Navra baaykoche rusve-fugve - 10 in Marathi Comedy stories by शब्द बिंधास्त..Mk books and stories PDF | नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१०

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१०

_______________________________________
तुम्ही भाग 9 मध्ये पाहिलंच मस्तपैकी जेवणाचा कार्यक्रम संपून, रितुने पोट दुखायचं कारण सांगून रात्रीच्या वेळेस बाहेर बाईकवर मस्त चांदण्या‌ रात्री फिरायचा तिचा प्लॅन फीसकला...
_______________________________________

आता यापुढे.....

मितु गितुला दवाखान्यात घेवुन जायला निघते, मात्र पुढे ‌जावुन रितु मितुला स्कुटी साइड ला लावायला सागंते. आणि रितु आपल्या नवरोबाला काॅल करत गुपचाप, गपगुमान, सतरा कारन‌ न देता इथ पाण्याची टाकिच्या समोर असलेल्या चाफ्याचा झाडाजवळ आम्ही बसलोय, ३ मिनिटात तुम्ही इथे यायला पाहिजे. नाहीतर तुम्ही बघा...😠

रीतु डार्लिंगची धमकी म्हणजे डेंजरस धमकी,

बायको पुढे सर्व नाईलाज होतो. आता जायचं कसं हा मोठा प्रॉब्लेम, जायला निघालो तर एक दोन जण तरी सोबत येईल. यासाठी आता शेवटचा पर्याय खिडकीतून उडी मारावी लागेल.
मग काय करणार बायकोसाठी करावाच लागत..😜
"तुम्ही पण तुमच्या बायकोसाठी केलं ना कधीतरी, असे डेंजर डेंजर किस्से"😜😝

शेवटी खिडकीमधून उडी मारुन अर्धा किलोमीटर पायी चालतच गेलो.. मला पायी चालत येत असताना बघून ती जोरजोरात हसायला लागली.

रितू मीतुला बोलत : मीतू इथून मेडिकल वरून पोट दुखायच्या गोळ्या घे, आणि इथेच बसून राहा पाच दहा मिनिटात आम्ही येतोच.
लय हुशार पोट दुखत नसतानासुद्धा मेडिकल करून गोळ्या घेते. दवाखान्यात गेलो याचं प्रूफ म्हणून गोड्या घेतलेलं बरं. बघा बाबा बायको म्हणजे थोडीही चूक स्वतःची राहू देत नाही, सगळ्या चुका गोल करून टाकतात...😜😝

रितू मीतुला मेडिकल वर बसवून ठेवते, आणि आम्ही निघतो...🥰

रितू मला म्हणत... घ्या राव चावी अन् बसा गाडीवर...

बाईक चालू करून... मस्तपैकी ती गार हवा, चेहऱ्यावर स्पर्शून एक वेगळाच आनंद देत होती, अचानकच रितू गाणं गुणगुणायला लागते.....

तेरे बाहो‌ मे हे मेरे दोनो जहा,
तुर है जिधर मेरी जन्नत वही,
जल रही आग है, जो दो तरपा भुजे
कभी मेरी मंन्नत तू ही मेरी आरजू
मै तेरी आशिकी तू मेरी शायरी.....

गाणं म्हणत असताना ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून.....love you stupid...😘

खूप सार्‍या गप्पा,
बहरल्या त्या चांद राती,
हळूच येऊन वाऱ्याची झुळूक,
लागली गालावर खेळायला.....

पाच-सात किलोमीटर जाऊन पुन्हा मागे वळायचं ठरलं,
आता रितु स्व:ताहून... अहो ऐका ना..? तुम्ही मागे बसा मला चालवायची स्कुटी..😊

मी हसूनच अरे वा भारीच..... चल बस तर, बायकोच्या मागे बसणे याला पण खूप नशीब लागतं...😜 ते नशीब आज मला लाभलं...😁😜
रितू स्कुटी चालवत असताना, मी तर भानच विसरून गेलो आज पहिल्यांदा रितु सोबत चांदण्या रात्रीत,गार त्या हवेत, मधेच हवेची झुळूक येऊन, नकळतच चेहऱ्यावर स्माईल येत गाडीवर....अचानकच काही शब्द पुटपुटायला लागले......

"हवा हि रंगीन,
गालावरून येते स्पर्शून,
माझ्या सवे येऊन,
भासवतेय मला ओठावर स्पर्शून......💝💝💝"

आज ऐका वेगळ्याच विश्र्वात जगतोय असा भास होतो, आजचे क्षण खुपच छान वाटत होते, कधीही विसरणार नाही असच आज वाटत होते..

रितू स्कुटी चालवत असते परंतु शिंका मला खूप येत असतात...
रितू मध्येच... एवढं काय शिंकताय?
तब्येत बरी नाही का तुमची?
काय झालं तुम्हाला?
स्कुटी थांबून, अहो काय झालं सांगा ना...?

अग माझी रितु सगळा ठीक आहे मी, बस तुझे केस नाका-तोंडात जातात..
जरा सांभाळ तुझ्या लटाणां...😝😝.. चल चल, ती मीतु तिथे वाट बघत असेल. हो खरच‌‌ खूप उशिर‌ झाला.
अगं रितु थोडं जोरात घे ना...! एवढी काय धीरे चालवत आहेस गाडी...
अग, जोरात चल ना, खूप उशीर झाला मीतू वाट बघत असेल मेडिकलवर..
रितू : हो चालते जोरात चालते..ओके

अग आता जोरात तर चल आता...३०च्या स्पीडने चालणार तर केव्हा पोहोचणार...?

रीतू: कस आहे ना जेवढे जोरात गेलो तेवढच लवकर पोहोचणार... आणि तुमच्या सोबत असा टाईम घालवायला मला खूप आवडतो म्हणून मला हळू हळू चालवायच आहे. कळल न्..!!!

खरं ना इथ रात्र झाली, तिकडे मीतू मेडिकलवर एकटी आणि या झिपरिच वेगळच काय चाललं... काय बोलू आता इथं... असो तिच्या मनाची इच्छा पूर्ण झाली तर ती पण खुश आणि मी पण खुश..😜😝

मी मुद्दामूनच... ये रीतू थोडा स्पीड कमी करणा , 20 च्या स्पीड ने चालव, मला पण आवडेल तुझ्यासोबत असा वेळ घालवायला...🥰

रितू: मजाक करताय ना तुम्ही...? खेचत आहेत तुम्ही माझी, कळतय मला तुम्ही असच करता, तुम्हाला कुठे आवडते माझ्या सोबत फिरायला, असेल कोणी दुसरी म्हणून तुम्हाला आवडत नाही माझ्या सोबत फिरायला...

अग तुला चांगलं म्हटलं ना माझी आई, मला तुझ्या सोबत वेळ घालवायला खूप आवडतं...
अस बोललो तरी, तुझ एवढं कीर्तन चालू करते तू..

मला नका काही सांगु मला चांगले कळलं, तुम्ही माझी मजाक करत आहे, आधीच तुम्हाला धमकी देऊन बोलवावं लागलं, म्हणून तुम्ही आले ...😏 नाहीतर आलेच नसते..😏

रितू गाडी थांबून... उतरा खाली तुम्ही,

अगं काय झालं तुला..!

रितू : तुम्ही जास्त बोलू नका, उतरा आता गपचूप, ही गाडी माझ्या बाबांनी मला दिली आहे.

पारा खूप चढत होता यासाठी बाबा नको. आगी मध्ये हात घालने चांगलं नाही यासाठी... उतरावा लागला बाबा, शेवटी बायको ती बायकोच, सगळ्या गोष्टी तिथे नतमस्तक होतात...😜 काय बरोबर ना..! कि खोटं बोललो..?

मग काय निघालो चालत चालत घरी.....
जसं पाई पाई यावं लागलं तसंच पाई पाई जाव लागतय... असो बाबा करणार तरी काय...!

शेवटी बायको म्हणजे बायकोच...😜


बघूया पुढच्या भागात काय होते....😁👍🏼 तोपर्यंत हसत राहा खेळत राहा...


क्रमशः

_______________________________________

शब्द बिंधास्त...mk
किरण सुरेश मगरे
जळगाव
_______________________________________