Marathi Quote in Shayri by Manish Chandale

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

शाळेतलं प्रेम

नित्याचं होतं माझं
कारण नसताना तुझ्या वर्गात येणं...
समोर तू असून सुध्दा
तुला चोरून पाहणं....

शाळा सुटल्यावर माझी
पावलं आपोआप तुझ्या
मागे वळायची....
घरी आई मात्र माझी
वाट बघून थकायची....

शाळे मध्ये तुझं लक्ष
माझ्याकडे राहाव म्हणून
खुप काही उद्योग करायचो....
या सगळ्यामुळे अभ्यासात
मात्र मी मागेच राहायचो....

इतर साऱ्या मुलींमध्ये मला फक्त
तूच आवडायचीस.....
शाळेच्या त्या कपड्यांमध्ये मला तू
परी भासायचीस....

खूप वेळ वाटायच सर्व
सांगावं तुला....
पण त्यावेळेस शिक्षकांचा
धाक वाटायचा मला....

या वयात असं होण योग्य की अयोग्य
याच विचारात मी असायचो....
त्यामुळेच तुझ्या समोर व्यक्त होण्याचा विचार
डोक्यातून काढून टाकायचो.....

मग पुढे शाळा सुटली पाटी ही फुटली....
आणि तुझी माझी Love Story
सुरू होण्या अगोदरच संपली....

- मनिष चांदले

Marathi Shayri by Manish Chandale : 111195189
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now