Husband and wife's Rusve-Fugwe ... 11 in Marathi Comedy stories by शब्द बिंधास्त..Mk books and stories PDF | नवरा बायको चे रुसवे-फुगवे...११

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

नवरा बायको चे रुसवे-फुगवे...११

तुम्ही भाग 10 मध्ये पाहिलंच रितूला रात्रीच्या वेळेस बाईक वर फिरायचं होतं म्हणून तिने काय काय नाही ते नाटक केले. मस्तपैकी फिरून वगैरे झालं आणि पाण्याच्या टाकीजवळ जस जातांना पाई पाई गेलो तसंच तिकडून सुध्दा ती मला पाईच पाठवते....
______________________________________
आता पुढे....

पोट दुखायचं नाटक करून गेलेली रितू घरी येताच चेहऱ्यावर थोडं तब्येत खराब आहे अस दाखवते. परंतु तिला ते खोटं नाटक करायला खूपच जड जाते...

मधेच मीतु : रितु ताई ते मेडिसिन वगैरे आणले आहेत. जेवण कर आणि मेडिसन घे... हे भरित पुरी आनली बघ तुझ्यासाठी जेवण करून घे.

रितू : अग मीतू ते भरीत पुरी राहू दे तिकडे,दाळ भात आन बाई, दाळ भात वरच दनका मारू दे मला आज...😜

मितू: हो गं, हो ताई. तुझी आवडती दाळ भात घे बाई...

रितू जेवण वगैरे करते आणि तिच्या रूम मध्ये जाऊन, मस्तपैकी बेडवर पडते. तेवढ्यात बिन पगारी फुल अधिकारी 😝 स्वप्ननगरी एक्सप्रेस येते आणि रितू त्या स्वप्ननगरी एक्सप्रेस मध्ये बसून मस्तपैकी प्रवास करते.... आणि सकाळी सकाळी स्वप्ननगरी एक्सप्रेस पुन्हा तिला बेडवरच आणून सोडते...😁

लग्न होऊन आज तिसरा दिवस असतो. आज घरातील सर्व मंडळी रितूच्या हातचा स्वयंपाकाची चव घेण्यासाठी प्रत्येक लहान मोठ्यांची जीभ जशी आतुरलेली असते. रितुला आज स्वयंपाकामध्ये वरण, बट्टी, वांग्याची भाजी, सोबत भजी आणि उडीदाचे पापड, बनवायचं असते.

रीतूला आता खूप प्रश्न पडतात. स्वयंपाक कसा होईल..? बरा होईल का..? घरात सर्वांना आवडेल का...? नाही आवडला तर काय होईल...? वरण ठीक आहे पण बट्टी बनवणे तिला नवीनच असते.

रितूच्या मदतीसाठी आई असतेच पण रितूचे देर मधेच स्वयंपाक घरात येऊन रितूला बोलतात.. वहिनी स्वयंपाक तुम्ही तुमच्या हाताने बनवायचा आहे हं...
आणि ये आई तू वहिनीला सांगू नको कसं स्वयंपाक करायचं ,"हा फक्त बट्टी कशी बनवायची ते तू सांगू शकते हं" कारण आमच्या लाडाच्या वहिनीने कधी बट्टी पाहिलीच नाही ना...! म्हणून तू बट्टी साठी हेल्प करू शकते वहिनीला. बाकी कामात हेल्प नाही करायची आज.

आई ओरडूनच....
ये जा रे तू.... करेल मी माझ्या लाडक्या मुलीसारख्या सुनेला मदत तुला काय करायचं ते कर आला मोठा शहाणा इथं, जा पळ इथून...🤨

आई फक्त रितू जवळ बसून रितूची गंमत बघत असते. वांग्याची भाजी आणि उडदाचे पापड सर्वकाही बनवून बट्टीच पीठ मळते. मळून झाल्यावर आईच्या तोंडाकडे बघते.. परंतु बोलायची हिंमत होत नाही की, "आई बट्टी कशी बनवतात ते सांगा"

परंतु ते आईला कळते. आई रितू कडे बघत, अगं पीठ मळून, त्या पिठामध्ये ओवा, टाकून त्यांचे गोल गोल उंडे बनव. आणि गरम पाण्यात उकळून काढ आणि एका वूड्यांचे चार भाग करून त्यांना कढाई मध्ये तेल टाकून . तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक सोड, थोडे लालसर लालसर झाले की काढून घेत जा.
आईने सांगितल्याप्रमाणे रितु सर्व काही करते... आणि बट्ट्या तयार होतात...😋

आता रितूची खरी परीक्षा असते. जेव्हा घरातील सर्व पुरुष मंडळी जेवायला बसतात आणि इथं रितुच्या मनामध्ये एक वेगळीच भीती निर्माण झालेली असते. जेवण बरोबर झाला असेल का...? नसेल झालं तर कोणी काही बोलेल का...?

आणि सर्व पुरुष मंडळी जेवायला बसतात.. आई सर्वांना वाढून देते.. सर्व पुरुष मंडळी जेवनामध्ये एवढे गुंग होतात कि रीतूने बनवलेला स्वयंपाकाचा रिझल्ट कोणीच देत नाही‌.... प्रत्येक जण ये आई मला वरण दे, आई मला वांग्याची भाजी दे, आणि थोडं जास्त टाक‌ हा आई... आज घरामध्ये वेगळेच वातावरण असत. प्रत्येक जण स्वतःहून जे लागेल ते मागत होता.

आणि मध्येच रीतूचा लहान देर... वहिनी हे काय केलं तुम्ही.. अहो वहिनी घशाच्या खाली घास उतरत नाही माझा.....

त्यावर आई बोलते : रितू जा बर स्वयंपाक घरातून लाटणे घेऊन ये... आणि याच्या घशाखाली घास कसा उतरत नाही तेच बघते..😠

अग अग आई....
ऐक ना उतरला घास.....😁😁😝

पुरुष मंडळी एवढं जेवण करून घेतात की शेवटी शिल्लक म्हणून काही उरतच नाही...... जेवण वगैरे आटोपून सर्व पुरुष मंडळी रितूला बोलतात..

पहिल्यांदा तुझ्या हातचं जेवण जेवलो आणि आज पहिल्यांदा इतकं पोटभरून जेवण केलं की तुला कसं सांगु बाळा खरच तुझ्या हाताला चव आहे.

तसं आज सर्वजण रितू वर खूप खूश असतात परंतु घरातील स्त्रियांना पुन्हा जेवण बनवाव लागतं. बिचाऱ्या स्त्रियांना पुन्हा स्वयंपाक करायला कंटाळा येतो. परंतु रितू आज खूप खुश असते कारण तिच्या हातचं जेवण सर्वांना आवडलेलं असतं म्हणून ती पुन्हा घरातील स्त्रियांना सांगते तुम्ही बसा मी स्वयंपाक करते.....😊

आज मी तर खूप खुश आहे माझ्या बायकोचा हाताची चव , बनवलेल जेवण माझ्या घरातील सर्वांना आवडलेल असतं....😊😊

आणि मी मनातल्या मनात लव यूवच बायको..🥰😘😘😘

क्रमश....
_______________________________________
शब्द बिंधास्त...mk
किरण सुरेश मगरे
जळगाव
_______________________________________