प्रेमकविता : ओढ भेटीची
तुझ्या माझ्या वाटा ,ना बोलती सोबती,
दूर राहतोस तू,पण तुझे घर माझ्या मनाशी,
होईल का आपली भेट,काहीशी क्षणभरी,
जरी असलो आपण दोन टोकावरी
तुझ्यासाठीच मी की माझेच तू झाले
तुझ्या डोळ्यांनी का मला हे नजरकैद केले
मी पाहू शकत नाही माझ्या डोळ्यांनी थेट तुला
म्हणून सावलीतून शोधते तू आहेस कुठे आजूबाजूला
माझी पाऊले नेहमी तुझ्या भेटीला
प्रेमवेडे हे मन ओढते त्या दिशेला..