मंदोदरी नावाची कादंबरी वाचकाच्या हातात देतांना आनंद होत आहे. ही माझी एकशे बारावी पुस्तक असून त्र्यांशिवी कादंबरी आहे. या कादंबरीतून मी मंदोदरीची त्या काळात झालेली उपेक्षा मांडली आहे. विशेष करुन सांगतो की मंदोदरी ज्या काळात झाली. तो काळ पितृसत्ताक कुटूंबपद्धतीचा काळ होता व त्याही काळात पत्नीला किंवा स्रीजातीला विशेष असा दर्जा नव्हता. त्यामुळंच मंदोदरीची त्याकाळात उपेक्षाच झाली. या कादंबरीचं विशेषण असं की ही कादंबरी पुर्णच बाबतीत सत्यावर आधारीत नाही. काही काल्पनिक भागही यात टाकलेला आहे. ज्यातून मंदोदरी कादंबरी बृहद स्वरुपात साकारता आली.
मंदोदरी - भाग 1
० मंदोदरी या मंदोदरी नावाची कादंबरी वाचकाच्या हातात देतांना आनंद होत आहे. ही माझी एकशे बारावी पुस्तक असून त्र्यांशिवी कादंबरी आहे. या कादंबरीतून मी मंदोदरीची त्या काळात झालेली उपेक्षा मांडली आहे. विशेष करुन सांगतो की मंदोदरी ज्या काळात झाली. तो काळ पितृसत्ताक कुटूंबपद्धतीचा काळ होता व त्याही काळात पत्नीला किंवा स्रीजातीला विशेष असा दर्जा नव्हता. त्यामुळंच मंदोदरीची त्याकाळात उपेक्षाच झाली. या कादंबरीचं विशेषण असं की ही कादंबरी पुर्णच बाबतीत सत्यावर आधारीत नाही. काही काल्पनिक भागही यात टाकलेला आहे. ज्यातून मंदोदरी कादंबरी बृहद स्वरुपात साकारता आली. खरं तर मंदोदरी ...Read More
मंदोदरी - भाग 2
*******२****************** मंदोदरी सात्विक होती व ते सात्विकतेचं बाळकडू तिला तिच्या आईनंच पाजलं होतं लहानपणी. तसं तिची आईही तिच्याजवळ जास्त दिवस राहिली नाही. मंदोदरीच्या आईवडिलांचं नाव मय व हेमा. ज्या मयचा जन्म कश्यप ऋषी व दितीच्या गर्भातून झाला होता व हेमा ही एक स्वर्गातील अप्सरा होती. मंदोदरीला दोन भाऊ व एक बहीण होती. एक मायावी व दुसरा दुदूंभी. त्यांनीही तिच्यावर फारसे असे संस्कार केले नाही. परंतु भावानं तिला प्रेम दिलं व तिला कोणताच असा फारसा त्रास होवू दिला नाही. मंदोदरीची आई हेमा ही स्वर्गातील अप्सराच होती. ती पाताळलोकातील ...Read More
मंदोदरी - भाग 3
*****३********************** मंदोदरीही काही कमी नव्हती. ती पुर्वजन्मातील एक अप्सराच होती. तसं पाहिल्यास तिनं भगवान शिवाला प्रसन्न करुन एक वर होता. मला महापराक्रमी व विद्वान, पंडीत व्यक्ती मला पती म्हणून मिळावा. त्यानंतर भगवान शिव प्रसन्न झाले व त्यांनी तिला वर दिला. ज्यानुसार रावण तिला पती म्हणून लाभला. जो विद्वान होता. पंडीत होता व तसाच तो महापराक्रमीही होता. रावणाचे दोन भाऊ होते. विभीषण आणि कुंभकर्ण. कुंभकर्णाचा विवाह बलीची मुलगी वज्रज्वालाशी झाला होता. तसेच विभीषणाचा विवाह गंधर्वराज शैलेषची मुलगी सरमाशी झाला होता. त्यातच तिघंही आपआपल्या संसारात खुश होते. रावण व मंदोदरीचा विवाह हा भगवान शिवाच्या आराधनेतून झाला. तिची व त्याची पहिली भेट ...Read More
मंदोदरी - भाग 4
****४******************* सुलोचना सुंदर होती. तिच्या सुंदरतेनंच तिला स्वर्गातील अप्सराही बनवलं होतं व ती स्वर्गात नृत्य करुन देव लोकांचं मनोरंजन होती ती. तीच मेघनादची पत्नी बनली होती. तिचा जन्म हा नागलोकात झाला होता. म्हणतात की तिचा जन्म व तिचीच बहिण राजा जनकपत्नी सुनयनाचा जन्म हा वासूकीच्या अश्रुतून झाला. ती एक पतीव्रता स्री होती. ती सोज्वळ होती नव्हे तर अप्सरा. म्हणतात की ती स्वर्गातील रहिवाशी होती व तिला इंद्रजीतनं जिंकून आणलं होतं आणि तिच्याशी विवाह केला होता. कोण होती ती? तिचा इंद्रजीतशी संबंध कसा आला व तिनं इंद्रजीतशी विवाह का केला असावा? ही उत्तरं अनाकलनीय आहेत. कोणी म्हणतात की ना तेव्हा ...Read More
मंदोदरी - भाग 5
*******५******************* 'मी असा कोणता अपराध केला की राक्षसाच्या घरी येवून पडले.' सुलोचनाचा तो विचार. तसा तिच्या मनात बराच विचार ती विचार करीत होती, 'म्हणतात की स्वर्ग हा वेगळा आहे. तो पृथ्वीचा भाग नाही. पृथ्वीवर फक्त माणसंच जन्म घेतात. देव नाही. देव देवलोकात अर्थात स्वर्गभुमीत जन्म घेतात. जिथं ब्रम्हांड असतं. जिथं सात्विक लोकं राहतात. ते जर वाईट कर्म करीत असतील तर त्यांच्या त्यांच्या पापकर्मानुसार ते ते पापकर्म भोगण्यासाठी त्यांना थेट पृथ्वीवर पाठवलं जातं. जिथं नरकयातनाच जास्त असतात. स्वर्गात पाप करणारी मंडळी ही स्वर्गातून दंडीत झाल्यावर पृथ्वीवर आली की ती चांगले वर्तन ठेवत नाहीत. ते आपलं वर्तन हे राक्षसी प्रवृत्तीचे ठेवतात. ...Read More
मंदोदरी - भाग 6
*******६********************* सुलोचना मंदोदरीची स्नुषा. इंद्रजीतची भार्या होती. तिला सतत दुःख जाणवायचं इंद्रजीतशी विवाह केल्याबद्दल. मंदोदरीही सुलोचनेसारखाच विचार करीत होती. ती एकदा सुलोचनेला भेटली. तिच्या कक्षात गेली होती ती. त्यातच सुलोचनेनं तिला बिरादरीबद्दल प्रश्न केला. त्थावर तिचं सांत्वन करण्यासाठी ती म्हणाली, "सुलोचना, स्वर्गलोक राक्षस समजतात आपल्या बिरादरीला. परंतु आपल्या बिरादरीतील लोकांचं काय चुकलं. ही देव मंडळी पुरातन काळापासून आमचा रागच करतात. राग करतात की आम्हीच देवांना त्रास दिला. परंतु देव आणि राक्षस ही एकाच बापाची मुलं. परंतु ज्यावेळेस समुद्रमंथन झालं. तेव्हा समुद्रात मिळालेल्या अमृतकलशातील अमृताचं वाटप करण्यात आलं होतं. ज्यात दोन रांगा बनविण्यात आल्या. ज्यात अमृतवाटप हे एकाच रांगेत सुरु ...Read More