Dominant - 5 in Marathi Thriller by Nilesh Desai books and stories PDF | डॉमिनंट - 5

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

डॉमिनंट - 5

डॉमिनंट

भाग पाच

डॉमिनंट भाग चारपासून पुढे....

मंदार, आरीफ आणि मनूचा एक गट तयार होऊन पुढे आखण्यात येणार्या योजनांवर विचार विनिमय करत होते. नाही म्हणायला सध्यातरी त्यांच्याकडे फक्त चार माणसांचा शोध घेण्याचे काम होते. इतर अजून कोणकोण त्या कारस्थानात सहभागी आहेत, याची कल्पना अजून कोणालाच नव्हती. आरीफला त्या चौघांबद्दल जेवढी माहीती होती ती सर्व त्याने मंदारसमोर मांडली.

"वो चारों एक लोकल भाय के लिये काम करते है.. पर अपने को उन चारों से उसका नाम उगालना होगा.. हम डायरेक्ट जाके भाय से नहीं भीड सकते.. उसके लिये उसे हमारे जाल में लाना होगा..." आरीफ.

"हा पर ये कैसे हो सकता है... उससे अच्छा की हम भाय के पास बिन बुलाये मेहमान बन के जाये.. और वही पे खेल खत्म करें.." मनू आरीफच्या पुढे जावून विचार करत होती.

"नहीं.. उसमें खतरा ज्यादा है.. भाय के ऐरीया में जाके उससे भिडना आसान काम नहीं होगा.. और समझो बाद में पता चला के इस कांड उसका हाथ ही नहीं था तो.. तो लेने के देने पड जायेंगे.. उसपर भाय को वहा के लोगों का भी सपोर्ट मिलेगा.." आरीफ मनूला समजावण्याच्या स्वरात म्हणाला.

"आरीफ बोलतोय ते खरे आहे.. आपल्याला समोरच्या माणसाची ताकद प्रथम आजमावी लागेल मगच त्याच्यावर हल्ला करता येईल. आणि त्याची ताकद त्याची माणसंच असणार.. म्हणून पहीलं त्यांचा समाचार घेतला पाहीजे.." मंदारने दोन्ही हातांच्या मुठी अलगद एकमेकांवर आपटत म्हटले.

आरीफ आणि मनूनेही त्याला सहमती दर्शवली.

"ठिक है.. अब में जाकर मुआईना करके आता हुं.. इस कांड के बाद अब कौन क्या कर रहा है इसका पता लगाना होगा.." आरीफ निघण्याच्या तयारीत म्हणाला.

"वो लोग तो अभी बिखर गये होंगे.. क्यु के उनका जो भी प्लॅन था वो फेल हो चुका है.. और अब वो लोग वही करेंगे जो उनके प्लॅन में बिलकूल भी नहीं था.." मंदार गालात हसत म्हणाला.

मंदारचा शाब्दिक बाऊन्सर आरीफच्या डोक्यावरून गेला. तो एकदा मंदारकडे पाहत मनूकडे नजर वळवू लागला.

"वो लोग अब कुछ नया करने की सोचने में अपना वक्त बरबाद करेंगे और जो भी सोचेंगे उस पर सौ टक्का शुअर नहीं होंगे.. इसका साफ मतलब ये है के अब हम उनसे एक कदम आगे चलेंगे.." मनूने मंदारच्या बोलण्यातला यथार्थ उद्देश आरीफला उलगडून सांगितला.

मंदार मनूच्या हुशारीवर मंद हसला. त्याच्याकडे पाहत मनूच्याही चेहर्यावर स्मितहास्य आलं. आरीफदेखिल सर्व काही समजल्यासारखे भाव घेऊन त्यांच्याकडे पाहत हसला आणि निघाला.

आता तिथं मंदार आणि मनू दोघंच होते.

रिलॅक्स होत मनूने नकळत आपला शर्ट काढला आणि थोडे आळोखेपिळोखे देऊ लागली. तिच्या काहीश्या ट्रान्स्परंट शुभ्र रंगाच्या स्लीव्हलेस टॉपमधून तिची काया यौवनाचा सर्वात वरचा क्लास दर्शवीत होती. शारीरीक जडणघडण नियमित कसरतीने रेखीव अशीच होती. शब्दांत व्यक्त न करता येण्यासारखं तिचं रूप मंदार भरभरून आस्वादत होता.

अचानक तिला मंदारच्या तिथल्या अस्तित्वाची जाणीव झाली. काही झालं तरी अजून तो काहीसा अनोळखीच होता. तिनं त्याच्याकडे पाहीले. दोघांची नजरानजर होताच त्याची नजर ओशाळत दुसरीकडे गेली. तिनं बाजूला टाकलेला शर्ट पुन्हा उचलण्यासाठी हात पुढे केला पण तितक्यात मंदार म्हणाला..

"काही हरकत नाही.. तू सहज राहू शकतेस.. माझ्यापासून तुला काही धोका नाही..."

त्याच्या डोळ्यांत रोखुन पाहत ती हसू लागली..

"प्रयत्न तर करून पहा.. मघासारखी हातात येणार नाही मी.. यावेळी तुला मात खावी लागेल.."

"अच्छा.. घाबरलो बाबा.. मी नाही प्रयत्न करणार तसा.."

दोघेही हसतखेळत रोमँटीक वातावरणनिर्मिती करत होते.

"तसंही तुझा मघाचा हातात सुरा घेतलेला अवतार मी पाहीलाय.. मला वाटलेलं आता संपलोच की काय.." मंदार मनूची आणखी तारीफ करण्याच्या बहाण्याने म्हणाला.

मनूला तो प्रसंग आठवून कसेसेच झाले. मंदार गुन्हेगार नसताना त्याच्यासोबत जे तिने केले त्याबद्दल तिला वाईट वाटू लागले. तिच्या मनात अपराधीपणाची भावना जन्म घेऊ लागली होती. तसेच त्याची कहानी ऐकल्यावर आता तिला मंदारबद्दल सहानुभूती वाटत होती. मनातून तो विषय निघावा यासाठी ती मंदारशी इतर गप्पांत रंगू लागली.

मंदारने ते ओळखले. स्त्रीयांच्या मनात एखाद्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली की त्या व्यक्तीवर प्रेम आपोआप होते. मंदार चलाख होता. त्यानं मनूच्या मनात अलगदपणे तिच्याही नकळत प्रवेश केला होता. त्याला मनोमन ती खुप आवडली होती. म्हणूनच त्यानं ही खेळी अत्यंत सफाईदारपणे खेळली होती.

"मला माहीत आहे.. तू घाबरला नव्हतास ते.. उगाच आता मला चण्याच्या झाडावर चढवू नकोस हा.. मंदार काही म्हण तू आहेस अगदी निर्भिड.. तुझ्या डोळ्यांत मला भीती अजिबात दिसली नाही इतक्या वेळात.." मनूने काहीश्या लटक्या रागात म्हटले.

मंदार जागेवरून उठला.. त्यांच्यादरम्यानचं जवळपास सहा-सात फुटांचं अंतर कापत तो तिच्या जवळ आला. तिच्या डोळ्यांत पाहताना त्यानं इतर कश्याचाही विचार केला नाही. ती काय म्हणेल..? आपल्याबद्दल काय विचार करेल..? मनात येणार्या असल्या फालतू प्रश्नांना न जुमानता तो तिच्या अगदी जवळ वाकून उभा होता. ती खुर्चीवर बसली होती. पुढे काय होईल याची कल्पना तिलाही नव्हती.. तिच्या मनातही थोडीफार घालमेल सुरूच होती..

"मग काय दिसलं तुला माझ्या डोळ्यात.." मंदारने विचारले.

तिनं त्याच्या डोळ्यांत पाहत एक आवंढा गिळला.. एक नजर दुसरीकडे फिरवली. त्याच्या व्यायामानं कमावलेल्या सर्वांगावरून नजर फिरवत पुन्हा त्याच्या डोळ्यांत पाहू लागली.. यावेळी तिला तो जेम्स बॉन्डसारखा भासला.. फक्त त्याचे केस तेवढे गोल्डन नव्हते.. तिला त्याचा श्वासोछ्वास स्पष्ट ऐकू येऊ लागला होता.. त्याच्या श्वासासोबत स्वतःचा श्वास एकाच लयीत एकरूप करून घेण्याची प्रबळ इच्छा तिच्या मनात आली. अंतर्मन नाही म्हणत असतानाही तिचं स्वतःवरचं नियंत्रण हरवत होतं. कितीही नाही म्हटले तरी मोहाचा तो एक क्षण कसा मानवी मनावर हावी होतो, याचा साक्षात्कार तिला तत्क्षणी होत होता.

तिची नजर त्याच्या डोळ्यांवरून खाली सरकत ओठांवर आली.. पापण्या हळूहळू बंद होऊ लागल्या.. जणू त्यानं संमोहीत केलं की काय.. तिच्याही नकळत तिचे ओठ पुढे सरसावले.. तो हसला.. मनूसारख्या डॅशिंग मुलीनं आपल्या स्वाधिन होणं हा त्याच्या पुरूषत्वाला मिळालेला पुरस्कारच होता.. आपल्यातल्या पुरूषावर त्याला गर्व वाटला.. त्यानंही आपले ओठ पुढे केले.. त्यांच्या ओठांमध्ये किंचितसं अंतर राहीलंच होतं की...

मंदारचा मोबाईल खणाणला... त्या आवाजानं गडबडत ती भानावर आली. मंदारला समोर पाहताच तीने मागे सरकून शर्ट उचलला आणि घालू लागली. मंदारही सावरत मोबाईल खिश्यातून काढू लागला. आज पहील्यांदा त्याला मोबाईल सोबत बाळगण्याचा प्रचंड राग आला होता. मनातल्या मनात 'कोणा भिकारड्याचा जीव जातोय' असे त्याला वाटले. फोन बाहेर काढून स्क्रीनवर त्याच्या वडीलांचे नाव पाहताच तो शांत झाला. फोन उचलून कानाला लावत तो मनूपासून थोडा बाजूला गेला.

काही वेळ कॉलवर बोलल्यानंतर तो पुन्हा मनूजवळ आला. पण आताचा तो थोडा वेगळा वाटला. त्याचे डोळे लाल झाले होते. रागाने तो धुसफुसत होता. काय करू नी काय नको असे त्याला वाटत होते. कारणच तसे होते. अख्ख्या गावात त्याच्या नावाची चर्चा चालू होती. पोलीस सुतावरून स्वर्ग गाठण्यात माहीर असतात. त्याच्या रेखाचित्रावरून पोलीस त्याच्या गावापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले होते.

एका किन्नरसोबत शय्यासोबत करून तिचा खुन केल्याच्या आरोपाखाली तो बदनाम झाला होता. आणि त्याच्या वडीलांनी त्याला इष्ट ते सर्व काही सांगून चांगलेच खडसावले. वर घराण्याच्या झालेल्या बदनामीचा दाखला देत मंदारशी असलेल्या संबंधांशी पूर्णपणे फारकत घेत फोन आदळला होता.

झालेली बदनामी मंदारच्या सहनशक्तीच्या पलीकडची होती. त्यामुळेच तो बिथरला होता. पण मनूला मात्र त्याच्यात काही वेगळाच बदल जाणवत होता. तिनं त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यानं कठोरतेने तिच्याकडे पाहत दुर्लक्ष केले. काही काळ असाच निघून गेला.

***********

भंडारी बावाच्या अड्ड्यावरून निघाल्यानंतर डिग्रीने सुचित केल्याप्रमाणे सर्वजण आपापली खाजगी कामे निपटवून एक तासानंतर सायंकाळी पाच-सहाच्या दरम्यान पुन्हा एकत्र आले. आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी कल्याण स्टेशनच्या दिशेने कूच केले. स्टेशनजवळच लैला नावाचा कुख्यात बार होता. जो आसपासच्या झाडून सगळ्याच खबर्यांचा खास असा अड्डा होता. शिवाय बाहेरच्या राज्यांतील बरेचसे तडीपार गुंड, गुन्हेगार तिथेच तळ ठोकून असायचे. त्याला कारणही तसे खासच होते म्हणा..

लैला बारच्या मागच्या बाजूलाच त्या बारचाच एक भाग असलेल्या चार मजली लॉजवर अनैतिक धंद्यांचा सुळसुळाट असायचा. कमालीची बाब अशी की तिथल्या वैश्याव्यवसायात क्वचितही स्त्रीयांचा सहभाग नसायचा. फक्त देहव्यापार करणार्या तृतीयपंथींचीच तिथे रेलचेल असायची. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांमध्ये एक खास बात असते जी सामान्य माणसात आढळून येत नाही. गुन्हेगार लोक कधीही संतुष्ट अथवा समाधानी होऊ शकत नाहीत. त्यामुळेच सतत त्यांच्या आवडीनिवडी, शानशौकत बदलत्या असतात. म्हणूनच स्त्रीयांमध्ये अडकतील ते गुन्हेगार कसले..?

आणि भर म्हणून की काय सर्वकाही माहीती असुनही पोलिस त्या जागी फिरकत नसत. अगदी मंत्र्या-संत्र्यापर्यंत सगळ्यांना बक्कळ हप्ता जात असे.

असो.. लैला बार मध्ये आपल्याला मंदारला शोधून देणारे कुणीतरी भेटेलच या सार्थ आशेने डिग्री, मदन, नसीर आणि चंदू तिथे पोहोचले.

साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुख्य रस्ता सोडल्यावर ते चौघे आतल्या बाजूच्या साधारण चार मीटरच्या अरूंद गल्लीत शिरले. वरती लैला बारचा डिजिटल बोर्ड जरी आकर्षक लाईटींगमुळे चकचकत असला तरी त्याकडे फारसे कुणाचे लक्ष जायचे नाही. कारण रस्त्याच्या दुतर्फा एकसोएक लावण्यवती तृतीयपंथी आपल्या अदाकारींचा जलवा प्रदर्शित करत असत.

डिग्री, मदन आणि नसीर पूर्वीही तिथं आले होते. त्यामुळे त्यांना त्यात फारसं काही आश्चर्य वाटत नव्हतं. परंतु चंदू त्या ऐरीयात पहिल्यांदाच आला होता. तो भरभरून त्या ललनांचा आणि त्यांच्या लटक्या नखरेल अदाकारींचा आस्वाद घेत होता. मौसमची सोबत त्याला राहूनराहून आठवू लागली.

थोडंस पुढे चालून आल्यावर नक्षत्रासारखी एक अप्सरा त्याला दिसली.. नेव्ही ब्लू कलरच्या साडीचा फिकट गुलाबी रंगाचा पदर छेडत ती ही त्याच्याकडंच पाहत होती. मेकअप भडकच वाटत होता पण तिची कमालीची फिगर आणि दातानं जरा दाबलेल्या रसरशीत लालभडक ओठांचा रस त्याला खुणावत होता. त्याच्या डोळ्यांतील भूक तीनं पाहताच ओळखली. तो आणखी थोडा जवळ येताच ती हळूच पुटपुटली..

"ये शाहरूख.. चल ना .. जन्नत दिखाती हुं.."

तिच्या प्रस्तावानं जणू चंदू घायाळ झाला. त्यानं पुढे पाहीलं बाकी तिघे त्याच्यापासून काही अंतरावर असलेल्या शिडीवरून वर चढत होते. चंदूने झपाझप पाऊलं उचलत त्यांना गाठलं.

"भाईलोग तुम चलो आगे मैं जरा इससे निपटके आता हुं.. आज इसको ले कर ही सुकून मिलेगा.." चंदूनं धडाधड त्यांना सांगितले.

"अबे क्या पागल हो गया है.." नसीर.

"अय... सांभाळून रहा इथं. माहीत पडलं तिनंच तुला घेतलं.. उद्या ढुंगण बाहेर काढून फिरशील.." मदनने हास्यावारी नेलं.

"चंदू.. अभी ये वक्त नहीं है.. रात को जाते टाईम उसको साथ लेके जायेंगे.." डिग्रीने त्याला समजावले.

पण चंदू मदनच्या पंच मुळे खजिल झाला होता. मनोमन मदनचा खून करावा असा विचार त्याच्या मनात आला.

**********

संध्याकाळ होत आली होती. आरीफने बाहेर पडताच फोनाफोनी करत आपल्या दोन-तीन भाईबंधूकडून त्या चौघांचे अड्डे, ठावठिकाणे जाणून घ्यायला सुरूवात केली. तसेच सर्वांना ते दिसतील तेव्हा कळविण्यास सांगितले होते. दोनएक तासात सर्व फिल्डींग लावल्यावर आरीफ भायच्या ठिकाणाच्या आसपासच्या परिसरात शोध घेण्यास तिकडे वळणारच होता की डिग्री आणि त्याचे साथीदार स्टेशन परीसरातल्या लैला बारजवळ नुकतेच आल्याची बातमी मिळाली.

आरीफने ताबडतोब मनूला फोन केला.

"उन चारों का पता चल गया है.. "

"हा.."

"अभी अभी लैला बार में इन्ट्री की है.."

"वहा का माहौल तुम्हे पता है.. सारे खबरीयोंका वही अड्डा है इसलिये वहा आने पर होशियार रहना.."

"मेरे खयाल से तु सिर्फ मंदार को भेज.. यहा पर मौसम की बहुतसी सहेलियां रह सकती है.. तुझे किसीने पहचान लिया तो मुसिबत हो सकती है.."

आरीफने आवश्यक त्या सुचना देत फोन ठेवला.

लाऊडस्पीकर ऑन मोड मध्ये असल्याने मंदारने संभाषण ऐकले होते.

"मी नाही जाणार असं होऊच शकत नाही.." मनू रागाने फुत्कारत म्हणाली.

"स्वीटहर्ट.. त्याचं म्हणणं बरोबर आहे.. आपल्याला त्यांचा खुन करायचा नाही.. तु तिथं गेलीस तर एकाचा तरी मुदडा पाडल्याशिवाय शांत रहाणार नाहीस.. वर तुला कुणी ओळखलं तर आपल्याला पुढच्या गोष्टी करणं अवघड जाऊ शकतं."

"अरे पण बदला मला घ्यायचाय..."

"तुला काय वाटतं त्यांना पकडून किंवा मारून बदला पूर्ण होईल...? ज्यानं मौसमला यात गोवलं त्याचं काय..? तो मुख्य सूत्रधार सापडेपर्यंत तुला बाहेर निघून चालणार नाही.. तसंही तु आपल्या टिमचा हुकमी एक्का आहेस.. तुला अजून कोणी पाहीलेलं नाही या प्रकरणात.. सो तुझ्यावर कुणालाच संशय येणार नाही.. मी आणि आरीफ त्यांच्याकडून खरं काय ते जाणून घेतो.. नेक्स्ट टाईम आय प्रॉमिस दॅट यु विल् लिड् दी ऑपरेशन.." मंदारने एखाद्या वकीलाप्रमाणे आपली बाजू स्पष्ट केली.

मंदारमध्ये हीच तर जादू होती, त्याचं म्हणनं तो समोरच्याला अश्यारीतीने पटवून द्यायचा की समोरच्या व्यक्तीला नकार देण्यास जागाच मिळायची नाही.

मनूनेही का-कू करत तो नाद सोडून दिल्याचे दाखविले.

मंदार तिथून एकटाच निघाला. सर्वात आधी तो त्या लॉजकडे वळाला जिथे त्यानं रूम घेतली होती. पंधरा मिनिटात खांद्यावर ब्लू अमेरीकन टुरीस्टर लटकवलेला एक इसम बाहेर पडला. डोक्यावर डार्कीश काळ्या रंगाची कॅप आणि ब्लॅक गॉगल्स लावलेला तो इसम शरीरयष्टीवरून तरी मंदारसारखाच भासत होता. हो.. तो मंदारच होता.

लॉजमध्ये घुसतानाचा मंदार आणि बाहेर पडलेला मंदार यांच्या वेशभूषेत आणि कपड्यांत बराच फरक होता. साहजिकच पोलिसांच्या कृपेमुळे त्याचा चेहरा मिडीयामध्ये आला होता. म्हणूनच त्याला लपूनछपून सर्व काही करणे भाग होते. रस्त्यावरच्या धावत्या ऑटो रिक्षाला हात दाखवत त्याने थांबविले. आणि कल्याण स्टेशनच्या दिशेने कुच केले.

*************

मंद लाईट्सचा प्रकाश त्या बारचं आतलं वातावरण अधिकच गडद करत होता. वेगवेगळ्या टेबलांवर अलगअलग तर्हेच्या माणसांच्या गुप्त मिटींगी चालू होत्या. काही टेबलांवरची माणसं तिथल्या सर्व्हंटशी अश्लील चाळे करत होती. डिग्री, मदन, नसीर आणि चंदू एका टेबलवर बसून कुणाची तरी वाट पाहत होते. चंदू राहून राहून आसपासचं सगळं निरखुन पाहण्यात मग्न होता.

अर्धा-पाऊनतास तसाच एक-एक पेग संपवण्यात घालवल्यावर नसीर कंटाळून गेला होता. चंदू अजूनही नेत्रसुख घेण्यात धन्यता मानत होता. मदन नसीरकडे रोखून पाहत होता. डिग्री मात्र शांतपणे सर्ववार नजर ठेवून होता. त्याचा खबरी केव्हाही तिथं आला असता.

"मैं जरा हलका हो के आता हुं.." नसीरने डाव्या हाताची करंगळी उंचावत दाखवली.

मुख्य हॉलपासून उजव्या कोपर्यात वॉशरूमकडे जाण्यासाठी एक चिंचोळी वाट केली होती. तिथलं वातावरणही काहीसं अंधारमय असंच होतं. अहं.. लाईटस् इश्शूज, लोडशेडिंग असलं काही कारण नव्हतं.. तिथं येणार्या सार्या कलंदरांची प्रायव्हसी म्हणून तशी अरेंजमेंट खास केली होती.

नसीर गेल्यावर पाच-दहा मिनिटांनी मदनही उठला आणि टॉयलेट रूमकडे प्रस्थान केले.

त्यांच्या मागावर असलेल्या आरीफने नसीर आणि मदनला टॉयलेट रूमकडे जाताना पाहीले. आणि तो कुणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने दबक्या पावलांनी त्यांच्या मागोमाग तिकडे जाण्यास निघाला. मंदारला याबाबत कळवावे असे त्याला मनोमन वाटले पण तितका वेळ नव्हता.

मदनला नसीरपाठोपाठ जाताना डिग्री संशयास्पद नजरेने त्याच्याकडे पाहत होता. मदन आणि नसीरमध्ये बर्याचदा खटके उडाले होते. शिवाय नुकतीच मदनने नसीरची कॉलर पकडली होती हे डिग्रीला आठवले. तसेच मौसमच्या खुनामध्ये मुख्य संशय डिग्रीला मदनवरच वाटत होता. म्हणूनच की काय आता त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.

इकडे वाॅश बेसिनमध्ये हात धुताना नसीरने आरश्यात पाहताना दाढीच्या एका पिकलेल्या केसावर नजर टाकत तोंड वाकडे केले. मागे टॉयलेट रूमचा बंद दरवाजा आरश्यातून स्पष्ट दिसत होता. नळ सुरू करून नसीर चेहरा धुण्यासाठी खाली झुकला.. ओंजळीत घेतलेले पाणी चेहर्यावर मारत तो आरश्यात पाहण्यासाठी म्हणून उठला आणि आरश्यामधल्या प्रतिबिंबातील झालेला बदल पाहून त्याच्या काळजात धस्स् झाले.. एक अनामिकशी भीती त्याच्या अंतर्मनाला स्पर्शून गेली.

जसा मनात काही वेगळाच विचार आला तसा डिग्री धावतच टॉयलेट रूमकडे पळाला. वाटेत त्याची धडक आरीफशी झाली.. पण सध्या त्याच्याकडे दूर्लक्ष करत डिग्रीने एकदाची आतमध्ये इन्ट्री मारली. आत घुसताना तो मदनच्या नावाने ओरडतच तीव्रतेने धावला.

मदन कमोडपासून एका हाताच्या दूरीवर गुडघ्यात वाकून बसला होता. डिग्री नुकताच तिथं पोहोचला आणि समोरचं दृश्य पाहून थिजला. मदनने मागे आलेल्या डिग्रीकडे पाहीले. त्याच्याकडे अविश्वासाने पाहत डिग्रीने तोंड फिरवले आणि तो नसीरला न्याहाळत आसपास नजर फिरवू लागला.

'नसीरचा खुन झाला होता. तोही इतक्या सफाईदारपणे की नसीरला बचावाची एकही संधी मिळाली नसावी. त्याचे हात उलट्या बाजूला वळाले होते पायांची हालतही जवळपास तशीच होती. आणि मुंडकं कमोडमध्ये झुकलं होतं. कुणीतरी जबरदस्त ताकद लावून नसीरच्या हाडांशी खेळलं होतं.'

डिग्रीला मदनवर संशय होता पण त्याची इतकी मजल जाईल का यावर शंकाही होती. मागून कुणाच्यातरी पाऊलांचा आवाज आला म्हणून सावध होत ते दोघे मागे फिरले. दरवाजा पुढे लोटलेल्या अवस्थेत होता. दरवाज्याजवळ येत ते बाहेरील आवाजाचा कानोसा घेऊ लागले.

जे कोणी बाहेरून येईल ते तिथलं दृश्य पाहून बोंबलणार एवढं नक्की होतं. म्हणून त्यानं आत पाऊल टाकल्याटाकल्याच त्याचं तोंड दाबायचं असं दोघांनी ठरवलं. पण तो पावलांचा आवाज असाच कुणा आयाराम गयारामचा असेल वा त्याच खुनी माणसाचा... आणि जर तोच असेल तर काय करायचे..? आता नाही म्हटले तरी डिग्री आणि मदनच्या मनात भीतीची ती लहर आलीच.

डिग्री आणि मदन दोघेही काहीशी ऊत्सुकता आणि काहीशी भीती अश्या द्विधा अवस्थेत दरवाज्याच्या मागे प्रतिकारात्मक तसेच बचावात्मक पवित्रा घेऊन उभे होते. पुढे काय होणार याची कल्पना कुणालाच नव्हती...

मंदार तिथं पोहोचला होता का..? मंदारनेच हे सर्व घडवून आणले की.. या सगळ्या प्रकरणात मदनचा हात होता..? मनू सारखं डॅशिंग व्यक्तीमत्व खरेच आणीबाणीच्या असल्या प्रसंगी घरीच बसलं असावं की तीनं या खेळात उडी मारली असावी..? का मुख्य सूत्रधार नवा व्हीलन बनून समोर आला होता..?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन भेटूया पुढील भागात...

क्रमशः