Matrutva - 5 in Marathi Fiction Stories by Vanita Bhogil books and stories PDF | मातृत्व - 5

Featured Books
Categories
Share

मातृत्व - 5

#@मातृत्व@#(5)
सौ. वनिता स. भोगील

.....काकु स्वातीला वीचारु लागल्या,, अग रडायला काय झाल...त्यावर स्वाति जास्त च रडू लागली,,,
पारस नुसता बघत उभा होता, क़ाय झाल ते त्याला काहीच कळत नव्हत.............
..... काकु स्वातिला म्हणाल्या अस तू रडत राहिली तर मला कस कळेल क़ाय झाल ते.
मग स्वाती ने डोळे पुसले, आणी सांगू लागली...
आई, मी पारस साठी जेवन घेवून आले, तो फ्रेश होवून जेवायला बसला, मला वाटले प्रिया नाही तर हा पोटभर जेवनार नाही, म्हणून मि इकडेच थांबले......
याच जेवून झाल्यावर मी आपल्या घरी यायला निघाले, तेवढ्यात पारसने माझा हात धरला,, आणी आणी.....
आणी क़ाय? पुढे बोल,काकु म्हणाल्या...
... आई पारस ने माझ्यावर जबरदस्ती केली, मी त्याच्या तावडीतुन सुटण्याचा खुप प्रयत्न केला पन माझी ताकद अपुरी पडली...........
.......
पारस विचार करत होता मला कस आठवत नाही,,
तो म्हणाला, स्वाती काहीतरी क़ाय बोलते, मी आस करायचा कधी विचारसुधा करु शकत नाही...
... तू सांगितले ते सगळ खोट आहे, मग मी अस काही केल असत तर मला कस आठवत नाही,,,,
त्यावर काकु म्हणाल्या.. पारस..तू असा असशील अस कधी वाटल नव्हत, मी पोलिस कंप्लेंट करायला जाते, माझ्या मुलीवर तू जबरदस्ती केलिस म्हणून.......
... मग तुला पोलिस घेवून जातील तेव्हा आठवेल सगळ बरोबर,,,,,,,
,,,,पारस म्हनाला अहो काकु अस का करता मि काहीही केलेल नाही...
काकु म्हणाल्या मग ठीक आहे जे व्हायच ते पोलिसस्टेशन ला बघू....
पारस खुप घाबरला ,त्याला काहीच सूचत नव्हते,
आपण अस कस करु शकतो यावर त्याचा स्वतचा विश्वास बसत नव्हता.......
......त्याने काकुचे पाय धरले,,,
काकु मला थोड़ा वेळ दया...
..... लगेच नका निर्णय घेवू,
काकु........
.... ठीक आहे,,सकाळ पर्यंत तुझ्याकडे वेळ आहे, म्हणून स्वातीला घेवून निघुन गेल्या..
पारस डोक्याला हात लावून तसाच जमिनीवर बसला,,,
रात्रि एवढ सगळ घडल, मग मला काहीच कस आठवत नाही..
.. डोक पण जड़ झालय, काहीच सूचत नाही..
काकु जर पोलिसात गेल्या तर माझी क़ाय इज्जत राहिल,, ख़र खोट ते नंतर पण मी अस काही केले आणी त्यामुळे पोलिस मला घेवून गेलेत हे सगळ्यांना कळल्यावर माझ तर जगन मुश्किल होईल........
..... आणी प्रिया तीच काय,, तिच्यासाठी हा धक्का पचवन खूपच कठीन आहे....
चकरावून गेल्यासारख पारस विचार करत होता.
पोलिसस्टेशन सोडून काही करता येईल का?
स्वातीची आणी काकुची पाय धरून क्षमा?
नाही.. काकु ऐकनार नाहीत.
मग क़ाय मार्ग निघेल.....
असे असंख्य विचार पारस करत होता.....तेवढ्यात पाचचा अलार्म वाजला..
पारस विचार करून थकला, मार्ग काही सूचत नव्हता,,
उठून फ्रेश झाला, देवाजवळ दिवा लावून हात जोडले, देवा मार्ग दाखवा म्हणून विनवनी केली.....
.....
तोपर्यंत सात वाजत आलेल्या..
दार वाजले तस पारस घाबरला,,
दार उघडले तर समोर काकु उभ्या होत्या,
पारस केलास का विचार?
काय करायच ठरवले तू?
पारस.... काकु आहो मि अस काही केल नाही...
काकु.... बर चल मग पोलिसात...
पारस.. काकु काही दूसरा पर्याय असेल तर सांगा, पोलिसात नको, माझी काय इज्जत राहिल समाजात....
काकु रागात म्हणाल्या ,,दूसरा पर्याय म्हणजे???
तू काय पैसे देवून आम्हाला विकत घेतो की काय?
आणी क़ाय रे, तू जरी पैसे। दयायला तयार झालास तरी देवून देवून किती देशील????
पारस च्या डोक्यात हा पर्याय नव्हताच आला पन स्वतः काकु म्हणतात म्हणजे बोलून बघायला काय हरक़त....
........
पारस काकु समोर जावुन उभा राहिला ,काकु तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो पण हे प्रकरण वाढवू नका प्लीज...
काकु.. माझी अजिबात तयारी नाही पण तू म्हणतो म्हणून एकते...
.. आता दोन लाख देशील का?
काकु!! दोन लाख?
बर देतो...
.. मी ऑफिस मधून येताना घेवून येतो,
....
काकु ठीक आहे म्हणून निघुन जातात..
मिटले एकदाचे, म्हणून पारस सुटकेचा श्वास घेतो...
संध्याकाळी ऑफिस मधून येताना पारस बैंक तून दोन लाख काढून आनतो...
घरी आल्या बरोबर काकुकडे जावुन पैसे त्यांच्या हातात देतो,,,
थैंक यू म्हणून घरी येतो...
खिशात मोबाइल वाजतो,, प्रिया चा फ़ोन,
बैग बाजूला ठेवून कॉल रेसिव्ह करतो...
तिकडूंन प्रिया म्हणते काय मला विसरला की काय?
आज दिवस भरात एकही कॉल नाही, क़ाय झाले?
पारस म्हणाला, अग अस काही नाही, ऑफिस मधे काम जास्त होत न म्हणून वेळच भेटला नाही...
आणी प्रिया तुला कसा विसरेल मी..... तू तर जीव आहेस माझा, पारस चे डोळे भरून येतात, चल मी तुला नंतर कॉल करतो, फ्रेश होवून, अस म्हणून पारस कॉल कट करतो..
विचारकरतो प्रिया ला जर रात्रि ची घटना समजली तर ति मला काय समजेल..
दोन दिवसांनी प्रिया येते,पारस काही फारस तिच्याशी बोलत नाही.
प्रियाला वाटते मि नव्हते म्हणून पारस नाराज असेल,,
,,, प्रिया तबेतीची काळजी घेत पुन्हा ऑफिस जॉइन करते,
,, पारस टेंशन मधेच असतो,
स्वताला अपराधी समजून प्रिया पासून लांब लांब राहतो,,
,,, ति जास्त विंचार करत नाही,ति येणाऱ्या बाळाच्या स्वप्नात दंग असते,
झालेल्या प्रकरणाला महिना उलटून गेलेला असतो,आता कुठे पारस थोड़ा रिलेक्स झाल्यासारख वागत असतो..
........... पण अचानक एक दिवस जोशी काकु पारस ला बोलावून घेतात,
,,, त्या दिवशी तू जे केलस त्याचे परिणाम खुप वाईट झालेत म्हणून सांगतात,,,
पारस घाबरून विचारतो,का? काय झाल?
अरे काय म्हणून क़ाय विचारतोस...
स्वाती ला दिवस गेलेत...... तू जे केलस त्यामुळे........
......
पारस ला काहीच सूचत नव्हत,
तो म्हणाला काकु मी अजुन पैसे देतो,
स्वातीला डॉक्टर कड़े घेवून जा, प्लीज, हात जोडतो मि, यातल काही प्रियाला समजल तर अनर्थ होईल.......
....
काकु म्हणाल्या ,तू सांगायच्या अगोदर मी तिला डॉक्टर कड़े घेवून गेले होते पण डॉक्टर नि अबोशन होऊ शकत नाही, स्वाति खुप अशक्त आहे आणि तिच्या जिवाला धोका आहे अस सांगीतल,,
आता क़ाय करायच तूच सांग .....