दंगा नावाची ही पुस्तक वाचकाच्या हातात देतांना मला अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक तमाम शोषीत हिंदू मुस्लिम व धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या लोकांना प्रेरणा देणारी आहे. ही पुस्तक लिहिण्यामागे प्रेरणा ही दंग्याचीच आहे. नागपूरमध्ये असाच दंगा उसळला होता. तीच पाश्वभुमी लक्षात घेवून काल्पनिक पद्धतीनं ही दंगा नावाची पुस्तक तयार झाली आहे. सध्या देशात वाद आहेत. काही ठिकाणी धर्मावरुन वाद आहेत तर काही ठिकाणी भाषीक वाद आहेत. धार्मिक वाद हे नेहमीच होत असतात व ते आपण या देशात जेव्हापासून आपले पुर्वज माकड अवस्थेतून मानव अवस्थेत जमीनीवर राहायला आले. तेव्हापासूनच पाहात आहोत. जसे, आर्य व द्रविड वाद, बौद्ध, जैन व वैदिक वाद, हिंदू मुस्लिम वाद. पुर्वीपासूनच असे वाद चालायचे. आज त्यात एका नवीन वादाची तेवढी भर पडली. ज्याला भाषीक वाद म्हणतो. आज देशात धार्मिक वाद, राज्यात भाषीक वाद, समाजव्यवस्थेतील भ्रष्टाचार वाद घोटाळा, नोकरीतील खाजगी वाद, तसेच कुटूंबातील पती पत्नींचे वाद सतत चालत असतात.

1

दंगा - भाग 1 व 2

१ दंगा पुस्तकाविषयी थोडंसं. दंगा नावाची ही पुस्तक वाचकाच्या हातात देतांना अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक तमाम शोषीत हिंदू मुस्लिम व धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या लोकांना प्रेरणा देणारी आहे. ही पुस्तक लिहिण्यामागे प्रेरणा ही दंग्याचीच आहे. नागपूरमध्ये असाच दंगा उसळला होता. तीच पाश्वभुमी लक्षात घेवून काल्पनिक पद्धतीनं ही दंगा नावाची पुस्तक तयार झाली आहे. सध्या देशात वाद आहेत. काही ठिकाणी धर्मावरुन वाद आहेत तर काही ठिकाणी भाषीक वाद आहेत. धार्मिक वाद हे नेहमीच होत असतात व ते आपण या देशात जेव्हापासून आपले पुर्वज माकड अवस्थेतून मानव अवस्थेत जमीनीवर राहायला आले. तेव्हापासूनच पाहात ...Read More