Marathi Quote in Thought by manasvi Manu

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

" असा कसा रे तू .... ना मला बघितलं , ना ऐकलं ... आणि चक्क प्रेमात पडला ... अरे आधी शहानिशा तरी करून घ्यायची ना . आणि वरून म्हणतो तू माझं सर्वस्व आहेस . बरं... जेव्हा कळलं आपण एकत्र येऊ शकतं नाही . माझ्या आयुष्याची काही शाश्वती नाही . तेव्हा तरी माघारी फिरायचस ना रे . इतकं सगळं माहीत असूनही तुझं प्रेम मात्र तेवढंच .... तसच ... लोकं म्हणतात या जगात प्रेम हे उरलेच नाही सगळा फक्त व्यवहार आहे . 😀... आता कसं सांगू त्यांना ....की या व्यवहारी जगात सुद्धा काही तुझ्या सारखे प्रेम वेडे आहेत .... जे फक्त प्रेम करतात . मला खरंच कधी कधी माझा स्वतःचा च हेवा वाटतो.... माझ्या मते मी या आजच्या काळात अगदीच Miss fit आहे . मला बऱ्याच गोष्टी कळत नाही सुचत नाही ... दिसणे तर राहूच द्या एकीकडे .... बाकी कसलेही गुण नाही माझ्यात ... तरीही या जगाच्या पाठीवर एक असा खुळा आहे जो माझ्या वर अतिशय ... म्हणजे च प्रमाणाबाहेर प्रेम करतो . त्याला नाही फरक पडत मी कशी दिसते . त्याला तर माझ्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम आहे . माझं हसणं , माझं बोलणं , माझं लाजणं , माझं गाणं .... अश्या एक ना अनेक गोष्टी ...या स्वार्थी जगात इतकं निस्वार्थी प्रेम करणं म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे . आणि वरून काही अपेक्षा सुध्दा नाही . लोकांनी आंधळ्या प्रेमाची बरीच व्याख्या केली ....पण मला विचारावस वाटतं ....

इतक्या डोळसपणे असं आंधळं प्रेम कोणी कोणावर कसं करू शकतं ...."

Marathi Thought by manasvi Manu : 112024974
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now