Marathi Quote in Poem by Kalyani Deshpande

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आठवण एखादी मनातली
मनाच्या तळातून येते काठावर
विसरून गेलेले गाणे एखादे
नकळत येऊन जाते ओठावर

आठवण एखादी मनातली
येते जशी पावसाची सर
भिजवून टाकते ती मनाला
उत्साहाचा जसा येई बहर

आठवण एखादी मनातली
येते जसा वाहता झरा
इकडून तिकडून वाहत जाई
अवखळ असा उनाड वारा

आठवण एखादी मनातली
येई घेऊन आनंदाची लहर
कधी रडवे तर कधी हसवे
ठाण मांडून करी कहर

आठवण एखादी मनातली
करेल एखाद्यावेळी तुम्हांस पॅनिक
आठवणी असतात पण जरुरी
जगण्याचं असतात त्या टॉनिक

Marathi Poem by Kalyani Deshpande : 111903539
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now