Travel in Marathi Travel stories by Ankush Shingade books and stories PDF | यात्रा

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

यात्रा

मनोगत
यात्रा नावाची ही पुस्तक कादंबरी स्वरुपात वाचकाच्या समोर ठेवतांंना मला अत्यंत आनंद होत आहे. ही पुस्तक म्हणजे एक प्रवासवर्णन असून ते पुस्तक मी कादंबरीच्या स्वरुपात मांडलेले आहे.
यातील कथानक थोडक्यात असं. एक आनंद नावाचा व्यक्ती. तो दरवर्षी नागद्वारची यात्रा काढत असतो. बिचा-याच्या स्वार्थ नसतो त्यात. त्यातच या यात्रेत काय काय अनुभव येतात. त्याचं वर्णन या पुस्तकात आहे. आपण ती पुस्तक वाचावी व नागद्वारचं दर्शन घ्यावं वास्तविक नाही तर पुस्तक रुपानं एवढंच आपणास सांगणं आहे.
यामध्ये नागद्वारमधील बहूतेक सर्व गुफांचं वर्णन आहे. त्या पहाड्या बोलत असलेल्या भाषतात तसेच नद्याही. नागद्वारमध्ये अतिशय रमणीय असं वातावरण असून त्याचं वर्णनही त्यात आहे. आपण ते वाचावं व त्या प्रवासवर्णनाचा मनमुराद आनंद घ्यावा.
ही माझी एक आगळीवेगळी कादंबरी असून एक प्रवास म्हणून लिहिलेली पुस्तक आहे. ही पहिली पुस्तक आहे की ज्यात बोध नाही. फक्त आनंद आहे. ही माझी साहित्यविश्वातील चौसष्टवी पुस्तक असून पसतीसवी कादंबरी आहे. मला वाचकांना मनमोहक आनंद देता यावा यासाठीच मी अलिकडे कादंबरी लेखन करीत आहे. आपणाला विनंती की आपण एक फोन मला अवश्य करावा. जेणेकरुन मला पुढील लेखनास प्रेरणा मिळेल.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर
९३७३३५९४५०


यात्रा (कादंबरी)
अंकुश शिंगाडे









यात्रा........सध्या यात्रेचं खुळ चर्चेत असून यात्रेला जास्त महत्व आलं आहे. त्या माध्यमातून आत्मीक बळ वाढत असलं तरी अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. कोणी पंढरपूर यात्रा तर कोणी बद्रीनाथ केदारनाथच्या यात्राही करीत असतात. तसेच कोणी कैलासमानसरोवर, अमरनाथ नागद्वार आणि महादेवाच्या यात्रा करीत असतात. यात्रेनुसार जत्रेलाही जास्त महत्व आलं आहे.
पुण्याच्या भागाचा विचार केल्यास तिथे असलेल्या जेजूरी देवस्थानाला भेट देण्यासाठी लोकं अवश्य जातात. देवस्थानाबाबत व यात्रेबाबत कोल्हापूरला असलेल्या महालक्ष्मीचा जास्त उदोउदो होतो. त्यातच तुळजापुरची भवानीदेवी. ती तर शिवरायांचं आराध्य दैवतच ठरली. याशिवाय विदर्भात असलेली माहूरची रेणूका, अमरावतीची अंबा, नागपूरची भवानी व कोराडीची जगदंबा ह्या देव्या सुद्धा विशेष प्रसिद्ध आहेत.
देशात विदेशात केवळ देव्याच प्रसिद्ध आहेत असे नाही. तर पंढरपूरचा विठ्ठल महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानलं जातं. तसेच लोकं दरवर्षी दिवाळीच्या दिवशी शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनालामजातात. त्यातच शनिशिंगणापूरच्या शनिमुर्तीचंही दर्शन करतात. तसेच ते जर विदर्भातील असतील तर शेगावच्या गजानन महाराजाचं दर्शन घेवून परत येतात.
हे महाराष्ट्रातील देवस्थान........कोणी गणपतीपुळेला जावून गणपतीचंच नाही तर तिथे असलेल्या समुद्राचंही दर्शन घेतात. इथे असलेला समुद्र हा उभाट असून त्याच्या लाटा पाहण्यासारख्या आहेत. यात्रा करण्यात केवळ हिंदूच समोर नाहीत तर मुस्लिम समुदायही पुढं आहे. कोणी मुंबापुरीच्या हाजीअलीलाही जातात. तर कोणी नागपूरच्या ताजबागला आवर्जून येत असतात. कोणी मक्का मदिनालाही जातात. यात ख्रिश्चन समुदायही मागे नाही. नाताळच्या दिवशी आवर्जून गोव्याच्या चर्चमध्ये गर्दी असते. तसेच बौद्ध बांधवही मुंबईच्या चरेचगेटला तसेच नागपूरच्या दिक्षाभुमीलाही आवर्जून भेट देत असतात. अलिकडे नागपूर जिल्ह्यातील ड्रगन पैलेसलाही महत्व प्राप्त होत आहे. यात्रेचा विचार केल्यास भीमाशंकरचा ज्योतिबाही काही मागे नाही.
यात्रा.......यात्रेला जाणे म्हणजे भाविकांचे श्रद्धेचं स्थान. त्यांची खुप मोठी श्रद्धा असते. म्हणून लोकं यात्रेला जात असतात. कोणी लांबच लांबचा प्रवास पायी करीत असतात. त्याला विठ्ठलाच्या भाषेत वारी म्हणत असतात. अशी यात्रेला जाणारी माणसं काही कमी नाहीत. त्यातच ज्या लोकांच्या जास्त यात्रा झाल्या ती मंडळी आवर्जून अभिमानानंर सांगत असतात की माझ्या एवढ्या यात्रा झाल्या. माझ्या तेवढ्या यात्रा झाल्या. त्यातच या यात्रा करणा-या मंडळींना देव मानून ते परत येताच त्यांचा उदोउदो केला जातो.
यात्रेला प्रत्येक धर्मातच विशेष महत्व आहे. मग तो कोणताही धर्म का असेना. लोकं आपआपल्या श्रद्धेनं यात्रा करीत असतात. कोणी यात्रा करतांना त्या त्या देवावर प्रचंड विश्वास ठेवत असतात. त्यातच कधी कधी कावळा फांदीवर बसताच जशी फांदी तुटते. तसा काही चमत्कारही होतो. त्यातच त्या चमत्काराला त्या दैवतीकरणाचं स्वरुप प्राप्त होत.
यात्रेत हौसे, नवशे व गवसे जात असतात. हौसे म्हणजे जे चमत्कार मानत नाहीत. परंतू आनंदानं जातात. नवशे म्हणजे जे चमत्कार मानतात. त्यातच नवश करतात व नवशं पूर्ण करण्यासाठी अगदी आनंदानं जातात व गवसे म्हणजे जे मनात लहर आली तर जातात. ह्या गवसे प्रकारात काही आस्तीक व काही नास्तीक माणसांचा समावेश होतो. आस्तीक म्हणजे देवाला मानणारे व नास्तीक म्हणजे देवाला न मानणारे.
यात्रेबाबत विचार केल्यास पुर्वीही यात्रा होत असत. यात्रा ही परंपरा पुर्वापार चालत आलेली आहे. त्यातच पुर्वी जास्तीत जास्त लोकं नवश करायचे. ते नवशं पूर्ण होताच यात्रा करायचे. यात कोणी कोणी कोंबडं बकरंही कबूल करायचे. मग पुर्वी गाड्या नसल्यानं खाचर बंडीवरुन वा पायी यात्रा करायचे. आता मात्र साधनं निघालेली आहेत.
आताही नवशं कबूल केला जातो. कोणी कोंबड्या बक-याचा नवश करतात. परंतू देव काही बकरा, कोंबडा खात नाही. परंतू देवाला बदनाम करुन बिचा-या मुक्या जनावरांचा नाहकच जीव घेतला जातो.
यात्रेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास देशात सर्वात कठीण यात्रा नागद्वार व अमरनाथची मानली जाते. अमरनाथला बर्फावरुन चालत जावं लागतं आणि इथं पहाडावरुन. बरीच कमी मंडळी नागद्वारच्या यात्रा करीत असतात. परंतू ज्याचा भक्तीभाव आहे. तो नागद्वारची यात्रा अवश्य करतो. या नागद्वारच्या यात्रेत पहाडी चढणे व उतरणे असल्याने शरीरात जर वर्षभरात रक्तवाहीण्यात काही जंग चढला असेल अर्थात कोलेस्टेरॉल आला असेल, तर तो साफ करण्याचं काम होतं. कारण पहाडी चढण्या उतरण्यात पुर्ण अंगातील अवयव काम करीत असून रक्त सपाट्यानं धावत असतं. त्यातूनच असा पहाड चढण्यातून शरीरातील विषारी घटक घामाद्वारे शरीरातून बाहेर निघतात व शरीराला पुढील काळात असाध्य रोगापासून दूर ठेवलं जातं.
महादेवाच्या यात्रेतही अगदी तसंच आहे. महादेवाच्या यात्रेत पहाडी चढण्याची उतरण्याची योजना असल्यानं अशा यात्रा वर्षभरातून एक तरी करावी असं जनमताचं म्हणणं आहे. ज्याला असं पहाड चढणं जमत नाही ती मंडळी पंढरपूरसारख्या वा-या वा उजैनच्या महाकालच्या दर्शनाच्या कावडयात्रा करीत असतात. कित्येक मैलावरुन पायी पायी चालत जाणे. महत्वाचं म्हणजे पायी चालणे हा व्यायाम असून पुर्वजांनी त्यात भक्तीभाव टाकून त्याला यात्रेचं स्वरुप दिलं आहे. कारण माणूस केवळ बैठे काम करीत असे. तो पायी चालत नसे. आताही ब-याच ठिकाणी पायी चालायची सोय नाही. आजही काही मंडळी केवळ बैठे काम करीत असतात. त्यातच त्यांना वेगवेगळे असाध्य रोग जडलेले असतात. हे रोग होवू नयेे व शरीरातील रक्त वहन व्हावं व नेहमी धावतं राहावं, म्हणून पुर्वीच्या काळी राजेमहाराजे आपले राजवाडे उच टेकडीवरच बांधायचे. याचं कारण म्हणजे शत्रूपासून संरक्षण व स्वशरीराचं संरक्षण. ते महाराजे शरीरावरही विशेष प्रेमच करीत होते असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
यात्रा........ही यात्रा करीत असतांना त्या यात्रेत आपली सेवा करणारी बरीच मंडळी असतात. या मंडळीत काही मंडळी ही अतिशय गरीब असून ते कपाळावर टिळा वावण्याचं काम करतात. काही लिंबू पाणी विकतात. काही उकडलेली बोरं तर काही तळलेल्या पोपटच्या घुग-या, काही उकडलेले चणे तर काही शेंगदाणेही विकतात. काहीजण ताक आणि काहीजण मका, बाजरीच्या पोळ्याही विकतात. असे जिनश विकणा-या काही मुली ह्या आवर्जून नट्टापट्टा केलेल्या असतात. त्या मुली अतिशय अल्प वयात विवाह केल्यासारख्या मंगलसुत्र परीधान केलेल्या दिसत असतात. त्यातच काही कुवा-या मुली पार्वतीचा मेकअप करुन व वेष धारण करुन टिळा लावण्यासाठी रस्त्यारस्त्यावर उभ्या असतात. परंतू आम्ही भाविक यात्रा करतांना अशा तरुण मुलींचे आपल्यासोबत फोटो काढतो व ती आपली बायको आहे असे त्यांना चिडवून त्यांच्या मजबूरीचा फायदा घेत असतो. त्यातच काही लोकं शांपल म्हणून याच मुलींना दारु मागतात व माल अच्छा नही है म्हणत पुढची वाट धरतात व त्यांच्या मजबुरीचा फायदा घेतात.
महत्वाचं म्हणजे तो भाग डोंगरावर असून तिथे पोळी भाजी वगळता खायला भरपूर मिळतं. ती मंडळी जंगलातील वेगवेगळे जिनस गोळा करतात व ते स्वतः न खाता आपल्याला चारतात आणि आपण त्यांच्या मजबुरीचा फायदा घेवून त्यांना लुबाडतो आणि हे विसरतो की ते आहेत म्हणूनन आपली यात्राही आहे. ते जर नसतील तर आपण त्या डोंगरद-यात बर्फाच्छादित प्रदेशात खरंच यात्रा करु शकू काय? याचा अर्थ नाही असा आहे.
विशेष म्हणजे आपण हे लक्षात घ्यायला हवं की ते आहेत म्हणून आपली यात्रा आहे. त्यामुळं त्यांच्या मजबूरीचा फायदा घेवून त्यांना आपण लुबाडू नये. आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म सपाट भुभागात झाला की ज्या भागात चांगलं आणि भरपूर पीकतं. पैसाही भरपूर मिळतो. त्यामुळं त्यांची मजबूरी नक्कीच विसरु नये. नाहीतर पुढील जन्मी आपलाही जन्म त्याच भागात होवून आपणही एक एक पैशासाठी तरसू. मग लोकंही आपला फायदा घेतील व क्या माल है, ये मेरी औरत है म्हणत आपल्यासोबत फोटो काढतील. त्याला व्हायरल करतील हे तेवढंच खरं आहे.
यात्रा........यात्रेला अंधश्रद्धेचे स्वरुप येवो की अजून कोणते स्वरुप येवो, यात्रा महत्वाची. परंतू अलिकडे काही लोकांनी यात्रेला सडवलं आहे. नागद्वार किंवा महादेवाच्या यात्रा करणारी बरीचशी मंडळी दारु पीत चालतात. तसेच त्या दारुच्या नशेत घाण घाण शिव्याही देत असतात. हे काही बरोबर वाटत नाही. कोणाच्या मजबूरीचा फायदा घेणे हा गुन्हाच आहे हा मानवनिर्मीत गुन्हा असून तो मानवाच्या न्यायाच्या कक्षेत असला तरी त्या गुन्ह्यावर न्यायदेवता अंध असल्यानं बघत नाही. परंतू ही न्यायदेवता मानवनिर्मीत आहे, निसर्गनिर्मीत नाही. परंतू निसर्गनिर्मीत अशीही एक देवता आहे की जी त्सुनामी आणते. भुकंप आणते, दुष्काळ पाडते, ओला सुका आणि पहाडाचंही भुस्खलन करते. ती आपलंही पाप उघड्या डोळ्यानंच बघते. तेव्हा आपण हे लक्षात घ्यावं. त्या निसर्गदेवतेला थोडंतरी घाबरावं. नाहीतर ती निसर्गदेवता आपल्याच वस्तीत कधी भुकंप आणून वा कधी पूर आणून वा कधी असाध्य रोगाची महामारी आणून आपल्याला केव्हा नेस्तनाबूत करेल हे सांगता येत नाही. म्हणून वेळीच असा त्या निष्पाप जीवांचा फायदा घेण्यापुर्वी सावधान झालेलं बरं.कुणाची छेड न काढलेली बरी. अन् जर अशा कोणाच्या मजबूरीचा फायदाच घ्यायचा असेल तर यात्रा न केलेली बरी हे तेवढंच खरं आहे.

*********************************************

धुपगड.........उंच टेकड्यांनी वेष्टिलेला भाग. हा भाग समुद्रसपाटीपासून अतिशय उंचावलेला असून हा भाग सातपुड्याच्या डोंगररांगानं वेढलेला आहे. या भागाला दुरुन पाहिले असता निव्वळ वाफ निघत असते. त्यामुळं याला धुपगड नाव पडले असावे.याच भागातील दर्शनी भागातून मावळत्या सुर्याचं चांगल्याप्रकारे दर्शन होतं. म्हणून याला सनसेट पाईंटही म्हणतात.
धुपगड हे पचमढीपासून दहा किमी अंतरावर असून धुपगडाला जाण्यासाठी काही खाजगी वाहनं चालतात. या खाजगी वाहनाची पुर्वी तिकीट जास्त नव्हती. परंतू आता महागाईची झळ त्यालाही बसली असून तिकीट दर वाढलेले आहे. नागद्वार यात्रा करणा-या भाविक मंडळींची धुपगड ही पहिली पायरी आहे.
या यात्रेची मजा ही उन्हाळ्यात येत नाही. कारण चढाव एवढा चढावं लागतो की अंगातून घामाच्या धारा टपकत असतात. त्यातच थकवा देखील जाणवतो. असा थकवा जाणवू नये म्हणून पाऊस हवा असतो. त्यामुळं लोकं पावसाळ्यात यात्रा करतात. विशेषतः नागपंचमीलाच यात्रा करतात. कारण नागपंचमी ही श्रावण महिण्यात येत असून या काळात पावसाला जास्त जोर असतो.
भाविक तिथे असलेल्या खाजगी वाहनानं धुपगडावर उतरतात व हळूहळू चढाव चढायला प्रारंभ करतात. त्यातच पाऊस असलाच तर तिथे अल्प दरात रेनकोट मिळतात. टोप्याही मिळत असतात. त्या घेवून पावसापासून शरीराचं रक्षण केलं जातं. काही मात्र चक्क पावसात भिजत असतात.
धुपगडावर प्रवेश करताच ज्यावेळी भाविक पायी चालत असतात. तेव्हाच अगदी पाऊस हजेरी लावून येतो. त्यातच वाराही. मग काय, भाविक मंडळींची मजाच असते. कारण त्या वा-यासोबत चालणारे ते मेघ अगदी निश्चिंत मनानं अनुभवता येतात. हे मेघ अगदी हाताजवळून जात असतात. त्यावेळी मनाला अगदी तरल वाटत असतं. मन पाखरु होवून उडत असतं. हे काळे पांढरे ढग जेव्हा हाताजवळून वाहतात. तेव्हा वाटतं की आपण ज्यांची एवढ्या दिवसापासून प्रतिक्षा करीत होतो, ते आता अनुभवतोय. बरंच उशीरा. आपण यापुर्वीच हा देखावा पाहायला येणं गरजेचं होतं.
भाविक चालत असतात. त्यातच एक नदी लागते. तसं पाहता पहाडात नद्याही लहानशाच असतात. ज्याला ओढ जास्त असते. इथे असलेल्या नदीवर पलिकडं जाता यावं म्हणून एक लहानसा पुल बांधलेला असून जाळीही लावलेली आहे. उद्देश एवढाच की कोणत्याही भक्ताचा तोल जावून कोणताही भाविक त्या नदीत पडू नये. मात्र या नदीवर भक्त आवर्जून थांबतात. काहीजण फोटोही काढतात तर काही जवळ आणलेल्या अक्षदा या नदीत टाकून पुढचा मार्ग धरत असतात.
या नदीवरुन पुल ओलांडून पुढं गेल्यास काही लोकं भाविकांची सेवा करण्यासाठी काही जिनस घेवून बसलेले दिसतात. त्यात जंगली आंब्याचा समावेश असतो. त्यातच आंबटचुका आणि काकडीही सोबतीला असते. मक्याचे कणसंही असतात. भाविक अशा ठिकाणावर आवर्जून थांंबतात व त्या त्या पदार्थांचा आश्वाद घेवून पुढचा मार्ग धरतात.
पुढचा मार्ग चढणीचा आहे. पुर्वी या मार्गावर डांबरीकरण नव्हतं. आता मात्र या रस्त्यावर डांबरीकरण केलेलं असून त्या रस्त्यावरुन सफारी नावाच्या डबल इंजिनच्या गाड्या चालतात. काही श्रीमंत भाविक या गाड्यातून जातात. काही मात्र पायी. पायी पायी चालण्यामागंही उद्देश असतो. या पायी चालण्यातही बरीचशी मंंडळी पायात चपला घालून चालतात. कारण रस्त्यावरील खडेगोटे पायाला रुतून पायाला इजा होवू नये हा उद्देश. काही भाविक मात्र चक्क अनवाणी पायाने म्हणजे चपला न घालता चालत असतात. त्यांचाही उद्देश आहे. पायाला जे दाबबिंदू असतात. ते दाबले जावे व पायाच्या दाबबिंदूच्या दबाबतंत्रानुसार रोगप्रतिकारक शक्ती माणसात निर्माण व्हावी. भाविक हळूहळू चालत असतात. त्यातच ते गोष्टीही करीत असतात तसेच काही जिनस खातही असतात. तसं गणपतीचं मंदिर येतं. हे बांधलेलं मंदिर नाही. उघड्यावर असलेलं मंदिर आहे. तसेच हे गणपतीचं मंदिर ब-याच वर्षापासून पाऊस, वारा, ऊन झेलत असलेलं प्रत्ययास येतं. याला नागद्वारची पहिली पायरी म्हणतात. इथूनच सुरु होते नागद्वारची यात्रा. लोकं याला पहिली पायरी म्हणत तिथे नारळ फोडतात.
नारळ फोडण्यामागंही एक पुरातन आख्यायिका आहे. पुर्वीपासून दगडाची मुर्ती बसवून तिला शेंदूर फासून तिला देव म्हणवून घेवून तिला बळी देण्याची प्रथा होती. या बळीत केवळ भाव म्हणून देवाला रक्त चढवीत असत. ते रक्त चढविताच देव प्रसन्न होवून पावन होतो व तथास्तू म्हणत भक्तांच्या इच्छा पुर्ण करतो. अशी भाविकांची श्रद्धा होती. त्यातच काही भाविक मंडळी असा बळी देवू शकत नव्हते. म्हणून देवाला बळी म्हणून नारळ फोडण्याची परंपरा आली. यानुसार पुर्वी पाणीवाल्या नारळाला शेंदूर लावून ते फोोडल्या जाई. त्यातच हे शेंदूर मिश्रीत पाणी त्या देवतेच्या अंगावर सोडत. याचाच अर्थ की ते पाणी म्हणजे रक्त आहे असा भाविकांचा समज असे. आपण हत्या करु शकत नाही म्हणून हेच कुत्रीम रक्त देवाला अर्पण करणे असा अर्थ घेवून पुढील काळात देव संबोधले जाणा-या पाषाणी दगडाला नारळ फोडण्याची प्रथा रुढ झाली.
हळूहळू भाविक चालत असतात. तिथे नारळ फोडला की चालत असतात. त्यातच ती खाचखळग्याची वाट. त्या वाटेवर जर एखाद्या वेळी पाय आडवा तिडवा पडला तर तो व्यक्ती स्वर्गवारी केल्याशिवाय राहात नाही.
सुधाकर असाच एक व्यक्ती. तो पचमढीला गेला. त्यातच तिथं एका गाडीत बसून तो धुपगडाला पोहोचला. तसा रस्ता चालू लागला. त्यातच ती नदी पार केली आणि आता पहिल्या पायरीवर नारळ फोडून ती खाचखळग्याची वाट चालायला लागला. तशातच एक भाविक पलिकडून परत येत होता. म्हणत होता की आज तीन दिवस झाले. पाऊस अजिबात नाही. त्याचं तसं म्हणणं बरोबर होतं. कारण तीन दिवसापासून पाऊसच नव्हता तिकडं. परंतू आज पाऊस आला होता. तोही तुरळकच.
तो पाऊस.......त्या पावसानं त्या भाविकाच्याही अंतर्मनाला स्पर्श केला होता. तो पाऊस आज तीन दिवसानंतर मित्र बनला होता भाविकांचा. कारण पावसाशिवाय यात्राच नव्हती नागद्वारची.
सुधाकरसकट सर्व त्याचं मित्रमंडळ ती नागद्वारची वाट चालत होते. काहींनी पाऊस लागायला नको म्हणून रेनकोट घातले होते तर काहींनी घोंगस्याही वापरल्या होत्या.
तो तुरळक प्रमाणात येणारा पाऊस तसा सुधाकरच्याही अंतर्मनाला सुखवून गेला. अगदी बरं वाटत होतं मनात. कधी न पाहिलेले कृष्णवर्णीय ते मेघ हाताजवळूनच जात होते. तसा थंड वाराही सुटलेला होता. काहींनी टोप्याही घातल्या होत्या. तसं काहींनी बैग ओली होवून जड होवू नये म्हणून बैगला प्लॉस्टीक पन्नी लावली होती.
ती नागद्वारची वाट जशी सुधाकर चालत होता. तसे भक्तही हळूहळू चालत होते. कारण त्या वाटेवर खाचखळगे व दगडधोंडेच होते.
काहींनी चपला घातल्या होत्या. काहींच्या पायात अजूनही चपला नव्हत्या. असं वाटत होतं की यांना पायात चपला नसल्यानं गोटे रुतत नसावेत काय? सुधाकरचा तो विचार. त्याचे तसे विचार करणे बरोबर होते. कारण तो फक्त मेघाचा व पावसाचा आनंद घ्यायला आला होता या वेळी. परंतू ती त्यांची श्रद्धा होती की त्यांना काहीच होणार नाही. कारण देव त्यांचा पाठीराखा आहे.
तो त्या भयाण वनातून दगडधोंडे पार करीत चालत होता. अशातच भजेगीरी आलं.
भजेगीरी........लोकांना थोडासा विश्राम करता यावा. यासाठी पुर्वापार विश्रामासाठी बनविलं गेलंलं ठिकाण. या ठिकाणी देव वैगैरे काही नाही. फक्त विश्रामाची जागा आहे. या ठिकाणी भजे चांगले मिळतात. म्हणून या ठिकाणाला भजेगीरी असं नाव देण्यात आलं आहे. इथे गरम गरम भजे मिळत असतात. ते खाताच मन अगदी प्रफुल्लीत होत असून थकलेल्या शरीराला ताकद देण्याचं काम ते भजे करीत असतात. कोणी या ठिकाणी वाईनही प्राशन करीत असतात. परंतू अलिकडे वाईनला बंदी आल्यानं ती तिथं मिळत नाही.
सुधाकरसह सर्व भक्तगण भजेगीरीला पोहोचले. तसा आज नवीनच दम होता. कारण नुकतीच चढाई सुरु केली होती त्यांनी. भजे खाणं महत्वाचं नव्हतं. परंतू तेथील भजे एवढे चांगले होते की मन मानत नव्हतं. त्यामुळं तोही तिथं थांबला आणि भज्यांचा आर्डर देत खमंग भज्यावर ताव मारु लागला. तसेच विश्रांती घेवू लागला.
भजेगीरीचं ते ठिकाण. इथे मित्रमंडळानं भजे तर घेतले. परंतू पहिलं पैसे विचारलेच नव्हते. त्यामुळं शेवटी त्या दुकानदारानं पैसे सांगताच छातीत धडकी भरली. परंतू वादाचा जुना अनुभव पाठीशी असल्यानं कोणीही वाद घातला नाही.
याबाबत एक जुना अनुभव सुधाकरला आठवत होता. बरेच वर्षाआधी त्याचं मित्रमंडळ असंच पहाडीवर आलं होतं यात्रेला. तेव्हा त्यांनी अनुभवलेला हा प्रसंग. तो त्याच्या मंडळाचा व्यक्ती नव्हता तर कोण्यातरी एका मंडळाचा व्यक्ती होता. त्या व्यक्तीनं तेथील कोरकूची दारु चोरली होती. मग काय ती लपवूनही ठेवली. त्यातच तो कोरकू व्यक्ती आपली दारुची बाटल शोधू लागला. त्यातच त्याला ती दारुची बाटल न मिळाल्यानं चांगलीव मारपीट झाली होती. त्यात दोनचार भक्तांंच्या डोक्याला जबर दुखापत झाली असल्यानं तो प्रसंग अजूनही त्याच्या लक्षात होता. खुद ऑखों देखी असा तो प्रसंग. त्यामुळं त्याला भांडण आवडत नव्हतं.
भजेगीरीचं ते ठिकाण त्यानं नाश्त्याचे पैसे दिले व ते देवून मोकळे होताच तो पुढे निघाला. पुढे काजळीचा रस्ता होता.
काजळीचा तो रस्ता. सारखा उतार होता. रस्त्यानं भाविक मंडळी हळूहळू जात होते. पाऊस पुरता गेला होता. त्यातच ब-याच जणांनी आपल्या आपल्या अंगातूून रेनकोट काढून टाकले होते. कारण अंगात गरमी जास्त होत होती. त्यातच घामही निघत होतं.
तो रस्ता फारच उताराचा होता. तसा उताराचा तो रस्ता. समस्या नव्हती उतरतांना. परंतू कस फारच लागत होता उतरतांना. तशी ती पायवाट ते चालत होते आणि त्यांचे पाय मोठे भरुन येत होते. तरीही चालत होते ते. कारण मनात एक वेडी श्रद्धा आाकार घेत होती आणि आकार घेत होता तो मनातला मेनू. ज्या मेनूनं अंगातील अनेक रोगावर रामबाण उपाय निघणार होता. कारण चालल्यानं चांगलं रक्ताभिसरण होत असून रक्तवाहिण्यातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. तेच विचार मनात होते आणि तोच मेनू होता त्यांचा.
सुधाकरसह सारे भक्तगण थकत होते. तसं दहा दहा मिनीटानं थांंबतही होते. काय करणार. थकव्यावर थोडं बसण्याशिवाय उपाय नव्हता. तसंं पाहता त्याच्या मोरक्याची तर कसरतच होती. कारण तो थोडासा लठ्ठ होेता. तो चालत जरी असला तरी त्याला पाय फेकणे जमत नव्हतं. तसा त्याला आणखी एक जुना प्रसंग आठवला.
सुधाकरची या नागद्वारला यायची पहिलीच वेळ नव्हती. तर ब-याच दिवसापासून तो नागद्वारला येत होता.
याच नागद्वारला एकदा तो आला असता तो एक प्रसंग अनुभवला होता त्यानं. त्यांच्याच भक्तापैकी एका भक्ताचा तो प्रसंग. त्यानं आपली दोन मुलं आणली होती. एक लहानसं कडीवरचं लेकरु होतं. तर दुसरी मुलगी होती पाच वर्ष वयाची असेल ती बहुतेक. तो मुलगा तर कडीवरच राहायचा. त्यातच ही नागद्वारची वाट म्हणजे आपला जीव आपल्यालाच भारी. त्यातच त्याची ही लहानलहान मुलं. एकतर मुळात चालतच नव्हतं आणि दुसरं चालत होतं. तिही पाय दुखले म्हणत होती. मग काय, भाऊसाहेबानं त्या दोघांनाही झाकणभर दारुच पाजून दिली.
ती दारु. ती पाजली खरी. त्यातच मुलगा कडीवरच होता. त्याची काही समस्या नव्हती. परंतू ती मुलगी. मुलीच्या अगदी अंगात येवून गेली होती. ती काही त्याला सांभाळत नव्हती. कारण ती याच काजळीला जाणा-या मोठमोठ्या दगडावरुन उड्या मारत होती. शेवटी सुधाकरला दया आली व त्यानं त्या मुलीचा हात पकडला आणि त्यानं हात घट्ट पकडून चालायला सुरुवात केली. तोच ती सुधाकरसोबत असतांना उड्या मारत चालत होती व सुधाकरला काकाजी, हात सोडा. मी चालतेय. असे म्हणत होती. परंतू त्याला भीती वाटत होती की कदाचित हिचा हात सोडला आणि ही एखाद्या ठिकाणी पडली तर लेण्याचं देणंं होईल. म्हणून तो अधिकच तिचा हात घट्ट धरला होता. तशी ती उड्या मारत लवकर लवकर चालताच तोही तिच्याच वेगानं लवकर लवकर चालत होता. कारण त्यावेळी त्याच्यातही तेव्हा तशी रग होती. जी आता वाढत्या वयाबरोबर नव्हती. आज त्यालाही त्या रस्त्यानं पाहिजे त्या गतीनं चालता येत नव्हतं. जसा तो पुर्वी अगदी वेगानं चालत असे. ती मुलगी त्याला अजूनही आठवत होती की ती जरी दारु पिवून असली तरी तिचा त्याला किंचीतही त्रास झाला नव्हता. तिला चालविण्याच्या नादात त्यावेळी केव्हा काजळी ठिकाण आलं ते त्याला कळलं सुद्धा नव्हतं.
आज हा पहाडी भाग उतरतांना बराच दम लागत होता. केव्हा काजळीचा तो भाग येईल आणि केव्हा नाही असं होवून गेलं होतं. अशातच काजळीचा भाग आला व मनाला थोडं हायसं वाटलं. तसा सुधाकर व त्याचं मित्रमंडळ एका मोक्याच्या ठिकाणी भक्तिभावाने बसलं. तसं त्याला पुन्हा एकदा तो जुना प्रसंग आठवला. एकदा त्यांच्या सोबतच्या एका भक्तानं एक झेंडा आणली होती. भेंडी म्हणजे नागद्वाराच्या भाषेत निशाण. कोणीतरी त्याच्या घराजवळच्या एका महिलेनं त्याच्या हातात ती झेंडा देत सांगीतलं होतं की हे निशाण निशाणगडावर नेशील.
निशाणगडावर तसा ओढणी भारी होता. साधारण भक्तगण निशाणगडावर जात नसत. कारण या दगडाला जातांना दोन गड एका लहानशा पायवाटेनं जोडलेले होते. तसेच एकपदरी रस्ता होता. तोल गेल्यावर सरळ खाईत. मग कोण जाणार. शिवाय मार्ग चढणीचावहोता. बराच दम लागत असे. म्हणून भाविकमंडळी जात नसत निशाणगडावर.
आता त्या महिलेनं त्याला ती झेंडी देताच व त्यानं तसं सांगताच सुधाकरनं ठरवलं. आपण निशाणगडावर जायचं चाहे काहीही करावं लागलं तरी चालेल. तसं त्यानं त्याच्या मोरक्याला सांगताच तो निशाणगडाची वाट चालू लागला.
सुरुवातीला ती वाट मोठी बिकट वाटत होती. परंतू कालांतराने ती वाट सोपी होत गेली. त्यातच त्या रस्त्यानं त्या निशाणगडावर जायला चार जण तयार झाले. परंतू नंतर दोघांनी चढायचं नाकारलं. त्यातच पहिलं सुधाकर ती चढणीची वाट चढू लागला. तशी दुस-यालाही हिंमत आली.
ते उभे असलेलं निशाणगड. सुधाकर पुढं होता. तसा तो अर्ध्यातासातच जाताच दुसरा त्याचा मित्र जलदगतीनं आला. तसे ते दोघंही ती वाट चढू लागले.
ती पहाडाची चढावाची वाट चढतांना फारच कस लागत होता. तशी ती झेंडी हातात घेवून चढता येत नव्हते. म्हणून की काय, सुधाकरनं ती झेंडी आपल्या कमरेला लटकवत तो दोन्ही हातांनी कडा धरुन ती चढणीची वाट चालत होता. तशी त्याला शिवारायांच्या काळातील कोंढाण्याची गोष्ट आठवली.
कोंढाणा अभेद्य असा किल्ला. परंतू तो किल्ला घेतांना त्यावर रात्रीच जावं लागत होतं. त्यामुळं तानाजीनं यशवंती नावाच्या घोरपडीचा सहारा घेतला आणि तो उच्च उभाट कोंढाणा सर केला.
निशाणगडही अगदी कोंढाण्याचंच द्वितीय रुप. कोंढाण्यासारखीच बिकट वाट. तिथं जाणं म्हणजेच तारेवरची कसरत होती. त्यातच ते दोघंही जण कोंढाण्यावर निघाल्यासारखे आज निशाणगडावर निघाले होते. परंतू इथं कोणत्या यशवंतीचा सहारा नव्हता. तर इथे हाताच्या बोटांनी कडा धरुन निघावं लागत होतं. तसे ते तो कडा त्या बोटांनी धरुनच त्यांनी सर केला होता. थोड्याच वेळात निशाणगडाचा कडा आला. तिथं कोणीतरी कापूर जाळून गेला होता. धुवा निघत होता.
सुधाकरनं त्या कड्यावर पोहोचलेल्या त्या मित्रासह तिथं झेंडी रोवली व तो माघारी फिरला. तसा त्याला उतरतांना कोणताही त्रास झाला नाही. परंतू तो उंच उभाट निशाणगड आजही त्याच्या स्मरणात होता. आजही त्याच्या मित्रमंडळींपैकी कोणीही अजूनही निशाणगडावर पोहोचलं नव्हतं.
सुधाकर मित्रासह खाली उतरला. तसं त्याला त्याच्या सोबतच्या इतर मित्रमंडळींना भेटायचं होतं. त्यामुळं तो काजळीमध्ये उतरताच तो जलदगतीनं निघाला. त्यातच थोड्याच वेळात श्रवणबाळाचं मंदिर आलं. त्या ठिकाणी लवकरच सुधाकरनं पुजाविधी आटोपला व त्या मित्रांना पकडण्यासाठी तो पुन्हा वायूवेगानं पुढील मार्गाकडे मार्गस्थ झाला होता.

****************************************

श्रवणबाळ हे ते ठिकाण. या ठिकाणावरील एक कथा प्रसिद्ध आहे. ती म्हणजे श्रवणबाळाची. श्रवणबाळ हा मैनावतीचा मुलगा. तिला पुत्रप्राप्ती न झाल्यानं तिनं नागद्वाराला नवश केला होता की मी तुला कुंकू वाहणार अर्थात लावणार. परंतू जेव्हा तिला पुत्रप्राप्ती झाली तेव्हा ती ते सारं विसरली. त्यातच एक दिवस देव तिच्या स्वप्नात आले व सांगीतलं की तिनं मुलप्राप्तीसाठी नवश केलेला असून त्याचं पालन तिनं करावं अर्थात नवश फेडावा.
ठरल्याप्रमाणे एक दिवस ती नवश फेडण्यासाठी आपल्या बाळाला घेवून या रस्त्याने चालली असता देव नागाच्या रुपात आला. त्यावेळी त्याचे स्वरुप लहानशे होते. तो देव मनुष्यवाणीनं बोलला की तिनं त्याला कुंकू लावावं व नवश फेडावा. परंतू त्या नागाचे ते छोटे स्वरुप का असेना, त्याला घाबरुन मैनाराणीनं त्याला कुंकू लावलं नाही. तसं ते स्वरुप अंतर्धान पावलं.
दुस-या वेळी त्याचं थोडं मोठं स्वरुप आलं. यावेळीही देव म्हणालं की तिनं त्याला कुंकू लावावं. परंतू तिला याही वेळी भीती वाटल्यानं तिनं त्याला कुंकू लावलं नाही. अशाप्रकारे देवानं आपला आकार वाढविले. परंतू मैनाबाईनं त्याला कुंकू लावला नाही. त्यामुळं त्यानं श्रवणबाळाला जखडलं. त्यातच त्याला तो पिळगळायलाही लागला. त्यातच बाळ 'आई मला वाचव, आई मला वाचव' म्हणायला लागली. परंतू आईला भीती वाटत असल्यानं तिनं फक्त आरडाओरडा केला. परंतू आपल्या बाळाला वाचविले नाही. त्यातच ते बाळ गतप्राण झालं व मैनाईवर रडायची पाळी आली. तेच ते ठिकाण. त्याला श्रवणबाळ हे नाव. ते ठिकाण काजळी गावात असल्यानं त्याला काजळी नाव पडलं आहे.
महत्वाचं म्हणजे जे नवश फेडता येवू शकत नाही. ते नवश करायचे कशाला? लोकं म्हणतात की देव नाही. कारण तो दगड रुपात आहे. ज्या दगडाला बोलता येत नाही. चालता येत नाही. खेळता येत नाही. हालचाल करता येत नाही. परंतू ते अगदी बरंही आहे. तो दगडधोंड्यात आहे म्हणून बरेे. कारण जर हा देव वास्तविक रुपात असता तर आपण त्याचेजवळ उभे तरी राहू शकलो असतो का? उदा. शस्र परिधान केलेली काली वा सिंहावर बसलेली दुर्गा जर आपल्या पुढ्यात आली तर खरंच आपण तिला पाहात उभे राहू शकलो असतो का? की ती ज्या वाहनावर बसलेली आहे. त्या वाहनाच्या खाण्याच्या भीतीनं आपण पळ काढला असता. याबाबत विचार न केलेला बरा. देव हा मुुर्तीतच बरा. वास्तविक जीवनात नाही.
आपणाला आवडतो, शेष परिधान केलेला शंकर, सुदर्शन आरुढ क्रिष्ण, गदाधारी हनूमान, तसेच धनुष्यबाण घेतलेला राम........ परंतू ते केवळ दगडमुर्तीत किंवा चित्रातच आवडतात. वास्तविक जीवनात आवडत नाहीत. ते चित्रात किंवा मुर्तीतच बरे. कारण ते वास्तविक जीवनात आले आणि मोठाले रुप घेवून आले तर आपल्याला त्यांची भीतीच वाटणार आहे. कारण त्यांचा स्वभाव आपण विचार करतो तसा नसेल, बराच वेगळा असेल, ही संशयता नाकारता येत नाही.
काजळीतील श्रवणबाळ मंदिरात पुजाअर्चना करुन सुधाकर निघाला. त्यासोबतच त्याचा मित्रही. ते दोघंही जण त्या पाण्यातून निघाले. जिथे ती एक नदी होती. कोणी तिला बेलगंगा म्हणत. त्यातच ते दोघंही तिथे न थांबता तेथून ताबडतोब निघाले. त्यातच झपाझप पावलं टाकत ते पहिल्या पायरीजवळ आले.
ती पहिली पायरी......त्या पहिल्या पायरीजवळ जाताच सुधाकरला त्याचं मित्रमंडळ दिसलं. तसं त्याला हायसं वाटलं. तसा तो स्वतःला भाग्यवान समजू लागला.
आज त्याला तो निशाणगडाचा प्रसंग आठवत होता. काजळी आलं होतं. तिथं जाताच ते सर्व भक्तगण थांबले. त्यातच थकले असल्यानं त्यांना भूक खूप लागली होती. तसं पाहता तिथं जेवन सुरु होतंच. त्यातच त्यांनी तिथं पोटभर जेवन केलं.
ते जेवन करीत होते. तसा सुधाकरही जेवन करीत होता. तशी त्याची नजर त्या निशाणगडाच्या उंच टेकडीकडं गेली. तसा समोर एक सुचनाफलक दिसलं. निशाणगडावर जावू नये. शासनानं निशाणगडाची यात्रा बंद केली आहे.
ते सुचनाफलक........ एका झाडाला लटकलेलं. परंतू तरीही लोकं जात होते निशाणगडावर. तशी ती पहाडी सुधाकरलाही खुणावत होती नव्हे तर बोलवत होती त्याला. ये म्हणून आवाज देत होती. तो एकटक पाहात होता त्या निशाणगडाकडे. तसा त्याच्याकडे लक्ष असलेला एक भक्त म्हणाला,
"भाऊ, जावू नका निशाणगडाकडे. सरकारनं बंदी घातली आहे."
"मग हे भक्त कसे जात आहेत?"
"ते आपल्या रिस्कवर जात आहेत."
"म्हणजे?"
"म्हणजे काही झाल्यास सरकार त्यांना मुआवजा देणार नाही."
सुधाकरनं ते ऐकलं. तसा तो चुप बसला. तसं पाहता त्याला तिथं जायचंच नव्हतं. त्यामुळं की काय, त्याला चूप बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
सुधाकरनं व त्याच्या मित्रमंडळींनी श्रवणबाळाचा पुजाविधी आटोपवला आणि दे पुढे निघाले. कारण त्यांना त्यांच्या मुक्कामाचं ठिकाण गाठायचं होतं.
ते पावसाळ्याचेच दिवस होते. तसे ते पहाड चढत होते, उतरतही होते. परंतू दम लागत होता. कारण पाऊस नव्हता. तसा तो तीन दिवसापुर्वीपासूनच नव्हता. कोणीतरी तसंच सांगत होतं.
सुधाकरनं यापुर्वीही ब-याच यात्रा केल्या होत्या. परंतू असा प्रसंग कधी उदभवलाच नाही. दरवर्षी ते पहाडात येताच पाऊस यायचाच. मात्र त्याचं प्रमाण कमी अधिक असायचं. याहीवेळी पाऊस आलाच. परंतू तुटपुंजा. तोही धुपगडावर. आता तब्बल तीनचार तास होवूनही पावसानं हजेरी लावली नव्हती. अशातच ती पहिली पायरी आली. ती पहिली पायरी येताच सुधाकरला ती जुनी आठवण आली. याच ठिकाणी निशाणगडावरुन उतरल्यावर भक्तांची भेट झाली होती.
भक्तांनी या पहिल्या पायरीवर नारळ फोडला. तसे नारळ फोडून व कापूर लावून ते भक्त पुढे गेले.
पुढे जाताच जेवनं सुरु असलेली दिसली. परंतू आता जेवणाची इच्छा झाली नाही. ते चालत होते. एवढ्यात सपाट रस्ता लागला. तो सपाट रस्ता पार करताच पुन्हा एक उतरण लागली. ती उतरण उतरताच एका नदीचं पात्र दिसलं. ते पात्र आज कोरडं होतं. निव्वळ गोटे होते त्यात. पाण्याचा एक अंशही नव्हता तिथे.
त्या नदीकाठावर झाडच झाडं पसरली होती. त्या झाडांच्या फांद्यांना कपडे लटकलेले होते. तसं भक्ताचं गाणं ऐकायला येत होतं.

'मायची नेली चोळी गा बापाचा नेला शेला
बापाचा नेला शेला न् लेक तिरथाले गेला'

ते महादेवाचे गाणे. लोकं गाणे म्हणत म्हणत गड चढत होते. गाणे म्हणण्याचा उद्देश हा व्यायामाचाच एक प्रकार होता. परंतू भक्तांचा विश्वास गाणे म्हटल्यास देव प्रसन्न होतो यावर होता. व्यायामावर नव्हता.
तो एक व्यायामच होता. तोंडाचा आवाज स्पष्ट करण्याचा. त्यातच त्या ओरडू ओरडू गाणे म्हटल्याने शरीरातील पूर्ण नसावर ताण पडून त्या मोकळ्या होत असल्यानं जुन्या काळापासून महादेव किंवा नागद्वारला जातांना गाणे म्हणण्याची पद्धत आली होती. परंतू गाणे म्हटल्यानं जास्त थकतात. म्हणून मौन बाळगलेलं बरं हे लोकांना माहित नसल्यानं ते बोलत चालत जात. तसं पाहता त्यांचंही बरोबरच होतं. कारण बोलत चालत असल्यानं वेळ निघून जात होता. ते थकले असले तरी थकवा जाणवत नव्हता त्या वाटेवर काहीजणांना.
ती नदी पार केली. तसा चढाव आला. थोडासा चढाव. त्यातच दम लागायला लागला. तसं काहीवेळ चालताच घंट्या वाजायला लागल्या. तसं कोणीतरी म्हणालं, 'बाप्पाचा मोठा दरबार आला.'
तो बाप्पाचा मोठा दरबार. त्याचं नाव पदमशेष होतं. तो पदमशेष ज्याला भक्तमंडळी या संपूर्ण पहाडाचा मालक समजायचे.
पदमशेष हे नागाचं ठिकाण. ते ठिकाण आलं होतं. तसा सुधाकरला त्याचा भुतकाळ आठवला. गतकाळात तो पदमशेषची गुफा चढला होता. तसा तिथं त्या पदमशेष बाबापाशी एक पुजारी बसला होता. तो सांगत होता की एकदा तिथं एक बाबा निघाला. (बाबा अर्थात साप. नागद्वारी यात्रेकरु त्याला बाबा म्हणतात. बाबा याचा अर्थ बाप. त्याला आपला बापच समजतात. बाप अर्थात जबाबदारी सांभाळणारा.चोखपणे पार पाडणारा) तो बाबा एवढा मोठा होता की माझी पंढरी घाबरली. होती. मी विचार केला की पळालो तरी मरणार आणि नाही पळालो तरी मरणार. शेवटी मन पक्कं केलं व न घाबरता बसूनच राहिलो. त्यानंतर थोड्या वेळानं बाबा खाली निघून गेला.
तो पदमशेष मोठा मालक. जणू पहाडाचा मालकच समजतात त्याला. तिथं रांग होती. परंतू यावेळी दरवर्षीपेक्षा लहानशी रांग होती. त्यामुळं की काय, लवकरच दर्शन झालं. तसं दर्शन होताच सुधाकर मित्रासमवेत तेथून निघाला. मात्र भक्तगण तिथं चहा पिल्याशिवाय निघाली नाहीत.
तिथे असलेला फुकटचा चहा. काहीजण तो चहा पित होते. काही मात्र अर्धा अर्धा कप चहा फेकत होते. तसं त्याला एका रात्रीची आठवण आली.
गतवर्षी त्याचा एका पहाडीत मुक्काम होता. त्यातच त्या पहाडीत जेवन मिळालं होतं भक्तांना तेही फुकट. तसं ते जेवन जेवत होते. बरंचसं अन्न फेकतही होते. त्यामुळं सुधाकरला अत्यंत वाईट वाटत होतं. त्याला वाटत होतं की नागद्वारला जेवन फुकटात मिळतं. याचा अर्थ असा नाही की ते अन्न फेकावं. जेवढं पोटाला लागते, तेवढंच घेतलेलं बरं. परंतू लोकं ताटात अन्न जास्त घेतात अन् खाणं न झाल्यास फेकून देतात. त्याला वाटत होतं की जेवढं जेवायला लागते. तेवढंच घ्यावं अन्नाची नासाडी करु नये. हा अन्नाचा अपमान आहे.
सुधाकरचं बरोबर होतं. कारण हे अन्नाचे पोते वाहणारे ते कोरकू. त्या कोरकूच्या भरवशावर तर यात्राच होती. बिचारे रक्ताचं पाणी करीत करीत पचमढीतून अन्नाचे पोते या पहाडीत आणत होते. तसेच भांडेही. त्यातच ते आणायला भाडेही लागायचे आणि भक्तगण त्या अन्नाला पैसे मोजावे लागत नाही, म्हणून पोटाला लागेल, तेवढं अन्न ताटात न घेता. जास्तीचं घेवून ते फेकत होते. कारण त्यांना अन्नाचं मोल माहित नव्हतं.

****************************************

पदमशेषचा चहा घेवून झाला होता. तसे सर्व भक्तगण ती वाट उतरत होते. त्यातच एक लहानशी सीडी होती. तिथे एक म्हातारी दिसली. तिला नीट चालताही येत नव्हतं. तरीही ती चालत होती. भक्तांंनी तिला विचारले असता ती म्हणाली, 'माझ्या तेरा यात्रा झाल्या.' तसा सुधाकरला दत्तगीरीवरचा गतवर्षीचा एक प्रसंग आठवला. एक भक्त म्हणत होता की माझ्या शंभरच्या वर यात्रा झाल्यात.
शंभर! आश्चर्य करण्यालायक गोष्ट होती. कारण शंभर माणसाचं वय नसतं. तसं आश्चर्य प्रकट करताच तो भक्त म्हणाला की मी दरवर्षी तरुणपणात एका वर्षाला तीनतीन यात्रा केलेल्या आहेत.
पदमशेषच्या चढणीचा उतार उतरताच त्याला तो परीसर दिसला. या ठिकाणी बक-या दरवर्षी चरतांना दिसत होत्या. यावर्षी दिसल्याच नाहीत. परंतू त्याची गत आठवण ताजी झाली. जेव्हा त्याचा विवाह झाला होता. त्यातच त्या विवाहानंतर त्यानं आपल्या पत्नीला नागद्वार यात्रेलासोबत आणलं होतं. तेव्हा इथे बकरी दिसताच ते त्याला तेव्हापासून बकरी बकरी म्हणून चिडवीत होते. विशेष म्हणजेे ते संबोधन त्याच्या पत्नीसाठी होतं.
पदमशेषचा तो पहाड उतरताच पुन्हा एक नदी लागली. ह्या नदीतही पाणी नव्हतं पुरेसं. त्यावरुन यावर्षी नागद्वारला पाणीच नाही असं अगदी स्पष्टच दिसत होतं.
ती नदी तशी पार केली. पुढं सपाट रस्ता आला. तशी त्याला आणखी एक आठवण आली. ती आठवण म्हणजे शंभर रुपयाची. सुधाकरला एकदा शंभर रुपयाची नोट इथंच सापडली होती. कोण्या भक्ताची बहूतेक पडली असेल ती नोट. त्यानं ती नोट आपल्या खिशामध्ये टाकली व फायदा झाल्याबाबत सुस्कारा सोडला आणि ती नोट खर्च न करण्याचा त्यानं निर्णय घेतला. परंतू काय आश्चर्य पुढं पश्चिम द्वार होतं. तिथं पोहोचेपर्यंत त्याला तापच आला होता. त्यानंतर त्यानं ती नोट पश्चिमद्वारमध्ये दान केली होती.
सुधाकर जसजसा नागद्वाराची वाट चालत होता. तसतशा त्याला त्याच्या गतकाळाच्या आठवणी येत होत्या. काही आठवणी त्याला दुःख देवून जात होत्या तर काही आनंदही देत होत्या. अशातच तो त्या सपाट जागेवरुन खाली उतरला. त्यातच ती नदी लागली.नदीत थोडं पाणी होतं. ती नदी विस्तीर्णही होती. त्यातच तो नदीमधून झपाझप पावले टाकत पश्चिमद्वाराकडे निघाला होता.
पश्चिमद्वार.........निसर्गाचा अनमोल नजारा. निसर्गानं याठिकाणी सौंदर्य एकवटून ठेवल्याचा भाष होतो. या ठिकाणी उंचावरुन एक पाण्याचा प्रवाह पडतो. तो एवढ्या उंचीवरुन व तिक्ष्ण वेगानं पडतो की तो थेट डोक्यावाच लागतो. तो डोक्याला मार देताच डोक्यातल्या नसा न नसा मोकळ्या झाल्याशिवाय राहात नाहीत. भक्तगण इथं आवडीनं आंघोळ करीत असतात.
सुधाकर पश्चिम द्वाराची वाट चालत होता.तसं पश्चिम द्वार आलं आणि त्याला तो नजारा नजरेत पडला. तो नजारा त्याला भुतकाळात घेवून गेला.
ती उंच पडणारी संततधार पहिल्या वेळी जेव्हा त्यानं पाहिली होती, तेव्हा त्याचं मन मोहून टाकलं होतं. त्यातच त्या नदीपात्रातून पायी चालत असतांना त्या पाण्याचा गारवा केवळ पायालाच झोंबत नव्हता तर तो मस्तकातही गेला होता. आताही त्यात बदल झाला नव्हता. सुधाकरनं पहिल्या वेळी जेव्हा तो धबधबा पाहिला, तेव्हा तो आश्चर्यचकितच झाला होता. ते पाणी कुठून येकं हे त्याला कळेनासं होतं. परंतू ती निसर्गाचीच किमया........ती किमया अशी की नारळातही पाणी निर्माण करु शकते. हा तर बाहेरचा भाग आहे. असाच निसर्गाचा देखावा त्यानं अनहोनीलाही पाहिला होता. ज्यावेळी तो येत होता नागद्वारला.
अनहोनी ठिकाण. हे गरम पाण्याचं कुंड होतं नव्हेतर गरम पाण्याचा झरा. तिथं लोकांनी अनहोनी अर्थात ज्वालादेवीचं मंदिर बांधलं आहे. सुरुवातीला अनहोनीला जायला पुरेसे रस्ते नव्हते. पाऊस सुरु असल्यानं व आजुबाजूला चिखल असल्यानं गाड्या फसत होत्या. चालक मंडळी अनहोनीला जायला धजत नव्हते. अशातच लोकं अनहोनीचं दर्शन न करता सरळ सरळ पचमढीला जात.
अनहोनीला एक नदीही वाहते. ती बाजूनच वाहते. त्या नदीत थंड पाणी आहे आणि त्या कुंडातून जो पाण्याचा झरा निघतो. त्यात गरम उकळतं पाणी आहे.एखाद्याला भात बनवायचा असल्यास पुचूंंडीत तांदूळ बांधून टाकून द्या कुंडात. पाच मिनीटात भात तयार. तशी गतवर्षाची एक आठवण सुधाकरला आली. गतवर्षी कोणतातरी एक व्यक्ती सांगत होता.
'मी अमरावतीचा. मला कोड फुटलं होतं. कोणीतरी सांगीतलं की तू अनहोनीला जा. तिथे काही दिवस राहा. त्या गरम पाण्याच्या झ-यात आंघोळ कर काही दिवस. मग बघ तुझा कोड कसा राहतो ते. मी आलो. मी येथील गरम पाण्यात आंघोळ करु लागलो. आता बरेच दिवस झाले. मला गरम पाण्याची सवयही पडली. माझं कोडंही सुधारलं आहे संपुर्णतः आणि एवढंच नाही तर मी त्या गरम पाण्याच्या सवयीनुसार त्या कुंडातही उतरतो. ते पाणी मशीननं काढून ती जागा स्वच्छ करतो. मला तर वाटते की अनहोनी मातेनं भक्तांच्या सेवेसाठीच व त्यांना स्वच्छ पाणी मिळावं. म्हणून कदाचित ती स्वच्छता करण्यासाठी मला बोलावलं असावं. मला त्या पाण्याचं काहीही वाटत नाही.
सुधाकरला ते ऐकून आश्चर्य वाटत होतं की एवढं तप्त उकळतं पाणी आणि त्या उकळत्या पाण्यात हा माणूस चक्क उतरतो म्हणून सांगतोय. आपण तर साधं दोनचार सेकंद आपला एखादा शरीराचा अवयव त्यात टाकून ठेवू शकत नाही. अन् हा चक्क उतरण्याची भाषा करतोय. तसं सुधाकरला ते खरं वाटत नव्हतं. परंतू काही वेळ जाताच तो माणूस आंघोळ करायसाठी या कुंडात गेला नव्हे तर तो चक्क त्या कुंडात पोहू लागला होता.
तो व्यक्ती काही धष्टपुष्ठ नव्हता. बारीकसाच होता. गाल हाडाला चिकटलेले होते आणि संपुर्ण शरीराचं मांसही हाडाला चिकटलेलं होतं. त्या तप्त पाण्याच्या स्पर्शानं त्याचं संपुर्ण शरीर काळं पडलं होतं.
सुधाकरनं त्यापुर्वी उनकेश्वरची किमया पाहिली होती. यवतमाळ जिल्ह्यातील उनकेश्वर. जे महाराष्ट्रात आहे. इथेही एक गरम पाण्याचं कुंड आहे आणि बाजूलाच एक नदी वाहात असून तिथंही नदीत थंड पाणी आहे.
ही सारी निसर्गाची किमया. सुधाकरनं अनहोनीला केलेली आंघोळ अंग शेकल्यासारखं झालं होतं त्या गरम पाण्यानं. काही जणांनी साबण लावली होती अंगाला. मात्र या पाण्यात गंधकाचं प्रमाण जास्त असल्यानं तो साबणाचा फेस अंगाला चिकटला होता. तो निघत नव्हता. शेवटी त्यांना त्या नदीतील थंड पाण्यानं आंघोळ करावी लागली व साबणाचा फेस काढावा लागला.
सुधाकर पश्चिमद्वारला होता. परंतू त्याला अनहोनीची आठवण येताच सारं हुबेहूब आठवत होतं. तशी रात्र होत चालली होती. मुक्कामाचं ठिकाण थोडंसं दूरच होतं. त्यामुळं मोरक्याच्या सुचनेनुसार घाई करीत सुधाकरनंही आपली आंघोळ उरकवीत पुढली वाट धरली. मात्र मनात पश्चिमद्वाराच्या आठवणी होत्या. तसेच त्या पहाडाच्या आतमधील पाण्यातून बरंच लांब गेल्यावर नागाच्या दर्शनाचं आश्चर्य होतं.
पुढचं स्थळ होतं जोडीद्वारवाले बाबा. या ठिकाणी नागनागीण जोडीनं एकत्र राहात असतील वा दोन्हीही नर साप जोडीनं राहात असतील बहूतेक. म्हणून याला जोडीवालेबाबा असं नाव पडलं असावं.
सुधाकर पश्चिम द्वारातून निघाला. त्यातच खाचखळगे ओलांडीत तसेच पहाडाची चढण उतरत तो जोडीवाल्याबाबापाशी आला. ज्यावेळी तो जोडीवालेबाबाजवळ आला. तेव्हा तिथं रात्र बरीच झाली होती. त्यामुळं मुक्काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शेवटी त्यांनी एका ओळखीच्या गिरीत मुक्काम ठोकला.
गिरीवाल्यांनी त्यांची झोपण्याची व जेवनाची चांगली सोय केली होती. चांगलं गरम गरम जेवन दिलं होतं. तसेच भज्यांचा नवीन प्रकार म्हणजे सोयाबीन वडीचे भजे चारले. विशेष म्हणजे सोयाबीन वडीचे भजे खाण्याची ती पहिलीच वेळ होती. भाजीही चांगली बनल्यानं भक्तमंडळी भरपेट जेवले होते. तसं थकव्यानंही जेवन भरपेट झालं होतं.
रात्रीचे दहा वाजले होते. तसं सर्व भक्तांचं जेवन आटोपलं होतं व त्यांनी अंथरुणं टाकली होती. तसं ते नवीन ठिकाण झोप कशी येणार हा प्रश्नच नव्हता. सारेच थकले होते. त्यामुळं झोप केव्हा लागली ते समजलंच नाही.
दुसरा दिवस उजळला. सर्वजण लवकरच जागे झाले होते. त्याचबरोबर प्रातःविधी आटोपून सर्वजण पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाले होते. तसं मोरक्यानं आदेश दिला. तसा जमीनीवर कापूर लावण्यात आला व कापूर घेवून ते सर्वजण स्वर्गद्वाराकडे निघाले.
स्वर्गद्वार.......स्वर्गाचा आनंद आहे त्यात. त्या ठिकाणी जातांना खरंच आपण स्वर्गात जात आहोत असं वाटतं. एवढं ते सुंदर आहे. चढाई आहे उंचच उंच अशी. सिड्याही आहेत. चढायला अलिकडं सिड्या असल्यानं स्वर्गद्वार चढणं सोपं झालं आहे. तसं पाहता ते कठीणच. समजा त्या सिड्या चढतांना एखाद्याला अंधारी आल्यास वा त्याचा बीपी लो झाल्यास तो सरळ खाईत. अशी इथे अवस्था. काही लोकं सांगतात की इथं बरेच हादसे झालेले असून बरेचशी मंडळी मरण पावलेली आहेत. म्हणून याला स्वर्गद्वार नाव पडलेलं आहे.
येथे भरपूर जागा असून त्या जागेवर एवढंसं सुद्धा पाणी दिसत नाही. त्यातच दोन गुफा आहेत. असे म्हणतात की त्या गुफेत एकदा एका भक्ताला सिंह बसलेले दिसले. परंतू त्या सिंहांनी भक्तमंडळींना काहीही केलेलं नाही.
सिंहाच्या बाबतीत असा समज आहे की हे सिंह त्यालाच त्रास देतात की जो पापी आहे. याचाच अर्थ असा की नागद्वार यात्रा ही पापपुण्याचा लेखाजोखा मोजते.
कोणीतरी सांगीतलेली गोष्ट अशी. एकदा एके ठिकाणी चौघं जण झोपलेले असतांना दोघं पापी असल्यानं व त्यांनी व्याभीचार केल्यानं सिंहांनी येवून दोघांचेच चेहरे पंज्यानं ओबडधोबड केले. दोघांचे नाही. सकाळी उठून जेव्हा पाहिलं तेव्हा ते सिंहाचे पंजे चेह-यावर स्पष्ट उमटलेले दिसत होते.
स्वर्गद्वारात वर एक गुफा आहे. त्या गुफेत एक भगवान शंकराचा फोटो लागलेला असून तो डोळ्यानं दिसतो. या गुफेत कागदी लिंबू फेकले जातात. जर ते कागदी लिंबू त्या गुफेत गेले तर तो पुण्यवान समजला जातो. तसेच तिथे त्या भगवान शंकराच्या फोटोला लागून लिंबू आतमध्ये गेल्यास तो व्यक्ती अधिकच पुण्यवान समजला जातो. सर्वच भक्तगण लिंबू फेकतात. परंतू ब-याच जणांचे लिंबू त्या गुफेत जात नाहीत. एखाद्याचेच जातात. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी स्वर्गाचाच आनंद मिळतो. म्हणून याचं जे नाव स्वर्गद्वार ठेवलं. ते सार्थक नाव आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
सुधाकर स्वर्गदाराची वाट चढत होता. त्यातच त्याचेसोबतचे मित्रमंडळही तो रस्ता चढत होते. तो रस्ता फार कठीण असून चढणीचा होता. त्यातच लोखंडी सिड्याही लावलेल्या असल्यानं ती वाट चढणं सुधाकरला कठीण वाटत होतं. परंतू मोरक्याचा आदेश. तो पाळणे आवश्यक होते. म्हणून की काय, सर्वजण मोरक्याच्या आदेशाचॉ पालन करीत चालले होते.
थोड्याच वेळात स्वर्गदार आलं व सुधाकरनं जी कल्पना केली होती. ती सर्व कल्पना खरी ठरली होती. स्वर्गदार, स्वर्ग चढल्याचा आनंद देत होता.
स्वर्गदार आला होता. भाविकांनी स्वर्गदाराचं दर्शन घेतलं. काहींनी लिंब फेकले. त्यातच काहींचे लिंब त्या फोटोला लागून आतमध्ये गेले. काहींचे जातच नव्हते. मात्र एखादा लिंबू आतमध्ये गेल्यास मजा येत होती. न गेल्यास भाविक हिरमुसल्या मनानं अगदी गप्प राहात होता.
****************************************

ती नागद्वाराची यात्रा. त्या यात्रेची तयारी अगदी महिण्याभरापुर्वीपासूनच झाली. नागद्वाराला कोण कोण चालणार. म्हणून मोरक्याला जास्त कसरत करावी लागली.
मोरक्या.........त्या मोरक्याचं नाव आनंद होतं. आनंदाला सर्वांना आनंद देणं आवडत असे. तो व्यक्ती सर्वांच्या आनंदात आपला आनंद मानून दरवर्षी न चुकता यात्रा काढत असे. त्याच्याचमुळं सर्वांच्या यात्रा घडत असत. हा मोरक्या पुर्वीपासून कुठंही बसत नसे. तो सर्वांच्या मागं राहात असे. त्यातच सर्वांना घेवून चालत असे. त्यामुळं यात्रेच्या ठिकाणी त्याचं नेतृत्व चांगलं असल्यानं कोणतीही गैरसोय होत नव्हती.
आनंदाच्या मदतीनं सुधाकर तसेच इतर भक्त मंडळींच्या यात्रा घडत गेल्या. त्यातच एवढी चढाई असतांनाही आनंदकड पाहून कोणालाही ती चढाई मोठी वाटत नव्हती.
आनंदनं अगदी लहानपणापासून ब-याच यात्रा केल्या होत्या. त्यानं तर ब-याच दिवसापासून यात्रेला खंडही पाडला नव्हता. दरवर्षी कोणी येवो अगर न येवो, आनंद महिण्याभरापुर्वीपासून तयारीत लागायचा. त्यातच त्याचा फोन आला रे आला की न जाणा-या भक्तांनाही जावंसं वाटायचं. त्यातच त्याच्या यात्रेत काही काही मंडळी ही निरंतरतेचं प्रतिक होती.निरंतर म्हणजे नेहमी जाणारे.
आनंद एक पोलिस अधिकारी होता. त्यामुळं या यात्रेला जातांना कोणालाही भीती वाटायची नाही. अगदी निर्भय होवून सगळेजणं नागद्वारच्या यात्रेला निघायचे. कारण त्यांना माहित होतं की आनंद कोणावरही आच येवू देत नाही. सगळ्यांना सांभाळून नेतो काळजी घेतो. गैरसोय करीत नाही.
आनंद........जाडजुद आकाराचा होता. परंतू मजबूत बांध्याचा होता. सारे भक्तगण थकायचे. परंतू तो थकायचा नैही. त्यातच त्याला आतापर्यंत कधी बसलेला कोणीच पाहिलं नव्हतं. तो श्वासही घ्यायचा. तो बसून न घेता घोडा जसा उभ्याउभ्यानं श्वास घेतो. तसा घ्यायचा. परंतू आता तो बराच थकला होता. त्यातच तो थोडा लठ्ठ असल्यानं त्याला पुरेसं चालणं जमत नव्हतं. तरीही तो नागद्वाराची वाट चालत होता.
तो लठ्ठ असल्यानं काही ठिकाणी त्याला दरवर्षी सांभाळावं लागायचं. दरवर्षी कोणी ना कोणी राहायचं. यावर्षी त्याचा किरायेदार होता. ज्याने यावर्षी संपुर्ण प्रवासात त्याचं पिशवीचं ओझं तर सांभाळलं होतं. व्यतिरीक्त त्यालाही सांभाळलं होतं. तसा सुधाकरही सांभाळत होता. त्याचबरोबर कधीकधी सारे भक्तगणंही. मात्र त्याच्या धाडसाची दाद द्यावी लागेल की तो नागद्वार एवढं कठीण असूनही नकार न देता ती नागद्वाराची वाट चालत होता.
त्याला ममदत करणा-या त्याच्या किरायेदाराचं नाव गुलाब होतं. तो गुलाबासारखाच होता. पवित्र निर्मळ मनाचा. स्वभावानं सोज्वळ.
नुकतीच ती स्वर्गद्वाराची वाट, स्वर्गद्वार येताच संपली होती. दर्शनही झालं होतं. त्यातच आनंदनं आदेश दिला. त्यानुसार सर्वजण पुन्हा पुढील रस्ता चालू लागले. त्यातच रस्त्यात ज्या ज्या देवांच्या मुर्त्या दिसत. त्या त्या मुर्तीवर अक्षदा टाकू लागले.
आनंद........जो या यात्रेचा प्रमुख होता. तो आज चालत होता कसातरी. त्याला मदत करायला सुधाकर, गुलाबसह सारेच होते.
प्रवासात तीन व्यक्ती म्हातारे होते. आनंदपेक्षाही जास्त वयाचे. दोघं बारीक होते. एक थोडा लठ्ठ होता. तिघंही नोकरीतून निवृत्त झाले होते. आनंद अजूनही नोकरीवरच होता. त्या निवृत्तपैकी एक पोलिस इनस्पेक्टर होता. तो बहूतेक घरी व्यायाम करीत असेल, कारण तो भराभर चालत होता. त्यातच बाकी दोघंजणंही निवृत्ती स्विकारलेली माणसं दुडूदुडू धावल्यासारखी चालत होती. त्यांचं नाव देवीदास, योगेश व होतं. त्यातच दोन पोलिस शिपाही होते यात्रेत. दोघंही तरुणच होते. एक थोडा जास्त वयाचा वाटत होता. तसेच तो नेहमी लवकर चाला म्हणत घाई करायचा. परंतू यावर्षी आनंद ज्या जागेवर एकदा का बसला. ती जागा लवकर उठतच नव्हता.
त्या दोन तरुण शिपायापैकी एकाचं नाव होतं. अभय तर दुस-याचं नाव अमेय होतं. अभय....... त्याला चढाई काहीच वाटत नव्हती. कारण त्याच्या पाठीवर त्याच्या स्वतःचंही ओझं नव्हतं. त्याचं ओझं दुस-यांनीच घेतलेलं होतं. तर अमेयच्या पाठीवर मोठं ओझं होतं. तो तर चालण्याच्या बाबतीत जास्तच वयोवृद्ध वाटत होता. नेहमी मागच राहायचा.
बाकी मुलं होती. ती मुलं बहूतेक तिशीच्या आतील होती. काही पोलिस अधिकारीही घ्यायचा. या यात्रेत दरवर्षी चारचार पोलिसवाले असायचे. तसेच या पोलिस मित्रमंडळीत काहीजण तर ठरलेलेच असायचे. असे बरेचसे पोलिस अधिकारी आनंदसोबत आनंद घेण्यासाठी परीवारासह नागद्वार यात्रेला येवून गेले होते.
आनंद ज्यावेळी नागद्वार यात्रा काढायचा. तेव्हा त्याचा उद्देश फक्त सेवा होता. नागद्वारचे भक्तलोकं मोठमोठ्या गि-या स्थापन करुन अन्नदान करुन अन्नदानाची सेवा करीत आणि आनंद आापल्यासोबत अशी भक्त मंडळी सोबत नेवून त्यांची गैरसोय न करता योग्य प्रकारे सांभाळून त्यांची सेवा करीत होता. या यात्रेत आनंद आपल्या मित्रमंडळींची राहण्याची सोय, जेवनाची सोय, चायपाण्याची सोय करीत होता. त्यात पैसेही मागत नव्हता. मग प्रवासाच्या शेवटच्या दिवशी गाडी एका मंदिरात थांबत असे. तिथे कढई व महाप्रसाद होत असे. तिथे पैशाचा हिशोब होत असे व प्रत्येकाच्या वाट्याला जेवढे आले तेवढेच पैसे आनंद गोळा करीत होता. मात्र त्यात एक पैसाही जास्त न लावता तो छदामही घेत नव्हता.
आनंद स्वभावानं चांगला होता. दरवर्षी तो ज्याप्रमाणे यात्रा करीत असे. तसेच भोजनदानही करीत असे मोठा कार्यक्रम करुन. तसा तो दान देण्यातही अग्रेसर असून प्रत्येक ठिकाणी तो दान देत असे. तसेच प्रत्येक ठिकाणी नारळ आणि पुजाविधी चढवीत असे. मग ते पुजेचं साहित्य कीतीही रुपयाचं होवो.
आनंद........जाडजुद आकाराचा होता. परंतू मजबूत बांध्याचा होता. सारे भक्तगण थकायचे. परंतू तो थकायचा नैही. त्यातच त्याला आतापर्यंत कधी बसलेला कोणीच पाहिलं नव्हतं. तो श्वासही घ्यायचा. तो बसून न घेता घोडा जसा उभ्याउभ्यानं श्वास घेतो. तसा घ्यायचा. परंतू आता तो बराच थकला होता. त्यातच तो थोडा लठ्ठ असल्यानं त्याला पुरेसं चालणं जमत नव्हतं. तरीही तो नागद्वाराची वाट चालत होता.
तो लठ्ठ असल्यानं काही ठिकाणी त्याला दरवर्षी सांभाळावं लागायचं. दरवर्षी कोणी ना कोणी राहायचं. यावर्षी त्याचा किरायेदार होता. ज्याने यावर्षी संपुर्ण प्रवासात त्याचं पिशवीचं ओझं तर सांभाळलं होतं. व्यतिरीक्त त्यालाही सांभाळलं होतं. तसा सुधाकरही सांभाळत होता. त्याचबरोबर कधीकधी सारे भक्तगणंही. मात्र त्याच्या धाडसाची दाद द्यावी लागेल की तो नागद्वार एवढं कठीण असूनही नकार न देता ती नागद्वाराची वाट चालत होता.
त्याला ममदत करणा-या त्याच्या किरायेदाराचं नाव गुलाब होतं. तो गुलाबासारखाच होता. पवित्र निर्मळ मनाचा. स्वभावानं सोज्वळ.
नुकतीच ती स्वर्गद्वाराची वाट, स्वर्गद्वार येताच संपली होती. दर्शनही झालं होतं. त्यातच आनंदनं आदेश दिला. त्यानुसार सर्वजण पुन्हा पुढील रस्ता चालू लागले. त्यातच रस्त्यात ज्या ज्या देवांच्या मुर्त्या दिसत. त्या त्या मुर्तीवर अक्षदा टाकू लागले.
आनंद........जो या यात्रेचा प्रमुख होता. तो आज चालत होता कसातरी. त्याला मदत करायला सुधाकर, गुलाबसह सारेच होते.
प्रवासात तीन व्यक्ती म्हातारे होते. आनंदपेक्षाही जास्त वयाचे. दोघं बारीक होते. एक थोडा लठ्ठ होता. तिघंही नोकरीतून निवृत्त झाले होते. आनंद अजूनही नोकरीवरच होता. त्या निवृत्तपैकी एक पोलिस इनस्पेक्टर होता. तो बहूतेक घरी व्यायाम करीत असेल, कारण तो भराभर चालत होता. त्यातच बाकी दोघंजणंही निवृत्ती स्विकारलेली माणसं दुडूदुडू धावल्यासारखी चालत होती. त्यांचं नाव रमेश, सुरेश व नरेश होतं. त्यातच दोन पोलिस शिपाही होते यात्रेत. दोघंही तरुणच होते. एक थोडा जास्त वयाचा वाटत होता. तसेच तो नेहमी लवकर चाला म्हणत घाई करायचा. परंतू यावर्षी आनंद ज्या जागेवर एकदा का बसला. ती जागा लवकर उठतच नव्हता.
त्या दोन तरुण शिपायापैकी एकाचं नाव होतं. अभय तर दुस-याचं नाव अमेय होतं. अभय....... त्याला चढाई काहीच वाटत नव्हती. कारण त्याच्या पाठीवर त्याच्या स्वतःचंही ओझं नव्हतं. त्याचं ओझं दुस-यांनीच घेतलेलं होतं. तर अमेयच्या पाठीवर मोठं ओझं होतं. तो तर चालण्याच्या बाबतीत जास्तच वयोवृद्ध वाटत होता. नेहमी मागच राहायचा.
बाकी मुलं होती. ती मुलं बहूतेक तिशीच्या आतील होती. असा सुधाकर आणि आनंदचा भक्तमंडळ आज स्वर्गद्वारासमोरील वाट चालत होता. तसं तिथंही दगडधोंडे आणि त्या पहाड्या पार कराव्या लागत होत्याच.
नुककंच स्वर्गद्वार गेलं होतं व आता चिंतामणी नावाचं ते ठिकाण आलं होतं. तसं सर्व भक्तांनी भक्तीभावानं नारळ विकत घेतलं व ते चिंतामण बाबाच्या दर्शनाला निघून गेले. त्यासोबत सुधाकरही. सुधाकर यावेळी पुढं होता. कारण तो लवकरच चिंतामणीला पोहोचला होता.
चिंतामणी सुधाकरचं आवडतं ठिकाण. इथे आजुबाजूला भरपूर देवस्थानं आहेत. त्याचबरोबर भक्तांना राहता यावं म्हणून भरपूर सोईही आहेत. त्यातच कोणाला वेळेवर कोणता आजार उद्भवल्यास दवाखान्याचीही सोय आहे. जेवनाखावण्याचीही सोय आहे. जेवनात खमंग इडली, जिलेबीही इथे मिळते. त्याचबरोबर नाना प्रकारचं जिनस याठिकाणी मिळतं. महिलांना सुरक्षीतपणे शौचालयात जाता यावं म्हणून शौचालयाच्याही सुविधा आहेत. पाण्याचीही उत्तम सोय आहे.
चिंतामणीच्या नावातच सगळं काही आहे. चिंतामणी अर्थात चिंता हरण करणारा म्हणजेच चिंतेवर विजय मिळवून देणारा. अशी त्याची ख्याती आहे. या ठिकाणी एक दरबार आहे. काही जुने भक्त सांगतात की नागद्वारला भक्त जाण्यापुर्वी वा ही यात्रा भरविण्यापुर्वी इथे देवांची सभा होते. त्या सभेत भक्तांना कोणत्याच समस्या उद्भवू नयेत. म्हणून सारेच निर्णय घेतले जातात. काही निर्णय कठोरही असतात.
हा दरबार........ त्या दरबारातील जागा मुलायम आहे नव्हेतर ती एक मोठी गुफा आहे. या ठिकाणी भक्त सहज जावू शकत नाहीत. कारण चढणं कठीण आहे आणि समजा गेल्यास तिथं कधीकधी वाघ, सिंह विश्रांती करीत असलेले दिसतात. या दरबारात सात दरवाजे आहेत. अंतर्मनातून पाहिल्यास ते सोन्याचे दिसतात. तसेच खाली पिवळसर माती असून ती गादीसारखी असल्यानं वाघ, सिंह इथे येतात व आश्चर्य देवून जातात की एवढ्या उंचावर माणूस जात नसतांना हे वाघ, सिंह कसे जात असावेत. परंतू ती निसर्गाचीच किमया. तसं पाहता या ठिकाणी भगवान शिवाच्या लहानमोठ्या पिंडी बनलेल्या दिसतात. त्या कोण बनवतात हेही एक आश्चर्यच आहे.
दुसरं ठिकाण आहे. नागीणी पद्मिनीचं. आख्यायीका आहे की नागीनी पद्मिनी या नागाच्या बहिणी होत्या. त्यांचा विवाह श्रीकृष्णाशी झाला होता.
निसर्ग........निसर्गाची किमया मोठी न्यारी आहे. नागद्वारलाही एक दरबार नावाचं स्थळ आहे. एकदा एक व्यक्ती असाच तो दरबारात गेला असता त्यानं पाहिलं की एक किडा भगवान शिवाच्या पिंडी तयार करतो. तशा तिथं लहानमोठ्या पिंडी होत्या. त्या लहानमोठ्या पिंडी लहानमोठे किडे बनवीत होते.
किती निसर्गाची किमया की हे किडे भगवान शिवाच्या लहानमोठ्या पिंडी बनवतात. त्यांच्यात ती कला आहे. याबाबत एक गोष्ट सांगतो. एकदा एका मुंगीनं एका मधमाशीला प्रश्न केला की तू नित्यनेमानं शहद गोळा करतेस. परंतू तो स्वार्थी मनुष्य तुझं शहद नेहमी चोरुन नेतो. त्याबद्दल तुझं मत काय? तुला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही काय? त्यावर मधमाशी म्हणाली,
"वाटते ना. बरंच काही वाटते. ही स्वार्थी माणसं फक्त माझं शहदच चोरतात ना. माझी कला तर चोरु शकत नाही.".
मधमाशीचं बरोबर आहे. कारण अजुनही कुत्रीम शहद कसं तयार करावं याचा शोध लागलेला नाही. ती कला आहे आणि ती कला मधमाशीनंच जोपासली आहे. निसर्गाची किमया एवढी आहे की ज्या मुंगीला आपण साधारण म्हणतो. त्या मुंगीचं आपण घर पाहिलेलं नाही. ते घर साधारणतः आपल्याही घरापेक्षा मोठं असतं. जर जमीन खोदून पाहिलं ना. तर आपल्याला ते दिसेल. हे संशोधनार्थी सिद्ध झाले. झाडांनाही जीव असतो. तेही श्वास घेतात. अन्ननिर्मीती करतात. त्यांनाही विजेचा झटका लागतो. हे प्रयोगांती जगदिशचंद्र बोस नावाच्या एका शास्रज्ञानं सिद्ध केलंय. आजही अशा चमत्कारीक गोष्टी निसर्गात घडतात. विशिष्ट मोसमात पाऊस येणे, उन तापणे आणि थंडी वाजणे ह्या चमत्कारीकच गोष्टी आहेत. परंतू ते कळायला मार्ग नाही आपल्याजवळ.
आम्ही देव त्यालाच मानतो. ज्याला चमत्कार करता येतात. अलिकडे असे चमत्कार करणारे गल्लोगल्ली तयार झाले आहे. काही लोकं मुरमु-यापासून रुपये देखील बनवून दाखवतात. मग असे जर रुपये बनतात. तर त्यांना रस्त्यारस्त्यावर भिक्षा का बरं मागावी लागते? प्रश्न आहे ना हा विचार करण्यालायक. बरोबर आहे. कारण ती हातचलाखी आहे. हे हातचलाखी करणारे लोक कधी रुमाल काढतात तर कधी कबूतर. एक नाही, जोड्याच्या जोड्या काढतात. हा माणसाचा चमत्कार. त्याच चमत्कारानं आपण भाळतो आणि त्या माणसाच्या बोलण्यानुसार आपण त्याच्या बोलण्याला बळी पडतो आणि अंधश्पद्धेच्या आहारी जातो. मग तो सांगतो की अमूक ठिकाणी गुप्तधन आहे. ते मिळेल, परंतू त्या ठिकाणी एक नरबळी द्यावा लागेल. मग काय, आपली लालसा आपल्याला तसा बळी देण्यास बाध्य करते. शेवटी नरबळीसाठी शोधाशोध सुरु होतो. असा शोधाशोध घेत असतांना मोठ्या माणसांचा बळी आपण देत नाही.लहान मुलं बघतो. कारण लहान मुलांना गायब करणं तेवढं धोक्याचं नसतं. मोठी माणसं गायब करणं तेवढं कठीण. मग मोठ्या माणसांना गायब करण्याऐवजी लहान मुलं गायब केली जातात. ती नरबळी दिली जातात. परंतू धन काही मिळत नाही. ही वास्तविकता आहे. शेवटी ते धन मिळवून देणाराही पैसे ऐंठून मोकळा होतो.
आज अशीच अंधश्रद्धा पसरत आहे. निसर्गाच्या चमत्कारावर आम्ही विश्वासच करीत नाही. विश्नास करतो माणसाच्या अनैतिक चमत्कारावर. जो चमत्कार आपल्याला गुन्हेगार बनवू शकतो.
निसर्गाची माया अफाट आहे. त्यावर विश्वास केलेला बरा. कारण निसर्ग हा आपला तारणहार आहे. पालनहारही आहे. यासाठीच यात्रा करावी लागते. त्यातच तो देव नसला तरी त्याला देव संबोधले जाते. पाऊस न आल्यास धावा केला जातो आणि जास्त पाऊस आल्यासही धावा केला जातो. आज निसर्गशक्ती एवढी बळकट आहे की ज्यावेळी पुरस्थिती निर्माण होते. तेव्हा मोठमोठ्या इमारती वाहून जातात. अशा स्थितीत एक तणाचं झोपडं शिल्लक राहातं. आहे ना चमत्कार. मागे बद्रीनाथ केदारनाथला पूर आला. सारं वाहून गेलं. परंतू त्या बेलपिंडीवरील ते बेल चिकटून राहिलं. हा चमत्कारच नाही का?
नागद्वारलाही असाच चमत्कार आहे. त्या उंच उंच टेकड्या. त्यातच त्या टेकड्यावरुन पायी चालणारी ती माणसं. त्या टेकड्या नागाच्या आकाराच्या असून ती माणसं त्या नागाच्या फण्यावरुन चालतात. परंतू ती दगडं कोसळत नाहीत. वा भक्ताला कोणत्याही स्वरुपाची इजा होत नाही. अनहोनीचंही स्थळ असंच आहे. अनहोनीचं स्थळ म्हणजे बाजूलाच गरम पाणी आणि बाजूलाच थंड पाणी.
महत्वाचं म्हणजे माणसानं नवनवीन शोध लावले. तंत्रज्ञान विकसीत केलं व विकसीत करीत आहे. परंतू त्या तंत्रज्ञानापुढं निसर्गाची हार दिसत नाही. माणूस कितीही पुढे जाईल. परंतू निसर्गाला जिंकू शकत नाही. निसर्ग फक्त परीक्षा पाहात आहे माणसाची. हं, माणूस कुत्रीमतेनं बटाट्याच्या झाडाला टोमैटो लावू शकतो. परंतू तसा स्वाद देवू शकत नाही. माणूस मशिनीनं जमीनीला छिद्र पाडू शकतो खुप खोलवर. परंतू ज्या जागेत पाणीच नाही. त्या जागेवर कितीही खोल मशिनद्वारे छिद्र पाडलं तरी पाणी मिळवू शकत नाही. असं चर झालं असतं तर भुस्खलन, भुकंप यावर विजय मिळवता आला असता. अवकाळी येणा-या पावसाला रोखलं असतं, तसेच न येणा-या पावसालाही बोलावलं असतं. माणूस हे साध्य करु शकतो. कारण तो हूशार आहे. तो नवनवीन शोध लावत आहे. कारण थोडंसं टच करुन माणूस एका जागेवरुन सर्व जगाची माहिती मिळवीत आहे. कारण माणूस हतबल नाही. परंतू माणसानं हेही लक्षात ठेवावे की हे जेव्हा संपुर्णतः साध्य होईल. तेव्हा ही सृष्टीच राहणार नाही. हिचा विनाश होईल. भुस्खलन, भुकंप आणि पुुुराच्या त्सुनामीच्या माध्यमातून. कारण माणूस कितीही तंत्रज्ञान विकसीत करीत असला तरी माणूस हतबल आहे. निसर्ग नाही. हेही तेवढंच खरं आहे.
सुधाकर एकदा हिंमत करुन काही भक्तांबरोबर दरबारात गेला होता. त्यातच त्यानं एकदा आनंदलाही विनंती करुन दरबारात नेलं होतं.
आनंदसमवेत सर्व भक्तांनी दरबार वगळता चिंतामणीतील सर्व स्थळं पाहिली. तसे ते पुढील प्रवासासाठी सज्ज झाले. पुढं गंगावन शेषची गुफा होती.
गंगावन शेष. तिथे तर नागाच्या पोटातून नागमोडी शिरुन त्याच्या फण्याकडे जावं लागतं. अगदी चढाव चढत. एक मोठी गुफा आहे. या ठिकाणी सतत पाणी पडत असतं. श्वास गुदमरतो. पुरेसा उजेड नसल्यानं टार्च सोबत न्यावा लागतो. दोन तीन टार्च हवे असतात. पुर्वी असे पाणीनियंत्रीत टार्च मिळायचे. आता मोबाईल आल्यानं असे टार्च बहुतःश दिसत नाही. मोबाईलनं सा-यांचे उद्योगधंदे बुडवले.

************************************************

बरीचशी मंडळी म्हणतात की मोबाईलच्या वापरानं उद्योगांना फटका बसलेला आहे. उद्योगधंदे चालणे बंद झालेवे आहे. जसे. घड्याळ उद्योग, कैलेंडर उद्योग, पुस्तक छपाई उद्योग इत्यादी. परंतू तसं काहीही झालेलं नसून तेही उद्योग जशासतसे सुरु आहेत एवढंच सांगावेसे वाटते.
मोबाईलबाबत विचार केल्यास मोबाईलनं सा-यांचेच उद्योगधंदे बुडवले असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कोणकोणते उद्योगधंदे बुडाले, त्याची अनुक्रमणिका थोडक्यात अशी.
१) आज मोबाईलवर घड्याळ पाहायला मिळते. म्हणून घड्याळ कंपन्या बुडल्या. त्याचबरोबर त्या ठिकाणी काम करणा-यांचे रोजगार बुडले. तरीही काही काही शौकीन घड्याळ बांधतात. मात्र त्यात थोडीसी नक्कीच घट आली आहे.
२) मोबाईलवर कैलेंडर पाहायला मिळते. जुना नवीन तसेच कितीही वर्षापुर्वीचा. त्यामुळं कैलेंडर छपाईचा व्यवसाय बुडाला. तरीही बरेच कैलेंडर विकले जातात. बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
३) पुस्तकाचा व्यवसाय बुडाला. कारण अलिकडे मोबाईलवर एका क्षणात माहिती उपलब्ध मिळते. परंतू ती पुुर्ण स्वरुपात नसल्यानं पुस्तकाला मागणी आहे.
४) पोष्टाचा उद्योग बुडाला. तरीही काही व्यवहार पोष्टानंं करावेच लागतात.
५) प्रवासाचा खर्च वाचला. कारण काही काही संदेश हे व्हाट्सअप व मेसेंंजरवर पाठवले जातात. तरीही मैयत, लग्न काही आवश्यक समारंभात जावं लागतं प्रवास करीत.
५) टार्च कंपन्या बुडल्या. तरीही शेतक-यांना शेतावर जातांना मोठ्या विजेच्या बैट-या घेवून जावेच लागते. मोबाईलचा उजेड पुरेल असा नसतो.
६)ब्लैकबोर्ड पद्धती बुडाली. जी पुर्वी ब्लैकबोर्डवर आकडेमोड केली जायची. तरीही शिकवितांना ब्लैकबोर्ड वापरतात.
७) पेन उद्योगाला फटका बसला. तरीही काही काही गोष्टीचं टिपण ठेवण्यासाठी पेनाचा वापर केलाच जातो. कारण मोबााईलवर सा-या गोष्टी ह्या चिरकाल टिकत नाहीत. त्याची सीमा क्षणीक असते.
अलिकडे स्मार्टफोनचा शोध. उद्योगांना फटका देणारा ठरत असला तरी मोबाईल हा फक्त पर्याय म्हणून वापरता येतो. ती माहिती तंत्रज्ञानातील सार्वकालीक वस्तू नाही की जिच्याद्वारे आपण चिरकाल टिकणारं तत्वज्ञान मिळवू शकू. आजही परीक्षेतील पेपर सोडवितांना मोबाईल वारावर परवानगी नसल्यानं विद्यार्थ्यांना घड्याळ घेवून द्यावीच लागते वा त्यांना ती घड्याळ वापरावीच लागते. आजही कैलेंडर वापरावाच लागतो आणि आजही पत्र पाठवावीच लागतात. राखीच्या सणाला भाऊ लांब राहात असेल आणि बहिणीचं जाणं जमत नसेल तर केवळ व्हाट्सअपच्या माध्यमातून हाय हल्लो करुन चालत नाही वा एखाद्या राखीचंं चित्र पाठवून चालत नाही तर प्रत्यक्षात राखी लिफाफ्यात बंद करुन पाठवावी लागते. त्यामुळं कोणीही मोबाईलचा उद्योगांना फटका बसला असा अर्थ घेवू नये. हं, मात्र एक नक्की की दुष्परीणाम नक्की झालेत.
लहानग्या वयात या मोबाईलनं लहान लहान मुलांचे डोळे अवश्य चोरले. अर्थात लहान लहान मुलं मोबाईलचा सतत वापर करीत असल्यानं त्यांच्या डोळ्यांचे आजार वाढलेले आहेत.
महत्वाचं सांगायचं म्हणजे मोबाईल नक्की वापरावा. परंतू त्याचा उहापोह करु नये. नाहीतर त्यातून निघणारी रेडीयल किरणं ही जसा पशूपक्षांचा जीव घेतात. तसाच आपलाही जीव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं वेळीच सावधान झालेलं बरं.
महत्वाचं म्हणजे मोबाईलचा उद्योगांना फटका बसलेवा नसून आपल्याच जीवनमानाला फटका बसलेला आहे हे तेवढंच खरं आहे. म्हणून कोणीही उद्योगधंद्यांना फटका बसला असं समजू नये. जीवनमान सांभाळावं म्हणजे झालं.
सुधाकरसमवेत काही जणांनी गंगावन शेषमध्ये प्रवेश केला होता व निसर्गाच्या या अद्भूत देखाव्याचा आनंद घेतला होता.
गंगावन शेषचं दर्शन घेवून आनंद व त्याचा पूर्ण भक्तसमुह पुढे निघाला. पुढे पुन्हा पहाडाचा उंचवटा होता. तो पार करीत करीत व गोष्टी करत करत ते धुनीवाल्या बाबापाशी पोहोचले. ती खोबणीतील जागा. भरपूर मोठी गुफा. त्या गुफेत ते सर्वजण शिरले व शिरताक्षणी त्यांनी लवकरच या देवाचं दर्शन घेतलं. कारण त्यांनी गतरात्रीला ठरवलं होतं की नंदीगडाला जायचं.
नंदीगड कठीण होता. तसा तो उभट गड. तो निशाणगडासारखाच कठीण होता. शासन नंदीगडाची व निशाणगडाची यात्रा करण्यास प्रतिबंध लावत होतं. तिथे गेल्यास व काही झाल्यास काहीही मुआवजा मिळणार नाही वा भक्तांची काहीही सोय करणार नाही अशी प्रशासनाची सक्त ताकीद असायची. तरीही भक्तगण जबरदस्तीनं या दोन्ही गडावर जायचे.
नंदीगड सोपा नव्हता. तिथं एक आख्यायिका होती की नंदीगडावर पोळ्याच्या पाडव्याला शेण (बैलाची विष्ठा) सापडते. तशी ती एक धमालच होती. कारण एवढ्या उंचावर, जिथे साधारण माणसाला कस लागतो. तिथे बैल जाणारच कसा. परंतू ते सत्य असेलच. कारण निसर्गात अशाच प्रकारचे चमत्कार घडत असल्यानं लोकं यात्रा करीत होते. त्यातच तिथे बैलं जात असतील की नाही हे एका श्वानावरुन दिसून आलं.
धुनीवाले बाबा नावाचं ते नागद्वारचं स्थळ. त्या ठिकाणी माणूसच सहजासहजी चढत नाही. परंतू तिथे एक श्वान सुधाकरच्या आधीच पोहोचला होता. तो पांढ-या रंगाचा असून त्याला आदल्या दिवशी त्या भक्तमंडळींनी पदमशेषला पाहिलं होतं आणि नुकताच त्याला खालच्या भागात म्हणजे चिंतामणीला पाहिलं होतं आणि आता धुनीवालेबाबाजवळ. तो श्वान कसा काय एवढ्या लवकर पोहोचतो. थकत नाही काय हेही एक आश्चर्यच होतं. परंतू प्राणीच तो. ज्या उंच दरबारात वाघ, सिंहासारखे प्राणी जावून विश्राम करतात. तिथे हा तर कुत्रा. तोही देवाचंच रुप वाटत होतं. देव अगदी सोबत सोबत चालण्याचा भाष होत होता.
तो श्वान. त्या श्वानावरुन एक गोष्ट सुधाकरला सहज आठवली. ती महाभारतातील होती. महाभारतात जेव्हा द्वापर युग संपायला आलं होतं. तेव्हा हा श्वान अचानक युधीष्ठरासोबत चालायला लागला होता.
महाभारताचं युद्ध संपलं होतं. कौरवावर पांडवांनी विजय संपादन केला होता. त्यातच ध्रृतराष्ट्र आपली राणी गांधारी, तसेच कुंतीला घेवून वनात गेले होते. त्यातच काही दिवस युधीष्ठरानं राज्यकारभार केला. त्यानंतर ते म्हातारे झाले असता त्यांनी स्वर्गारोहणाची तयारी केली व त्यांनी स्वर्गासाठी प्रस्थान केलं. त्यावेळची ही गोष्ट.
स्वर्गप्रस्थानादरम्यान युधीष्ठर सर्वात पुढे होता. अचानक श्वान त्याच्या सोबतीला होता. तशी चढाई चढत असतांना त्याच्या मागे असलेले नकूल, सहदेव, अर्जून, द्रौपदी तसेच भीम एकापाठोपाठ एक मरण पावले. परंतू युधीष्ठर अजूनही जीवंतच होता. तो चालत होता सारखा. त्याचदरम्यान तो श्वानही. त्यातच ते दोघंही जेव्हा स्वर्गपायरीवर पोहोचले, तेव्हा यमदूत त्याला न्यायला रथ घेवून आला. त्यातच तो म्हणाला,
"महाराज, मी तुम्हाला न्यायला आलोय. चला लवकर बसा."
युधीष्ठरानं ते सगळं ऐकलं. तसा तो त्या श्वानाला आधी रथामध्ये बसवायचा प्रयत्न करु लागला. तसा यमदूत म्हणाला,
"मी तुम्हाला न्यायला आलोय. श्वानाला नाही." युधीष्ठरानं ते ऐकलं. तसा तो म्हणाला,
"जर तुम्ही या श्वानाला नेत नसाल तर मलाही नेवू नका. मीही येत नाही."
यमदूतानं ते ऐकलं. तसा तो आर्जव करु लागला. परंतू त्या युधीष्ठराच्या निश्चयापुढं यमदूताचं काही एक चालत नव्हतं. शेवटी यमदूत तयार झाला. त्यातच श्वानरुपातील यम तात्काळ आपलं रुप बदलवून आपल्या मुळ रुपात आला व म्हणाला,
"महाराज, मी आपली परीक्षा घेत होतो. आपण खरंच धर्मात्मा आहात की आपण इथंही धर्म सोडलेला नाही. आपण खरंच स्वर्गात जाण्याच्या लायक आहात."
यम युधीष्ठराशी बोलून गेला. तसे ते दोघंही रथात बसले व रथानं स्वर्गाच्या दिशेनं प्रस्थान केलं.

****************************************

धुनीवाल्याचं दर्शन घेवून आनंदसह संपूर्ण समूह निघाला. वाटेत गुलालशेषाचंही दर्शन घेतलं. त्यातच हळूहळू पहाडी पुन्हा चढत उतरत ते हल्दीशेषला गेले. परंतू ते दरवर्षीप्रमाणे याहीवेळी डोमनशेषला गेले नाहीत.
हल्दीशेष.........हल्दीशेषलाही एक गुफा आहे. आतमध्ये जाणारी. त्या गुफेत एकावेळी फक्त पाचच भक्त जावू शकतात. ते परत आल्याशिवाय बाकी भक्तांना थारा नाही. अगदी सरपटत (झोपल्या अवस्थेत) नागमोडी जावं लागतं. आत खोबणीत एक लहानशी नागाची मुर्ती आहे. तिथे कापूरही जाळता येत नाही. कारण प्रदूषण होतं. श्वास गुदमरतो. तिथून बाहेर निघताच आपलं अंग पिवळसर होतं. कारण आतमध्ये सरपटत जात असतांना खालची पिवळी माती अंगाला लागते व अंग पिवळं होतं.
हल्दीशेषाचं दर्शन घेवून बाहेर येताच उंचावरुन पडणा-या लहानशा धारेत भक्तमंडळी आंघोळ करतात. त्यानंतर ते पुढील प्रवासाला लागतात.
आनंद या ठिकाणी गेला खरा. परंतू तिथं भक्तांची गर्दी जास्त असल्यानं आनंद तिथे थांबला नाही. कारण त्याला लवकर दर्शन करुन नंदीगडावर जायचं होतं.
आनंद तेेथून निघाला होता. त्याचबरोबर त्याचा मित्रभक्तसमुदायही. तशी ते पहाडी चढत होते. चढता चढता आनंद दत्तगीरीवर आला. जिथे त्याच्या ओळखीची भक्तमंडळी होती. आनंद त्या भक्तमंडळींसह बोलत बसला होता.
वेळ होत होता. तसा देवीदास घाई करीत होता. तसा आनंद उठला व चालायला लागला.
देवीदास नवीन होता यात्रेत. तसं त्याचं वयही जास्त होतं. परंतू तो अगदी तरुण बालकासारखा चालत होता ती नागद्वाराची वाट. तो सतत पुढंच राहात असे.
मोहन उठला व दत्तगीरी चढून पुढं गेला. त्याचबरोबर त्याचं भक्तमंडळही. त्यातच अंबामातेचं ते स्थळ आलं.

****************************************

अंबामाता.........या स्थळाला अंबागीरीही म्हणतात. इथे अंबादेवी बसलेली असून तेथून सारे भक्त एक धागा बांधतात. तो धागा चित्रशाला मातेच्या मंदिरापर्यंत न्यायचा असतो. तो धागा बांधल्यावर कसनी करावी लागते अशी नागद्वार भक्तांमध्ये श्रद्धा आहे. ही कसनी केल्यानं आपल्याला आपलं जीवन चांगलं जगण्यासाठी लाभच होतो असं मानलं जातं. ती कसनी सव्वा महिण्याची असते. त्यांचंही बरोबर आहे. कारण पुर्वजांनी हा सव्वा महिण्याचा काळ बांधून दिलाय तो दोन प्रकारच्या शास्रीय कारणानं.
कसनीचा हा श्रावणातील सव्वा महिना. पुर्वजांनी कसनीच्या रुपात पाळायला सांगीतंलाय. ही कसनी करणारी मंडळी, या सव्वा महिण्याच्या काळात कोणाच्या हातचं खात नाहीत. सुके पदार्थ खातीलही कदाचित. परंतू ओले पदार्थ अजिबात खात नाहीत. कारण ते पावसाळ्याचे दिवस असतात. याच काळात वेगवेगळ्या आजाराचे जंतू शरीराच्या ओलसर भागावर चिकटलेले असतात. ते जंतू पसरु नये वा त्या जंतूरुपातून इतर लोकांना त्या जंतूची लागण होवू नये. म्हणून पुर्वजांनी ही कसनी लागू केली असावी. हे एक कारण झालं. दुसरं कारण म्हणजे नागद्वारवरुन परत आलेले भक्त हे पुर्वी आणि आताही वेगवेगळे जंतू अंगावर घेवून येतात. ते जंतू त्यांच्या अंगाखांद्यावर व वेगवेगळ्या अवयवावर लागलेले असतात. त्यातच ते जंतू इतरांना लागू नये वा पसरु नये. म्हणून पुर्वीपासून नागद्वार भक्तमंडळी कसनी करीत होते. कारण तेव्हा दवाखानेही कमी प्रमाणात होते. त्यातच ती श्रद्धा बनत गेली. आताही ती त्याच स्वरुपात पाळली जाते. परंतू आता त्याला अंधश्रद्धेचं रुप दिलं आहे.
आनंद जसा अंबागीरीवर पोहोचला. त्यानं धागा घेतला. तो अंबामातेच्या दरवाज्याजवळ बांधला व हळूहळू चालू लागला हातात धाग्याचा बंडल घेवून. थोड्या वेळातच ते चित्रशाळा मातेचं देवस्थान आलं. तोपर्यंत आनंदच्या हातातील ते सुताचं बंडल संपलं होतं.

**************************************************************************

चित्रशाला माता........इथे काळभैरवाचंही मंदिर आहे. भक्त अगदी मनोभावानं इथं पुजा करीत असतात. कोणी मातेला खणानारळाची ओटी चढवतात. कोणी ओटीही भरतात. ही देवी नवसाला पावते अशी इथे आख्यायिका आहे. परंतू या देवीजवळ व्यापार होतांना दिसतो. व्यापार असा की भक्त मंडळी जी ओटी चढवतात. त्याच ओटीतील भरपूर सामान हे तेथीलच दुुकानदारांना विकलं जातं. म्हणजे एक नारळ जर एका भक्तानं चढवलं तर तेच ते नारळ अनेकवेळा तेथीलच दुकानातून विकत घेवून भक्त देवीला चढवीत असतात.
येथून नंदीगडाचंही दर्शन होत असतं. सुक्षदर्शक यंत्रातून पाहिलं असता नंदीगड ख-या स्वरुपात जसा आहे, तसा दिसत असतो.
आनंदनं इथं ओटी चढवली. त्याचबरोबर इतरही भक्तांनी. तसे ते पुढली वाट चालू लागले. मागे वळून न पाहता.
पुढं होती ती चित्रशाळा समोरील वाट. ती वाट फार धोक्याची होती. त्यातच त्या वाटेनं कोणी जास्त जात नव्हतं. कारण सर्व प्रकारचं अवधान ठेवून ती वाट चालावी लागायची. एकदा का अवसान गळालं आणि अवधान हटलं की बस सरळ खाईत जाण्याची भीती. ही वाट चालत असतांना दुधाळा तलावही लागायचा.
त्याचं नाव दुधाळा तलाव होतं. कारण तिथं वरुन उंचावरुन एक धबधबा पडत असून ते ज्या पात्रात पडायचं. त्या पात्रातील पाणी दुधासारखं पांढरं दिसायचं. म्हणून याला दुधाळा तलाव हे नाव दिलं होतं.
इथंही पश्चिम द्वारासारखाच उंचीवरुन पडणारा धबधबा. पश्चिम द्वारापरसही जास्त वेगानं आणि तीव्रतेनं पडणारं पाणी त्यातच तो एक हौद असून त्या हौदात कंबरभर असलेलं पाणी. त्यामुळं त्यात आंघोळ करतांना काही औरच मजा यायची. तिथं आंघोळ करतांना त्या हौदातून निघावंसं वाटायचं नाही. तेथून आंघोळ झाली की परत यायचं ते भक्तमंडळ किंवा पुढे गुप्त गंगेच्या मार्गानं जायचे.
गुप्तगंगा असं त्या ठिकाणाचं नाव. गंगा नदी ही स्वर्गातून आलेली. परंतू तिचा प्रवाह हा कुठेतरी खंडीत झाला अशी आख्यायिका आहे. त्यानुसार या गुप्तगंगेची एक धारा इथे पाहावयास मिळते. म्हणून येथील भागाला गुप्तगंगा असंही नाव आहे. ही गंगेची धारा प्रर्यटकांना थोडीसीच दिसते व पुन्हा लुप्त होते. लोकं म्हणतात की ही गुप्त गंगा पुढे क्षिप्रा नदीजवळ दिसते. जे ठिकाण उजैनला आहे.
या गुप्तगंगेचा मार्ग बिकट असला तरी येथून जाणारा रस्ता हा जवळचा असल्यानं काही हिंमतवान भक्त तेवढेच या भागातून जात असतात. बाकी चित्रशाळेजवळच्या मार्गानं जात असतात.
सुधाकर आणि त्याची चमू चित्रशाळेजवळच्या मार्गानं जात होते. कारण त्यांना नंदीगडला जायचं होतं आणि नंदीगडचा मार्ग हा चित्रशाळेजवळूनच जात होता.
सुधाकर व त्याची चमू तेथून उतरली व ती थेट बेलगंगेत गेली. त्यातच बेलगंगेला धबधब्यासारखं पाणी असल्यानं तिथं आंघोळीचा मोह आवरला नाही. त्यातच सर्व भक्तगण सुधाकर, आनंद, वासूदेव, देवीदास आणि योगेशसह आंघोळीला गेले होते. फक्त अभयने आंघोळ केली नाही. अमेयही आंघोळीला गेला होता. त्याचबरोबर गुलाबही. मुलांनी उशिरा आंघोळ केली. त्यांना वेळेचं भान नव्हतं. काही वेळ असाच गेला. त्यातच काही वेळानं मुलं आली. तसं तयारी झाल्यावर आनंदसह सर्वजण नंदीगडाची वाट चालायला लागले.
तो नंदीगड कठीणच होता. तसं पाहता ते उभाट दगडं सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तशी ती चढाई करतांना पाय पुढे ठेवायला हिंमत होत नव्हती. आनंद तर चालूच शकत नव्हता. तरीही तो चालत होता.
नंदीगडावर पाणी नव्हतं. त्यातच ती चढाई मोठी उभट असल्यानं तहान लागली होती. परंतू पाणी? पाण्याचा प्रश्न होता. पाणी आणायचे कोठून? त्यातच एकदोन बॉटला होत्या. परंतू त्याही तरुण पोरांनी संपवल्या होत्या.
तसं चालता चालता एका ठिकाणी पाण्याचा लहानसा झरा सापडला. सर्वांना हायसं वाटलं. तसे ते चालू लागले.
तो नंदीगड चढणं कठीण होतं. तरीही ते चढले. त्यातच तब्बल साडेतीन तास चढल्यावर आनंदसह सर्व भक्तांनी तिथं आरती केली. त्यातच काही वेळ विश्राम करून ते निघाले. कारण नंंदीगडावर मुक्कामाची सोय नव्हती.
नंदीगडावर जसा जाण्याचा रस्ता कठीण होता. तसा परत येण्याचाही कठीणच होता. मागे एकदा नंदीगडावर सुधाकर आनंदसोबतच गेला असता परत येण्याचा रस्ता सोपा असल्याचं जाणवलं होतं. परंतू यावेळी बहूतेक पहाडी खचली होती की काय, भाविकांनी दुर्गम भागातून रस्ता काढला होता. जो अतिशय कठीण होता.
आनंद हळूहळू चालत होता. त्यातच तो घसरता मातीचा रस्ता आला की तिथे माणसाचा तोल जातो व भक्तमंडळी सरळ घसरुन पडतात. तसा आनंदही या वाटेवर घसरुन पडत होता. गुलाबही घसरला होता आणि सुधाकरही.
आनंदचा भक्तसमुह...... सर्वात पुढं गेला होता तो समूह. फक्त चारच जण उरले होते मागं. अमेय, गुलाब, सुधाकर आणि स्वतः आनंद. रात्र होत आली होती. परंतू तेवढीही रात्र झाली नव्हती की आनंद मुख्य रस्त्यावर नाही येणार. तसा तो थकलाच होता. कारण आज स्वर्गदार तर चढला होता तो. व्यतिरीक्त नंदीगडही केलं होतं त्यानं. तशी त्याची तेवढी क्षमता नव्हती. तरीही तो चढला होता मनात महत्वाकांक्षा निर्माण करुन. तसेच उतरलाही होता.
आनंदसह ते चारही जण भजेगीरीला पोहोचले होते. तसा अंधार पडला होता. खुप थकले होते. तहानही लागली होती. तशी भूकही. त्यातच भजे खाण्याचा मोह आवरला नाही. तसा आनंदनं आर्डर देत भजे बोलावले व भुकेच्या समोर त्या भज्याची केव्हा वाट लागली ते कळलंच नाही.
आनंद त्या चारही जणांना घेवून भजेगीरीला आला. त्यातच तिथं दहा जणांपैकी फक्त चारजण थांबले होते व म्हणत होते की प्रवासाला एवढा उशिर का लागला. परंतू त्याचं ते आनंदलाच माहित की त्यानं तो पर्वत कसा पार केला असेल किंवा उतरला असेल..
अंधार पडला होता. त्यातच आनंद थोडा आराम करण्याच्या उद्देशानं थांबला होता. जे चार जण थांबले होते तेही अंधाराच्या धाकानं निघून गेले होते. मात्र आनंदला सुधाकर,अमेय आणि गुलाबनं सोडलं नव्हतं. ते अजूनही त्याच्याच सोबत होते. तसा वेळ होत आहे हे पाहून सुधाकर म्हणाला,
"चल न् भाऊ, वेळ होत आहे. अंतर बरंच लांब आहे. अशानं दहा वाजतील."
सुधाकरनं बोललेले ते शब्द. आनंद उठला. तसा गुलाबनं मोबाईलचा टार्च लावला. तो त्याचे पायाजवळ धरला. तसा आनंद झपाझप पावले टाकत निघाला. त्यातच त्याच्या पाठीमागं अमेय व सुधाकर. त्यातच त्या अंधारात भजेगीरीतून धुपगड केव्हा आलं ते कळलंच नाही.
अंधार पडला होता. आजुबाजूला रातकिडे किरकिर आवाज करीत ओरडत होते. ती खाचखळग्याची वाट. त्यातच तो मोबाईलचा अंधूक प्रकाश. तरीही त्या वाटेचं त्या मोबाईलच्या अंधूक प्रकाशापुढं काहीही चालत नव्हतं. काहीही चाललं नाही. ते खाचखळगे व ते दगडधोंडे तसेच ते रस्त्यातील पाण्याचे प्रवाह पार करीत करीत ठेच लागत आनंद चालला होता. तसाच सुधाकर आणि अमेयही. तसा गुलाबही. गुलाब तर आनंदची जणू काठीच बनला होता.
थोड्या वेळाचा अवकाश. धुपगडाची सुरुवातीची पायरी आली होती. सारे भक्तगण कापूर लावत होते. हात जोडत होते. तसा आनंदनंही कापूर लावला. हात जोडले. काहीतरी मनात पुटपुटला. काय म्हटलं माहित नाही. परंतू तीच पुनरावृत्ती सुधाकरनं केली व म्हटलं की देवा मला माफ कर. काही चुकलं असेल तर पदरात घे. तुझे नियम कडक आहेत. ते मी पाळू शकत नाही. त्यामुळं तसं बंधन आम्हाला नको. आम्ही आलो एवढंच आमचं भाग्य समज. त्याची शिक्षाही आम्हाला करु नको.
अंधार काळाकुट्ट पडला होता. आजुबाजूचं काहीच दिसत नव्हतं. तसे ते भराभर पावले टाकत स्टॉपवर निघाले. जिथं गाड्या थांबल्या होत्या. तसे पुलाजवळ येताच सारे समूहातील भक्तगण मिळाले. जे आनंदची वाट पाहात होते. म्हणत होते की एवढा वेळ का लावला आणि आनंदला त्यांच्या बोलण्यावर राग येत होता की ते त्याचेसाठी थांबले नव्हते.
धुपगड आलं होतं. तसे सर्वजण गाडीत बसले. त्यातच सर्वजणांनी इच्छा केली की आपण लाल बंगल्यावर जेवावं व गाडी लाल बंगल्यावर थांबवावी. परंतू आनंदची इच्छा नव्हती. त्याला दोन तारणं होती. पहिलं म्हणजे,थकवेपण व दुसरं म्हणजे अशी वेळ येत नैही. म्हणून बाहेर जेवावं. याचाच अर्थ असा की साधं जेवन जे लाल बंगल्यावर होतं. ते तर नेहमीच खातो असं आनंदला वाटत होतं. फिरायला आलो ना, मग पैसे कशाला पाहायचे. असंही आनंदला वाटत होतं. तसंच दुसरं कारण होतं ते म्हणजे त्याला वाटत होतं की आपण आता थकलो आहोत. लाल बंगल्यापासून आपल्या राहण्याचं ठिकाण बरंच लांब आहे. तेव्हा आपण जवळपासच्या हॉटेलात जेवावं. आनंदचं एकप्रकारे बरोबरच होतं. परंतू बाकी समुदाय त्यामुळं नाराज झाला होता. कारण ते थोडे का होईना, पैसे वाचवायला पाहात होते.
आनंदनं त्या दिवशी कोणाचंच ऐकलं नाही. तसं सर्वांनी त्या दिवशी हॉटेलातच जेवन केलं व खमंग जेवनाचा आश्वाद घेतला. अमेय मात्र त्यांचेसोबत जेवला नाही. तो आणि सुधाकर वेगळ्या हॉटेलात जेवन करायला गेले होते.
जेवन झालं तसं अमेय व सुधाकर तेथील बाजारपेठेत फिरायला गेले. काही वेळ बाजारात फिरुन ते जेव्हा परत आले, तेव्हा सर्वजण झोपले होते. झोपायला जागाच उरली नव्हती. त्यातच सुधाकरला बाहेर व्हरांड्यात झोपावं लागलं होतं.
दुसरा दिवस उजळला होता. त्यातच सर्वजण उठले. तसे आपआपल्या तयारीला लागले. कारण प्रवास संपला नव्हता. तशी सर्वांची तयारी होताच आनंदनं पुढची वाट धरली. ही नागद्वाराची वाट नव्हती. तर ती महादेवाची वाट होती.
विदर्भातील लोकं भगवान शंकराला जास्त महत्व देत असतात. ते दरवर्षी राखी आणि महाशिवरात्रीच्या यात्रा करीत असतात. त्यातच जे नागद्वारला येतात, त्यातील काहीजण महाशिवरात्रीची यात्रा करीत असतात. ज्याप्रमाणे मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील लोकं पांडूरंगाला मानत असतात तसे.
महाशिवरात्र किंवा राखी. भगवान शंकराचा दिवसं. भगवान शंकर हेही एक दुःखी पात्र. सृष्टीनिर्माते म्हणून ब्रम्हा, पालनकर्ते म्हणून विष्णू, तर समाप्त करणारा घटक म्हणून या शिवाला मानलं जातं. या शिवाला मानतांना सर्वप्रथम बेल वाहावं म्हणतात. त्या बेलानं शिव प्रसन्न होतो म्हणतात. महत्वाचे म्हणजे भगवान शंकर आदिवासींचा राजा. रोज द-याखो-यात राहून कंदमुळे खाणारा माणूस. हा माणूस कुठेतरी त्या तमाम लोकांना त्यावेळी भारी गेला. ज्यांची राजसत्ता होती. म्हणून त्या राजसत्तेने या आदिवासी माणसाचे अस्तीत्व मान्य केले. त्याच्यात तद्नंतर चमत्कार ही भरला. हे वास्तविक सत्य आहे. पुराणात एक कथा आहे की एक शिकारी एका झाडावर बसून हरणाची शिकार करण्याची वाट पाहात होता. ते झाड बेलाचे होते. मात्र वाट पाहता पाहता तो त्या बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकू लागला. तेव्हा ते बेलाचे पान खाली असलेल्या पिंडीवर पडू लागले. क्षणात त्याचा स्वभाव बदलला. त्याची शिकारीची भावना नष्ट झाली. असं होत नाही. पण पुस्तकात तसंच लिहिलंय.
दरवर्षी लोक महाशिवरात्रीला यात्रेला जातात. पचमढीला यात्रेला जात असतांना हे पचमढी म्हणजे भाविकांना अमरनाथच वाटते. एवढं प्रेम लोकं त्या पचमढीवर करतात. ज्यांच्याकडे पैसा नाही ते मात्र जवळपासच्या मंदीरात जातात. हरबोला हरहर महादेव म्हणत हे त्या टेकड्या चढत असतात. त्या टेकड्या चढतांना फार मजा वाटते. विशेष म्हणजे ह्या टेकड्या चढत असतांना महत्वाचा फायदाही होतो. अंगाची सर्वीसींग झाल्यागत वाटते.
सा-या आजाराचं धन असलेलं शरीर रक्तात कोलेस्टेराल साठल्यानं मोठमोठ्या आजार होत असतात. ही कोलेस्टेरालची समस्या रक्त घट्ट झाल्यानं होत असते. तेव्हा ते रक्त पातळ होण्यासाठी या भगवान शंकराची एकप्रकारे मदतच होते. कशी तर भगवान शंकर टेकडीवर निवास करतात. अर्थात त्यांचं मंदिर टेकडीवर असते. या मंदिरावर जातांना चढाव चढावा लागतो. तो चढाव चढत असतांना रक्त हे धमणीतून सळसळ वेगाने धावत असते. कोलेस्टेराॅल च्या भागाला साफ करत....त्यामुळे एकंदर यामुळे फायदाच होतो शरीराला.
भगवान शंकराची भक्ती करतांना कोणी ध्यान लावतात. त्यामुळे एकाग्रता वाढीस लागते. स्वभाव शांत होतो. तिथे फोडण्यासाठी वापरले गेलेले नारळ त्याचे खोबरे खावून शरीराला कॅल्सीअम मिळत असते. पर्यायाने भाविकांना वाटो न् वाटो पण यामुळे रक्त पातळ झाल्याने मनात चैतन्य निर्माण होते. माणूस पुढील कामे सापाचे कात टाकल्यागत करीत असतो.
भगवान शंकराकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्यांचे महाविराट रुप पाहून त्यागाची भावना वाढीस लागते. त्यांच्या शरीरावर वस्रे नव्हती. त्यावरुन त्याग, परोपकारी वृत्ती दिसून येते. एवढंच नाही तर भगवान शिवाने पूर्ण सृष्टीला केंद्रीत केलेला फोटो हा मुळात संदेश देतो की माणसाने राग, लोभ, द्वेष, मध, मत्सर यापासून दूर राहावे.
महत्वाचे सांगायचे झाल्यास कोणी भक्त मानो या न् मानो, भगवान शंकराची पुजा केल्याने अंगातील सारेच षडरिपूजे शरीराचे जे शत्रू असतात. ते दूर पळवायला मदतच होते.
मानवाच्या शरीरात बरेच शत्रू असतात. ते शत्रू माणसाच्या आयुष्याला नष्ट करीत असतात. तेव्हा हे शत्रू शांत करण्यापुर्वी आपण शांत होणे गरजेचे आहे. भगवान शंकराने दक्षाला ठार तर केले पण त्यांनी आपला क्रोध शांत करण्यासाठी कैलासावर तपश्चर्या केली. त्यांनी समुद्र मंथनातून निघालेले विष ग्रहण केले. त्यांनी चंद्राला डोक्यावर ठेवून त्याच्या वासनांध शक्तीला नियंत्रीत केले. तसेच स्वर्गातून आलेल्या गंगेलाही त्यांनी जटेमध्ये सामावून घेतले. संजीवन विद्येचा वापर करुन त्यांनी स्वपुत्राला जीवंत केले. त्यांचा वैराग्यपणा हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. ते भाविक असो की नसो प्रत्येकासाठी ते वरदान आहेत. कारण त्यांच्या स्थळाला भेट देण्यासाठी डोंगर चढून जावे लागते. त्यामुळे कित्येक आजारापासून दिलासा मिळू शकतो. यात आतिशयोक्ती नाही.
बरोबर आहे, मी आध्यात्म मांडलेलं नाही. शंकर हा आदिवासी बहूजन समाजाचा देव. डोंगरद-यात राहणारा. म्हणून खाली लिहिलं की त्यांच्याकडे आध्यात्म म्हणून पाहू नये तर एक व्याधी नष्ट करण्याचा पर्याय म्हणून पाहावे. कारण डोंगर चढून रक्ताच्या वाहण्यात जो वेग निर्माण होतो तो अनेक व्याधींना नष्ट करतो. हे तेवढंच खरं आहे.
आनंदनं महादेवाची वाट धरली होती. तसा त्याच्यासोबत सुधाकर होताच. तशीच ती चमूही. आज सकाळीच ते उठले होते आणि सकाळी लवकरच आंघोळ करुन ते तयार झाले होते आणि चालायला लागले होते.
आजचा तिसरा दिवस होता प्रवासाचा. परंतू अद्यापही पाऊस नव्हता तिथं. त्यामुळं तो चढाव लक्षात येताच भयंकर वाटायचा. त्यातच वाटायचं की पुन्हा या वाटेनं येवू नये. परंतू काय करणार. ते नागद्वारचे दुवस येताच प्रत्यक्ष देवाचंच बोलावणं आल्यागत जायची इच्छा मनाला मोहून घेत होती. तसं जावंसंच वाटत होतं.
सुधाकर आनंदच्या पाठीमागं जात असतांना अचानक त्याला ते धनगवळीचं स्थान आठवलं.
धनगवळी.........तो धनाचा मालक होता असे काही भाविक सांगतात. म्हणतात की कोणीतरी चोर इथे असलेलं धन चोरण्यासाठी आला असता प्रत्यक्ष देवानं हे धन त्या धनाचं रक्षण केलं. कोणी म्हणतात की या देवाची पुजा केल्यानं धनसंपत्ती अपार मिळते. परंतू तसं काहीच नाही. धन मिळविण्यासाठी अपार कष्टही करावे लागतात. परंतू काही लोकं म्हणतात की सारेच लोकं अपार मेहनत करतात. मग काहींना अपार धन मिळतं आणि काहींना काहीच नाही. असं का? असं यासाठी की प्रत्येकाचं प्रारब्ध लिहिलेलं असतं धनधान्यावर. ते मेहनत करो की न करो. त्या प्रारब्धानुसार त्यांना धन मुळत असतं. माणूस जे मागील जन्मी जे काही कर्म करतो. त्यानुसार प्रत्येकाला पुढील काळात तसा जन्म मिळतो. उदाहरण द्यायचं झाल्यास काही लोकांचा जन्म राजघराण्यात होतो. त्यांच्यापुढे अपार सुख व अपार धन असतं. याउलट काहींचा जन्म मुळात गरीब कुटूंबात होतो, तिथे त्यानं कितीही मेहनत केली तरी तो श्रीमंत बनू शकत नाही. कारण त्यांच्या भाग्यात तसं नसतं. महत्वाचं म्हणजे पद, प्रतिष्ठा, संपत्ती व मालमत्ता ह्या गोष्टी प्रारब्धनुसार मिळत असतात. त्यामुळं चिंता करायची गरज नसते जर प्रारब्धात असेल तर आपल्याला सहजपणे पद, प्रतिष्ठा, पैसा व मालमत्ता मिळत असते. काहीच करायची गरज नसते. कारण प्रारब्धच आपल्या हातून तसे प्रयत्न घडवून आणणात. जेव्हा वेळ काळ चालून येतो. वेळेपुर्वी काहीही मिळत नाही व भाग्यात जेवढे असेल तेवढेच मिळते. भाग्यापेक्षा जास्त मिळत नाही. कोणी कितीही प्रयत्न केला तरी.
सुधाकरला धनगवळी आठवताच आनंदही आठवला होता. आनंदनं नागद्वारची यात्रा ठरविताच ठरलेल्या दिवशी ते सर्वजण एकत्र येवून त्यांनी गाडी काढली व ती गाडी सुसाट वेगानं धनगवळीच्या दिशेनं धावत होती.
तो धनगवळीचा रस्ता दैदीप्यमान वाटत होता. आजुबाजूला हिरवेगार गवत होते. त्यातच काही ठिकाणी हिरवीगार झाडी तर काही ठिकाणी हिरवीगार शेतं डोलत होती. त्या शेतीत धान, मका, मुग इत्यादी पीकं होती. काही ठिकाणी सोयाबीनचंही पीक होतं. अशातच वडचिचोली आली.
वडचिचोली नावाचं ते गाव. या गावी एका वडाच्या झाडाच्या पारंब्या खाली येवून त्या पारंब्यापासून नवीन झाड तयार होवून पूर्ण कितीतरी परीसरच त्या वडाच्या झाडानं वेढलेला आहे. त्यामुळं त्या चिचोली गावाचं नाव वडचिचोली झालं. ते गाव या वडाच्या झाडामुळं अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
आनंदची गाडी धावत होती. तसं पांढूरणा आलं. पांढूरणा येताच गाडी थोडीशी थांबली. तिथं योगेश आणि त्याच्या सोबत्यांना घेवून गाडी पुन्हा चालायला लागली.
गाडी काहीवेळ चालताच तिनं मुख्य रस्ता सोडला. तशी ती आडमोडी वाटेनं निघाली. तसा आडमोडी त्या छोट्याशा रस्त्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूनं पीकं होती. काही ठिकाणी बैलंही दिसली. परंतू त्या बैलांकडं पाहतांना विचार येत होता तो त्यांच्या बारीकपणाचा. कारण एवढं सगळं हिरवंगार गवत खायला असूनही ती बारीक का असेल? असा प्रश्न सुधाकरसमोर होता.
गाडी चालत होती. तशी एक नदी आली. तसं कोणीतरी ओरडलं, 'धनगवळी आलं' तसे सर्वजण उतरण्यासाठी सज्ज झाले.
धनगवळी आलं होतं. तशी गाडी थांबली. सर्वजण गाडीच्या बाहेर निघाले. तोच सर्वजण नदीवर गेले. त्यांनी हातपाय धुतले व धनगवळी महाराजांची पुजाअर्चना करुन ते पुरते पुढे निघाले. तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते.
आठ वाजले होते. तशी गाडी त्या रस्त्यानं चालत होती. आजुबाजूला काळाकुट्ट अंधार पडला होता. रातकिड्यांची किरकिर सुरु होती. तसा रस्ताही बरोबर नव्हता. रस्त्यानं खाचखळगेच होते. बराच वेळ झाला होता. तसं कोणीतरी म्हणालं,
"भूक लागली, गाडी थांबवा."
त्याचं ते वाक्य. तसा एकजण म्हणाला,
"कसं थांबवणार. जंगल आहे. या जंगलात थांबवणार काय. थांबा थोडं."
त्या व्यक्तीच्या बोलण्याचा अवकाश......तो व्यक्ती चूप बसला. तशी गाडी वेगानं चालतच होती. थोड्याच वेळात जेवनाचं ठिकाण आलं. तिथं एक नैना देवीचं मंदिर होतं.
गाडी थांबली होती. तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले होते. भूक फारच लागली होती. तसं ते ठिकाण येताच सर्वांनी देवी नैनाचं दर्शन घेतलं. तसं जेवनही केलं व पुन्हा सर्वजण गाडीत बसून गाडी अनहोनीच्या दिशेनं रवाना झाली. गाडी त्या तामिया घाटीत घाटीचं नागमोडी वळण घेत घेत निघाली होती. मात्र ते पाहायला कोणीही जागे नव्हते. ते तर अनहोनी येईपर्यंत झोपी गेले होते. अनहोनी येताच सर्वजण उठले व तिथे उतरताच सर्वजण पुन्हा या अनहोनी ठिकाणावर गाढ झोपी गेले. त्याचठिकाणी त्यांना झोप कशी लागली ते कळलंच नाही. परंतू जेव्हा पाखरांची किलबिल सुर झाली, तेव्हा ते उठले असता सकाळ झाली होती.

****************************************

सुधाकरला ते सगळं आठवत होतं. आता तो आनंदसोबत महादेवाची वाट चढत होता. त्यातच त्यांनी गाडी केली. ती गाडी करुन ते इवरात पोहोचले.
इवर आलं होतं. तशी इवरात पुजा करुन ते महादेवाची चढाई चढत होते.
ती महादेवपायरीची चढाई. फार कठीण होती ती चढाई. ती कठीण होती. ती चढाई चढण्यापुर्वी उतरण आली. ती उतरण उतरताच पहिली पायरी आली. त्यातच या पहिल्या पायरीवर नारळ फोडून पुन्हा सर्वजण निघाले त्या पाय-या चढण्यासाठी. त्या पाय-या........त्या पाय-या चढत असतांना श्वास लागत होता. परंतू ते थांबत थांबत चढत होते पहिली पायरी आणि ती जागा.
महादेवाची एक एक पायरी चढत चढत आनंद आणि सुधाकर व त्याची चमू चालली होती.
[13/08, 9:28 pm] Ankush: सुधाकर पाय-या चढत होता. तशा जुन्या आठवणी त्याच्या ताज्या होत होत्या. त्याच्या जवळपास शंभरच्या वर महादेवाच्या यात्रा झालेल्या असून एकदा त्यानं या रस्त्यानं पाच बाबा पाहिले होते. (बाबा अर्थात साप) एक तर सुतसारखाच बारीक होता. त्याची हालचाल एकदम मंद असून तो मेला आहे की जीवंत हेच ओळखायला मार्ग नव्हता. परंतू कोणाचा पाय पडेल असा उद्देश गृहित धरुन एका पादचारी भक्तानं जेव्हा त्याला लहानशा काडीनं बाजूला केला, तेव्हा त्यानं थोडीशी हालचाल केली होती. त्यानंतर अगदी गडावर म्हणजेच महादेवाच्या मंदिरासमोर दोन बाबा जोडीनं पाहिले होते व त्यांना कुंकूही लावलं होतं.
ती महादेवाची यात्रा......अजब गजब असायची ती यात्रा. नागद्वारला येण्यापुर्वी सुधाकर अगदी लहानपणापासून महादेवाच्या यात्रा मोसमातून दोनवेळा करायचा. राखी आणि शिवरात्र त्याचे ठरलेले असायचे. कधीकधी होळीच्या पाडव्यालाही तो यात्रा करीत असे. राखीच्या वेळी राखी चढवायला अतिशय कमी लोकं येत. कारण ते नागद्वारच्या वेळी राखी चढवून जात असत. तसेच नागद्वारच्या वेळी भरपूर लोकं येत. मात्र शिवरात्रीच्या वेळी प्रचंड भीड असायची की आईला लेकरु सांभाळायचं नाही. दुरुन पाहिलं असता लोकं मुंग्यासारखेच दिसायचे.
सुधाकरला राखीची यात्रा आवडायची. कारण राखीच्या वेळी प्रचंड पाऊस असायचा. त्यातच थकवा जाणवायचा नाही. ते काळे काळे मेघ जवळून जायचे अगदी अंगाला झोंबत. तसा ज्याप्रमाणे फवारा असतो ना. तसे ते मेघ फवारा उडवीत शरीराला स्पर्श करायचे. ते पाहून वा प्रत्यक्ष अनुभवून शरीर अगदी गदगद होवून जायचं. त्या नवशरीरात चैतन्यता निर्माण व्हायची. परंतू यावेळी पाऊस नसल्यानं तशी चैतन्यता शरीरात नव्हती. शरीर अगदी रुक्ष झालं होतं.
चालतांना अगदी दम लागत होता. आनंदला तर नाकीनवच येत असेल कदाचित. कारण तो अगदी दम टाकत चढत होता. बसला की उठायची इच्छाच करीत नव्हता.
ते सर्वजण हळूहळू बसत उठत चढत होते. त्यातच तो रस्ता दोन तासाचा असला तरी साडेपाच तासाचा झाला होता. कारण त्या आनंदमुळं तो गड चढायला तब्बल साडेपाच तास लागले होते.
दोन वाजले होते. तसं गड आलं व मंदिरही आलं. ते मंदिर अगदी दैदिप्यमान वाटत होतं. आता ते सजलं दिसत होतं. आतमध्ये मार्बल लागली होती तर बाहेर काही स्टाईलरुपी गोटे. तसं पाहता मंदिरालाही रंगवण्यात आलं असून तेही सजवलं होतं. त्यामुळं कधी नाही, तसं मंदिर आज दिसत असल्यानं महादेवाच्याही मंदिराचा कायापालट झाल्याचा आनंद सुधाकरला वाटत होता. तसं यापुर्वी महादेवाच्या यात्रेला एवढे लोकं यायचे. भरपूर दानही करायचे. परंतू मंदिर अगदी जीर्ण स्वरुपात दिसायचं. त्यामुळं खंत वाटायची की एवढा पैसा कुठं जातोय? परंतू आता मंदिराचा कायापालट पाहता ती शंका पुर्णतः नेस्तनाबूत झाली होती. मंदिरातील मुर्तींचाही कायापालट झाला होता. तसं मंदिराचं दर्शन घेवून सुधाकर बाहेर आला असता एका ठिकाणी फारच भीड लागली होती. सुधाकरनं जवळ जावून पाहताच दोन तृतीयपंथी माणसं शिवपार्वतीचा वेष परिधान करुन आली होती. लोकं त्यांच्या पाया लागत होते. कोणी दानात पैसे देत होते तर कोणी फक्त पाया लागत होते. मात्र त्यांना पैशाचं काही लेणदेन नव्हतं. ते मात्र अगदी निःसंकोचमनानं भक्तांना आशिर्वाद देत होते.
गडावर पोहोचताच सुधाकरनं कढई तयार केली. तोच कढई बाणासमोर ठेवून आरती म्हटल्या गेली. तेव्हा ते शंकर पार्वती वेषातील दोघंही जण त्याचसोबत एक चव-या रुपातील साधा माणूस संपूर्ण आरतीभर बाण नाचवत होते. त्यांनी त्यात खंड पडू दिला नाही.
कढई झाली होती. तशी पूर्ण पुजा आटोपली होती. तसा आनंद खाली उतरायला लागला. त्याचबरोबर त्याची चमूही ज्यात देविदास, योगेश, अमेय, अभय, वासूदेव आणि इतर सारे लोक होते. सुधाकर यावेळी वेगळ्या मार्गानं निघाला. त्याचबरोबर योगेशही. मात्र गुलाबनं व अमेयनं आनंदला यावेळीही सोडलं नव्हतं. ते हळूहळू उतरत होते.
सायंकाळ होत आली होती. तसा सुधाकर व योगेश खाली उतरुन एका ठिकाणी वाट पाहात बसले होते. ते ब-याच अवधीपासून वाट पाहात होते. तसा ब-याच अवधीनंतर तो समूह आला. त्यातच आनंद सुधाकरवर ओरडत होता. वाटत होतं की तो जास्तच भडकला आहे. कारण त्याची महत्वाची वस्तू सुधाकरजवळ होती. जी सुधाकरनं अगदी व्यवस्थीतपणे सांभाळली होती.
आनंद जसा खाली आला. त्यानं ती वस्तू सुधाकरच्या हातातून घेतली. तसे ते तो ओबडधोबड रस्ता चालू लागले. त्यातच एक नदी आली. ती नदी पार करताच पुन्हा इवर आलं व पुन्हा पचमढीमार्गाच्या गाडीत बसून ते पचमढीसाठी रवाना झाले. मात्र आज ठरवलं होतं की लाल बंगल्यातच जेवन करायचं. हॉटेलात नाही.
गाडी जेवनासाठी लाल बंगल्यात थांबली. जेवन सुग्रास होतं. तसं सर्वांनी त्या सुग्रास अन्नावर ताव मारला. त्यानंतर ते सर्वजण पायीपायी पचमढीच्या बाजारपेठेत आले. त्यानंतर त्यांनी काही वस्तू पचमढीबाजारपेठेत विकत घेतल्या. त्यानंतर ते रुमकडे गेले व रुमवर सर्व वस्तू आपल्या पिशव्यात भरुन त्यांनी रुम सोडली. ते गाडीत बसले. गाडी एकदाची सुरु झाली.
गाडी सुरु झाली होती. तशी ती नागमोडी वळण घेत चालली होती. तसं जेवन फार झालं होतं. मळमळ वाटत होतं. त्यातच सुधाकरला त्या गाडीत ओका-या सुरु झाल्या. त्याचबरोबर योगेशही ओका-या करीत होता. बाकी मित्रमंडळ टवाळक्या करीत होतं. परंतू खरं कारण सुधाकरला माहित होतं. ते म्हणजे लाल बंगल्यातील त्या वाळलेल्या पुरीचं जेवन. त्या पु-या खाल्ल्यानं ओकारी होत होती आणि आता वाटत होतं की जर आज हॉटेलात जेवलो असतो तर ही व्ळ आली नसती.
दरवर्षी नागद्वारवरुन परत येतांना सर्व भक्त हॉटेलात जेवत होते. मात्र यावेळी पैसे वाचविण्याच्या चक्करमध्ये ते लालबंगल्याचं जेवन जड झालं होतं. परंतू आता उपाय नव्हता.
गाडी चालत होती त्या पहाडातून. सुधाकरच्या ओका-या थांबल्या होत्या. त्याचबरोबर योगेशच्याही. दोघंही झोपी गेले होते. तसं जांबसावली आलं. तिथं गाडी थांबली, तेव्हा सकाळचे चार वाजले होते. तिथं आंघोळ करुन सर्वांनी बजरंगबलीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते तेथून निघाले. ते आता आपल्या घरी परत आले होते. मात्र यावेळची यात्रा सुधाकरला आवडली नव्हती. कारण जीवनातून पहिल्यांदा प्रवास करतांना त्याला ओकारी झाली होती. त्यामुळं तो नक्कीच व्यथीत झाला होता. अंतर्मनातून नव्हे तर बाह्यअवयनातून. परंतू पुढल्या वर्षी नागद्वारला जाणार नाही हा घाट आजही मनात नव्हता. तर नवी आशा अजूनही मनात होती. ती म्हणजे नागद्वारला जाण्याची. त्यासाठीच तो पुढचं वर्ष केव्हा येते आणि केव्हा नाही. याची जणू वाटच पाहात होता.
ती वेळ निघून गेली होती. परंतू आठवणी मात्र राहिल्या होत्या शिल्लक. त्या आठवणीचा खजिना शिल्लक होता मनात. त्या आठवणी नसत्या तर ही पुस्तकही लिहिता आली नसती.
सुरुवातीच्या यात्रा जरी आनंदनं केल्या असल्या तरी आज सुधाकरसोबत प्रवासातील आनंद घेतांना आनंदला अगदी हायसं वाटत होतं. त्यामुळे तो नित्यनेमाने दरवर्षी यात्रा काढत होता आणि सर्वांना सोबत घेवून त्याचं संरक्षण करीत करीत यात्रा यशस्वी करीत होता. त्यामुळे तो होता म्हणून यात्रा होती. नाहीतर या गटातील कोणत्याही माणसाची ताकत नव्हती की ते यात्रेला जातील.
जांबसावली........हनूमानाचं प्रसिद्ध मंदिर होतं ते. ज्याप्रमाणे लोकं देवाला मानत होते. तसेच ते भूतालाही मानत होते. याठिकाणी अशी आख्यायिका होती की ज्या कोणाच्या अंगात भरतं येतात. त्यांचं भूत इथं निघणं. परंतू ती एक मानसिकता होती विकृततेची. सतत विचार करुन तशी मानसिकता मनात निर्माण व्हायची व लोकं भूत लागलं असे म्हणायचे. मग याठिकाणी आरती सुरू होताच त्या धरतीवर ती भरतं थयथयाट वाचायची कोणी ओरडायची. तेव्हा भक्तांपैकी बरेच जण आरतीकडं कमी व त्या अंगात येणा-या मुलांकडे जास्त पाहात. लोकं पाहतांना दिसले की त्या अंगातली भुतांनाही जास्त ताव येत असे व ते जास्त जोमानं आपल्या लीलया करीत असायचे.
आंघोळ करुन जेव्हा आनंदाची चमू दर्शनरांगेत लागली, तेव्हा गर्दी जास्त होती. त्यातच तो झोपलेला हनुमान दिसत नव्हता भक्तांना. मात्र ती लीलया करणारी माणसं दिसत होती. ते पाहून लोकं खुश होत होते.
ते जांबसावलीचं हनुमान मंदिर.......त्याचीही एक आख्यायिका होती की कोणीतरी दरोडेखोर व्यक्ती ते धन चोरण्यासाठी आला असता प्रत्यक्षात हनुमान त्या मनावर झोपला धनाची रक्षा करण्यासाठी. त्यावेळी त्या दरोडेखोरांनी त्याला हटविण्याचा बराच प्रयत्न केला. परंतू तो हटला नाही.
आरती झाली होती. तसा पुजाविधीही आटोपला होता. परतीची वाट लागली होती. असं वाटत होतं की केव्हा घरी जातो आणि केव्हा नाही. त्यातच आरती झाल्यावर ताबडतोब कढई करुन चमू तेथून रवाना झाली. ती थेट आपआपल्या निवासाकडे येवून थांबली. मोरक्यानं सर्वांना चहापाणी पाजलं व ते सर्व भक्त आपल्या आपल्या घरी निघून गेले.
भक्त घरी आले होते. सर्वांनी प्रवासाचा चांगला आनंद घेतला होता. आनंदही त्यात सहभागी झाला होता. सर्वांनी एक नागद्वारचा ग्रुप बनवला होता. त्यातच काही फोटो व काही व्हिडीओ अपलोड करणे सुरु होते. अशातच सुधाकरला ती पचमढीतील गोष्ट आठवली. कोणीतरी म्हणत होतं की तुम्ही एवढ्या पुस्तका लिहिल्या. एखादी नागद्वारवर लिहिली का?
प्रश्न बरोबर होता. तसा सुधाकर गप्प होता.मनात विचार होता की आपण एवढ्या पुस्तका लिहिल्या. परंतू नागद्वारवर कुकूच कू होतं. शेवटी मनात विचार केला आणि ठरवलं की आपण पुस्तक लिहायची नागद्वारवर. जगाला प्रेरणा देण्यासाठी. काल्पनिक तर कोणीही लिहितं.
सुधाकरला असं वाटताच तो लिहू लागला. त्या सुंदर सुंदर आठवणी. जणू त्याला त्या आठवणी लिहितांना ते सुंदर मन मोहून घेणारे पहाड आवाज देत होते. तिया इवल्या इवल्या नद्या मंगलवाद्य वाजवीत होत्या. तसेच ती रम्य वाटणारी हवा लिहिण्यासाठी प्रेरणा देत होती.
ती मनमोहक सृष्टी वास्तवाचं भान राखून होती. तिथं देव नव्हता. परंतू देव असल्याचा भाष होत होता. त्यामुळं जोही कोणी तिथं जाईल. त्याच्या अंगातील पूर्ण अवयवाचं एकप्रकारे सर्वीसींग होत होतं.
तिथं जंगल होतं नव्हे तर लताही होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि जीवजंतूही होते. जे सुधाकरनं कधीच पाहिले नव्हते. त्यामुळं कोणत्याही स्वरुपाची कल्पना करायला वावच नव्हता. सर्व वास्तविक होतं आणि लिहिता येणं सोपं होतं.
यावेळची ती यात्रा सुधाकरला आवडली जरी नसली आणि त्रास झाला असला तरी त्यानं आपल्या जीवनातील यात्रा बंद केल्या नव्हत्या. दरवर्षी आषाढ लागला की सुधाकर आणि आनंद यांना यात्रेची हूरहूर सुटायची. त्यातच आनंद ज्याला त्याला फोन करुन गाडी करायचा व दरवर्षीच त्यांना प्रवासाला घेवून जायचा.
आज आनंद थकला होता. त्याला चालणं जमत नव्हतं. परंतू त्यानं यात्रा बंद केली नव्हती. तो दरवर्षीच यात्रा काढत होता आणि दरवर्षीच नागद्वारच्या यात्रेला भक्तांना घेवून जायचा. मात्र चढण्याचं तेवढं त्राण नसल्यानं तो धुपगडापर्यंतच जायचा. तिथं पहिल्या पायरीवर नारळ फोडून व कापूर लावून बाकी भक्तांना पहाडी फिरुन यायला सांगायचा. त्यातच तो धुपगडावरच दोन दिवस राहून निसर्गसौंदर्याचा आश्वाद घ्यायचा परत येणा-या त्याच्या सोबतच्या भक्तांची वाट पाहात. तो यात्रा करायचा. कारण त्याच्या मनात श्रद्धा होती असे नाही तर भक्तमित्रांवर त्याचं निरतिशय प्रेम होतं. त्याचबरोबर त्या नागद्वारच्या मातीत वसलेल्या त्या मुर्तीतील देवावर. त्यामुळंच तो भक्त आणि त्या मुर्त्या यातील दुवा बनून भक्तांना त्या देवाला भेटण्यासाठी नित्यनेमानं दरवर्षी नेत होता नव्हे तर दुवा बनून देव आणि भक्तांचं सुवर्णमध्य साधत होता. असं वाटत होतं की जणू त्या देवानंच भक्तांची भेट घेण्यासाठी त्याची नियुक्ती केलेली असावी.
आनंद आनंद देणाराच व्यक्ती होता. नागद्वारच्या प्रवासयात्रेला भेटलेला. आज त्या नागद्वारच्या पहाड्या बोलत असल्या, नद्या गाणे गात असल्या, लता संवाद साधत असल्या तरी त्यांची भेट आनंदनं करुन दिली असल्यामुळे त्यांना बोलता येत होतं. संवाद साधता येत होतं आणि गाणेही गाता येत होतं. नाहीतर सुधाकरला त्या कधीच गाणे गातांना व संवाद साधतांना तसेच बोलतांना दिसल्या नसत्या. ना त्याच्या मनात आाठवणी असत्या ना त्याला पुस्तक लिहिता आली असती ना ही प्रवास असता ना ही यात्रा. आनंद होता म्हणून सर्वकाही होतं आणि त्या तत्सम आठवणी आणि तो साक्षात देवही होता. त्याचं त्या ठिकाणचं अस्तित्वही होतं. ते अस्तित्व आनंदमुळंच सजीव वाटत होतं. असे म्हणायला काहीच हरकत नाही.