता एक मुलगा. कसा असेल तो.
मला आज जगण्यात काहीच अर्थ नाही. यापेक्षा मी मेलेला बरा. देवी शाकंबरीनं मला मरण दिलेलं बरं. पण नाही. असं तसं मरायला नको. बदला घेवून मरायला हवं. जसं हा म्हणतो की मी बदला घेतला. चित्रलेखा माझी प्रेमिका होती म्हणतो हा. ती मिळाली नाही म्हणून मी बदला घेतला म्हणतो हा. अगदी तसाच बदला. मलाही घ्यायला हवा तसाच बदला. यालाही तसंच मारायला हवं. पण कसं मारणार याला. प्रश्न आहे माझ्यापुढे. काही उपायही सुचत नाही.
तो विचार करु लागला होता स्वगत. पण त्याला काही उपाय सापडत नव्हता. काय करावं सुचत नव्हतं. त्याचे डोळे फोडल्यावर तो हातानं चाचपडत आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवीत होता. नव्हे तर नवे नवे बेत आखत होता. मार्ग शोधत होता. पण त्याला काही केल्या मार्ग सापडत नव्हते.
************************************************************************************************
चंदबरदाई...... त्याचा जीवलग मित्र होता तो. पृथ्वीराजचा जीवलग मित्र होता चंदबरदाई. त्याचा व चंदबरदाईचा जन्म एकाच सालाचा असून तो कवी होता. त्याला युद्धकलाई येत होती.
चंदबरदाई हा एक अनाथ बालक होता. जो सोमेश्वरला सापडला होता. पृथ्वीराज व चंदबरदाई हे दोघं मित्र असून दोघंही सोबतच वाढले होते. पृथ्वीराज त्याला आपल्या भावाप्रमाणे वागवत असे.
पृथ्वीराजला साखळदंडात कैद केलं. त्याला घेवून घोरी गजनीला गेला. तिथं त्याचे डोळे फोडले. ह्या गोष्टी अगदी स्पष्टपणे अख्ख्या हिंदूस्थानला माहित झाल्या होत्या. त्या गोष्टी स्वतः घोरीनंच हिंदूस्थानला माहित केल्या होत्या. त्यातच मोहम्मद घोरीचा उद्देश होता की या गोष्टी माहिती झाल्यानं अख्खा हिंदूस्थान त्याला घाबरेल. त्याला राज्य करता येईल व हिंदूस्थानातील कोणताही शासक त्याच्या तोंडावर येणार नाही वा मान वर करुन पाहणार नाही. विशेष म्हणजे अख्खा हिंदूस्थान त्याच्या ताब्यात येईल. म्हणून तो जे जे पृथ्वीराज सोबत करायचा. त्या त्या गोष्टी तो हिंदूस्थानमध्ये पेरायचा. अशीच पृथ्वीराजचे डोळे फोडल्याची गोष्ट त्यानं हिंदूस्थानात पेरली होती. तिच गोष्ट हा हा म्हणता चंदबरदाईला माहित झाली होती. त्याचबरोबर चंदबरदाईला पृथ्वीराज आठवला. त्यांचं बालपणही आणि सहवासही आठवला.
चंदबरदाई हा दुष्परिणाम कवी होता. तसाच तो पराक्रमी वीर योद्धाही होता. त्याचे वडील ब्रम्हभट राव हे सरदार होते. त्याचा जन्म लाहोरमध्ये झाला होता. परंतू त्याचं पूर्णतः जीवन दिल्लीमध्ये पृथ्वीराजच्या सानिध्यात गेलं. तो राजधानी आणि युद्धभुमी या दोन्हीवेळी पृथ्वीराजच्या सोबतच होता.
चंदबरदाईचं जीवन हे पृथ्वीराज सोबत असं जुळलं होतं की दोघांनाही वेगळं करता येवू शकत नव्हतं. सर्व गोष्टीमध्ये पृथ्वीराज चंदबरदाईला सोबत घेवून जायचा. त्यातच त्याला पृथ्वीराजनं अनेक सन्मान देवून गौरवान्वीत केलं होतं.
ज्यावेळी पृथ्वीराजला घोरीनं साखळदंडात जखडून गजनीला नेलं. त्यावेळी चंदबरदाईला फार वाईट वाटलं. त्याचं अवसानच गळलं आणि तो त्याच आवेगात क्षणाचाही विलंब न करता गजनीला रवाना झाला. त्यात त्याचा हेतू होता की घोरीला धडा शिकविणे. त्यासाठी त्यानं एक योजना तयार केली. ती योजना होती. घोरीशी प्रेमाप्रेमानं वागावं व घोरीचा काटा काढावा.
चंदबरदाई गजनीला पोहोचला. सुरवातीला त्यानं आपला पृथ्वीराज मित्र आहे हे दाखवलं नाही. सुरुवातीला त्याच्या विरोधातील गोष्टी करुन त्यानं घोरीचं ह्रृदय जिंकलं.
चंदबरदाईचे पुर्वज हे पंजाबमध्ये राहात होते. चंदबरदाई हा पृथ्वीराज दरबारातील एक सामंत देखील होता. तो चतूर होता. त्यामुळंच त्याला मोहम्मद घोरीचं ह्रृदय जिंकता आलं.
चंदबरदाईला चार मुलं होती. त्यापैकी घोरीनं एका मुलाला जबरदस्तीनं मुसलमान बनवलं होतं. त्यातच एक मुलगा अमोरमध्ये बसला. तर एक मुलगा नागौरला. त्यातच गजनीला जाण्यापुर्वी चंदबरदाई आपल्या जल्हण नावाच्या मुलाला पृथ्वीराज रासो नावाची लिहिलेली पुस्तक देवून म्हणाला की यदिकदाचित मी मृत्यला कवटाळले किंवा मला मृत्यू आलाच तर ही पुस्तक त्यानं पुर्ण करावी. कारण मी माझा बालसखा पृथ्वीराज चव्हानच्या मदतीकरीता जात आहे. त्यातच मुलानं होकार देताच चंदबरदाई गजनीला रवाना झाला.
चंदबरदाईला दोन पत्नी होत्या. त्याला दहा मुलं होती त्याच्या पत्नीचं नाव कमला व गौरन होतं. तर मुलांची नावं सुर, सुंदर, सुजान, जल्हण, वल्लह, वलभद्र, केहारी, वीरचंद, अवधुत आणि गुनाराज तसेच एक मुलगीही होती. तिचं नाव राजाबाई होतं.
चंदबरदाई गजनीला रवाना होण्यापुर्वी घोरीनं हिंदूस्थानातील अनेक मुलींना व स्रीयांना गजनीला नेलं होतं. अफगाण राजे हे आपल्या खलिफांना जास्त मानत असत. कोणतेही कार्य करायचे झाल्यास एकवेळ खलिफाचा आदेश घेत. त्यातच समजा युद्धामध्ये ते राजे जिंकलेच तर ते जे काही या देशातून नेत. ते खलिफाला दान देत.
मोहम्मद घोरी ज्याप्रमाणे महाराज पृथ्वीराजला घेवून गजनीला गेला. त्याचप्रमाणे त्यानं या देशात असलेल्या वस्तूही त्यानं आपल्यासोबत नेल्या. त्यात हिरे,जवारात व काही स्रीयाही होत्या. त्या स्रीयांमध्ये पृथ्वीराजची मुलगी बेला व जयचंदची मुलगी कल्याणीही होती.
कमातकमी सहा महिने झाले असेल, मोहम्मद घोरीनं दिल्ली काबीज केली होती. त्या ठिकाणी घोरीनं स्वतंत्र्य राज्यकारभार सुरु केला होता. ते पाहून जयचंदच्या मनात सांशकता निर्माण होवू लागली होती. त्यातच जयचंदनं घोरीला एक निरोप पाठवला की अटीनुसार दिल्लीचं राजपद त्याला द्यावं. पण घोरीनं तो निरोप पुरता परतवून पाठवला आणि सांगीतलं की त्यानं आता दिल्लीच्या राजगादीची स्वप्न पाहू नयेत. कारण ती आम्ही जिंकलेली असून आम्ही ती टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जावू शकतो.
घोरीचा तो अपमानजनक निरोप.......जयचंदाला आता पश्चाताप वाटत होता. ती धरा त्याच्या पायाखालून घसरु लागली होती. त्यातच त्याला विचार येवू लागला होता की आपण जे पृथ्वीराजशी वागलो. ते बरोबर वागलो नाही. त्याला त्याबद्दल वैषम्यता वाटत होती. पण आता उपाय नव्हता.
दिल्लीची राजगादी. जयचंदनं त्या राजगादीचं स्वप्न आधीपासूनच पाहिलं होतं नव्हे तर पाहात होता. काय करावं सुचेनासं झालं होतं. त्यातच ती राजगादी आता त्याला मिळेल की नाही हाही प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला होता.
आज जयचंदला पश्चाताप होत होता. तसा तोही शुरवीर होताच. त्यानं जयचंदाला हरविण्यासाठी युद्धाची तयारी करणं सुरु केलं होतं. तसा तो सैन्य जमवीतच होता. तशी ती सैन्य जमविण्याची गोष्ट गुप्तहेराकरवी जयचंदाला माहित झाली व त्याला वाटले की उद्या हाच जयचंद आपल्यावर भारी जाईल. याला धडा शिकवायला हवा.
मोहम्मद घोरीनं तसा विचार करताच त्यानं निवडक फौज हिंदूस्थानात आणली व तो जयचंदवर चालून गेला. त्यातच चंदावार या ठिकाणी जयचंदची गाठ मोहम्मद घोरीशी पडली.
चंदावार हे ठिकाण म्हणजे वर्तमानकाळातील फिरोजाबाद शहर होय.हे फिरोजाबाद उत्तरप्रदेशचे मुख्यालय आहे. हे चंदावारचं युद्ध इस ११९४ मध्ये लढलं गेलं.
जयचंदला त्याचा दादा गोविंदचंद कडून शाही विरासत मिळाली होती. त्याचं राज्य उत्तरप्रदेशच्या वाराणसीपर्यंत पसरले होते. त्याच्याजवळ एकलाख सैन्यदळ व सातशे हत्ती होते असं इतिहासात वर्णित आहे. ज्यावेळी जयचंदची सेना चालत असे. तेव्हा संपूर्ण शहर चालत आहे असा भास होत असे.
इस ११९२ ला पृथ्वीराजला हरविल्यावर मोहम्मद घोरीला वाटलं की जयचंदचा बिमोड करावा. त्यामुळे की काय त्यानं ११९४ ला जयचंदवर आक्रमण केलं. ज्यात जयचंद चंदावारचं युद्ध हारला आणि त्यातच त्यानं जयचंदला बंदी बनवून ठार केलं.
चंदावारचं युद्ध हे कुतूबुद्दीन ऐबक व राजा जयचंद यात झालं. जयचंद हत्तीवर बसला होता. त्यातच कुतूबुद्दीननं तीर चालवला. तो तीर जयचंदाला लागताच जयचंद खाली पडला व मरण पावला. त्यानंतर कुतूबुद्दीननं जयचंदच्या तिनशे हत्तीला जीवंत पकडलं. तसेच गडवालचा खजिना लुटला. त्यानंतर ते वाराणसीच्या भागाकडे वळले. जिथे जातांना वाटेतील हजारो मंदिरांची तोडफोड केली.
घोरीची सेना वाराणसीला पोहोचताच जयचंदचा मुलगा हरिश्चंद्र याने घोरीच्या सेनेला रोखलं. दोघात तुंबळ युद्ध झालं. त्यात घोरीच्या सेनेचा पराभव झाला. अनेक सामंत मारले गेले. त्यातच घोरीचे सैन्य वााराणसीतून परत जाताच हरिश्चंद्रनं तोडलेल्या मंदिराची पुन्हा उभारणी केली. तसेच मशिदी नष्ट केल्या. परंतू तोपर्यंत वेळ झाला होता. कारण त्यापुर्वी राजा जयचंद चंदावारच्या युद्धात मरताच जयचंदची मुलगी कल्याणीला घेवू न मोहम्मद घोरी गजनीला निघून गेला होता. जिथे तिची भेट आधीपासूनच तिथे पोहोचलेल्या बेलाशी झाली होती. ती बेला जी महाराजा पृथ्वीराजची मुलगी होती.
************************************************************************************************
आज जयचंद मरण पावला होता तर जयचंदमुळं पृथ्वीराजच नाही तर पृथ्वीराजचं अख्खं कुटूंब अडचणीत आलं होतं. त्याचबरोबर जयचंदचाही परीवार अडचणीत आला होता. मोहम्मद घोरी गजनीला जाताच त्यानं खलिफाची भेट घेतली. खलिफा म्हणाला,
"आओ घोरी आओ। हमें तुमपर नाज है। तुमने हिंदूस्थानपर फतेह करके इस्लाम का नाम रोशन किया है। बताओ की जिस हिंदूस्थान को सोने की चिड़िया कहते है।उसके कितने पैर कतर के लाये है?"
"अर्थात?"
"अर्थात कसा काय राहिला हिंदूस्थानचा प्रवास?"
"छान राहिला."
"काय काय आणलं हिंदूस्थानमधून?" खलिफा म्हणाला.
काय काय आणलं हिंदूस्थानमधून. घोरीनं ते ऐकलं. तसा घोरी चूप बसला. तो विचार करु लागला. तसा तो हसला. त्यातच तो बोलता झाला.
"खाविंन्द, मी हिंदूस्थानातून सत्तर करोड दिरहम मुल्य किमतीचे सोन्याचे शिक्के, पचास लाख चारशे मन सोना आणि चांदी, याव्यतिरीक्त अनेक मौलवान दागदागीणे, मोती, हिरे, पन्ने, भारी जरीचे वस्र आणले आहेत मी हिंदूस्थानातून."
"आणखी काय काय आणलं?"
"काही नाही आणखी म्हणजे मी आपली सेवा करण्यासाठी दास दासी आणल्या आहेत."
"काय हिंदूस्थानात इस्लामचा प्रसार केला की नाही?"
"केला ना काजी साहेब. इस्लाम धर्म वाढवला आणि काही लोकांना जबरदस्तीनं मी इस्लामी बनवलं."
"अन् बंदी लोकांचं काय केलं?"
"बंदी लोकांनाही मी गुलाम बनवून आणलं आहे ना गजनीला. आता तर मी या लोकांची गजनीच्या बाजारात विक्री करत आहे. त्यातच खुरासान, इराकचे व रोमचे व्यापारी हे या भारतीय गुलामांना खरेदी करुन नेत आहेत. एक एक गुलाम चांगल्या मुल्यात विकला जात आहे."
"हिंदूस्थानातील मंदिरांचं काय केलं?"
"त्या मंदिरातून आम्ही सतरा हजार सोन्याच्या व चांदीच्या मुर्ती आणल्या आहेत. दोन हजार रुपये किमतीच्या दगडाच्या मुर्तीही आणल्या आहेत. तसेच काही शिवलिंगही आणले आहेत. तसेच पुष्कळ मंदिराची व पुजास्थळाची तोडफोडही केलेली आहे. त्यातील मुर्तींचीही तोडफोड केली आहे. त्या मंदिरस्थळांना जाळलं देखील."
"घोरी, हे तर चांगलं पुण्याचं काम केलेलं दिसते."
"काजी साहेब, आणखी एक सांगतो की ज्या मंडळींना हिंदूस्थानात प्रतिष्ठीत समजत होते. त्यांना गजनीत दुकानदारांनी विकत घेतलं आहे. ते गजनीच्या दुकानात नोकर बनले आहेत."
"घोरीसाहेब, माझ्यासाठी विशेष असं काय आणलं तुम्ही?"
"आणलं आहे ना काजी साहेब."
"काय आणलं आहे?"
"जन्नत ची हूर."
"अर्थात?"
"जन्नतची हूर म्हणजे राजा पृथ्वीराजची मुलगी बेला आणि महाराज जयचंदची नातीन कल्याणी."
"तर मग वेळ कशाची आहे."
"म्हणजे?"
"म्हणजे वाट कशाची पाहत आहा म्हटलं."
"वाट! वाट आपल्या इशा-याची. आपण एक इशारा करा. नूर हजर."
"ठीक आहे घोरी. तर आजच हरमसाठी माझ्या समक्ष त्या दोघींना हजर करा."
"ठीक आहे." मोहम्मद घोरी म्हणाला. तसं मोहम्मद घोरीनं बेला आणि कल्याणीला हरमसाठी काजीच्या समक्ष उभं केलं व तो तिथून निघून गेला.
कल्याणी व बेला सुंदर होत्या. त्यांची सुंदरता पाहून काजी भावविभोर झाला होता. त्याला वाटत होतं की आज या हरमसाठी जणू स्वर्गातील अप्सराच आल्या असाव्यात. तसं त्या दोघींनाही पाहताच काजीनं त्यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तसं पाहता बेला म्हणाली,
"काजी साहाब, आम्ही आपल्याच बायका आहोत असं मानून घ्या. तेव्हा आम्ही काही या ठिकाणाहून परणार नाही. परंतू आमच्याही काही अटी आहेत."
"कोणत्या अटी आहेत त्या लवकर सांगा. मी लवकरात लवकर तुमच्या अटी पूर्ण करतो. सांगा लवकर."
"काजी साहेब, तुमच्या पत्नी बनणं हे आमचं सौभाग्य आहे. पण आमच्या दोन अटी आहेत."
"कोणत्या दोन अटी आहेत तुमच्या? सांगा लवकर. तुमच्या सारख्या सुंदरींसाठी मी कोणत्याही अटी पूर्ण करायला तयार आहे."
"पहिली अट आहे. ती म्हणजे आम्हाला आमचा विवाह होईपर्यंत आम्हाला पवित्र ठेवावं. ही अट मंजूर आहे का तुम्हाला?"
"हो, मंजूर आहे तुमची पहिली अट आणि दुसरी अट."
"दुसरी अट आहे ती आमच्या हिंदूस्थानातील."
"कोणती?"
"आमच्याकडे विवाहासाठी कपडे हे एकमेकांच्या घरुन येतात."
"म्हणजे?"
"म्हणजे मुलींसाठी मुलांच्या घरुन व मुलांसाठी मुलीच्या घरुन. आमच्या मतानुसार तुम्ही जर आमचे पती बनणार आहात तर विवाहापुर्वी तुम्हाला आमच्या हिंदूस्थानातून आलेले कपडे वापरावे लागतील. तेव्हा हे कपडे आपण आमच्या हिंदूस्थानातून बोलवावे असे मागणे आहे आपल्याला. बोला हे मंजूर आहे काय?"
काजीनं ते बोलणं ऐकलं. तसा कोणत्याही प्रकारचा विचार न करता उतावीळपणानं काजी म्हणाला,
"ठीक आहे. मला तुमची ही देखील अट मंजूर आहे."
काजीनं पत्र लिहिताच बेला आणि कल्याणीनं कवीचंदला एक रहस्यमयी पत्र लिहिलं. ते दुताकरवी हिंदूस्थानला पाठवून त्यांनी विवाहासाठी रहस्यमयी पोशाख बनवून पाठवायला लावलं.
दूत हिंदूस्थानात आला होता. त्यानं कवीचंदचा पत्ता विचारला. तसा तो कवीचंदजवळ पोहोचला. त्यानं कवीचंदला ते पत्र दिलं. तसा तो म्हणाला,
"आमच्या काजीचा हुकूम आहे की कोणत्याही परिस्थीतीत हे कपडे लवकरात लवकर तयार करुन द्यावे."
कवीचंदच्या हातात ते पत्र आलं होतं. त्यानं ते पत्र उघडलं. त्यानं ते पत्र वाचलं. त्यातील मजकूर त्याच्या लक्षात आला. तसा ताबडतोब त्यानं तो रहस्यमयी पोशाख तयार केला व तो पोशाख त्या दुताकरवी गजनीला पोचता केला.
विवाहाचा दिवस उजळला होता. काजीसोबत विवाहाचा दिवस निश्चीत झाला होता. त्यातच तो विवाह रहमत झीलच्या बाजूला बनविण्यात आलेल्या सभामंडपात तो विवाह होणार होता. तसा विवाहाचा दिवस उजळला. सभामंडप सजविण्यात आला होता.
विवाहाच्या दिवशी काजीनं बनविलेले कपडे कल्याणी बेलानं वापरुन त्या दोघीही तयार झाल्या होत्या. तसेच हिंदूस्थानातून बनून आलेले कपडे वापरुन काजीही तयार झाला होता. या लग्नाची एवढी खुशी होती गजनी वासीयांना की दुरुदुरुन हा सोहळा पाहायला लोकं आले होते. तेव्हा बेला काजी साहेबांना म्हणाली,
"आम्ही तर आपल्या पत्नीच बनणार आहोत. तेव्हा आम्ही आजच सर्व लोकांना आमचा चेहरा दाखवू इच्छितो. कारण उद्याचालून हा चेहरा तुमचाच असेल. याचे मालिकही तुम्हीच असाल. मग हा चेहरा इतर कोणाला दाखवता येणार नाही. तेव्हा याची अनुमती आपण द्यावी. कारण विवाहाच्या पुर्वी लोकांना दर्शन देण्याची आमची परंपरा आहे. तसं पाहता विवाहानंतर आम्हाला जीवनभर बुरखाच वापरायचा आहे ना. हं मंजूर नसेल तर सांगा. तसंही पाहता तुम्हाला तुमच्या म्हाता-या अवस्थेत आमच्यासारख्या जन्नतच्या नुरा मिळत आहे. तसंही आम्ही तुमच्या पत्नी बनलो की ही सुंदरता फक्त तुमच्याच कामात येणार आहे. इतरांच्या नाही."
काजीनं त्यावर विचार केला व उतावीळपणानं हो म्हटलं.
भारतीय गुलाम आणि येथील महिलांना विदेशात फारच पसंती होती. त्यांच्या सुंदरतेवर खलिफाच नाही तर इतरही लोकं मोहित होत असत. असंच घडलं बेला आणि कल्याणीसोबत. तो गजनीचा खलिफा त्यांच्या मागं वेडा झाला होता. त्या जे काही म्हणत होत्या, त्यावर विचार न करता तो गुरफटत चालला होता. तशातच बेला म्हणाली,
"काजी साहेब, आमचे तुम्ही होणारे पतीदेव आहात. आमच्या हिंदूस्थानात आम्ही पतीला अगदी तुमच्या अल्लासारखे पुजतो. तेव्हा तुम्हाला आमच्या अटीबाबत संभ्रम नाही ना?"
"नाही, किंचीतही नाही."
"ठीक आहे."
तसं म्हणताच त्या दोघींनी त्या काजीला राजमहालच्या कंगू-यावर नेलं. परंतू तिथे पोहोचता पोहोचताच त्या काजीच्या उजव्या खांद्यावरील कापडाला आग लागली. जे वस्र बेला आणि कल्याणीनं हिंदूस्थानातून बोलावले होते. त्या कपड्यावर कवीचंदनं विशेष रसायन छिडकलं होतं. तसं पाहता भारतीय वंशाचे लोकं हुशार होते. पण दयाळू असल्यानं समस्या निर्माण होत होती.
ती आग हळूहळू पसरत चालली होती. कारण त्या वस्रात रसायनापाठोपाठ तीक्ष्ण विषही कालवले होते. ज्या प्रयोगानं अंगार एवढ्या लवकर पकडली की काजी वेडा झाल्यागत इकडे तिकडे फिरायला लागला होता. तो वाचवा वाचवा म्हणत होता.
ते दृश्य सगळी मंडळी डोळे विस्फारुन पाहात होते. तशी बेला म्हणाली,
"तुम्हीच घोरीला हिंदूस्थानवर आक्रमण करायला उकसवले ना. म्हणूनच आम्ही दोघींनीही तुम्हाला मारण्याची योजना बनवली. बदलाही घेतला आमचा हिंदूस्थान लुटण्याचा. आम्ही हिंदू कुमारीका आहोत. तुमच्यापैकी कोणात ताकद नाही की आमच्या जीववंतपणी आमचं शिलभंग करेल."
तशी कल्याणीही म्हणाली,
"निर्लज्जा, तू पुष्कळ धार्मीक बनतोस ना आणि जेहादचा ढोल पिटवतोस ना. शांतीनं राहणा-या लोकांवर जुलूम करतोस ना. धिक्कार आहे तुझ्यावर. हे शुरपणाचे लक्षण नाही. यानंतर तुम्ही जर नाही समजलात. तर तुमच्यात माणूसकी नाही. पण एक लक्षात ठेवा की तुम्ही आमच्या हिंदूस्थानला कधीही कमजोर समजू नये."
ते अखेरचे शब्द. त्वेषानं बोललेलं शब्द. तशा त्या त्या महालाच्या छतावर उभ्या होत्या. काजीच्या संपूर्ण शरीरावर आग लागली होती. कोणाला काही सुचत नव्हतं. काय करावं, काय नाही असं सर्वजण करीत होते. सर्वत्र आरडाओरड सुरु होता. तोच पाणी आणेपर्यंत काजी जळून खाक झाला होता. अगदी तडफडून तडफडून मरण पावला होता तो. त्यातच दोन तीन शिपाही बेला आणि कल्याणीच्या दिशेनं धावले. तोच त्या दोघींनीही एकमेकांच्या छातीत विष लावलेली कट्यार खुपसली आणि राजा दाहिरच्या सुर्यकुमारी आणि परीमलची पुनरावृत्ती केली.
बेला आणि कल्याणीनं जीव सोडला होता. त्यानंतर काजीच्याही शरीराची राख झाली होती. तो कुत्र्याच्या मौतीनं मरण पावला होता. बेला आणि कल्याणी जरी वीरगतीस प्राप्त झाल्या असल्या तरी त्यांनी हिंदूस्थानातील तमाम जनतेसोबत केलेल्या काजीच्या अन्यायाचा बदला घेतला होता. त्या भारतीय मुली होत्या की ज्या मुलींनी आपल्या प्राणाची पर्वी न करता काजीला संपवलं होतं. कदाचित काजीनं त्यांना पत्नी बनवून सुखात ठेवलं असतं. पण त्यांना ते सुख नको होतो. कारण त्या सुखात स्वाभिमान नव्हता आणि हिंदूस्थानची सुखशांतीही नव्हती असे म्हणायला काहीच हरकत नाही.
************************************************************************************************