Matrutva - 1 in Marathi Fiction Stories by Vanita Bhogil books and stories PDF | मातृत्व - 1

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

मातृत्व - 1

**@# *मातृत्व* #@(1)
*सौ.वनिता स. भोगील***

जोशी काकू थोडी साखर मिळेल का?
,,,जोशी काकुनी दाराकडे पाहिल..
,,, अरे पारस तू होय,,,
ये ये.....
साखर आहे का म्हणून काय विचारतोस आलाच आहेस तर चहा च घेवून जा......
.... अहो नको काकु कशाला उगिच त्रास..
अरे त्रास कसला?
स्वाती पारस साठी चहा टाक ग!!!
हो आई"
..... पारस मोठ्या कंपनित मॅनेजर होता,,,, नोकरी लागली तेव्हापासून तो जोशी काकु च्या शेजारच्या फ्लैट मधे राहात होता...
त्याला जवळच अस कुणीच नव्हत, अनाथ आश्रमात मोठा झाला....
पुढे शिक्षण घेवून चांगली नोकरी पण लागली...
पारस ला मोठ्या पगारची नोकरी होती...
नोकरी लागून दीड वर्ष झाले असतील तेव्हापासून तो तिथेच राहात होता....
...... जोशी काकुंची मुलगी स्वाति,,, दिसायला बरी होती पण खुप आगाउ होती....
.. जोशी काकुना तर प्रश्नच पडला होता स्वाती च लग्न होईल की नाही ते,,
.... पारस स्वभावाने खुप शांत ,समंजस होता...
लहानपनापसुन एकटा राहिल्यामुळे तो लगेच कुणात मिसळत इसे....
...
त्याच त्यांच्याच ऑफिस मधे काम करणाऱ्या प्रिया शी काही महिन्या पूर्वी मैत्री झाली....
पुढे मैत्रिच रूपांतर प्रेमात झाल......
...... प्रिया पण पारस सारखीच शांत मन मिळावू होती....
.... तिला वडील नव्हते आई आणी मोठा भाऊ अस तीच कुटुंब होत...इकडे जोशी काकु स्वाती च लग्न पारस सोबत व्हाव म्हणून विचार करत होत्या,
स्वतीला पण पारस आवडत असे...
..प्रिया घरी पण प्रिया ने पारस बद्दल सांगितले होते,
दोघांच लग्न करायच ठरल,,
पारस प्रिया च्या आई आणि भावाला जाऊन भेटला,,,
स्वभाव चांगला आणी चांगली नोकरी,,, त्यामुळे प्रियाच्या आई अण भावाने लगेच लग्नासाठी होकार दिला......
... एक दिवस मुहूर्त बघून अगदी साध्या पद्धतीने प्रिया आणी पारस च देवा ब्राम्हणाच्या साक्षिणे लग्न पार पडल,,,,
पारस कडून कुणीही नव्हते,, प्रियाकडची थोडीफार पाहुणे मंडळी होती,,
,, सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन प्रिया आणी पारस दोघे पारस राहत होता तिथे आले,,,
.... पारस आणी प्रिया ला लग्नाच्या जोड्यात पाहुन सोसायतीतिल ओळखीच्या लोकांनी पारस आणी प्रिया च अभिनंदन केल....
.........पारस प्रिया घरी आले ,,,
पारस ने दार उघडले, तो प्रिया ला म्हणाला आपल्या घरात मोठ कुणीच नाही त्यामुळे सगळ्या रीती रिवाज करता येणार नाहीत.....
.. so मीच तुझ स्वागत करतो,,,,,
,,,,,,Wel come रानीसाहेब म्हणून त्याने प्रियाच स्वागत केल,,
प्रिया ने पण आनंदात घरात पाऊल टाकल..
तेवढ्यात जोशी काकु बाहेर आल्या,,,
,, पारस सोबत नवरी मुलगी पाहुन त्याना धक्काच बसला..
.. पण तस चेहऱ्यावर न दाखवता, म्हणाल्या ,काय रे पारस .. आम्हाला न सांगता लग्न केलस की काय?
हो काकु.....
सॉरी पण माझे कुणीच नात्यातील नव्हते म्हणून मी तुम्हाला पण सांगीतल नाही,
आणि आम्ही अगदी साध्या पद्धतित लग्न केल.......
.... मनात खुप राग आलेला असून पण काकुनी तस न वागता ,उलट म्हणाल्या बर झाल बाबा। चांगल केलस,,,
मग काय आता बायकोची ओळख करून देणार आहेस की असच बोलत राहणार?
पारस म्हणाला अहो काकु तस काही नाही,,
,,,
ही प्रिया माझ्याच ऑफिस मधे ,, आम्ही सोबतच काम करतो,,, तिथेच ओळख झाली....
काकु प्रिया कड़े टक लावून बघत होत्या,,,,,
परत म्हणाल्या, काय बाई लग्न करून आलास पन नवीन नवरीच स्वागत करायला दूसर कुणीच नाही...
स्वाति ए स्वाति अग ऐकलस का?
पारस ने लग्न केले, बाहेर येवून बघ तरी,,,
आणी हो येताना औक्षणाच ताट घेवून ये,,, नवीन नवरा नवरीच आपणच औक्षण करु,,,,,
अहो काकु कशाला,,, लगेच पारस म्हणला, उगिच त्रास तुम्हाला,
प्रिया ला मि सगळ सांगीतल आहे,, मी अनाथ आहे म्हणून,, त्यामुळे तिला अस काही वाटनार नाही ,,,