परटाची अनशी तिच्या पोराला सखारामाला घेवून माहेरी चवान वाडीला जायला बाहेर पडली. चार सालामागे तिचा घोव मेल्यापासून तिला भावांचा मोठा उपराळा होता. मळ्यात तिच्या निर्वाहापुरती जमिन होती. शेतीच्या टायमाला उखळदुरा करून पायली भात नी दोन शेर नाचण्याचापेरा ती मजुरीची जोतं लावून करून घेई. दाड(भाताची रोपे) वीत भर झाली की माहेराहून तिचे भाऊ चार जोतं नी गडी पैरी धाडीत. आलेले जोतये नी पैरी दोन तीन दिवस आगरेवाडीत थांबून तिची लावणी पुरी करून देत. भात कापणी झाल्यावर मळ्यात कुळीथ, चवळी, कडवे, वरणे अशी कडदणं (
चकवा - भाग 1
चकवा भाग 1 परटाची अनशी तिच्या पोराला सखारामाला घेवून माहेरी चवान वाडीला जायला बाहेर पडली. चार सालामागे तिचा मेल्यापासून तिला भावांचा मोठा उपराळाहोता. मळ्यात तिच्या निर्वाहापुरती जमिन होती. शेतीच्या टायमाला उखळदुरा करून पायली भात नी दोन शेर नाचण्याचापेरा ती मजुरीची जोतं लावून करून घेई. दाड(भाताची रोपे) वीत भर झाली की माहेराहून तिचे भाऊ चार जोतं नी गडी पैरी धाडीत. आलेले जोतये नी पैरी दोन तीन दिवस आगरेवाडीत थांबून तिची लावणी पुरी करून देत. भात कापणी झाल्यावर मळ्यात कुळी ...Read More
चकवा - भाग 2
चकवा भाग 2 गुरं परतीला लागली त्यांच्या मागोमाग मायलेकरं चालत निघाली नी थोड्याच वेळात घाटीचं आलं. ही कुठची वाडी काय त्याची ओळख पटेना. पण थोड्याच वेळात घरं दिसायला लागली. पहिल्यानेच लागले त्या घराकडे अनशी निघाली. घरातला कोणतरी बापया आंगणात उभा होता. "भावजीनू , मी चिचेबुडच्या देवू परटाची मागारीण..... माजा म्हायार चवान वाडीत बाबू हडकराकडे...... परत येताना आमी वाट चुकॉन हय उतरलंव......." त्यांच हे बोलणं सुरु असताना घरातून दागिन्यानी मढलेली गोरी बाई पुढे आली. " तू चिचे बुडच्या साईत्र्ये परटीणीची सून ना ग्ये? तुजी सासू येवची आमच्या कडेन. तुजो घोव पण जीवत आसताना कवटां घेवन् येयाचो. ...Read More