माय मराठी
अ" म्हणजे आई आणि "ई" म्हणजे ईश्वर.
" आ" आत्म्यातुन उमटतो साद ..
अन त्या विधात्याचे आम्ही पाईक.
"म" आपला मराठीचा, माय माऊली ती.
बाळ येते जन्माला अन हाक पहिली बोली भाषेतून.
पाटीवर गिरवत एक एक अक्षर.
"ग" "म" "भ" "न " होते मुळाक्षरांची ओळख.
गावो गावी,प्रांतोप्रांती रूप हिचे बदलत जाते.
अक्षर जरी वेगवेगळे,भाव कायम तेच राहते.
शब्द असो एक,अर्थ त्याचे नानाविध .
शब्दांची ही गंमत सारी,भाषा भाषा मध्ये सामावली.
कोणी असो मराठी,वा असो गुजराथी,असो पंजाबी.
बोल जरी वेगवेगळे,साऱ्या जगात गर्जते मातृभाषेची गोडी.