Matrutva - 6 in Marathi Fiction Stories by Vanita Bhogil books and stories PDF | मातृत्व - 6

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

मातृत्व - 6

#@मातृत्व@#(6)
सौ. वनिता स. भोगील

काकु काय सांगू मला काहीच सूचत नाही तुम्हीच सांगा क़ाय करु ते....
जोशी काकु म्हणतात, आमच्या नात्यातील गावी आहेत, त्याना सांगून स्वातिला तिकडे ठेवू नऊ महीने , नंतर बघू क़ाय करायच ते,पन तिचा सगळा खर्च तुला दयावे लागणार......
... पारस ने काकुपुढे हात जोडले,, काकु खुप उपकार झाले, तुम्ही संगाल ते मि करतो........
........ दुसऱ्या दिवशी स्वाति गावी जाते, पारस काकुकडे तिच्या खर्चाचे बरेच पैसे देतो,
स्वाति गेल्यावर पारस सुटकेचा निश्वास टाकतो,,,
पन पुढे क़ाय? या विचाराने। पुन्हा घाम फुटतो.
इकडे प्रिया आपल्या बाळाच्या स्वप्नात गुंग असते, जे आसपास घडत आहे याची कडिमात्र तिला कल्पना नसते,
दिवस भराभर निघुन जातात, पारस प्रत्येक महिन्याला काकु ला पैसे देत राहतो,प्रिया आपल्याच आयुष्यात रममाण असते,
,, प्रिया ला सातवा महीना लागतो, एक दिवस तिला आईचा फ़ोन येतो, सातवा महीना लागला आहे तर आपण डोहाळ जेवण करु.. प्रिया आईला बोलते की पारस ला बोलून बघते मग कळवते.....
.. संध्याकाळी दोघे ऑफिस मधून घरी येतात, जेवताना प्रिया विषय काढते, आई म्हणत होती डोहाळ जेवण करु म्हणून, करायचे का?
त्यावर पारस म्हणतो तुला जे योग्य वाटेल ते कर, तू आनंदी आहेस न मग झाल तर....
प्रिया खुश होऊन आईला कॉल करून सांगते,
तारीख ठरते,
प्रिया ऑफिस मधून आता डिलिव्हरी साठी सुट्टी घेते,पारस म्हणतो बर झाल सुट्टी घेतलिस ते,आता दोन महीने तरी आराम मिळेल.....
डोहाळ जेवण थाटात पार पड़त,,
प्रिया ची आई म्हणते प्रियाच पहिल बाळंतपन आहे त्यामुळे मि तिला माझ्या घरी घेवून जाते...
.. पण पारस काही बोलायच्या आत च प्रिया म्हणते नको तिकडे,
पारस चा जेवनाचा प्रॉब्लम होतो,, तूच इकडे येवून रहा म्हणजे सगळ सोइस्कर होईल...
ते आई आणी पारस दोघानाही पटत...
.. नंतर दोन दिवसानी ,,प्रिया हॉस्पिटल ला चेकअप साठी निघते,
जोशी काकु दारातच भेटतात..
काय ग प्रिया ,,कुठे निघालिस??
काकु नॉर्मल चेकअप साठी हॉस्पिटल ला चाले आहे.
.. त्यावर काकु लगेच बोलतात..
अग तुझे महीने भरत आलेत आणी तू अशी एकटी फिरते!!
वेळ विचारुन येते का?
मि पण येते तुझ्या सोबत..
..
अहो नको काकु.
कशाला उगीच त्रास तुम्हाला.

आग कसला त्रास?
तुझ्याजागी माझी स्वाती असती तर तिला एकटिला जावू दिल असत का मी,,
चल निघू.
दोघिजनी रिक्षा ने हॉस्पिटल ला जातात.
.. प्रिया चेकअप साठी आत जाते.
.... काकु इकडे नर्स, सिस्टर सोबत ओळख करून घेतात.
...
तासभरा नंतर प्रियाच सगळ आवरत.
प्रिया बाहेर आल्यावर काकु विचारतात ,,डॉक्टर नी क़ाय सांगितले, त्यावर प्रिया म्हणते,
काही नाही काकु सगळ नॉर्मल आहे काळजीच काही कारण नाही.
.. काकु लगेच प्रिया ला म्हणतात अग या डॉक्टरांच काही ख़र नसत, काही प्रॉब्लम असेल तरी सांगत नाहीत....
... प्रिया ला काळजी वाटते.
..
दोघी घरी येतात,
पुढच्या महिन्यात पण काकु प्रिया सोबत हॉस्पिटल ला जातात,
परत तिला तेच सांगतात...
.... नऊ महीने झाल्या नंतर प्रिया च्या एक दिवस पोटात कळा सुरु होतात ,, पारस ऑफिस ला असतो,प्रिया त्याला फोन करते,पण पारस ला वेळ लागणार हे दोघानाही माहित असत,
मग प्रिया काकुना बोलावते,
काकु लगेच टॅक्सी बोलवतात न प्रिया ला घेवून हॉस्पिटल ल गाठतात.
प्रिया ला एडमिट करून घेतात,थोड्याच वेळात पारस प्रिया च्या आईला घेऊन हॉस्पिटल ला पोहचतो,,,,,,,
जोशी काकु ना पारस विचारतो प्रिया कशी आहे?
त्यावर काकु म्हणतात काही ख़र नाही, नोर्मल डिलिव्हरी होईल की नाही काही सांगता येत नाही,
पारस डॉक्टर ना शोधू लागला, समोरून नर्स येत होती,तिला पारस आडवून वीचारु लागला ,,कशी आहे प्रिया ? काही तरी सांगा न.........