वायंगीभूत

(2)
  • 48
  • 0
  • 1.5k

पहिला कोंबडा झाला नी घरण उठली. काल रात्रीच्या रांधपाला नाचण्याचं पीठ संपलं होतं. आज काहीही करून दोन पायलीचं दळण करणंच भाग होतं. जावाना हाकारून तिने चुलीतला शेणगोळा बाहेर ओढला. अर्धी थापटी(गोलाकार शेणी) मोडून घेवून त्यावर चुलीतला शेणगोळा ठेवून तो फुंकणीने फोडून त्यावर रान शेणीचा कुस्कर टाकून फुंकर घालू लागली. थोड्याच वेळात चांगला जाळ धरल्यावर कोपऱ्यातल्या पिचुर्ड्या अलगद ठेवून त्या पेटायला लागल्यावर साण्यातल्या चिमूटभर तंबाखु घेवून तो भाजून त्याची मशेरी लावीत बायजा मागिलदारी गेली. दोणीजवळची पितळी दीडशेरी घेवून ती खोरणात (बहिर्दिशेला) निघाली. ती परत येवून हातपाय धुवून घरात येईपर्यंत जावा उठून दळणाच्या तयारीला लागलेल्या होत्या.

1

वायंगीभूत - भाग 1

पहिला कोंबडा झाला नी घरण उठली. काल रात्रीच्या रांधपाला नाचण्याचं पीठ संपलं होतं. आज काहीही करून दोन पायलीचं दळण भाग होतं. जावाना हाकारून तिने चुलीतला शेणगोळा बाहेर ओढला. अर्धी थापटी(गोलाकार शेणी) मोडून घेवून त्यावर चुलीतला शेणगोळा ठेवून तो फुंकणीने फोडून त्यावर रान शेणीचा कुस्कर टाकून फुंकर घालू लागली. थोड्याच वेळात चांगला जाळ धरल्यावर कोपऱ्यातल्या पिचुर्ड्या अलगद ठेवून त्या पेटायला लागल्यावर साण्यातल्या चिमूटभर तंबाखु घेवून तो भाजून त्याची मशेरी लावीत बायजा मागिलदारी गेली. दोणीजवळची पितळी दीडशेरी घेवून ती खोरणात (बहिर्दिशेला) निघाली. ती परत येवून हातपाय धुवून घरात येईपर्यंत जावा उठून दळणाच्या तयारीला लागलेल्या होत्या. ...Read More

2

वायंगीभूत - भाग 2

" आता तू आमका वळाकतस..... आमचा खानदानी घराणा. आमी गावचे मानकरी म्हाजन. दोनशे माड नी अडिजशे पोफ़ळ हा आमची. खंडी खंडाचा भात येता...... दुपिकी मळो...... हाल्लीच शंभर कलमांची बाग उटवली. पण चार बाजून येवडा उत्पान असोन आज मितीक पन्नास रुपाये म्हणशा तर गाटीक नाय आमच्या. येरे दिवसा नी भर रे पोटा अशी कुडवाळ तऱ्हा ..... आमच्या काय उतवाक् धूर लागना नाय. लय थळा सोदून झाली. पण एकाचो म्हणशा तर गुन नाय......" आलेली किरकोळ गिऱ्हायकं मार्गी लागल्यावर जिक्रियाने बाबुला आत न्हेला. भिंतीवर हाजी मलंगाचा फोटो लावून त्यासमोर चटई टाकून डोक्याला गलप बांधून म्हमद पालथा पडला ...Read More

3

वायंगीभूत - भाग 3

दणदणा तोडगा घेवून आला नी दुसऱ्या दिवशी तो शिपणं करायला गेला. चाळीसेक लाटा मारल्यावर लाट थांबवून दुसऱ्या ओळीत पाणी तो गेला नी बघतोतर सगळ्या ओळीत पाणी तुडुंब भरलेलं होतं. आश्चर्याचा भर ओसरल्यावर त्याच्या लक्षात आलं की हा त्या वायंग्याच्या चेड्याचा प्रताप होता. बागेत फिरून फिरून पडलेल्या सुपाऱ्या, नारळ पुंजावतानाही हाच चमत्कार व्हायचा. ओंजळ्भर सुपाऱ्या ठेवून बाबु पुन्हा पडीच्या सुपाऱ्या पुंजावून आणी पर्यंत मूळ जागी चौपट नग वाढलेले असत. कणगीतून भात उसपताना दोन चार मापटी उसपून पोत्यात ओती पर्यंत पोतं तोंडोतोंड भरत असे नी कणगीतून उसपल्यावरही कणगीतला ...Read More