Marathi Quote in Poem by prajakta panari

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

तू आहेस ..... म्हणून


तू आहेस म्हणून या जगण्याला
मी अर्थ देवू पाहते
तुझ्यामुळे रोजच्या थकव्याला
मी हरवू पाहते

तुझ्यामुळे रोजच्या वाटाही
नव्या नव्याशा भासतात
तुझ्यामुळे हरवल्या मनाही
शोधणे मज शक्य होते

तुझ्याकडे येण्याची आस
मजला लढाया शिकवते
तुझ्या प्राप्तीची ती ओढ
रोज मज ऊर्मी देत जाते

सारे काही संपूनी जाता
तुच तर आशा माझी बनतोस
जीवनातल्या प्रश्नांचे
तुच तर उत्तर बनून येतोस

मुलगी असल्याच्या जाणीवा
कमजोर जेव्हा करतात
तेव्हा तुझ्यात लपल्या कल्पना
नाविन्याची दृष्टी नवी देतात

माझ्या परावलंबी ओळखीला
तुच तर स्वतंत्र करतोस
माझ्या मनाच्या मर्यादेला
तुच तर मुक्त करतोस
म्हणून तू न दिसता या दृष्टीला
जगणे जगणे न वाटते
म्हणून तू न दिसता या जगण्याला
जगणेही राख राख वाटते
म्हणून या मनास रे माझ्या
सोडून तू जावू नको स्वप्ना

Marathi Poem by prajakta panari : 111803839
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now