Bekaar asa janm janm dilay in Marathi Magazine by Ankush Shingade books and stories PDF | बेकार असा जन्म जन्म दिलाय

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

बेकार असा जन्म जन्म दिलाय

6. बेकार असा जन्म जन्म दिलाय

आई माझा गुरु आई कल्पतरु असं सानेगुरुजी म्हणतात. आई गुरुच आहे. कारण ती लहानाचं मोठं करते. आपल्याला उन्हातून सावलीत नेते. दूध पाजते. शिकवते नव्हे तर आपल्यालाही घासही चारुन देते. मायेचा ओलावा देते. आपण रडलोो तर आपले अश्रू पुसते. आणि आपलं सांत्वन करते. कधी वाईट गोष्टी पासून आपल्याला अडवते. संकट आलीच तर स्वतः झेलते. पण आपल्याला काहीही होवू देत नाही. महत्वाचं सांगायचं म्हणजे आई आपल्यासाठी राब राब राबते.

आपण मात्र स्वार्थी. आपण थोडेसे मोठे झालोच तर आपले विचार मावत नाही आपल्या मनात. मग याच विचारात कु विचारही येतात आपल्या मनात. मग आई कितीही चांगलं सांगत असली तरी तिचे विचार आपल्याला पटत नाही आणि त्याचबरोबर आपण तिच्या विचाराचा त्याग करतो. आपल्याला दुस-याचे विचार चांगले वाटतात. त्यातच ती मुलगी असेल तर मग विचारता सोय नाही.

ती प्रेयसी आपल्याला हवीहवीशी वाटते. तिच्यासोबत जगावेसे वाटते. तिच्यासोबत आपल्याला राहावेसे वाटते. ती आपल्याला जीव की प्राण वाटते. ती जवळ राहावी असं वाटतं आणि अशातच ते प्रेम वाढत जावून आपण तिच्याशी विवाहबद्ध होतो.

नवीन आलेली मुलगी. आपण तिच्या इवल्याशा प्रेमावर फिदा झालेले. ती आपलं मन ओळखते. तिला तुमच्या घरी पाय रुतवायचे असतात. रुतबा निर्माण करावयाचा असतो. त्याचाच फायदा ती घेते. ती तुमच्या कानाशी लागते. तुमच्या विश्वासाला तडा जाईल याचा तिला विचार नसतो. त्यातच ती आपला विश्वासघात करते एक दिवस. जी आई...... ज्या आईनं एवढं जपलं. त्या आईला आपण त्या नवीन सुन म्हणून आलेल्या पोरीच्या हातचे बाहुले करीत असतो. ती आदेश देणारी अधिकारी असते आणि आपण तिचे नोकर. मातृप्रेम आपलं विफल होतो. आपण तिनं जे काही आपल्यासाठी केलं, ते सारंच विसरतो आणि या नव्या मुलीला प्रेम देतो. हवं तर तिच्या बोलण्यातून आपल्या आईची रवानगी वृध्दाश्रमात करतो. पण पत्नीला सोडू शकत नाही.

आज घरोघरी अशाच गोष्टी सुरु आहेत. आपण रामायण मोठ्या आवडीनं पाहतो. पण तसो वागण्याचा प्रयत्न करतो का? त्यातील काही काही गोष्टी खरंच शिकण्यासारख्या आहेत. पण आपण तसे वागण्याचा प्रयत्न करतो का? तर याचं उत्तर नाही असेच आहे.

ज्या रामायणात कैकेयी सावत्र आई जरी असली तरी रामानं तिनं दिलेला वनवास सहर्ष स्विकार केला व हसत हसत जंगलात गेला. किती मोठं मातृप्रेम आणि आपण साधं बोलणं तेही सख्ख्या आईचं सहन करु शकत नाही. त्यानं तर जनतेसाठी सीतेची अग्निपरीक्षा घेतली. आपण आपल्या सीतेसाठी आई सोडतो आणि स्वतः पोरके होवून जातो.

घरोघरी हाच पोरकेपणा आज कलिकाळात पाहायला मिळतो आहे. कोणीही शिकून मोठा अधिकारी झाला असेल, पण त्यानं जर आईला त्रास दिलाच तर त्याच्या जगण्याचा काहीच फायदा नाही. आई गुरु आहे, कल्पतरुही आहे. पण केव्हा?जेव्हा तिला आम्ही म्हातारपणात मानू. तिचा गौरव करु. तिला दुःख होणार नाही असे वागू. नव्हे तर आपल्या सुखाचा त्याग करुन आईच्या म्हणण्यानुसार म्हातारपणी वागू. आईला पोरके वाटणार नाही. अशीच आपली रहनसहन असेल.

आपली आई अनुभवी असते. उन्हाळे पावसाळे तिनं पाहिलेले असतात. म्हणून विवाह करतांनाही आईची पसंती असावी. काही काही महाभाग विवाह करतांना मायबापाची पसंती नसते. आईबापाला समजत नाही याचा विचार करीत ते विवाह करतात. मग फसतात सैराट चित्रपटांच्या कथानकासारखे. शेवटी काय होतं तर विनाश.. .. भांडणं...... ताटातुट व घटस्फोट. हे जर टाळायचं असेल तर मायबाप सांगतात. तसंच वागावं. विवाह करतांना.

पूर्वीही विवाह व्हायची. मायबाप पोटाला कुंकू लावायचे. पण आता तसं तर नाही. आपल्यालाही मुलगी पसंत अधिकार आहे. पण खरंच आपली पसंती ही आपण रास्त तरी करु शकतो का? करीत असाल तर ठीक आहे. कारण आईला पोरकं वाटायला नको. जेव्हा तुम्ही तिला वृध्दाश्रमात टाकता ना. तेव्हा खरंच आईला जग पोरकं झाल्यासारखं वाटतं. तिला वाटतं की असली मुलं मला नसती झाली तर बरं झालं असतं. मी वांझ असते तर अगदी बरं झालं असतं. बेकार अशा मुलाला मी जन्म दिलाय आणि बेकारच असा जन्म दिलाय.