Dominant - 2 in Marathi Thriller by Nilesh Desai books and stories PDF | डॉमिनंट - 2

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

डॉमिनंट - 2

डॉमिनंट

भाग दोन

भाग एकपासून पुढे....

"हम्म्..."

.......................

"वो फोटोग्राफर तो अपना खासमखास है.......... हार्ड कॉपी कल तक मिल जायेगी.."

.....................

"ठिक..."

.....................

"उसकी फिक्र छोड दो.... काम लगभग पूरा होने को है....."

भारदस्त आवाजात पठाणी घातलेला तो अंगणातल्या व्हरांड्यात पाठमोरा उभा राहून फोनवर कुणाशीतरी बोलत होता. शरीरयष्टीही त्याच्या आवाजाला साजेशी अशीच तगडी होती. फोनवर बोलताना त्याच्या उजव्या हातातला चांदीचा जाडजूड कडा मागून सहज दिसून येत होता.

बोलणे संपताच त्याने आपल्या स्मार्टफोन वरून लगेच दुसरा नंबर डायल केला.

"हॅलो..."

....................

"फोटोग्राफर को पैसा देकर निकलने बोल... और उसको कलकी डिलीव्हरी का याद दिला दे..."

...........................

"हा उसका भी काम हो गया है... बाकी क्लियर करके जाने बोल दे..."

..............

"और रात को काम करके फौरन निकल आना.. याद रख 'बकरे' की मरम्मत करनी है.. पार्टी को खुनखराबा नही चाहीये..."

"ओके भाय..."
असा समोरून काहीश्या अस्पष्ट आवाजात होकार मिळताच याने फोन कट केला..

माणसाला बर्याचदा असे वाटते की सर्वकाही त्याच्या अंदाजानुसार चालले आहे, किंबहुना तो तसेच व्हावे यासाठी झटत असतो. पण खरेच असे होते का...? डाव जिंकण्यासाठी आवश्यक सर्व हुकमी पत्ते जरी समोरच्या माणसाकडे असले तरी त्यातूनही विरूद्ध बाजूला बसलेला एखादा गॅम्बलर तो डाव त्याच माणसावर उलटवून जिंकतो.

मदनला इन्स्ट्रक्शन देणारा भाय हा खरंतर कल्याणलगतच्या गावाजवळील झोपडपट्टीचा इरफान दादा होता. चोरी, हाल्फ मर्डर, छोटेमोठे दरोडे, खंडणी, हप्तावसुली ही त्याच्या उत्पन्नाची मुख्य साधने होती. चाळीशी पार केलेली असली तरी गुन्हेगारी जगतातल्या त्याच्या दीर्घ अनुभवामुळे तो लीडर बनला होता. कमाई जरी जास्त असली तरी त्याप्रकारचे राहणीमान दाखवण्यात त्याला स्वारस्य अजिबात नव्हते. मदन, डिग्री, नसीर, चंदू ही त्याचीच पाळलेली माणसं होती. त्यांच्या एकूण हालचाली आणि प्लॅनिंगवरून तरी ती या क्षेत्रात मुरलेली वाटत होती. मौसम तर फक्त त्यांचं प्यादं म्हणून तिथं होती.

इरफान भाय आपल्या माणसांना त्यांचा योग्य तो मोबदला कसाही करून मिळवून द्यायचा. हीच तर ती माणसे होती ज्यांच्यामुळे इरफान 'भाई' म्हणून मिरवू शकत होता.

मदनला जरी इरफान भायने पुढे करावयाच्या कृती स्पष्ट करून सांगितल्या असल्या तरी या सर्वामागचा सूत्रधार कुणी औरच होता. मंदारला इथं आणायचं कारणही त्यानेच निर्माण केलेलं होतं. आणि आता इरफान भायशी फोनवर संभाषण करून सर्वकाही सुरळीत असल्याची खात्री करून घेतली होती.

आणि मंदार... आतापर्यंत मंदारसोबतची आपापली भूमिका प्रत्येकाने चोख बजावली होती. पण मंदारने आपले रंग अजून दाखवलेच नव्हते.. तो फक्त वाट पाहत होता एका संधीची.. कारण तो जाणून होता त्याला इथपर्यंत आणणारी व्यक्ती कुणी औरच आहे. बाकी सगळे त्या व्यक्तीच्या इशार्यावर नाचणारे नाच्ये आहेत..

हो नाच्येच.. कारण इथं आल्यापासून भेटलेल्या कुठल्याही व्यक्तीला तो सहज लोळवू शकत होता. त्याच्या तोडीचं अजून त्याला या गेममध्ये कुणीच दिसलं नव्हतं. त्या मुख्य व्यक्तीला लवकरात लवकर शोधणं मंदारसाठी आवश्यक होतं.. आणि त्यासाठी त्यांच्या प्लॅनमध्ये नसलेलं असं काहीतरी घडणं गरजेचं होतं.

------------------------

मंदार बेडवर पडल्यापडल्या स्वतःशीच विचार करत होता.

'एक्झॅक्टली.... प्लॅन हे ठरवून दिलेल्या क्रमानुसारच एक्झिक्यूट होत असतात... प्लॅनविरूद्ध एखादी छोटीशी गोष्ट जरी घडली की संपूर्ण बनवलेला प्लॅन बदलावाच लागतो. आणि तिथेच चूक होण्याची शक्यता असते.'

मंदारच्या चेहर्यावर हसु उमटले. रात्रीचे साडेआठ वाजले होते. पोटात भुकेने सिगनल दिला होता.

बाजूला लागूनच रूम असल्याने मंदारने मौसमला तिच्या रूममध्ये जाताना पाहीले होते. झटकन उठून तो काही क्षणांतच रूम नंबर २०२ च्या दरवाज्यात होता. त्याने आजूबाजूला पाहीले आणि बेल वाजवली.

दरवाजा उघडताच मौसमच्या चेहर्यावर आश्चर्याची छटा त्याला दिसली.

"तू... आता... ईथे...." मौसमला त्याच्या येण्याचे नवल वाटत होते.

"का.. मित्र येऊ शकत नाही का भेटायला...." मंदारने तिरकस प्रश्न केला.

"हा.. हा.. नक्कीच येऊ शकतो..." मंदारला आतमध्ये घेत मौसम म्हणाली.

आत येता येता मंदारने रूममध्ये नजर फिरवली. मौसमची तयारीत पॅक केलेली बॅग पाहून तो चक्रावला.

"कुठे जाण्याची तयारी काय...?" मौसमकडे पाहत तो उद्गारला

"हो... इथले काम संपले.. आता सरळ घरी...." मौसम.

"ओह यार्... कसलं फुटकं नशिब घेऊन जन्माला आलोय मी..." मंदारनं तुटक शब्दांत आपलं दुःख दाखवलं. त्याच्या मनात एव्हाना पुढे करावयाच्या गणितांची आकडेमोड सुरू झाली होती.

मौसम तिला काही कळालं नसल्याचा भाव घेऊन त्याला पाहत होती..

"डिनर आणि आजची रात्र तुझ्यासोबत अविस्मरणीय अशी करण्याची माझी इच्छा बहुतेक मनातच राहील..." मंदारच्या बोलण्यात एकप्रकारची खंत होती.

आता आश्चर्यचकित होण्याची पाळी मौसमची होती..

"मी...? मी चालेन का तुला पण...तुझे पता है ना मैं कौन..." मौसम.

"त्याने काय फरक पडणार आहे... "

"इस लम्हे में तू मिल जाये तो तू हसीन शाम है,
क्या फर्क पडता है फिर, चाहे जो भी तेरा नाम है..."

मंद हसत तिच्या डोळ्यांत पाहत मंदारने तिला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.

"इमोशन में बहकके दोस्ती नहीं बढती दोस्त... मौसम मर्दों से दोस्ती पैसे के लिये ही करती है मग तुला पण एका रात्रीचे पाच हजार द्यावे लागतील...." तिनं आपला प्रोफेशनधर्म त्याच्यासमोर प्रस्तूत केला.

"सकाळी जाताना मागशील तितके भेटतील.." त्याच्या आवाजात दृढता होती.

मौसमने एक क्षण विचार केला. नाहीतरी मदनचे काम संपले होते आणि त्याने तिचे बाकीचे पैसे देऊन तिला रात्रीच निघण्यासाठीही सांगितले होते. मौसम आता तिच्या इतर कामांसाठी मोकळीच होती. मग आजची रात्र मंदारसोबत त्याच्या रूममध्ये घालवण्यात काहीच वावगे नव्हते. अर्थातच त्यातूनही एक्स्ट्रा कमाई होणारच होती.

मंदारला होकार देण्यासाठी ती आपले ओठ उघडणारच होती की मंदार कानोसा घेत दबक्या पावलांनी दरवाज्याकडे धावला. बाहेरून कसलीतरी चाहुल लागली होती. हलक्याश्या उघडलेल्या दरवाजातून मंदारने रूम सर्व्हंटला दुसर्या बाजूच्या एका रूममध्ये जाताना पाहीले. जेवणाच्या प्लेट्सचा टेबल बिघडलेली लिफ्ट पुन्हा चालू झाल्याची सुचना देत होता.

तो मागे फिरला आणि मौसमच्या उत्तराची प्रतिक्षा करू लागला. मौसमने इशार्यानेच होकार दिला.

"मी निघतो, तुझं जेवण कॅन्सल कर.. म्हणजे कुणाला शंका येणार नाही. (बाहेर बोट दाखवत) तो खाली गेला की माझ्या रूमवर ये..." मंदार मौसमला सुचना देऊन निघून गेला.

मौसमने मागे पाहीले. बेडवर तीची भरलेली बॅग होती. महत्वाचं म्हणजे त्यात मदनने दिलेले कामाचे उरलेले पन्नास हजार रुपये होते.

काही झालं तरी ते मंदारपासून लपवणे गरजेचे होते. कारण फुकटचा पैसा कुणाला हवाहवासा वाटत नाही, त्यात मंदार अजूनतरी तिच्यासाठी नविनच होता. पण ही रूम सोडणेही अत्यावश्यक होते, मदनला कळाले तर त्याच्या रागाला सामोरे जावे लागले असते. पहाटे कुणाच्याही नजरेत न येता निघायचे, असे तिने मनोमन ठरवले.

सगळं काही विशिष्ट पद्धतीत करायचं ठरवून तिने हातातल्या फोनकडे पाहीले. मघाशी मंदारच्या नकळत शिताफीने मोबाईलवर त्याचा काढलेला फोटो तिच्या हुशारकीचं प्रतिक होता.

अवघ्या पंधरा मिनिटात मौसम रूम नंबर २०१ मध्ये होती. जेवणाचे ताट भरलेले होते, मंदारने तिला जेवण्यासाठी खुणावले. तिने नकार दिला. खरं सांगायचं तर मंदारलाही हेच होतं. पण जेवण तपासण्यासाठी ते मौसमने थोडं तरी खाणं आवश्यक होतं.

"हे काय स्वीटी... तुला थोडं तरी खावंच लागेल..." असं म्हणत मंदारने बळेच तिच्यासमोर ताटातल्या मुख्य पदार्थांचा एकत्रित घास करून तिला खायला लावला.

थोडा वेळ रोमँटीक गप्पांमध्ये घालवल्यानंतर आणि आपल्या मनातल्या शंकेचं निरसन केल्यावर मंदारने आपली पोटातली भूक भागवली.

त्यानंतरची रात्र त्यांचीच होती..

-----------------------------

खाली पहील्या मजल्यावर बर्याच वेळापासून सुरू असलेली कसलीशी खलबतं नुकतीच थांबली होती. सगळी तयारी जवळपास होतच आली होती. नसीर खिडकीत उभा राहून सिगरेटचे झुरके ओढत नाकातून धूर सोडत होता. मदन आणि डिग्री हातातला शेवटचा पेग संपवतच होते. त्या सगळ्यांत थोडासा कच्चा असलेला चंदू नसीरकडे कुतूहलानं पाहतच होता.

चंदूला नेहमीच नसीरच्या नाकातून धूर सोडण्याच्या कसबाचं आश्चर्य वाटायचं.. त्यानंही सिगरेट ओढण्याचा एकदोनदा प्रयत्न केला होता. पण सिगरेट काही त्याची गर्लफ्रेंड व्हायला तयारच नव्हती.

मदननं नसीरकडे पाहणार्या चंदूकडे एक कटाक्ष टाकला.

"अरे... त्याला सोड... त्यात एवढं काय विशेष न्हाई..." मदन बोलू लागला तसे सगळे त्याच्याकडे पाहू लागले.

"तुला मी डोळ्यांतून धूर काढून दाखवू शकतो..." चंदूकडे पाहत मदन म्हणाला.

"तुला जास्त झालीयं... अजून काम संपलेलं नाय... सावध रहा म्हणे डोळ्यांतून धूर काढील..." चंदू उपहासानं मदनला म्हणाला.

"आरर् हाट्ट.. बीयर कुणाला चढती का कधी..." मदन चढ्या आवाजात उद्गारला.

भायच्या ऑर्डरमध्ये आजचा दिवस फक्त बीयरशिवाय कसलीही ड्रिंक न घेण्याचं बंधन होतं.
ऐन वक्ताला काम चोख होणं गरजेचं होतं.

"चल ये, तुला दाखवतो..." असं म्हणत मदन चंदूजवळ गेला.

चंदू अजूनही त्याच्याकडे अविश्वासाने पाहत होता. नसीर आणि डिग्री त्यांच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत होते.

मदनने सिगरेट पेटवली..

"हम्म... बघ डोळ्यात नीट बघ..." मदन काहीतरी महत्वाचं सांगत असल्यासारखं म्हणाला.

चंदू निरखून त्याच्या डोळ्यात लक्षपूर्वक पाहू लागला.

मदननं डोळे बंद करत श्वास भरून सिगरेटचा एक लांब झुरका ओढला. बीयर आणि सिगारेटची एकत्रित नशा त्याला झटका देऊन गेली... त्याच्या हातातील जळती सिगरेट चंदूच्या पायाला अर्धा-एक सेकंद चटका देऊन बाजूला झाली. मदनचे हळूहळू उघडणारे डोळे लालसर भासत होते.

सर्व लक्ष मदनच्या डोळ्यावर केंद्रीत असल्याने चंदूला सिगरेटचा चटका समजायला थोडा अवकाश लागला. पण त्याकडे दुर्लक्ष करत तो म्हणाला..

"भो×××च्या... कुठे आहे धूर....?" चंदू.

"हा..हा..हा.. माझ्या न्हाय तुझ्या डोळ्यात बघ...." चटक्यामुळे चंदूच्या डोळ्यातून आलेल्या अश्रूंकडे दर्शवीत मदन हसू लागला. त्याला साथ द्यायला नसीर आणि डिग्री तयारच होते.

चंदू झाला प्रकार समजून स्वतःच्या मूर्खपणावर खजिल झाला. पण काही बोलला नाही.

हसता हसता आलेला खोकला दाबण्यासाठी डिग्रीने पॅन्टच्या खिश्यात हात घालून रूमाल बाहेर काढला. त्याचवेळी रूमालासोबत खाली पडलेल्या किल्लीने सर्वांचेच हसू थांबविले.

वातावरण पुन्हा गंभीर झाले.. हीच ती डुप्लीकेट किल्ली होती.. रूम नंबर २०१ ची.. डिग्रीने संध्याकाळीच तिची सोय केली होती.. आज रात्री मंदारच्या रूमचा दरवाजा याच किल्लीने बाहेरून उघडला जाणार होता..

रात्रीचा एक वाजून गेला होता. गावालगतचा भाग असल्याने सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. थोडाफार रातकिड्यांचा आवाजच काय ती शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत होता.

लॉजमधल्या पायर्या वगळता बाकी जागेतल्या लाईटस् बंद झाल्या होत्या. मदनने बोटांत 'पंच' चढवला. नसीर, चंदू, डिग्री आपापल्या परीने सज्ज झाले.. सगळे बाहेर पडण्याआधी चंदू एकदा बाहेर जावून सर्व आलबेल असल्याची खात्री करून आला.

---------------------------

इकडे रूम नंबर २०१ मध्ये अंधार पसरला होता. आकाशातील चांदण्यांच्या खिडकीतून येणार्या काहीश्या प्रकाशामूळे मंदसा उजेड होता. पण तो उजेड फक्त मानवी आकृत्या दाखवण्याइतपतच होता. कुणाचा चेहरा दिसणे अवघडच..

बेडवर स्त्री आकृती असल्याने बहुधा ती मौसमच पालथी पहुडली असावी. मंदारसारख्या रानटी गड्यासोबत कदाचित तिची पहीलीच वेळ असावी. कारण नक्की सांगता येत नव्हते, त्यांच्यात काही झाल्याची शाश्वतीही देता येत नव्हती, पण मौसमच्या अवतारावरून तर 'तसली' शक्यता नाकारता येत नव्हती.

मानेवर रूळणारे तीचे केस विस्कटले होते. चादरीत अंग झाकल्यामुळे तिच्या अवस्थेचं ठिकसं वर्णन करता येत नव्हतं. एकंदरीत तीची फार दमछाक झाल्याचं चित्र समोर उभं राहीलं होतं.

समोर खुर्चीत मंदार कसलासा विचार करत बसला होता.

अचानक दरवाज्याजवळ झालेल्या चाहुलीनं मंदारचं चित्त भंग पावलं. तो दबक्या पावलांनी तिथं जाऊन कानोसा घेऊ लागला. कि-होल वर बाहेरून किल्ली लावल्याचा आवाज त्यानं स्पष्ट ऐकला.. किल्ली लागून लॉक हळूच उघडले... मंदार सावध झाला.. आजच घात होण्याचा त्याचा अंदाज खरा ठरू लागला होता.

करऽर.... करत जसा हळूहळू दरवाजा उघडू लागला... मंदार त्याच्या मागे आडोशाला आला... एक एक करत चार व्यक्ती शांतपणे आतमध्ये आल्या. काळोख जरी असला तरी त्यातल्या एका व्यक्तीने लाईटच्या बटणांची जागा पक्की ठाऊक असल्याप्रमाणे पहील्याच प्रयत्नात स्विच ऑन केले.

झटकन रूममध्ये प्रकाश पडला.. चौघांची नजर सर्वप्रथम बेडवर पालथ्या झोपलेल्या मौसमवर पडली.. तिला तिथं पाहताच त्या चौघांची अक्षरशः भंबेरी उडाली.. प्लॅन फसत असल्याचा विचार त्यांच्या मनाला शिवून गेला.

इतका खटाटोप करून बनवलेल्या डावाचा मौसममुळेच सत्यानाश होणार होता. मदन तर शिव्या घालतच मौसमवर धावून गेला. नसीर, डिग्री आणि चंदूही दातओठ खाऊन पुढे सरसावले. रागाच्या भरात ते चौघेही मंदारबाबत विसरूनच गेले.. आणि इथेच त्यांची घोडचूक झाली.. चूक...? नाही... .. एक अक्षम्य असा अपराध...

त्यांच्या गाफील राहण्यामुळे मंदारला काही क्षण का होईना आलेल्या प्रसंगाची जाणीव झाली आणि आपली चाल चालण्याची संधी मिळाली होती. ते काही क्षण त्याच्यासाठी पुरेसे होते..

लाईटस् च्या प्रकाशात मंदारने किडूकमिडूक हत्यारांनिशी आलेल्या त्या चौघांना मागून नीट न्याहाळत स्वीच ऑफ केला. पुन्हा रूममध्ये अंधार पसरला.

धप्प... करून लाथेचा एक मजबूत प्रहार सर्वात मागे असलेल्या चंदूच्या पाठीवर पडला.. त्या आघातानं चंदू कळवळत जाऊन बेडवर असलेल्या मौसम जवळ जाऊन पडला.

"आ....आहह...." मौसमच्या मुखातून वेदनेनं भरलेली अस्पष्ट अशी किंकाळी फुटली..

काय झाले ते पाहायला मागे वळणार्या नसीर आणि डिग्रीवर मंदार वीजेच्या चपळाईने धावला. पुढच्याच क्षणी डिग्री डाव्या बाजूला असलेल्या खुर्चीवर आदळला होता, तर नसीर बेडवर चंदू आणि मौसमच्या मध्ये असलेल्या जागेत पडला होता. चंदूचा उजवा हात नसीरच्या अंगाखाली आल्याने चंदू मोठ्या आवाजात विव्हळला.

मौसमची किंकाळी, चंदूचं विव्हळणं आणि डिग्रीचं खुर्चीवर आदळणं... फ्रिक्शन ऑफ सेकंद मधल्या या तिन्ही घटणांवर प्रतिसाद देताना मदनचे डोळे उजव्या बाजूकडून डावीकडे वळाले. परंतू त्याच्या नजरेच्या दृष्टीक्षेपात समोरून येणारा मंदारचा ठोसा त्याला दिसू शकला नाही.. चौघांपैकी कुणीही कल्पना सुद्धा केली नव्हती असं काहीसं त्यांच्यासोबत घडत होतं.

बेसावध क्षणी मंदारने त्या चौघांवर हल्ला चढवून एकप्रकारे आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं.

चंदू आणि नसीरनं आरडाओरड करत उठण्याचा प्रयत्न केला, परंतु मंदारने पुन्हा दोघांवर आपल्या बाहूबलाचा प्रयोग करून त्यांना फारशी हालचाल करू दिली नाही.

बाहेरची परीस्थिती जाणून घेण्यासाठी मंदार दरवाज्याजवळ आला. त्याने पाहीले की कॉरीडॉरमधल्या सर्व लाईट्स ऑन झाल्या होत्या आणि पायर्यांवरून दोन-तीन माणसे घाईत वर येत होती.

"डॅमीट.... रां×च्ये..." मंदारच्या तोंडातून रागातच उद्गार बाहेर पडले. चंदू आणि नसीरच्या गोंधळ घालण्याच्या हरकतीबद्दल त्यांना चांगलेच बदडून काढावे असा विचार त्याच्या मनात आला.

त्याने शक्य तितक्या लवकर डोअर आतून लॉक केला.

'थड्डडड.....थाड्ड्ड.....'

मंदार दरवाजा लावून मागे वळणार तितक्यात त्याच्या पाठीवर खुर्चीचा आघात झाला... आणि डिग्रीनं हातातली खुर्ची स्वतःच खाली केली.. मंदारच्या डोळ्यांतली आग डिग्रीला इतक्या अंधारातही स्पष्ट दिसली. त्याच्या तसल्या अवताराने डिग्रीचे धाबे दणाणले.

"असल्या फडतूसड्या प्लॅस्टिकच्या खुर्चीनं माझं काय होणार आहे रां×च्या...." असं म्हणत मंदारने डिग्रीच्या कानसूडात वाजवली त्याचा तडाखा इतका जबरदस्त होता की एकदोन क्षण डिग्रीचे कान वाजू लागले..

कमजोर सावजांना न्याहाळत वाघ जसा सभोवताली नजर फिरवतो तसा मंदार सगळ्यांकडे एकवार पाहत होता. समोर मदनच तेवढा सावरण्याच्या तयारीत दिसत होता... मंदारचा हात हत्यार काढण्यासाठी शर्टाच्या आतल्या बाजूस गेलाच होता की अचानक दरवाज्यावर 'धाडधाड' आवाज येऊ लागला..

मंदारच्या चेहर्यावरचा रंग त्या आवाजाने उडाला.. तिथून बाहेर पडणे त्यावेळी महत्वाचं होतं.. दरवाज्यातून जाणं शक्य नव्हतं... इतक्यात डिग्रीनं जवळ असलेले स्विच दाबून लाईट चालू केला.

डिग्रीला पुन्हा पकडून त्याला आपल्या डाव्या हाताचा प्रसाद देत मंदार बेडपर्यंत घेऊन आला.. डिग्रीनेही मंदारवर एक दोन प्रहार केले परंतु त्याचा फारसा फरक मंदारवर पडला नाही.. त्याला बेडवर चंदू आणि नसीरच्या अंगावर फेकत मंदार सावरलेल्या मदनकडेच वळणार होता की बेडवरचे दृष्य तो अचंबित होऊन पाहतच राहीला..

मौसमच्या मुखातून पुन्हा एकदा आवाज काढण्याचा प्रयत्न झाला होता...

बेडवर डिग्रीचा उजवा हात एका चाकूवर असून सोबत नसीर आणि चंदू दोघांचे रक्ताळलेले हात त्या चाकूभोवती होते. तो चाकू जवळपास पूर्णपणे मौसमच्या पाठीत छेदून गेला होता.. ती बिचारी वेदनेनं तळमळत मृत्यूची प्रतिक्षा करत असल्यासारखी निपचित पडून होती. त्यात भरीसभर म्हणून काय तर डिग्रीही तिच्या अंगावर आपलं धूड घेऊन पडला होता.

मंदार स्तब्ध होऊन तो प्रसंग पाहतच राहीला. दरवाजातून पुन्हा आवाज आला तसा भानावर येत मंदार तिथून निसटण्यासाठी सरसावला.. त्याच क्षणाला मदनच्या 'पंच' चा निसटता वार मंदारवर झाला.

'कर्रर्रर्......' मंदारचा शर्ट फाटून आतमध्ये छातीवर तो वार बसला होता...

अक्षरशः घाईघाईतच मंदारनं जखमेकडे दुर्लक्ष करत.... "हाड्ड्... भे×××...." पुटपुटत त्याने मदनला बाजूला ढकलले.. आणि सुसाट खिडकीच्या दिशेला पळाला.. खिडकीतून मागच्या भागाची त्याने अगोदरच पाहणी करून ठेवली होती. जवळच ठेवलेली अमेरीकन टुरीस्टर उचलत त्यानं खिडकीबाहेरचा कठडा गाठला... पहील्या झेपेला तो बिल्डींगच्या मागच्या बाजूला असलेल्या पाईपवर आणि दुसर्या झेपेत त्याच्या बाजूला असलेल्या फर्स्ट फ्लोअरच्या कमानीपर्यंत पोहोचला.. तिथून सरळ खाली असलेल्या झुडुपात उडी मारत त्यानं निसटण्याचा प्लॅन परफेक्टली एक्झिक्यूट केला होता.

लॉजचं नुकतंच रिनोव्हेट केलेल्या खुणांचे अवशेष तिथेही पडून होते. झुडुपात असलेल्या दगड, तुटलेल्या विटा आणि सिमेंटच्या गोण्या अंधारात त्याला दिसल्या नसल्याने खाली उडी मारल्यावर त्याच्या अंगावर शिरशिरी आली. काहीसा कण्हत त्याने आपला मोर्चा मेनरोड कडे वळवला...

चारही सर्राईत गुन्हेगारांचा प्लॅन त्यांच्या शहरात नव्याने आलेल्या इसमाने त्यांच्यावरच उलटवत आपलं वर्चस्व दाखवून दिलं होतं... खरंच तो 'डोमिनंट' असल्यासारखाच वागला होता...

क्रमशः