संकल्पना
संकल्पना मांडते या जीवनाची
अस्पष्ट माझ्या विचारांची
भोळी माझी विचारशैली
समाजाच्या रितीत अडकलेली
कधी जाईल या मनातून पुढे ?
हुळहुळ फक्त व्यक्त होण्याची
डगमग डगमग मनातील वादळ
वाट पाहतात त्या शब्दरूपी वाऱ्याची
संकल्पना मांडते या जीवनाची
अस्पष्ट माझ्या विचारांची
_ श्रेया