मागचा पूर्ण आठवडा मी अत्यंत कंटाळलेल्या अवस्थेत आणि छताकडे बघत घालवला होता.खिशात पैसे नाहीत, नोकरी नाही,काम नाही अशा स्थितीत. माझ्या जवळचा फोन हा एकमेव सोबती आणि आधार होता. एवढ्यात फोन वाजला. “ मी प्रीतम कपूर ची सेक्रेटरी रुधिरा बोलत्ये.” रुधिरा माझी मैत्रीण. आत्ताची की भूत काळातली? मी मनाला विचारलं. “ कशी आहेस रुधिरा?” “ प्रीतम कपूर ना तुम्हाला तातडीने भेटायचंय. येताय असं गृहीत धरू ना मी?” कोणतीही वैयाक्तीक ओळख असल्याचं न दाखवत तिने विचारलं.
तोतया - प्रकरण 1
प्रकरण १मागचा पूर्ण आठवडा मी अत्यंत कंटाळलेल्या अवस्थेत आणि छताकडे बघत घालवला होता.खिशात पैसे नाहीत, नोकरी नाही,काम नाही अशा माझ्या जवळचा फोन हा एकमेव सोबती आणि आधार होता. एवढ्यात फोन वाजला.“ मी प्रीतम कपूर ची सेक्रेटरी रुधिरा बोलत्ये.”रुधिरा माझी मैत्रीण. आत्ताची की भूत काळातली? मी मनाला विचारलं.“ कशी आहेस रुधिरा?”“ प्रीतम कपूर ना तुम्हाला तातडीने भेटायचंय. येताय असं गृहीत धरू ना मी?” कोणतीही वैयाक्तीक ओळख असल्याचं न दाखवत तिने विचारलं.“ तातडीने म्हणजे नक्की कधी? ”“ जेवण झाल्यावर.साधारण ३ वाजता दुपारी.”“ मी प्रीतम कपूर यांना काही रक्कम देणे लागतो.त्याच्या वसुलीसाठी नाही ना बोलावलंय?” मी विचारलं“ जॉब बद्दल आहे.” रुधिरा म्हणाली.मला ...Read More
तोतया - प्रकरण 3
तोतयाप्रकरण ३आज तिसरा दिवस..दुपारी मजहरने जेवण आणलं तेव्हा मी सह्या करत बसलो होतो. माझी सहीवर आता हुकुमत आली होती. त्याने माझा तिसरा हप्ता आणला होता.पाच हजाराचा ड्राफ्ट ! मला आता बाहेर नेण्यात येणार होतं.माझी तोतयेगिरी आता सुरु होणार होती. भालेकर आत आला त्याच्या हातात ब्रीफ केस होती.त्यातून एक लीगल पेपर बाहेर काढला. हिरवट रंगाचा. त्यावर काहीतरी मजकूर छापला होता.“ यावर पेन्सिल ने सही कर.”मी हातात पेन्सिल घेऊन अस्खलित पणे प्रखर प्रजापती ची सही ठोकली.भालेकर माझ्याकडे बघत होता.माझा आत्मविश्वास पाहून तो खुष झाला.“ आता पेनाने कर.” तो म्हणाला. मी केली. ती नीट निरखून पहात तो म्हणाला,“ पास झालास तू चक्रपाणी, ...Read More
तोतया - प्रकरण 4
तोतयाप्रकरण 4मी भालेकरवर कडाडल्यावर त्याचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता.रागाने लालेलाल झाला. मजहर माझ्या मागे होता त्यामुळे त्याचा चेहेरा दिसला पण त्याला ही आश्चर्य वाटलं असावं, पण भालेकरला मी ओरडल्यामुळेत्याला मनातून आनंद झाला असावा. भालेकर माझ्यावर काहीतरी ओरडणार होता पण मालविकाने त्याला हाताने खूण करून गप्प राहायला सांगितलं. ते दोघं निघून गेले आणि खोलीत आम्ही दोघंच होतो.तिने माझ्याकडे निरखून पाहिलं जणूकाही माझा अभ्यास केला आणि म्हणाली,“ तुझा मास्क काढून टाक.तू कसा आहेस मला बघायचंय.” मी बाथरूम मधे जाऊन मास्क काढला.बाहेर आलो.मी टेबलाजवळ उभा होतो आणि ती माझ्याकडे बघत होती.खाटिक जसा त्याच्या समोरच्या प्राण्याकडे बघेल तशी नजर वाटली मला.“ बस खाली.” ...Read More
तोतया - प्रकरण 2
तोतयाप्रकरण २मला तिथेच थांबायला सांगून तो गोरिलाला घेऊन बाहेर गेला. थोड्या वेळात मला गाडीत नेऊन बेशुद्ध करणारी म्हातारी बाई आली.तिच्या हातात तो छोटा कुत्रा होता.माझ्याशी असं वागल्या बद्दल ती माफी मागायला आली होती.“ तुझी आई हयात आहे?” अचानक तिने मला प्रश्न विचारला आणि मी हादरलोच.“ का? असं काय विचारताय?” मी विचारलं.“ सांग तर ”“ नाही ती पाच वर्षांपूर्वीच गेली.”“ ती जिवंत असती तर मी आज तुझ्या बाबत जे केलं तेच केलं असतं. आम्ही तुला ज्या माणसाचा तोतया व्हायला सांगतोय तो माझा मुलगा आहे.”“ माझ्या आईने असं कुणालाच बेशुद्ध करून पळवलं नसत.उगाच तिच्याबाबत वाईट बोलू नका.” मी भडकून म्हंटलं.“ संकटं ...Read More
तोतया - प्रकरण 5
तोतया प्रकरण 5प्रकरण ५रात्री माझ्या बेडवर मालविका आल्याचं स्वप्न मला पडलं मी चमकून जागा झालो रात्रीचे सव्वातीन वाजले होते अंमला मधून मी जागा झालो तेव्हा मला लक्षात आलं की ते स्वप्न नव्हतं.“तू खूप छान आहेस. ‘सर्वच’ बाबतीत” ती म्हणाली.“तू सुद्धा तशीच आहेस” मी म्हणालो“भालेकर तुझ्यावर खूप खुश आहे. तो म्हणत होता की तुला फोनवरील संभाषण खूप छान प्रकारे करता आलं.” मालविका म्हणाली.“मी मुळात अभिनेता आहे मालविका आणि हा अभिनय करण्यासाठीच मला इथे आणलं गेलंय. चक्क भाड्याने घेतलं गेलंय.” माझ्या बोलण्यात नकळत कटूता आली.“प्रखर ची परिस्थिती आणखीनच खराब झाल्ये, आज त्यानं मला ओळखलं पण नाही”मी किंचित सावध झालो. ही माझ्यावर ...Read More
तोतया - प्रकरण 6
तोतया प्रकरण 6मी पुन्हा सावध झालो माझ्या सह्या त्या खोट्या मृत्युपत्रावर केल्यानंतर मला दोन कोटी मिळतीलच याची काय खात्री शिवाय मी प्रखर प्रजापतीचा तोतया म्हणून होतो. प्रखरच्या मृत्युपत्रानंतर माझं अस्तित्वच संपणार होतं.मी तिच्याकडून आणखीन काही माहिती काढायचं ठरवलं कारण मला माझा निर्णय लगेच द्यायचा नव्हता मी तिला विचारलं,“ तू म्हणतेस त्याला पुरावा काय?”“ कशाचा?” तिने विचारलं.“ म्हणजे प्रखर प्रजापती तू म्हणतेस तसा दोन वर्षापासून आजारी आहे. बिछान्यातून उठू शकत नाही याला काय आधार आहे तुझ्याकडे?”“तसा पुरावा आहे, प्रखर चे स्टेट बँकेत फोर्ट मुंबई आणि दुबई बँकेत जे वैयक्तिक खाते आहे त्यावर व्यवहार करणे प्रखर ला शक्य नव्हते, तेव्हा त्याने ...Read More
तोतया - प्रकरण 7
तोतया प्रकरण 7रात्री मला नीट झोप लागली नाही. माझ्या मनात विचार आला समजा प्राशिलाचा खून करण्यासाठी मालविकाने मजहरला पटवलं मला प्राशिलाला सांगावं लागेल की मालविका ने प्रजापतीशी लग्न केलेलं नाही आणि खोटा लग्नाचा दाखला आणि मृत्युपत्र तयार करण्यासाठी ती मला पटवते आहे. समजा मी प्राशिलाला हे सगळं सांगितलं तर काय होईल? माझ्या हातात एक हुकमाचं पान घेईल. पुढच्या कुठल्याही कागदपत्रावर मी सही करणार नाही असा स्पष्ट नकार मी देऊ शकेन. नंतर माझ्या मनात भालेकर बद्दल विचार आला. तो फार क्रूर होता. तो मला बळजबरी करू शकेल का सह्या करण्यासाठी? त्याला गरज होती म्हणून तो मला ठार मारणार नाही पण ...Read More
तोतया - प्रकरण 8
तोतया प्रकरण 8दिवसा पळून जायचं तर मला पहारेकर्यांना चकवा देता आला पाहिजे. प्रजापतीचा मास्क घालून मी तो सहज देऊ होतो फक्त त्यावेळी मजहर तिथे असता कामा नये एवढीच काळजी मला घ्यायची होती मी ठरवलं की काहीतरी निमित्त काढून बाजूला खाली घेऊन जायचं. बंगल्याच्या खालच्या गॅरेजमध्ये जग्वार, रोल्स राईस आणि मर्सिडीज अशा तीन गाड्या होत्या. कुठल्या गाडीने पळून जाणं जास्त सोयीस्कर आहे असा विचार माझ्या मनात आला..मजहर आत आला. मी त्याला काल दिलेल्या बातमीचा त्याच्यावर काय परिणाम झाला असेल याचा अंदाज घ्यायचा मी प्रयत्न केला पण तो फारसे काही बोलला नाही.“अर्ध्या तासात आपण निघतो आहोत.” तो म्हणाला आणि आतल्या कपाटात ...Read More
तोतया - प्रकरण 9
प्रकरण 9सर्वात प्रथम मी बँकेत फोन लावला आणि त्यांना सांगितले की मला पैसे काढायचे आहेत तर माझ्या खात्यात जमा पस्तीस हजार पैकी पंधरा हजार इथल्या दुबई शाखेत त्यांनी वर्ग करावेत. पंधरा वीस मिनिटात ते जमा झाले आणि मी बँकेत जाऊन रक्कम काढली.या सर्वातून हे लक्षात आले की प्रजापती ने त्याचा शब्द पाळला होता, मला कुठेही फोन करता येईल, बाहेर जाता येईल असं तो म्हणाला होता, तसं खरंच झालं होतं.माझ्या होकाराची वाट न बघता त्याने ही व्यवस्था केली होती.मला उद्या नवीन कपडे आणि इतर गोष्टी खरेदीसाठी ही रक्कम लागणार होती.बरोबर पावणेसहा वाजता मी प्रजापतीला भेटायला गेलो. बाजूला भालेकर होता. माझा ...Read More
तोतया - प्रकरण 10
प्रकरण 10बाहेर साक्षात प्रखर मार्तंड प्रजापती उभा होता !***हा माणूस माझ्या कडे येईल अशी कधीच मी अपेक्षा केली नव्हती.“ चंद्रहास, तू या वेळी जागा आहेस? तुला डिस्टर्ब नाही ना केलं?” त्याने विचारलं. मी त्यांच्याकडे निरखून पाहिलं.त्यांचे हात थरथरत होते.मला जरा ते आजारी वाटले, पण त्यांना तसं भासवू न देता मी म्हणालो,“ छे, छे. मला आनंदच झाला उलट. पण तुम्ही का आलात इथे? मला निरोप पाठवला असता तर मीच आलो असतो.” मी म्हणालो.“ बस.मला तुझ्याशी खाजगी बोलायचं होतं जरा.” प्रजापती म्हणाले.मी अस्वस्थ झालो जरा.यांना काय बोलायचं असेल?“ कसं चाललंय तुझं आयुष्य?” प्रजापतीने विचारलं.जगातला दोन नंबरचा श्रीमंत माणूस माझ्या शेजारी बसून ...Read More